Bhima Koregaon History in Marathi – Bhima Koregaon Itihas भीमा कोरेगाव इतिहास मराठी कोरेगावची लढाई म्हणून प्रसिद्ध असणारी, ही लढाई १ जानेवारी १८१८ रोजी पेशवे सैन्य व ब्रिटिश सैन्य यांच्यामध्ये पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झाली. या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला ब्रिटिशांचा विजय झाला आणि ब्रिटिशांनी भीमा कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला. दरवर्षी एक जानेवारी रोजी दलित समाज मोठ्या संख्येने या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करतात. भीमा कोरेगाव लढाई तर पेशवे व ब्रिटिशांमध्ये झालेली होती ज्यामध्ये ब्रिटिशांनी विजय प्राप्त केला होता तर दरवर्षी १ जानेवारीला दलित समाज विजय स्तंभा जवळ जाऊन विजय दिवस का साजरा करतात ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज का साजरा करतो याचं उत्तर आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
भीमा कोरेगाव इतिहास मराठी – Bhima Koregaon History in Marathi
Bhima Koregaon Itihas
भारत हा एक असा देश आहे जो त्याच्या विविध संस्कृती, परंपरांबद्दल व विविध जाती, धर्मांबद्दल ओळखला जातो. जिथे अनेक विविध जाती धर्माचे लोक सुखाने राहतात. त्याच भारत देशामध्ये जात-धर्म या गोष्टी वादाचं कारण बनल्या आहेत. उच्च समाजाच्या जातीने खालच्या समाजाच्या जातींना हिनतेची, अस्पृश्यतेची वागणूक देणे.. परिणामी दोन विरुद्ध धर्मांमध्ये दंगली किंवा हिंसक घटना घडणे हे सहाजिकच आहे. आणि वंशवाद, जातीवाद, धर्मवाद या सगळ्या गोष्टी आत्तापासूनच नाही तर दोनशे वर्षांपूर्वी पासून चालत आलेल्या आहेत.
जातिभेद, धर्मभेद याची बीजे पूर्वजांनी पेरून ठेवली आहेत. त्यातीलच एक म्हणजे भीमा कोरेगाव युद्ध. भीमा कोरेगाव युद्ध हे इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. कारण या युद्धानंतर बलाढ्य किंवा श्रेष्ठ अशा पेशवाईचा अंत झाला. अठराव्या शतकापर्यंत मराठी साम्राज्य संपुष्टात येऊ लागलं होतं ज्यामध्ये प्रमुख घटक म्हणून पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेरचे सिंधिया, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड यांचा समावेश होता.
ब्रिटिशांनी या प्रमुख गटांशी शांतता करार करत त्यांच्या राजधानीमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. व १३ जून १८१७ मध्ये ब्रिटिशांनी बाजीराव पेशवे द्वितीय यांच्याकडून एक करार करून घेतला ज्यामध्ये गायकवाडांच्या महसुली वर ब्रिटिशांचा हक्क आहे व त्यांचा मोठा भूभाग इंग्रजांना देण्याचं मान्य केलं होतं या करारामुळे पेशव्यांचे इतर मराठा सरदारांवर चे राज्य संपुष्टात आले. पेशव्यांनी ब्रिटीशांची पुणे येथील ब्रिटिश रेसिडेन्सी जाळून टाकली. पुढे पेशवे साताराला पळून गेले आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पुण्यावर ताबा मिळवला.चार्लस बार्टन यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात कारभार चालू झाला.
पेशव्यांचा पाठलाग करण्यासाठी जनरल स्मिथ यांची नेमणूक करण्यात आली. १८१७ च्या डिसेंबरच्या अखेरीस पेशव्यांनी पुण्यावर आक्रमण केलं ज्यावरून कोरेगावची लढाई घडली. त्यावेळी पेशवाई ही ब्राह्मणांकडे होती आणि ब्राह्मणांनी दलित व मागासवर्गीय समाजाचे हाल केले त्यांनी महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावांमध्ये भीमा नदीच्या काठावर भीमा कोरेगाव ही ऐतिहासिक लढाई झाली. इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य मध्ये ही लढाई घडली.
पेशव्यांच्या बाजूने या लढाईचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होते. पेशव्यांकडे एकूण २८ हजार सैन्य होतं. वीस हजार घोडदळ आणि आठ हजार पायदळ. व सोबत दोन हजार सैनिक. इतकं सैन्य घेऊन बाजीराव पेशवे दुसरा यांच्या नेतृत्वाखाली ही तुकडी पुण्याकडे निघाली. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीवर हल्ला करण्याचं पेशव्यांचे ध्येय होतं. परंतु फ्रान्सिस स्टाॅन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीचे ८०० सैनिक पेशव्यांवर हल्ला करणार होते.
हे ८०० सैनिक महार सैनिक होते. पेशव्यांनी इतर मागासवर्गीय व महार लोकांना अस्पृश्यतेची वागणूक दिलेली होती म्हणून महार ब्रिटिशांच्या तुकडीत सामील झाले. जे पेशव्यांच्या विरुद्ध लढणार होते. ३१ डिसेंबर १८१७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीची तुकडी शिरूर ऊन निघाली रात्रभर कूच करून २५ मैलांचे अंतर कापून तळेगाव ढमढेरेच्या मागे असलेल्या उंच मैदानावर पोचले जिथे भीमा नदीच्या पलीकडे पेशव्यांची फौज त्यांच्या नजरेस पडली. कॅप्टन फ्रान्सिस स्टाॅन्टनने कोरेगाव-भीमा गावापर्यंत कूच केली. ब्रिटिश भीमा नदी पार करून पुढे येतील असं पेशव्यांना वाटले. परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने वाटेतील एका गावावर कब्जा केला.
ब्रिटिशांच्या या ८०० जणांच्या महार सैनिकाच्या तुकडीने जवळपास बारा तास सलग मराठ्यांशी लढाई केली. नवीन वर्षाची सुरुवात झाली नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य भीमा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल. हे युद्ध भीमा नदीच्या तीरावर झालं २५००० मराठा सैनिकांना ब्रिटिशांच्या सैन्यात सामील झालेल्या महार सैनिकांनी भीमा नदीच्या तीरावर रोखून धरले. या लढाईमध्ये पेशव्यांच्या जवळपास ५०० ते ६०० सैनिक मारले गेले.
मराठ्यांच्या सैन्यामध्ये अरब, गोसाई, मराठा यांचा समावेश होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या ८३४ सैनिकांपैकी २७५ सैनिक या लढाईमध्ये मारले गेले. ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडी मध्ये काही भारतीय वंशाचे सैनिक होते आणि सर्वात अधिक महार समाजाचे होते. १ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांनी माघार घेतली आणि ब्रिटिशांचा विजय झाला. या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला व ब्रिटिशांच्या इस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मध्ये सर्वात जास्त सैनिक महार समुदायाचे होते.
या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी ब्रिटिशांनी भीमा कोरेगाव येथे एक विजय स्तंभ उभारला ज्या वरती काही महार सैनिकांची नावे नोंदवली होती ज्यांना या लढाईमध्ये वीरमरण आलं. काही जाणकारांच्या मते ब्रिटीशांच्या बाजूने पेशव्यांविरुद्ध लढाई करणाऱ्या महारांसाठी ही लढाई मराठ्यांविरुद्ध नव्हती तर ब्राह्मणांविरुद्ध होती. त्यावेळी पेशवाई ब्राह्मणांकडे होती आणि त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाला चुकीची व अस्पृश्यतेची वागणूक दिली गेली त्यामुळे ही लढाई महारांसाठी अस्मितेची लढाई होती आत्मसन्मानाची ही लढाई होती.
काही इतिहासकारांच्या मते जेव्हा ते नगरात यायचे तेव्हा त्यांच्या कमरेला एक झाडू बांधलेला असायचा जेणेकरून ते चालताना त्यांची पावले देखील पुसली जावी. इतकच नव्हे तर त्यांच्या गळ्यामध्ये भांडण लटकावले जायचं जर त्यांना थुकायचं असेल तर त्यांना त्याच भांड्यात थुकाव लागायचं कारण त्यांच्या थुकीने जागा अपवित्र नको व्हायला. अगदी विहिरीतून पाणी काढण्यासाठी देखील त्यांना हाल सोसावे लागायचे. ही लढाई मराठ्यांविरुद्ध नव्हती तर ब्राह्मणांविरुद्ध होती ज्यांनी दलितांवर स्पृश्य-अस्पृश्यता लादली होती.
महार व मराठ्यांमध्ये कधीही मतभेद झाले नव्हते परंतु ब्राह्मणांनी मराठ्यांच्या हातून पेशवाई काबीज केली होती त्यामुळे मराठ्यांचे नाव मधी घेतलं गेलं. या युद्धाचे मूळ कारण ब्राह्मणांनी केलेला जातिभेद होता. जर ब्राह्मणांनी जातिभेदाची बीजे समाजात पेरलीच नसती तर हे युद्ध देखील घडलं नसतं. महार समाजाने ब्राह्मणांना ही जातीभेदाची पद्धत संपवायला सांगितली होती परंतु ब्राह्मणांनी त्यांच ऐकलं नाही ज्यामुळे महार समाज नाराज झाले आणि इस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील झाले.
महार समाजातील व्यक्तींना ब्रिटिश सैन्याने लष्करी प्रशिक्षण देण्याचे काम केलं व पेशव्यांविरुद्ध लढण्यासाठी सांगितले. मराठ्यांच्या जोरावर ब्राह्मणांनी पेशवाई उभारली होती आणि म्हणूनच ही लढाई ब्राह्मणांविरुद्ध होती ती कधीच महार समाजाची मराठा विरुद्धची लढाई नव्हती. ही काही इतिहासकारांची मते आहेत. हे युद्ध पेशव्यांच्या कारकिर्दीतील शेवटचे युद्ध होते यानंतर पेशव्यांचे साम्राज्य संपुष्टात आले. दरवर्षी एक जानेवारी रोजी दलित समाज विजयस्तंभा जवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात.
हा विजय स्तंभ ब्रिटिशांनी त्या वेळी ज्या महार सैनिकांनी युद्धामध्ये आपले प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ उभारला आहे. संपूर्ण दलित बांधव या विजयस्तंभाला दरवर्षी १ जानेवारीला भेट देण्याचं कारण म्हणजे १९२७ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभाला भेट दिली आणि त्यांनी बौद्ध बांधवांना दरवर्षी येथे येऊन विजय दिवस साजरा करण्याची कल्पना सुचवली.
भीमा कोरेगाव लढाई हि लढाई इतिहासातील एक महत्त्वपूर्ण लढाई समजली जाते. या लढाई बद्दल फारशी माहिती अजूनही काही लोकांना ज्ञात नाही आहे. या लढाईबद्दल अनेक इतिहासकारांचे वेगवेगळे मत आहेत. या ऐतिहासिक घटनेला दोनशेहून अधिक वर्ष होऊन गेली आहेत.
आम्ही दिलेल्या bhima koregaon history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भीमा कोरेगाव इतिहास मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhima koregaon history marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि koregaon bhima history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये 1 jan bhima koregaon Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट