भालाफेक माहिती Bhala Fek Information in Marathi

bhala fek information in marathi भालाफेक माहिती, भालाफेक हा खेळ वैयक्तिक खेळ असून हा खेळ ऑलंम्पिक मधील अॅथलेटीक्स मध्ये खेळला जातो. पूर्वी देखील हा खेळ परिचित होता परंतु पूर्वीच्या काळी याचा वापर हा शिकार करण्यासाठी आणि युध्दामध्ये शत्रूवर मात करण्यासाठी वापरला जात होता आणि नंतर काही दिवसांनी हि क्रिया एक खेळ म्हणून नावारूपाला आली आणि हा खेळ प्राचीन ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जात होता.

त्यानंतर १९०८ मध्ये पुरुषांच्यासाठी हा एक ऑलम्पिक खेळाचा भाग बनला तसेच १९३२ मध्ये ते हा खेळ महिला देखील ऑलम्पिकमध्ये खेळल्या जाऊ लागल्या.

पूर्वी हा खेळ म्हणावा तसा प्रसिध्द नव्हता परंतु सध्या पहिले तर या खेळाची व्याप्ती हि खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि हा खेळ ऑलम्पिक मध्ये देखील खेळला जातो आणि नुकत्याच झालेल्या ऑलम्पिक मध्ये भारताचा नीरज चोप्रा यांने या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवून आपल्या सोबत देशाचे नाव देखील खूप उंचावले आहे आणि हा खेळाबद्दल लोकप्रियता देखील मोठ्या प्रमाणत वाढली आहे. चला तर या खेळाविषयी सविस्तर माहिती आपण खाली पाहूया.

bhalafek information in marathi

भालाफेक माहिती Bhala Fek Information in Marathi

खेळाचे नावभालाफेक
इंग्रजी नावJavelin Throw
प्रकारमैदानी खेळ
खेळाची सुरुवातग्रीस मध्ये झाली
ऑलम्पिक सुरुवातपुरुषांचा खेळ १९०३ मध्ये आणि स्त्रियांचा खेळ १९३२ मध्ये.
भाल्याचे वजनपुरुषांच्यासाठी ८०० ग्रॅम आणि स्त्रीयांच्यासाठी ६०० ग्रॅम

स्पर्धेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाल्याची माहिती

खेळामध्ये वापरला जाणारा भाला हा दंडगोलाकार असतो आणि दोन्ही टोकांना खाली निमुळता असतो. त्याच बरोबर या खेळामध्ये देखील स्त्रिया आणि पुरुष असे विभाजन केले आहे आणि पुरुषांच्या खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाल्याचे वजन हे ८०० ग्रॅम इतके असावे लागते आणि या भाल्याची लांबी २.६ मीटर ते २.७ मीटर असते.

आणि महिलांच्या खेळामध्ये वापरला जाणारा भाला हा ६०० ग्रॅम वजनाचा असून त्याची लांबी हि २.२ मीटर ते २.३ मीटर इतकी असते. त्याचबरोबर भाल्याचे तीन भाग असतात ते म्हणजे डोके, शाफ्ट आणि एक दोरखंड पकड. भाल्याचा जो शाफ्ट असतो तो भाल्याचा मुख्य भाग असतो आणि तो भाग हा धातू पासून बनलेला असतो.

भालाफेक खेळाचे मैदान – bhala fek ground

कोणताही हि खेळ खेळण्यासाठी एक विशिष्ट अशी रचना केलेले मैदान हे गरजेचे असते आणि तसेच भालाफेक खेळ खेळण्यासाठी देखील एक विशिष्ठ रचना केली जाते. भालाफेक मैदान हे दोन भागामध्ये विभागलेले असते ते म्हणजे धावपट्टी आणि लँडिंग क्षेत्र.

धावपट्टी

धावपट्टी किंवा टेकऑफ क्षेत्र हे धावण्याच्या ट्रॅकचा एक भाग आहे जो भालाफेक करणाऱ्यांना त्यांनी भालाफेक करण्याअगोदर धावणे सुरु करण्यासाठी आणि भाला सोडण्यापूर्वी गती निर्माण करण्यासाठी अनुमती देते. या धावपट्टीची लांबी हि ३० मीटर असावी आणि काही परीस्थीतीमध्ये याची लांबी ३६.५० मीटर इतकी असू शकते.

आणि या धावपट्टीची रुंदी हि किमान ४ मीटर इतकी असावी. पुढे धावपट्टीवर शेवट थ्रोविंग पॉईंट हा चिन्हांकित केलेला असतो ज्याची त्रिज्या हि ८ मीटर इतकी असते आणि याला स्क्रॅच लाईन म्हणून देखील ओळखले जाते.

लँडिंग क्षेत्र

धावपट्टी समोर फनेल आकाराचे लँडिंग क्षेत्र असते जे सहसा गवत आणि कृत्रिम टर्फने झाकलेले असते. फनेलच्या रेषा ह्या धावपट्टीच्या थ्रोइंग अर्कच्या दोन टोकांना छेदल्यानंतर २८.९६ अंशाचा कोण बनवतात.

भालाफेक हा खेळ कसा खेळला जातो – how to play javelin throw game

 • भालाफेक हा एक लोकप्रिय खेळ आहे आणि हा खेळ शाळा, महाविद्यालये, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो आणि हा खेळ ऑलम्पिक मध्ये देखील खेळला जातो. खाली आपण हा खेळ कसा खेळला जातो या बद्दल माहिती घेणार आहोत.
 • प्रथम भाला तुमच्या डोक्याच्या वरच्या उंचीवर घट्ट उजव्या हाताने धरा जसे कि भाला जमिनीला समांतर असेल.
 • तुम्ही तुमचे दोन्ही पाय फेकण्याच्या दिशेने एकमेकांच्या जवळ ठेवा आणि दुसरा तळहात भाल्याच्या टोकाखाली ठेवा. आणि शक्यतो भला मागे खांद्याने खेचा. आता भल्याची स्थिती समांतर नसून नसून ती फेकण्याच्या दिशेकडे सरळ असली पाहिजे आणि या स्थितीला टी पोझिशन म्हणून ओळखले जाते.
 • आता धावपट्टीवर थोडा वेग घ्या आणि थ्रोविंग पॉईंटवर आल्यानंतर मोठे अंतर कापण्यासाठी पूर्ण आवेगाने भाला फेकून द्या.

भालाफेक खेळासाठी लागणारी उपकरणे – equipment

भाला

भाला हा हा खेळ खेळण्यासाठी लागणारे एक महत्वाचे उपकरण आहे आणि हे उपकरण तीन भागांनी बनलेले असते ते म्हणजे डोके, शाफ्ट आणि एक दोरखंड पकड. भाल्याचे वजन हे पुरुषांच्यासाठी ८०० ग्रॅम इतके असावे लागते आणि या भाल्याची लांबी २.६ मीटर ते २.७ मीटर असते आणि महिलांच्यासाठी ६०० ग्रॅम वजनाचा असून त्याची लांबी हि २.२ मीटर ते २.३ मीटर इतकी असते.

शूज

भालाफेक खेळताना जास्तीत जास्त ११ समोर आणि मागील क्लीट्स असलेले लेदर किंवा नायलॉन शूज परिधान केले जातात.

कपडे

हा खेळ खेळणारे खेळाडू हे हलके स्लीव्हलेस किंवा शॉर्ट स्लीव्ह असलेले टी शर्ट घालतात आणि मांड्यांना आधार देण्यासाठी शॉर्ट्स घट्ट बसवलेल्या असू शकतात.

भालाफेक खेळाचे नियम – rules javelin game

भालाफेक हा एक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक मध्ये देखील खेळला जाणारा खेळ आहे त्यामुळे हा खेळ खेळण्यासाठी काही नियम ठरवले आहेत ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • सेक्टरमध्ये भाला फेकण्यासाठी स्पर्धकांना ओव्हर द शोल्डर फेकण्याची गती वापरली पाहिजे.
 • स्पर्धक त्यांच्या थ्रो साठी गती मिळवण्यासाठी धावपट्टीच्या खाली धावू शकतात.
 • भाला खाली जमिनीपर्यंत उतरेपर्यंत स्पर्धक पाठीमागे पाठ फिरवू शकत नाहीत.
 • भाल्याची टीप हि प्रथम जमिनीला स्पर्श करणे आवश्यक आहे.
 • जर एखाद्या स्पर्धकाने त्याच्या खांद्यावर नसलेले कोणतेही फेकण्याचे तंत्र वापरले तर त्याला फॉल मानले जाते.
 • जर भाल्याचा टीप सोडून कोणताही भाग जर जमिनीवर आढळला तर त्याला देखील फॉल समजले जाते.
 • तसेच स्पर्धक थ्रोइंग अर्क लाईन वर जर पाऊल टाकत असेल तर तो देखील फॉल मनाला जावू शकतो.

आम्ही दिलेल्या bhala fek information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भालाफेक माहिती माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhala fek game information in marathi या bhala fek information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bhala fek in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhala fek information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!