बेसबॉल खेळाविषयी माहिती Baseball information in Marathi

baseball information in marathi बेसबॉल हा खेळ १८४६ पासून इंग्लंड मध्ये खेळला जात होता असे बोलले जाते कारण यावर काही ठोस पुरावे नाहीत त्यानंतर अमेरिकेमध्ये या खेळामध्ये काही बदल घडवले आणि बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बनला आहे. baseball chi mahiti हा खेळ दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि मध्य अमेरीका तसेच कॅरिबियन, दक्षिण आशिया मध्ये बेसबॉल मोठ्या प्रमाणात खेळला जातो. या खेळामध्ये हि क्रिकेट सारखे बॅट आणि बॉल असते पण बेसबॉल चे बॅट हे क्रिकेट बॅटपेक्षा वेगळे असते हे बॅट दिसायला रॉडसारखे असते.

हा खेळ सुध्दा दोन विरोधी संघांमध्ये खेळला जातो आणि प्रत्येक संघात ९ खेळाडू असतात तसेच या खेळामध्ये एक खेळपट्टी असते आणि या खेळपट्टीवर खेळणाऱ्या खेळाडूला पिचर म्हणतात. या खेळामध्ये जो संघ बॅटिंग करत असतो त्यांचे पहिले उद्दीष्ट प्रथम खेळाडू सुरक्षितपणे पहिल्या बेसमध्ये जावून न आउट होता धावा बनवणे आणि विरोधी टीमचे लक्ष हे असते कि बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंना आउट करणे आणि धावा काढू न देणे.

baseball-information-in-marathi
baseball information in marathi

बेसबॉल खेळाची माहिती इतिहास नियम Baseball information in Marathi

बेसबॉल खेळाचा इतिहास ( history of baseball )

बेसबॉल या खेळाची सुरुवात कधीपासून झाली हे स्पष्ट झाले नाही पण बेसबॉल सारख्या एका खेळाचे वर्णन एका १४ व्या शतकात एका अहवालामध्ये आहे म्हणातले जाते. हा खेळ इंग्लंडमध्ये आधीपासून १८ व्या शतकाच्या मध्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या जुन्या खेळापासून विकसित झाला आहे म्हणजे ह्या खेळाची सुरुवात १८४६ पासून इंग्लंड मध्ये झाली त्यानंतर अमेरिकेने या खेळामध्ये काही बदल घडवले. १८७१ मध्ये प्रथम नॅशनल असोशीयन ऑफ प्रोफेशनल बेसबॉल प्लेयर्स ची स्थापना करण्यात आली. १९०० व्या दशकात हा खेळ असंख्य देशामध्ये खेळू लागला. हा खेळ उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, कॅरिबियन, दक्षिण कोरिया, जपान तसेच तैवान या देशांमध्ये हा खेळ लोकप्रिय आहे.

टेबल टेनिस खेळाविषयी माहिती 

बेसबॉल खेळासाठी वापरली जाणारी उपकरणे ( equipments used in baseball game information in marathi )

या खेळामध्ये बॅट आणि बॉल वापरले जाते. बॅट हे लाकडी, अल्युमिनियम किवा मेटलचे असते आणि बॉल पांढरा किवा लाल रंगाचा असतो आणि या बॉलचा व्यास ३ इंच असतो. फिल्डिंग करणारा संघ हॅन्डग्लोव्ह घालतात त्याला मीट्स म्हणतात त्याच बरोबर बॉडी पॅड, हेल्मेट आणि पॅडिंग या प्रकारची उपकरणे वाढवली जातात.

बेसबॉल खेळामध्ये स्कोरिंग कसे केले जाते ? ( scoring ) 

या खेळामध्ये स्कोर करण्यासाठी एकाद्या फलंदाजाने बॅटच्या सहाय्याने बॉल क्षेत्ररक्षण केलेल्या भागामध्ये मारला तर किवा चारही तळांवर फिरवला तर किवा एकाद्या खेळाडूने घरातील धाव घेतली तर अनिवार्य गुण मिळू शकतात. त्याचबरोबर जर एका पेक्षा जास्त खेळाडू एका तळावर असतील तर  एका हिट मध्ये फलंदाजी करणारा संघ अनेक गुण मिळवू शकतो ( एका हिट ४ गुण मिळवले जातात ).

