बासुंदी रेसिपी मराठी Basundi Recipe in Marathi

Basundi Recipe in Marathi – Recipe of Basundi in Marathi बासुंदी रेसिपी मराठी बासुंदी हा दुधापासून बनवला जाणारा एक गोड पदार्थ आहे आणि हा गोड पदार्थ आपण घरामध्ये कोणत्यातरी छोट्या किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी, सणांमध्ये किंवा लग्नाच्या कार्यक्रमामध्ये किंवा इतर समारंभामध्ये एक गोड डिश म्हणून बनवली जाते. बासुंदी हा गोड पदार्थ पश्चिम भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जातो म्हणजेच हा पदार्थ महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही ठिकाणी हा पदार्थ लोक खूप आनंदाने बनवतात आणि आवडीने खातात देखील. बासुंदी हि रेसिपी दुधाने, काही मसाल्यांनी आणि सुक्या मेव्यांनी अगदी कमी वेळेत म्हणजेच ३० मिनिटामध्ये बनवली जाते.

बासुंदी हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनतो. बासुंदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घरामध्ये सहजपणे उपलब्ध असते. बासुंदी हा पदार्थ खूप लोकांना आवडतो आणि म्हणूनच आज या लेखामध्ये घट्ट आणि स्वादिष्ट बासुंदी कशी बनवायची हे पाहूयात.

basundi recipe in marathi
basundi recipe in marathi

बासुंदी रेसिपी मराठी – Basundi Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
अटवण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ४० मिनिटे
पाककलापश्चिम भारतीय
वाढणी२ ते ३ व्यक्ती

बासुंदी म्हणजे काय ?

बासुंदी म्हणजे दुध गॅसवर आटवून ते घट्ट रबडी सारखे बनवणे आणि त्यामध्ये साखर घालून त्याचा गोडपणा वाढवणे आणि त्याची अजून चव वाढवण्यासाठी त्यामध्ये काजू, बदाम, चारोळ्या यासारखा सुखामेवा, वेलची पावडर घालणे. बासुंदी हे एक घट्ट, मलईदार आणि गोड भारतीय स्वादिष्ट डिश आहे.

बासुंदीसाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

बासुंदी बनवण्यासाठी काही मुख्य साहित्य लागते ज्याशिवाय बासुंदी बनू शकत नाही. चला तरमग पाहूयात बासुंदी साठी लागणारे मुख्य साहित्य.

  • दुध : दुध हा बासुंदी बनवण्यासाठी लागणारा एक मुख्य घटक आहे. बासुंदी बनवताना दुध हे मंद आचेवर आटवले जाते आणि ते घट्ट होईपर्यंत आणि त्याला मलई सुटे पर्यंत ते शिजवले जाते.
  • साखर : साखर हि बासुंदी मध्ये वापरली जाते कारण साखर घातल्यामुळे बासुंदीला गोड चव येते आणि म्हणूनच साखर हा या पदार्थातील महत्वाचा घटक आहे.
  • वेलची पावडर : आपण जर बासुंदीमध्ये वेलची पावडर टाकली तर बासुंदीला चांगला स्वाद येतो.

बासुंदी कशी बनवतात – how to make basundi in marathi recipe

बासुंदी हा पश्चिम भारतातील एक लोकप्रिय पदार्थ असून त्या भागातील छोट्या किंवा मोठ्या समारंभामध्ये बासुंदी हा गोड पदार्थ हमखास असतो आणि पदार्थ लोक अगदी चवीने खातात. आता आपण बासुंदी हा पदार्थ कसा बनवायचा आणि हे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
अटवण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ४० मिनिटे
पाककलापश्चिम भारतीय
वाढणी२ ते ३ व्यक्ती

बासुंदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make basundi 

बासुंदी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी खूप जास्त नसते आणि हा पदार्थ बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते.

  • १ लिटर दुध.
  • २ चमचे खवा.
  • १ चमचा काजू पावडर.
  • ३ ते ४ केशर धागे.
  • १ चमचा वेलची पावडर.
  • २ ते ३ मोठे चमचे साखर.
  • १ चमचा बदामचे काप.
  • १ चमचा चारोळी.
  • १/२ चमचा पिस्ता तुकडे.

बासुंदी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make basundi 

  • सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडेसे पाणी घालून त्यामध्ये केस भीज ठेवा.
  • त्यानंतर एक खोल भांडे घ्या आणि ते भांडे गॅसवर मोठ्या आचेवर ठेवून त्यामध्ये दुध घाला आणि ते दुध चांगले उकळून घ्या.
  • दुध उकळले कि गॅस आच मध्यम करा आणि दुध चांगले ढवळत रहा.
  • बासुंदी बनवतेवेळी आपल्याला सतत चमच्याने दुध ढवळत राहावे लागते.
  • हि प्रक्रिया जो पर्यंत दुध घट्ट होत नाही आणि दुधाला मलई येत नाही तो पर्यंत करा.
  • दुध आटवत असताना मध्यम आचेवर एक लहान कढई ठेवून त्यामध्ये थोडे तूप घाला आणि ते तूप गरम झाले कि त्यामध्ये बदाम, पिस्ता आणि चारोळ्या घालून तो सुकामेवा तळून घ्या. गॅस बंद करून तो तळलेला सुका मेवा एक प्लेटमध्ये काढून घ्या.
  • आता दुधामध्ये खवा व काजू पावडर घ्या आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. काजू पावडर घातल्यानंतर बासुंदी मध्ये काजूच्या पावडरच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या.
  • आता या मिश्रनामध्ये साखर घाला आणि ती चांगली विरघळूपर्यंत दुध मंद आचेवर ढवळत रहा.
  • आता आपली बासुंदी ८० टक्के तयार झाली, आता त्यामध्ये केशरचे पाणी, वेलची पावडर आणि तळलेला सुका मेवा टाका आणि हे सर्व बासुंदीमध्ये चांगले मिक्स करा.
  • आता गॅस बंद करा कारण तुमची स्वादिष्ट बासुंदी तयार झाली.
  • बासुंदी थोडी गार झाल्यानंतर ती फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवा.

सिताफळ बासुंदी कशी बनवायची – how to make custard apple Recipe in Marathi

भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बासुंदी बनवली जाते आणि वेगवेगळ्या ठिकाणी बासुंदी बनवण्याची पध्दत वेगवेगळी असते. तसेच बासुंदी या पदार्थाचे देखील वेगवेगळे प्रकार बनवले त्यामधील एक लोकप्रिय प्रकार म्हणजे शिताफळ बासुंदी. आता पाहूयात शिताफळ बासुंदी कशी बनवायची.

सिताफळ बासुंदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make custard apple basundi 

  • १ लिटर दुध.
  • २ मोठे चमचे साखर
  • १ चमचा वेलची पावडर.
  • १ सीताफळ.
  • १ चमचा बदामचे काप.
  • १ चमचा काजूचे काप.
  • १/२ चमचा पिस्ता.

सिताफळ बासुंदी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make custard apple basundi 

  • सर्वप्रथम शिताफळमधील बी काढून त्याचा गर काढून एका वाटीमध्ये ठेवा.
  • मग मध्यम आचेवर एक लहान कढई ठेवून त्यामध्ये थोडे तूप घाला आणि ते तूप गरम झाले कि त्यामध्ये बदाम, पिस्ता आणि काजू घालून तो सुकामेवा तळून घ्या. गॅस बंद करून तो तळलेला सुका मेवा एक प्लेटमध्ये काढून घ्या.
  • त्यानंतर एक खोल भांडे घ्या आणि ते भांडे गॅसवर मोठ्या आचेवर ठेवून त्यामध्ये दुध घाला आणि ते दुध चांगले उकळून घ्या.
  • दुध उकळले कि गॅस आच मध्यम करा आणि दुध चांगले ढवळत रहा.
  • बासुंदी बनवतेवेळी आपल्याला सतत चमच्याने दुध ढवळत राहावे लागते.
  • हि प्रक्रिया जो पर्यंत दुध घट्ट होत नाही आणि दुधाला मलई येत नाही तो पर्यंत करा.
  • आता या दुधामध्ये साखर घाला आणि ती चांगली विरघळूपर्यंत दुध मंद आचेवर ढवळत रहा.
  • मग त्यामध्ये वेलची पावडर आणि सुका मेवा घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या आणि बासुंदी थोडी गार होईपर्यंत वाट पहा.
  • बासुंदी गार झाली कि त्यामध्ये शिताफळचा गाभा घाला आणि ते चंगले मिक्स करून घ्या आणि ते गार होण्यासाठी १ तास ते २ तास फ्रीजमध्ये ठेवा.
  • तुमची शिताफळ बासुंदी तयार झाली.

बासुंदी सोबत काय खावे – serving suggestions 

  • आपण बासुंदीचा आस्वाद तसाच घेवू शकतो किंवा पुरी सोबत देखील आपण बासुंदी खाऊ शकतो.

आम्ही दिलेल्या basundi recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बासुंदी रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या khavyachi basundi recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि angoor basundi recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये basundi recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!