बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य Bermuda Triangle Information in Marathi

Bermuda Triangle Information in Marathi बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य माहिती आपल्याला हे शब्द ऐकल्यानंतर लगेचच बर्म्युडा ट्रँगल म्हणजे की हे जाणून घेण्याची उत्सुकता वाटत असते आणि म्हणून आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत बर्म्युडा ट्रँगल म्हणजे काय, ते कसे काम करते आणि त्यांचे रहस्य काय आहे. बर्म्युडा ट्रँगल हा उत्तर अटलांटिक महासागराच्या पश्चिमेकडील एक प्रदेश आहे जो त्रिकोणी आहे आणि ज्यामध्ये जहाजे, विमाने आणि लोक रहस्यमयरीत्या गायब झाल्याचे सांगितले जाते. बर्म्युडा ट्रँगल हि कथा प्रत्यक्षात ५६ वर्षांपूर्वीची म्हणजेच इ. स. १९६४ मध्ये सुरू झाली.

बर्म्युडा ट्रँगल हे नाव प्रथम अमेरिकन लेखक व्हिन्सेंट गॅडिस यांनी अर्गोसी मासिकात अटलांटिक महासागरातील त्रिकोणाच्या आकाराचे वर्णन करण्यासाठी वापरले होते त्याचबरोबर या भागाला ‘डेव्हिल्स ट्रँगल’ या नावाने देखील ओळखले जाते.

अनेक दशकांपासून या विषयावर चर्चा हजारो लोकप्रिय चित्रपट, पुस्तके आणि माहितीपटांमध्ये झाली असली तरीहि आज आपण या छोट्याश्या लेखामध्ये बर्म्युडा ट्रँगल या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. 

bermuda triangle information in marathi
bermuda triangle information in marathi

बर्म्युडा ट्रँगल विषयी माहिती  – Bermuda Triangle Information in Marathi

बर्म्युडा ट्रँगल म्हणजे काय ? 

 • बर्म्युडा ट्रँगल हा उत्तर अटलांटिक महासागराच्या पश्चिमेकडील एक प्रदेश आहे जो त्रिकोणी आहे आणि ज्यामध्ये जहाजे, विमाने आणि लोक रहस्यमयरीत्या गायब झाल्याचे सांगितले जाते किंवा काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
 • बर्म्युडा ट्रँगल हा एक अटलांटिक समुद्रामध्ये पाच लाख स्क्वेअर किलो मीटर मध्ये पसरलेला एक प्रदेश असून हे असे षटकोनी डगांच्यामुळे तयार होते आणि याचा अकरा त्रिकोणी असतो आणि या भागामध्ये जहाजे, विमाने आणि लोक रहस्यमयरीत्या गायब झाल्याचे सांगितले जाते.
 • या ठिकाणी एक हजारहून अधिक लोक, ७५ विमाने आणि १०० पेक्षा जास्त जहाजे गायब झाली आहेत.

बर्म्युडा ट्रँगल हे ठिकाण कोठे आहे ? 

बर्म्युडा ट्रँगल जेथे लोकांना जीव गमवावा लागतो ते ठिकाण अटलांटीक महासागरात तयार होते आणि हे फ्लोरीडाच्या मियामी, बर्म्युडा बेट आणि प्योर्टो रिकोच्या सॅन जुआन जवळ आहे. या ठिकाणी फ्लोरीडाच्या मियामी, बर्म्युडा बेट आणि प्योर्टो रिकोच्या सॅन जुआन हि ३ ठिकाणे एकमेकांना जोडलेली आहेत आणि तेथे एक त्रिकोण तयार झाला आहे आणि बर्म्युडा ट्रँगल म्हणतात.

बर्म्युडा ट्रँगलचा इतिहास – History of Bermuda Triangle in Marathi

या प्रदेशातील रहस्याबद्दल काही इतिहासकारांनी वेगवेगळे निष्कर्ष काढले आहेत आणि या ठिकाणी काही शास्त्रज्ञांना काही पुरावे मिळाले आहेत. १५ व्या शतकातील प्रसिद्ध खलाश ख्रिस्तोफर कोलंबस यांच्या जर्नलमध्ये या रहस्याबद्दलचा पहिला उल्लेख आढळतो. त्यांनी आपल्या प्रवासवर्णनात या प्रदेशाचा उल्लेख केला आहे, ज्यावेळी ते फ्लोरिडा या ठिकाणाहून प्रवास करत होते.

त्यावेळी त्यांना फ्लोरिडा आणि पोर्तो रिको दरम्यान न दिसणारी सीमा ओलांडल्यानंतर त्याच्या कंपासने काम करणे थांबवले. त्याचबरोबर त्यांनी असे देखील सांगितले कि या भागात आकाशातून आगीचा एक मोठा गोळा समुद्रात पडताना पाहिला आणि काही वेळाने समुद्रातून एक विचित्र प्रकाश दिसला. आणि तेव्हापासून या ठिकाणा बद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात.

बर्म्युडा ट्रँगलशी संबधित काही कथा – Bermuda Triangle Mystery in Marathi

बर्म्युडा ट्रँगल या ठिकाण संबधी अनेक भयानक आणि जीवघेण्या कथा घडल्या जसे कि १००० पेक्षा अधिक लोकांचे प्राण यामध्ये गेले तसेच जहाजे आणि विमाने गायब झाली ती परत सापडली नाहीत. यामधील काही कथा खाली दिलेल्या आहेत.

एलेन ऑस्टिन या जहाजाची कथा 

इ.स १८८० मध्ये एलेन ऑस्टिन नावाचे ब्रिटिश जहाज लंडन मधून न्यूयॉर्कला जात होते. हे जहाज शेवटच्या प्रवासाला निघाले तेव्हा त्यामध्ये अनेक लोक उपस्थित होते असे सांगितले जाते. इ. स. १८८० मध्ये लंडन ते न्यूयॉर्क असा प्रवास करताना ते एलेन ऑस्टिन नावाचे ब्रिटिश जहाज बर्म्युडा ट्रँगल परिसरात शेवटचा दिसले म्हणजेच ते जहाज त्या परिसरामध्ये गायब झाले असे सांगितले जाते.

अमेरिकेची ५ युद्ध विमाने गायब झाली 

फ्लाइट १९ नावाच्या पाच अमेरिकन युद्ध विमानांचा ताफा इ.स १९४५ मध्ये बर्म्युडा ट्रँगल परिसरामध्ये गायब झाली होती. फ्लाइट १९ ची पाच विमाने जी लढाऊ कसरत करण्यासाठी गेली होती ती पुन्हा पृथ्वीवर उतरली नाहीत.

डग्लस डीसी- ३ हे जहाज अचानक हरवले 

इ स १९४८ मध्ये पोर्टो रिकोहून मियामीला जाणारे प्रवासी विमान बर्म्युडा ट्रँगलच्या परिसरात अचानक गायब झाले. त्यावेळी त्या जहाजात ३२ प्रवासी होते आणि या ३२ प्रवाश्यांसोबत हे जहाज समुद्रामध्ये गायब झाले.

यूएसएस सायक्लोप्स जहाज गायब झाले होते 

१८१८ मध्ये यूएसएस सायक्लोप्स हे यूएस नेव्हीचे एक खूप मोठे मालवाहू जहाज बर्म्युडा ट्रँगल ठिकाणी हरवले होते. या जहाजामध्ये ३०० लोक होते आणि या जहाजाचे इंजिन जहाज गायब होण्याअगोदर खराब झाले होते.

बर्म्युडा ट्रँगल विषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – interesting facts about bermuda Triangle

 • ख्रिस्तोफर कोलंबसने जगाला प्रथम बर्म्युडा ट्रँगलची माहिती दिली. या त्रिकोणात होत असलेल्या उपक्रमांचा त्यांनी त्यांच्या लेखांत उल्लेख केला होता.
 • बर्म्युडा ट्रँगलच्या सभोवतालच्या हवामानाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी दावा केला आहे, की या त्रिकोणावर धोकादायक वारे वाहतात आणि त्यांचा वेग ताशी १७० मैल आहे.
 • या भागातील जहाजे, विमाने आणि लोक गायब होण्याच्या कारणावर अनेक संशोधने आणि अभ्यास झाले आहेत, परंतु अद्याप काहीही स्पष्टपणे ज्ञात नाही.
 • बर्म्युडा ट्रँगल हे युनायटेड स्टेट्सच्या पूर्व किनाऱ्यावर, फ्लोरिडा मियामी पासून फक्त १७७० किलोमीटर आणि हॅलिफॅक्स, नोव्हा स्कॉशिया, (कॅनडा) च्या दक्षिणेस १३५० किलोमीटर अंतरावर आहे.
 • या ठिकाणी एक हजारहून अधिक लोक, ७५ विमाने आणि १०० पेक्षा जास्त जहाजे गायब झाली आहेत.
 • बर्म्युडा ट्रँगल हा उत्तर अटलांटिक महासागराच्या पश्चिमेकडील एक प्रदेश आहे जो त्रिकोणी आहे आणि ज्यामध्ये जहाजे, विमाने आणि लोक रहस्यमयरीत्या गायब झाल्याचे सांगितले जाते
 • बर्म्युडा ट्रँगल या परिसराला डेव्हिल्स ट्रँगल या नावाने देखील ओळखले जाते.
 • १५ व्या शतकातील प्रसिद्ध खलाश ख्रिस्तोफर कोलंबस यांच्या जर्नलमध्ये या रहस्याबद्दलचा पहिला उल्लेख आढळतो आणि त्यांनी आपल्या प्रवासवर्णनात या प्रदेशाचा उल्लेख केला होता.

आम्ही दिलेल्या bermuda triangle information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बर्म्युडा ट्रँगल विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information of bermuda triangle in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about bermuda triangle in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bermuda triangle mystery in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!