Bharli Vangi Recipe in Marathi – Vangi Bhaji Recipe in Marathi भरली वांगी रेसिपी मराठी भारतीय स्वयंपाक पध्दतीमध्ये रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात आणि त्यामधील एक लोकप्रिय भाजी म्हणजे वांग्याची भाजी होय. वांगी ह्या भाजीपासून आपण वेगवेगळे प्रकार बनवू शकतो त्यामधील एक म्हणजे भरली वांगी. भरली वांगी कोणाला आवडत नाहीत, भारतामध्ये बहुतेक लोकांना भरलेली वांगी आवडतात. भरली वांगी हा पदार्थ भारतीय डिश असून या पदार्थाला एक पारंपारिक पदार्थ म्हणून ओळख आहे कारण हा पदार्थ खूप पूर्वीपासून भारतीय स्वयंपाक घरामध्ये बनवला जात आहे.
भरली वांगी हा पदार्थ घरामध्ये बनवण्यासाठी अगदी सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून अगदी सहज बनते. आज या लेखामध्ये आपण भरली वांगी हा स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
भरली वांगी रेसिपी मराठी – Bharli Vangi Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ५ व्यक्ती |
बनवण्याची पध्दत | सोपी |
भरली वांगी म्हणजे काय ?
भरली वांगी म्हणजे वांगी पूर्णपणे न चिरता त्याचे चार भाग करून त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, साखर हे सर्व मिश्रण करून ते वांग्यामध्ये भरून त्याला फोडणी देवून किंवा वाफवून शिजवले जाते. भरली वांगी आपण चपाती, रोटी, भाकरी किंवा नाना सोबत खूप छान लागते.
- वांगी : वांगी हा एक भाजीचा प्रकार आहे आणि हा घटक या पदार्थातील महत्वाचा घटक आहे. कारण वांग्यामध्ये मसाला भरला जातो.
- मसाला : वांग्यामध्ये जे सारण भरले जाते ते शेंगदाण्याचा कुट, ओल खोबरं आणि कोथिंबीर पेस्ट, लाल तिखट, मीठ यासारखे सर्व घटक मिळून मसाला बनवला जातो.
भरली वांगी रेसिपी – masala vangi recipe in marathi
भरली वांगी हा भारतीय लोकप्रिय प्रकार आहे जो भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवला. भरली वांगी हि दोन प्रकारे बनवली जातात आणि ती म्हणजे एक तर फोडणी देवून किंवा वाफवून आणि आज आपण दोन्हीही पध्दती पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात भरली वांगी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ५ व्यक्ती |
बनवण्याची पध्दत | सोपी |
भरली वांगी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते साहित्य घरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असते. त्यामुळे हा पदार्थ बनवताना कोणतीच अडचण येत नाही. पण हा पदार्थ बनवताना आपण जी वांगी वापरणार आहोत ती वांगी चांगली आणि ताजी असावीत. आता आपण भरली वांगी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहू.
- ५ वांगी छोटी किंवा मध्यम आकाराची.
- २ मोठे चमचे शेंगदाण्याचा कुट.
- १ मोठा चमचा वाटलेली खोबरं आणि कोथिंबीर.
- १ चमचा गरम मसाला.
- २ चमचे लाल मिरचीची मसाला चटणी किंवा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- कांदा ( चिरलेला ).
- मोहरी.
- तेल ( आवश्यकतेनुसार ).
पहिली पध्दत : वाफवून किंवा उकडून केलेली भरली वांगी
- भरली वांगी बनवताना सर्वप्रथम मिक्सरवर कुट आणि खोबरे आणि कोथिंबीर पेस्ट करून घ्या आणि ते थोडा वेळ बाजूला ठेवा.
- आता वांगी स्वच्छ धुवून घेवून वांगी पूर्णपणे न चिरता त्याचे चार भाग करून जेणेकरून वांग्यामध्ये सारण भरता येईल.
- मग एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, वाटलेले खोबरं आणि कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर घाला आणि ते मिश्रण एक जीव करून घ्या आता ते मिश्रण सर्व वांग्यामध्ये भरा.
- जर तुम्ही भरलेली वांगी उकडण्यासाठी मोदक पात्राच्या चाळणीचा वापर करत असाल तर चाळण वरती झाकणासाठी बसेल अशे भांडे घ्या आणि त्या भांड्यामध्ये ३ ते ४ वाटी पाणी घाला आणि ते गॅसवर उकळण्यासाठी ठेवा.
- चाळणीला तेल लावून त्यामध्ये भरलेली वांगी घालून ती चाळण त्या भांड्यावर ठेवा आणि त्यावर गच्च झाकण घाला आणि ते १० ते १५ मिनिटे उकडून घ्या.
- आता वांगी उकडल्यानंतर चांगली शिजली जातील, त्यानंतर एका भांड्यामध्ये थोडे तेल घालून ते गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये कांदा घाला आणि तो लालसर होईपर्यंत चांगला भाजा आणि त्यामध्ये थोडीसी हळद आणि लाल तिखट घाला (फोडणीला रंग येण्यासाठी) आणि मग त्यामध्ये आपण उकडलेली वांगी घालून परतवून घ्या.
- आपली भरलेली वांगी तयार झाली आता ती आपण चपाती, भाकरी किंवा रोटी सोबत सर्व्ह करू शकतो.
दुसरी पध्दत : फोडणी टाकून केलेली भरलेली वांगी
- आता वांगी स्वच्छ धुवून घेवून वांगी पूर्णपणे न चिरता त्याचे चार भाग करून जेणेकरून वांग्यामध्ये सारण भरता येईल.
- मग एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, वाटलेले खोबरं आणि कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ (चवीनुसार) आणि साखर घाला आणि ते मिश्रण एक जीव करून घ्या आता ते मिश्रण सर्व वांग्यामध्ये भरा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला.
- तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये कांदा घाला आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजा मग त्यामध्ये १ चमचा लाल तिखट, हळद घाला आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये भरलेली वांगी घाला आणि ती २ ते ३ मिनिटे वर खाली करून भाजा.
- अंग त्यामध्ये दुध किंवा पानी घालून ते चांगले मिक्स करा आणि त्यावर झाकण लावून ते १० मिनिटे शिजवा किंवा वांगी मऊ होईपर्यंत शिजवा.
- आपली भरली वांगी तयार झाली.
भरली वांगी हा पदार्थ कश्या सोबत खातात – serving suggestions
भरली वांगी हा पदार्थ आपण शक्यतो रोजच्या जेवणातील एक प्रकार आहे जो भारतीय स्वयंपाक घरांमध्ये आठवड्यातून एकदा तर बनवलाच जातो. भरली वांगी आपण भाकरी, रोटी, चपाती, नान किंवा प्लेन राईस सोबत खावू शकतो.
टिप्स ( Tips )
- भरल्या वांगी तुम्हाला जास्त मसालेदार आणि खूप फ्लेवरफुल पाहिजे असतील तर त्यामध्ये तुम्ही आले लसून पेस्ट घालून डिशची चव वाढवू शकता.
- भरल्या वांग्यामध्ये शेंगदाण्याचा कुट घालण्याऐवजी तीळ, जिरे या सारख्या मसाल्यांचे वाटण करून देखील आपण भरली वांगी बनवू शकतो आणि प्रकारच्या वांग्याला मसाला वांगी म्हणून ओळखतात.
आम्ही दिलेल्या bharli vangi recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भरली वांगी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kolhapuri bharli vangi recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि masala vangi recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bharleli vangi chi bhaji Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट