Essay On Sainik in Marathi – Mi Sainik Boltoy Essay in Marathi मी सैनिक झाले तर निबंध मराठी आपल्या भारतीय सैन्याच्या प्रत्येक योद्ध्याला आपण ‘भारतीय सैनिक’ किंवा ‘जवान’ असे म्हणतो. त्याच्यासाठी जातीभेदाचे काहीच महत्व नाही. धार्मिक विडंबनेचा तर त्याच्यात लवलेशही नसतो. प्रांतीयतेच्या संकुचित भावनेपासून तो नेहमी दूर राहतो. त्याला केवळ हे माहित आहे की भारतमातेचे रक्षण करणे हे त्याचे पवित्र कर्तव्य आहे. १९६२ मध्ये हिमालयातील बर्फाळ खोऱ्यात पुरेश्या सोई नसतानाही, फक्त मोजक्याच भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याशी सामना केला, ते खूप कौतुकास्पद होते.
भारतीय जवानांनी प्रत्येक वेळी नवलक आणि अनोख्या पराक्रमासह पाकिस्तानी हल्ल्यांचा सामना केला आहे. पाकिस्तानच्या अमेरिकन पॅटर्नच्या टँकची बैलगाड्यांप्रमाणे नासधूस करुन टँकांचे विशाल ‘कब्रिस्तान’ बनवून सोडले होते.
एवढेच नव्हे तर सुमारे एक लाख पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्यासमोर त्यावेळी पराभव मानावा लागला होता. यामुळे, जगातील बरीच मोठी राष्ट्रेही भारतीय सैनिकांची शक्ती व कौशल्य पाहून आश्चर्यचकित झाली होती, जगातील सर्वच देशांनी तेंव्हापासून भारताला ‘मोठी शक्ती’ मानण्यास सुरुवात केली आहे.
” सैनिक तुम्ही या देशाचे,
रक्षक तुम्ही या जनतेचे.
शत्रूचा सदैव असतो तुम्हाला राग,
देशाच्या रक्षणासाठी केला घराचा त्याग.”
भारतीय सैनिक निबंध मराठी – Essay On Sainik in Marathi
सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी – Sainik Nibandh in Marathi
आपल्या भारतीय सैन्यामध्ये आपण प्रत्येक योद्ध्याला ‘जवान’ असे म्हणतो. त्याच्यासाठी जातीभेदाचे काहीच महत्व नाही. धार्मिक विडंबनेचा तर त्याच्यात लवलेशही नसतो. प्रांतीयतेच्या संकुचित भावनेपासून तो नेहमी दूर राहतो. त्याला केवळ हे माहित आहे की भारतमातेचे रक्षण करणे हे त्याचे पवित्र कर्तव्य आहे.
१९६२ च्या हिमालयाच्या युद्धामध्ये बर्फाळ खोऱ्यात पुरेश्या सोई नसतानाही, फक्त मोजक्याच भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याशी सामना केला, ते खूप गौरवास्पद होते. आपल्या जवानांनी प्रत्येक वेळी नवलक आणि कर्तबगार पराक्रमासह पाकिस्तानी हल्ल्यांचा सामना केला आहे.
पाकिस्तानच्या अमेरिकन पॅटर्नच्या टँकची बैलगाड्यांप्रमाणे नासधूस करुन टँकांचे विशाल ‘कब्रिस्तान’ बनवून सोडले होते. त्यांनी बांगलादेशाला पाकिस्तानी अत्याचारापासून निर्भयपणे स्वातंत्र्य दिले. एवढेच नव्हे तर सुमारे एक लाख पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्यासमोर त्यावेळी पराभव मानावा लागला होता.
नक्की वाचा: १५ ऑगस्ट भाषण
यामुळे, जगातील बरीच मोठी राष्ट्रेही भारतीय सैनिकांची शक्ती व कौशल्य पाहून आश्चर्यचकित झाली होती, जगातील सर्वच देशांनी तेंव्हापासून भारताला ‘मोठी शक्ती’ मानण्यास सुरुवात केली आहे.
सशस्त्र लढाईचे शिकष घेतलेले व गरज पडल्यास लढाईत भाग घेणाऱ्या व्यक्तीस ‘सैनिक’ असे म्हणतात. शस्त्रधारी सैनिक हे पोटासाठी आणि ज्या राष्ट्राने भरती केले आहे त्या राष्ट्रासाठी लढतात. भारतीय सैनिकांना विविध शस्त्रे अस्त्रे वापरण्याचे आणि लढाईच्या वेगवेगळ्या तंत्राचे प्रशिक्षण दिलेले असते. आधुनिक सैनिक बंदूक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील आपल्याला वापरताना दिसतात.
काही वेळा देशांदेशांमध्ये युद्धे होतात, त्यावेळी मित्र देशांमधील काही सैनिक भाड्यानेही उपलब्ध केले जातात. “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती” या गाण्याप्रमाने आपले भारतीय सैनिक धैर्याच्या छातीने शत्रूंच्या समोर जातात आणि त्यांचा पाडाव करूनच मागे फिरतात.
आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या देशवासीयांच्या संरक्षणासाठी अहोरात्र जागरण करून आपले जवान सीमारेषेवर शत्रूशी भिडत असतात. एक आई ज्याप्रमाणे आपल्या लहान लेकराला डोळ्यात तेल घालून जपते, त्याप्रमाणे आपले सैनिक भारत मातेची सेवा डोळ्यात तेल घालून करत असतात. खरंतर, आपल्या देशावर निस्वार्थी प्रेम करणारे सैनिकच असतात.
देशाची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून आपले जवान सुरुवातीला खूप परिश्रम घेतात. सोन्यापेक्षा आणि चांदिपेक्षा उच्च असणारी सैनिकाची वर्दी मिळवण्यासाठी ते अपार कष्ट करतात. त्यानंतर त्यांना सैनिकांची वर्दी परिधान करण्यासाठी दिली जाते आणि त्यांची सैन्यात भरती केली जाते.
- नक्की वाचा: भारत माझा देश निबंध
सैन्यामध्ये त्यांचे ट्रेनिंग सुरू होते. सैनिकांना प्रशिक्षण घेण्याच्या कालावधीत सुद्धा खूप कठीण परिश्रम घ्यावे लागतात. त्यानंतर त्यांचे पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते. पोस्टिंगची ठिकाणे कुठे असतील यांचा त्यांना थांगपत्ता ही नसतो. कधी काश्मीर सारख्या आतंगवादी आणि अशांत भागात त्यांना पाठवले जाते, तर कधी जिथे जंगल, वाळवंट, चहूबाजूंनी पाणी आहे अशा भागात देखील त्यांची रवानगी केली जाते.
सैनिकांना एकदा का त्यांच्या तुकडी प्रमुखांचे आदेश मिळाले की अमूक या भागात आतंगवादी घुसले आहेत, त्याक्षणी त्यांना आहे ते सगळ सोडून आतंगवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जावं लागत. तिथे होणाऱ्या गोळीबारात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना आतंगवाद्यांशी दोन हात करावे लागतात.
कडाक्याची थंडी आणि गोठलेली सृष्टी ,
कसा सोसतो आपला सैनिक बर्फाची वृष्टी!
भूक तहान विसरून तो लढतो अहोरात्र शत्रूशी
त्याच्यामुळेच घेऊ शकतो निद्रा आपण सुखाची!
सीमेवर होणाऱ्या गोळीबारामध्ये कितीतरी सैनिक शहीद होतात आणि अनेक सैनिक जखमी देखील होतात. आतंगवाद्यांशी चाललेले हे युद्ध कितीतरी दिवस तसेच चालू राहते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्याठिकाणी त्यांच्याजवळ जे काही खायला, प्यायला आहे त्यावर पोटाची भूक मिटवून शत्रूशी लढा द्यावा लागतो. युध्दाच्या रणभूमीवर जाताना प्रत्येक सैनिकाच्या पाठीवर त्याचे कफन असते.
