बिपिन रावत मराठी माहिती Bipin Rawat Information in Marathi

Bipin Rawat Information in Marathi – Bipin Rawat Biography in Marathi बिपीन रावत यांची माहिती जनरल बिपीन रावत हे भारतीय सैन्यातील चार स्टारचा रँक मिळालेले देशाची सेवा करणारे जनरल तसेच ते भारतीय सैन्यातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ देखील होते आणि म्हणूनच आज या लेखामध्ये आपण त्यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत. बिपीन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ मध्ये उतराखंड मधील पाउरी या जिल्ह्यातील सैंज या गावामध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण सिंह असे होते आणि हे देखील भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट जनरल होते आणि त्यांच्या इतर पाठीमागील पिढ्या देखील भारतीय सैन्यामध्ये काम करत होत्या.

म्हणजेच बिपीन रावत यांना देखील देशाची सेवा करण्याची प्रेरणा देखील त्यांच्या वडिलांच्या कडून मिळाली असावी. बिपीन रावत यांचा जन्म हिंदू कुटुंबामध्ये झाला होता आणि त्यांच्या किसान सिंग परमार यांची मुलगी होत्या जे उत्तरकाशी भागाचे आमदार होते. बिपीन रावत यांनी भारतीय सैन्यामध्ये ३२ ते ३३ वर्ष सेवा केलेली असून ते कारगिल सारख्या मोठ्या युध्दाचा ते एक भाग होते.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून निवड होण्याअगोदर त्यांनी कर्मचारी समितेचे अध्यक्ष म्हणून आपला कार्यभार पार पाडला होता आणि ३० डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्याचबरोबर हे भारतीय सैन्यदलाचे २६ वे दल प्रमुख देखील होते.

bipin rawat information in marathi
bipin rawat information in marathi

बिपिन रावत मराठी माहिती – Bipin Rawat Information in Marathi

जन्म१६ मार्च १९५८
शहरउतराखंड मधील पाउरी या जिल्ह्यातील सैंज या गावामध्ये झाला
मृत्यू८ डिसेंबर २०२१
कामभारतीय सैनिक
शाखाभारतीय सैन्य दल
स्थानजनरल
मुख्य युध्दबिपीन रावत हे कारगिल युद्धाचा एक भाग होते.
सेवा वर्ष१९ डिसेंबर १९७८ ते ८ डिसेंबर २०२१
वडिलांचे नावलक्ष्मण सिंह (लेफ्टनंट जनरल )

बिपीन रावत यांचे शिक्षण 

बिपीन रावत यांचा जन्म जरी उतराखंड मधील पाउरी या जिल्ह्यातील सैंज या गावामध्ये झाला असला तरी जनरल बिपीन रावत यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण देहरादून या शहरामध्ये घेतले. त्यांनी केबरीन हॉल या शाळेमध्ये थोडे शिक्षण घेतले आणि शिमल्याच्या सेंट एडवर्ड या शाळेमध्ये थोडे शिक्षण घेतले.

घरातील पाठीमागील पिढ्या देखील भारतीय सैन्यामध्ये काम करत होत्या तसेच त्यांचे वडील लक्ष्मण सिंह देखील भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट जनरल होते त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांच्याकडे पाहून त्यांना देखील भारतीय सैन्यामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि म्हणून त्यांनी देहरादून या शहरामध्ये असणाऱ्या भारतीय सैन्य अॅकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि तेथे त्यांनी सैन्य दलाचे शिक्षण घेतले.

तसेच त्यांनी अमेरिकेतील डिफेंस सर्विसेस स्टाफ कॉलेज मध्ये वेलिंगटन आणि हायर कमांड यासारखे कोर्स देखील केले. त्यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालय मधून रक्षा आणि प्रबंध या विषयांमध्ये एम फिल केले. २०११ मध्ये बिपीन रावत यांना डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी हा टॅग देवून सन्मानित करण्यात आले मग त्यांनी २०११ मधेच चौधरी चरण सिंह विश्वविद्यालय मध्ये सैन्य मिडिया अध्ययन या विषयामध्ये पीएचडी केली.

बिपीन रावत यांची लष्करी किंवा सैन्य कारकीर्द 

जनरल बिपीन रावत यांची लष्करी सुरुवात ११ गोरखा रायफल्सच्या ५ व्या बटालियन पासून झाली कारण त्यांनी सर्वप्रथम निवड या बटालियन मध्ये झाली होती आणि बिपीन रावत यांचे वडील देखील या बटालियन तुकडीचा भाग होते. त्यांनी १० वर्ष बटालियन मध्ये काम केले आणि त्यानंतर त्यांची निवड मेजर म्हणून झाली आणि ते मेजर असताना त्यांनी जम्मू – काश्मीर आणि उरी मधील एका संघटनेचे नेतृत्व केले होते.

काही दिवसांनी त्यांची निवड ब्रिगेडियर या पदावर झाल्यानंतर त्यांनी बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले होते ज्यामध्ये त्यांना दोन वेळा फोर्स कमांडर म्हणून सन्मानित करण्यात आले होते. बिपीन रावत यांना मेजर जनरल हे पद मिळाल्यानंतर त्यांनी उरी येथील पायदळ कमांडिंग जनरलची भूमिका अगदी यशस्वीपणे पार पाडली तसेच ते पुण्यामधील सैन्य दलामध्ये लेफ्टनंट जनरल म्हणून देखील काम केले होते.

त्याचबरोबर त्यांची आर्मी कमांडर या पदावर नितुक्ती झाल्यानंतर त्यांनी दक्षिण कमांडचे कमांडर जनरल म्हणून आपला कार्यभाग बजावला आणि मग त्यांना लगेचच लष्कराच्या उपप्रमुख पदावर निवड करण्यात आली. २०१६ या वर्षामध्ये १७ डिसेंबर या रोजी त्यांना भारत सरकारने २७ वे चीफ ऑफ स्टाफ म्हणून निवड झाली पण त्यांनी ३१ डिसेंबर २०१६ ला या पदावर नियुक्त झाले.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून निवड होण्याअगोदर त्यांनी कर्मचारी समितेचे अध्यक्ष म्हणून आपला कार्यभार पार पाडला होता त्याचबरोबर बिपीन रावत हे राज्य समितींच्या प्रमुखांचे ५७ वे अध्यक्ष होते. ३० डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्याचबरोबर हे भारतीय सैन्यदलाचे २६ वे दल प्रमुख देखील होते. अश्या प्रकारे त्यांनी आपली लष्करी कारकीर्द पार पडली होती.

बिपीन रावत यांची लष्करी कारकिर्दीत पार पडलेली पदे 

अ क्रपद
१.       ११ गोरखा रायफल्सच्या ५ व्या बटालियन तुकडीचा भाग
२.       मेजर
३.       ब्रिगेडियर
४.       मेजर जनरल
५.       लेफ्टनंट जनरल
६.       आर्मी कमांडर
७.       लष्करी उपप्रमुख
८.       चीफ ऑफ स्टाफ
९.       चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ

बिपीन रावत यांना मिळालेले पुरस्कार – awards 

अ.    क्रपुरस्कार
१.       उत्तम युध्द सेवा पुरस्कार
२.       परम विशिष्ट सेवा पदक
३.       युध्द सेवा पदक
४.       अति विशिष्ट सेवा पदक
५.       विशिष्ट सेवा पदक
६.       सेना पदक
७.       एंड डी कैम्प

बिपीन रावत यांचा मृत्यू – death 

बिपीन रावत हे भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर एमआय – १७ व्ही एच या हेलिकॉप्टरने त्यांची पत्नी आणि इतर ११ व्यक्तींच्या सोबत जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडू राज्यातील कुन्नूर या गावाजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला. आणि यामध्ये बिपीन रावत यांच्यासोबत सर्व व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले आहे. बिपीन रावत यांचा मृत्यू ८ डिसेंबर २०२१ या दिवशी झाला.

आम्ही दिलेल्या Bipin Rawat Information in Marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बिपिन रावत मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Bipin Rawat Information in Marathi wikipedia  या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about Bipin Rawat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Bipin Rawat marathi mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “बिपिन रावत मराठी माहिती Bipin Rawat Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!