नीरज चोप्रा माहिती Neeraj Chopra Information in Marathi

Neeraj Chopra Information in Marathi (नीरज चोपडा) नीरज चोप्रा माहिती २०२१ टोक्यो ओलंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून, भारताला तब्बल १३ वर्षाच्या संघर्षानंतर सुवर्णपदक मिळवून देणारा भारतीय तरुण भालफेक पटू नीरज चोपडा याच्या संघर्षाची गाथा आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. आजच्या लेखामध्ये, आपण नुकतच सोशल मीडियावर चर्चेत असणारा आपला भारताचा भालाफेकपटू नीरज चोपडा याच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. नीरज चोपडा हा भारताचा प्रोफेशनल भालाफेक पटू असून, त्याने नुकत्याच झालेल्या ऑलंपिक मध्ये सुवर्णपदक मिळवून भारताचं नाव सोन्यासारखा चमकवून टाकलं आहे.

यावर्षी भारताला तब्बल तेरा वर्षानंतर सुवर्णपदक मिळालं. आणि याचं सगळं श्रेय जात मूर्ती लहान पण कीर्ती महान असं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या नीरज चोपडाला.

नीरज चोपडा ने त्याच्या भालाफेक की मधील उत्तम कौशल्याने आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यासोबतच युवा पिढी साठी आदर्श ठेवलेला नीरज चोपडा अगदी २३ वर्षाचा आहे. चला तर मग जाणून घेऊन नीरज चोपडा च्या या यशाची गाथा.

 neeraj chopra information in marathi

neeraj chopra information in marathi

नीरज चोप्रा माहिती – Neeraj Chopra Information in Marathi

पूर्ण नाव नीरज चोपडा
जन्म२४ डिसेंबर १९९७
राष्ट्रीयत्व भारतीय
वडीलसतीश चोपडा
आईसरोज देवी
जन्मगावहरियाणामधील पानिपत

जन्म

नीरज चोपडा चा जन्म एका शेतकऱ्याच्या घरात झाला. २४ डिसेंबर १९९७ रोजी नीरज चोपडा याने हरियाणामधील पानिपत या शहरांमध्ये जन्म घेतला. त्याच्या वडिलांचा म्हणजे सतीश चोपडा यांचा शेतीचा व्यवसाय आहे. नीरज चोपडाच बालपण तसं गरिबीत गेलं. नीरज चोपडा यांची आई एक गृहिणी आहेत.

नीरज हा त्यांच्या भावंडांपैकी सर्वात मोठा आहे. नीरजला लहानपणापासून मैदानी खेळ खेळायला आवडायचे. तसा तो अभ्यासातही हुशार होता. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नीरज ने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असं समजण्यात आले की नीरज चे वंशज हे मराठी घराण्याचे होते.

शिक्षण

नीरजने त्याच प्राथमिक शिक्षण तो राहात असलेल्या हरियाणा या शहरातल्या एका प्राथमिक शाळे मधूनच पूर्ण केलं. नीरज ने बी.बी.ए हि त्याची ग्रॅज्युएशन ची डिग्री महाविद्यालयामधून मिळवली. नीरजचं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे. नीरजला मैदानी खेळांची आवड होती. आणि म्हणूनच त्याने मोठ होऊन स्पोर्ट्स मध्ये करिअर करण्याचं ठरवलं.

नीरज चोपडा च वय २३ वर्षे आहे. इतक्या लहान वयामध्ये नीरज ने ऑलंपिक सामन्या मध्ये सुवर्णपदक मिळवून चाहत्यांच्या मनामध्ये स्वतःचं स्थान प्राप्त केलं आहे. नीरजच्या उत्तम भालाफेक कौशल्यामुळे सोशल मीडिया वरती चाहत्यांनी धुमाकूळ घातला आहे.

कारकीर्द

नीरज हा मैदानी खेळामध्ये सरस आहे. तो अकरा वर्षाचा असताना त्याने पहिल्यांदा भाले फेक करण्यास सुरुवात केली. नीरज ला भालाफेक हा खेळ आवडू लागला आणि म्हणून त्याने या खेळांमध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला. स्वतःला या खेळांमध्ये अजून मजबूत बनवण्यासाठी नीरज चोप्रा त्याने वयक्तिक कोच चं मार्गदर्शन घेण्यास सुरवात केली.

नीरज चोपडाने स्वतःचा पहिला भाला २०१४ मध्ये खरेदी केला. तोही तब्बल सात हजाराचा. नीरज नंतर राज्य स्तरावर होणाऱ्या भालाफेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागला. जसं जसं तो एक एक सामने जिंकत होता. तसं तसं त्याच नॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचण्याचा आत्मविश्वास वाढू लागला.

२०१२ साली लखनऊमध्ये सोळा वर्षाखालील असणाऱ्या स्पर्धकांसाठी नॅशनल ज्युनिअर चॅम्पियनशिप भालाफेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये नीरज ने ६८.४६ मीटर लांबीवर भालाफेक करून सुवर्ण पदक मिळवलं. २०१३ मध्ये मिरज ने नॅशनल चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये भाग घेतला. या स्पर्धेमध्ये नीरज ने दुसरं स्थान पटकावलं होतं.

२०१३ मध्ये नीरज ने IAAF वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिक पटकावलं होतं. २०१५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी असलेल्या नीरज चोपडा ने ८१.०४ मीटर लांबीवर भालाफेक करून वयोगटाचा विक्रम मोडला होता. २०१६ मध्ये नीरज जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सहभागी झाला होता.

या स्पर्धेमध्ये नीरज ने ८६.४८ मीटर लांबी वर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं. २०१६ मध्ये नीरज दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देखील सहभागी होता. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत नीरज ने सुवर्णपदक मिळवलं. नीरज ने या स्पर्धेमध्ये ८२.२३ थ्रो केला होता. गोल्ड कोस्ट मध्ये २०१८ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये नीरज ने ८६.४७ मीटर भालाफेक करून पुन्हा सुवर्णपदक पटकावलं.

नीरज ला त्याच पारितोषिक बघून पुढच्या सामन्यांना तोंड देण्यासाठी आत्मविश्वास जागृत व्हायचा. जकार्ता एशियन गेम २०१८ मध्ये नीरज ने ८८.०६ असा थ्रो करून सुवर्ण पदक मिळवलं होतं. नीरज भालाफेक या खेळांमध्ये दिवसेंदिवस स्वतः व देशाचे नाव रोशन करत होता. आज पर्यंत नीरज ने केलेल्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ त्याला २०११ मध्ये झालेल्या टोकियो ऑलम्पिक स्पर्धेमधून मिळालं.

नीरज चोपडा हा आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय आहे. इतकच नव्हे तर एशियन गेम व कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोपडा हा दुसरा भारतीय आहे. नीरज चोपडा ने आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत स्वतःच्या बळावर महिनतिने भरपूर पारितोषिक सुवर्णपदक मिळवले.

परंतु, २०२१ मध्ये घडलेल्या टोकियो ओलंपिक स्पर्धेमध्ये नीरज ने आपल्या भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिखरावर नेऊन ठेवलं. त्याचं कारण म्हणजे नीरज चोपडा ने यावर्षी आपल्या भारताला तेरा वर्षानंतर सुवर्णपदक मिळवून दिलं. यामुळे नीरजची संपूर्ण भारतात व जगभरात वाह वाह झाली.

त्याशिवाय सोशल मीडियावर तर नीरजला खूपच प्रसिद्धी मिळाली. भारताला तेरा वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोपडा हा पहिलाच व्यक्ती आहे. नीरज चोपडा चा ओलंपिक मधला हा सामना निरजच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन गेला.

हा सामना ७ ऑगस्ट २०२१ ला दुपारी साडेचार वाजता रंगला. या सामन्यांमध्ये नीरज एकूण सहा फेऱ्या मध्ये सहभागी होता सहापैकी दोन फेऱ्यांमध्ये ८७.५८ असा थ्रो करून सर्वात उच्च विक्रम आपल्या प्रतिस्पर्धींन पुढे ठेवला. त्यानंतरच्या चार सामन्यांमध्ये नीरज चोपडाचा हा विक्रम कोणी तोडू शकला नाही.

आणि त्याच मुळे नीरजला या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जाहीर झालं. नीरज चोपडा ने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. नीरजचं सध्याचं जागतिक पातळीवर म्हणजेच वर्ल्ड रँकिंग जैवलीन थ्रो मध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान आहे.

नीरज चोपडा च्या या यशानंतर त्याच्या झालेल्या काही इंटर्व्ह्यूज मध्ये असं समजण्यात आलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी नीरज ने तब्बल एक लाखाचा भाला खरेदी केला होता. नीरज चोपडा जर्मनीचे माजी भालाफेक पटू ऊवे होन यांच्या मार्गदर्शनाखाली भालाफेक चे प्रशिक्षण घेत आहे.

पुरस्कार

नीरज चोपडा च भालाफेक मधील कौशल्य बघून संपूर्ण जगाने त्याचं कौतुक केलं. नीरज चोपडा मुळे आज भारताची मान क्रीडा क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली गेली आहे. नीरज चोपडा कडे आज जी काही प्रसिद्धी आहे. ती त्याने घेतलेल्या अथक महिन्यात आणि परिश्रमामुळेच आहे. नीरज ने आपल्या भारताला अभिमान वाटावा असं काम करून ठेवलं आहे.

क्रीडा क्षेत्रामध्ये नीरज चे अनेक मान सन्मान करण्यात आले. नीरजला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळे पारितोषिक देण्यात आले. नीरज च भालाफेक या खेळातील उत्तम कौशल्य पाहून त्याला वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले आहेत. नीरज चोपडा ला आज पर्यंत तीन गोल्ड मेडल मिळाले आहेत.

राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिप सुवर्णपदक (२०१२). एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप सुवर्णपदक (२०१७). टोकियो ऑलिम्पिक २०२० सुवर्णपदक (२०२१). २०१६ मध्ये नीरज चोपडा ला तिसरा विश्व ज्युनियर अवॉर्ड देऊन त्याचा गौरव करण्यात आला. २०१३ ‌ मध्ये नीरज चोपडा ला राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप रौप्यपदक म्हणजेच सिल्वर मेडल मिळाल.

२०१६ मध्ये झालेल्या एशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नीरज ने रौप्य पदक पटकावलं. २०१८ मध्ये नीरज चोपडाला भारता मधील सर्वोत्कृष्ट पुरस्कार पैकी एक देण्यात येणारा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१८ मध्ये नीरज ला एशियन गेम्स चॅम्पियनशिपमध्ये स्वर्ण गौरव मिळाला.

नीरज चोपडाने संपूर्ण जगभरातील प्रमुख सहा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहेत. नीरज चोपडा भारतासाठी ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला ट्रेक आणि फिल्ड खेळाडू आहे. नीरज सारखे तरुण युवा देशाचे नाव मोठे करत आहेत. हे बघून आपल्या येणाऱ्या युवापिढीला देखील प्रोत्साहन मिळतं.

याशिवाय आजकाल बरेच पालक आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करून देत नाहीत. तर नीरज अशा पालकांसाठी एक उत्तम उदाहरण ठरला आहे. तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये मोठे होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या बहुतांश युवांसाठी नीरज एक आदर्श ठरला आहे.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये neeraj chopra information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

Neeraj Chopra Marathi मित्रानो तुमच्याकडे जर Neeraj Chopra Biography in Marathi म्हणजेच “नीरज चोप्रा यांची माहिती” neeraj chopra chi mahiti यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information about neeraj chopra in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “नीरज चोप्रा माहिती Neeraj Chopra Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!