बेसबॉल खेळाचे नियम ( rules of baseball )

  • बेसबॉल या खेळामध्ये दोन संघ असतात आणि प्रत्येकी संघांमध्ये ९ खेळाडू असतात.
  • या खेळामध्ये ९ डाव असतात ज्यामध्ये प्रत्येक संघ एकदा फलंदाजी करतो जर ९ डावानंतर दोन्ही संघामध्ये टाय झाला तर पुढे हा खेळ तसाच चालू ठेवला जातो जोपर्यंत विजेता मिळत नाही.
  • जर एकदा फलंदाजीचा क्रम ठरवला तर तो संपूर्ण खेळामध्ये बदलला जावू शकत नाही आणि जर काही कारणास्तव जर तो क्रम बदलावा लागला तर नवीन खेळाडूने पूर्वीच्या खेळाडूच्या क्रमाने फलंदाजी केली पाहिजे.
  • क्षेत्र रक्षक संघामध्ये पिचर, कॅचर, पहिला बेसमन, दुसरा बेसमन, तिसरा बेसमन, शॉर्टटॉप, डावे मैदान आणि मध्यभागी आणि उजवीकडे फिल्डमध्ये ३ आउटफिल्डर्स असतात.
  • जर एकदा फलंदाज बॉल मारण्यासाठी आपली बॅट स्विंग करतो अणि बॉल मारताना त्याच्या हातून काही चुक झाली तर स्ट्राइक चा विचार केला जातो.
  • फलंदाजी करताना जर स्ट्राइक असेल आणि फलंदाजाने आपली बॅट स्विंग न करता चार बॉल्स स्ट्राइक झोण च्या बाहेर गेले असतील तर फलंदाज पहिल्या बेसमध्ये जावू शकतात.

भारतीय लोकप्रिय बेसबॉल खेळाडू ( famous Indian baseball players )

दिनेश पटेल आणि रिंकू सिंग हे भारताचे बेसबॉल खेळाडू आहेत यांच्याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

दिनेश पटेल : Baseball Player Dinesh Patel

या खेळाडूचे पूर्ण नाव दिनेश कुमार पटेल असे आहे. या खेळाडूचा जन्म ८ मे १९८९ मध्ये झाला. दिनेश पटेल हा भारतीय उजव्या हाताचा बेसबॉल पिचर आहे ज्याने पिट्सबर्ग पायरेट्स संघटनेत खेळला आहे. दिनेश पटेल आणि रिंकू सिंग हे एकत्र खेळत होते. दिनेश पटेल हे भारतातील पहिले बेसबॉल खेळाडू होते जे अमेरिकन संघासोबत खेळले.

रिंकू सिंग : Baseball Player Rinku Sing

रिंकू सिंग यांचा जन्म ८ ऑगस्ट १९८८ मध्ये झाला. रिंकू सिंग हे भारतीय बेसबॉल खेळाडू आणि कुस्तीपट्टू होते. या खेळाडूने २००८ साली द मिलियन डॉलर आर्म या रियालिटी शो वर खेळपट्टी स्पर्धा जिंकल्यानंतर या खेळाडूला पिट्सबर्ग पायरेट्स या अमेरिकन संघाकडून प्रस्ताव आला आणि त्यानंतर रिंकू सिंग हे अमेरिकन बेसबॉल संघासाठी खेळू लागले.

बेसबॉल खेळाबद्दल काही तथ्ये ( facts of baseball information in marathi)

  • बेसबॉल खेळामध्ये सर्वाधिक चोरी बेस हा दुसरा बेस आहे.
  • बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे.
  • बेसबॉल या खेळामध्ये गोलंदाज करणाऱ्या खेळाडूला पिचर म्हणतात आणि फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला हिटर म्हणतात.
  • २००१ मध्ये लिटील लीग विश्व सिरीज बेसबॉल खेळ जिंकणारी मोने डेवीस हि पहिली महिला आहे.
  • आत्ता पर्यंत जवळ जवळ १०० देश आंतरराष्ट्रीय बेसबॉल फाउंडेशन चे सदस्य आहेत.
  • जपानमध्ये सर्वात मोठा बेसबॉल लीग खेळला जातो.
  • २०१४ मध्ये मेजर लीग बेसबॉलने जवळ जवळ ९ बिलियन कमवले होते.
  • न्यूयॉर्कन च्या यंकीस या खेळाडूने तब्बल २७ वेळा बेसबॉल विश्व सिरीज जिंकली आहे.
  • बेसबॉलला बऱ्याचदा राष्ट्रीय मनोरंजन म्हणून संबोधले जाते.

आम्ही दिलेल्या baseball information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बेसबॉल या खेळाबद्दल अधिक माहिती baseball chi mahiti असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या baseball information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि baseball game information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!