स्वतःचे कफन पाठीवर घेऊन त्यांना युद्ध लढावे लागते. यावरून, आपल्याला लक्षात येईल की कोणत्याही सैनिकाला रणभूमीवरून जिवंत आपल्या मायभूमीत परत येण्याची खात्री नसते. युध्दाच्या वेळी सगळे सैनिक एकमेकांना धीर देत असतात. जे सैनिक युद्ध भूमीवर शहीद होतात त्यांना त्यांच्या कफणमध्ये गुंडाळून मायभूमी पाठवले जाते.
तसेच, जे सैनिक जखमी होतात त्यांचा इलाज त्याठिकाणी सैन्यदलातील सैनिक डॉक्टर करतात. त्यातील काही सैनिक जर गंभीर जखमी असतील तर त्यांची रवानगी देखील मायदेशी इलाजासाठी केली जाते.
युद्धामध्ये जे सैनिक खूप मोठी कामगिरी करतात त्या सैनिकांना १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी यादिवशी पदक देऊन सन्मानित केले जाते. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात येते, तसेच त्यांचे प्रमोशन देखील केले जाते. खरंतर, एका सैनिकाचे जीवन खूप बिकट असते. तस पाहिलं तर युद्धाने कोणत्याही देशाचे भले होत नाही.
युद्धामध्ये दोन्ही देशांची वित्तहानी तसेच जीवितहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. तरीदेखील, सैनिकांना युद्धासाठी सीमारेषेवर तत्पर उभे राहूनच देशाची सेवा करावी लागते. सैनिक फक्त आपल्या देशाच्या शत्रूला मारण्याचे काम करत नाही तर, ते कठीण परिस्थितीत आपल्या देशाचे नागरिक आणि मित्र सैनिकांचे प्राण देखील वाचवत असतात.
- नक्की वाचा: पोलीस माझा अभिमान निबंध
त्यांच्या डोक्यावर मृत्यूचे सावट नेहमी फिरत असतानाही त्यांना एकाच गोष्टीचे नेहमी समाधान वाटत असते की त्यांच्यामुळे आपल्या मायदेशातील नागरिक सुरक्षित आणि सुखरूप आहेत. देशसेवा हीच त्यांच्यासाठी नेहमी एक अभिमानाची गोष्ट असते.
शांततेच्या काळात सैनिक लढाईखेरीज अन्य कामेही करतात. त्यांच्या कामाप्रमाणे सैनिकांना विविध नावांनी ओळखले जाते. उदाहरणार्थ; रेड गार्ड, सैनिकी पोलीस, बॉर्डर सिक्युरिटी पोलीस इत्यादी. भारतीय सैनिकांमध्ये पायदळ, रणगाड्यावरचे सैनिक, उंटावरचे सैनिक, अश्वदलाचे सैनिक, हत्तीवरचे सैनिक, नौदलाचे सैनिक आणि विमानदलाचे सैनिक असे अनेक प्रकार असतात.
शिवाय शस्त्राच्या प्रकाराप्रमाणे भालाधारी, मशीनगनधारी, तलवारधारी, गदाधारी, चक्रधारी, नांगरधारी, परशूधारी, कुकरीधारी, धनुर्धारी, बंदूकधारी, गोलंदाज असे कित्येक प्रकारचे सैनिक असतात. भारतीय सैनिकाला बराच मोठा काळ कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. तो केवळ पगाराला महत्त्व देत नाही.
भारतातील प्रत्येक सैनिक आपल्या जन्मस्थानाला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि प्राणापेक्षा प्रिय मानत असतो. तो जन्मभूमीला आपली आई मानतो. तिचा सन्मान आणि अभिमानाचे रक्षण करण्यासाठी तो आपला जीव धोक्यात घालू शकतो.
धैर्य आणि त्याग यांसारखे गुण त्याच्या रक्तात ठासून भरलेले आहेत. तो देशाची सेवा करण्यासाठी घर, नातेवाईक यांच्यापासून दूर निघून जातो. खरच, आपल्या जवानांमुळे शत्रू आपल्या देशाकडे डोळा वर करूनही पाहत नाही. खरोखर आपले भारतीय सैनिक हे त्यांच्या उत्कृष्ट कौशल्यामुळे जगभर प्रसिद्ध आहेत. खरोखर, आपले सैनिक आपला अभिमान आहेत.
आपल्या भारत देशाला आपल्या सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा खूपच अभिमान आहे. म्हणूनच आमचे स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ असे म्हणून त्यांचा गौरव केला होता. आपल्या सैनिकांवर आणि शेतकऱ्यांवर आपला भारत देश निर्भयपणे जगतो आहे. त्यांच्यामुळे आपल्याला रात्रीची शांत झोप लागते.
शेतकरी राजा रात्रंदिवस शेतात राबत असतो त्यामुळे, आपण पोटभर अन्न खातो आणि दुसरीकडे सैनिक आहेत म्हणून सुरक्षितपणे आपण आपल्या देशात कधीही मुक्त संचार करू शकतो. आपल्याला घरापासून एक महिना दूर राहिलं की कुठंतरी दहा वर्ष लांब राहिल्या सारखं वाटत असत. घरी जाण्याची आपल्याला आतुरता लागलेली असते.
विशेष करून गणेश उत्सव, रक्षाबंधन, दिपावली, नागपंचमी अशा सणांच्या दिवशी आपल्याला आपल्या कुटुंबाची, नातेवाईकांची आठवण येते. मात्र, आपले सैनिक दहा – दहा महिने, एक – दोन वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर राहत असतात. सणांच्या दिवशी त्यांनादेखील आपल्यासारखी त्यांच्या घरच्यांना भेटायची इच्छा होत असते.
पण, ते आपली इच्छा मारून आपले आयुष्य देशाच्या सेवेसाठी व्यथित करत असतात. आपल्याला सगळे सण, उत्सव आनंदाने साजरे करायला यावेत म्हणून ते तिथे सीमेवर पहारे देत असतात. आपण ज्यावेळी आपल्या मायभूमीत रंगांची होळी खेळत असतो त्यावेळी आपले सैनिक सीमेवर रक्ताची होळी खेळत असतात, आपण जेंव्हा घरामध्ये शांतपणे झोपी गेलेले असतो तेंव्हा ते सीमेवर आपल्याला शांत झोप लागावी यासाठी जागरण करत असतात.
त्यांच्या या त्यागाची आपल्याला नेहमी जाणीव असावी यासाठी १५ जानेवारी हा दिवस ‘सेना दिवस’ म्हणून आपल्या देशामध्ये साजरा केला जातो. तर, २३ मार्च हा दिवस संपूर्ण भारतात ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो. २३ मार्च यादिवशी इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना फाशी दिली होती.
आपण त्यांचा हा बलिदानाचा दिवस देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठीही शहीद दिवस म्हणून साजरा करतो. यादिवशी त्यांच्या आठवणीने आपल्या भारतीयांचे डोळे अश्रूंनी भरून येतात. त्यांच्या या पराकोटीच्या त्यागाला आमचा कोटी कोटी प्रणाम !
” देशासाठी अर्पण करता तुम्ही प्राण,
म्हणूनच आम्हाला वाटतो तुमचा अभिमान.
भारतभूमीसाठी करता तुम्ही अहोरात्र काम,
म्हणूनच तुम्हाला आमचा सलाम. “
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या essay on sainik in marathi language माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “भारतीय सैनिक निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sainik nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sainik charitratmak nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण bhartiya sainik essay in marathi या लेखाचा वापर mi sainik boltoy essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट