बीरबल साहनी यांची माहिती Birbal Sahni Information in Marathi

Birbal Sahni Information in Marathi – Birbal Sahni Biography in Marathi बीरबल साहनी यांची माहिती मित्रांनो आज वैज्ञानिक क्षेत्रामुळे हे जग किती पुढे गेले आहे आणि वैज्ञानिक क्षेत्राशी जगाला जोडून ठेवणारा दुवा म्हणजे शास्त्रज्ञ. अशाच एका महान शास्त्रज्ञा विषयी आपण आजच्या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे डॉक्टर बिरबल सहानी. डॉक्टर बिरबल सहानी हे महान शास्त्रज्ञ होते. बिरबल सहानी हे सुप्रसिद्ध भारतीय पुरावनस्पति विज्ञान व भारतीय वनस्पतीविज्ञान परिषदेचे संस्थापक होते. वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

birbal sahni information in marathi
birbal sahni information in marathi

बीरबल साहनी यांची माहिती – Birbal Sahni Information in Marathi

पूर्ण नाव (Name)बिरबल सहानी
जन्म (Birthday)१४ नोव्हेंबर १८९१
जन्म गाव (Birth Place)पश्चिम पंजाब जे आता पाकिस्तानमध्ये आहे येथील शहापूर जिल्ह्यातील भेडा या गावांमध्ये
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)वनस्पती शास्त्रज्ञ

जन्म, शिक्षण, वैयक्तिक आयुष्य

पश्चिम पंजाब जे आता पाकिस्तानमध्ये आहे येथील शहापूर जिल्ह्यातील भेडा या गावांमध्ये १४ नोव्हेंबर १८९१ रोजी बिरबल सहानी यांचा जन्म झाला. रूचिराम सहानि यांचे तिसरे अपत्य म्हणजेच बिरबल सहानी. रूचीराम सहानी रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. बिरबल यांना त्यांच्या वडिलांकडून चांगलं मार्गदर्शन लाभलं. भेडा हे गाव मिठाच्या टेकड्या आणि खडकांनी वेढलेले गाव होते त्यामुळे बिरबल यांना लहानपणापासूनच जीवाश्म वगैरे बघायला मिळाले.

बिरबल त्यांच्या वडिलांन सोबत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे तेव्हापासून त्यांना वनस्पती, खडक, जीवाष्म यांचा संग्रह करण्याचा छंद निर्माण झाला. बिरबल यांचे वडील रसायनशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे घरांमध्ये बिरबल यांना आवश्यक असणारी योग्य अशी शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली. बिरबल सहानी यांचा स्वभाव आनंदी, समाधानी, न्याय, दयाळूपणा आणि उदारता या भावनांचे मिश्रण होतं.

लाहोरच्या मिशन अंड सेंट्रल मॉडेल स्कुल येथून बिरबल सहानी यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली. बिरबल यांच पुढील महाविद्यालयीन शिक्षण तेथीलच शासकीय महाविद्यालयातून पार पडलं. इसवी सन १९११ साली बिरबल सहानी यांनी पंजाब विद्यापीठातून बी.एस्सी ची पदवी मिळवली. पुढे बिरबल सहानी यांनी केंब्रिज विद्यापीठाचा ट्रायपास मिळवला.

केंब्रिज विद्यापीठांमध्ये बिरबल सहानी यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या शिवाय ए. सी. सीवर्ड यांच्या नेतृत्वाखाली बिरबल सहानी यांनी जीवाश्म वनस्पती विज्ञानाविषयी अनेक मौलिक संशोधन केलं. या संशोधनासाठी लंडन विद्यापीठातर्फे बिरबल सहानी यांना डि.एस्सी ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

केंब्रिज विद्यापीठातून इतकी मोठी पदवी मिळवणारे बिरबल सहानी हे पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते. इसवी सन १९२० मध्ये बिरबल सहानी यांचा विवाह सावित्री यांच्याशी झाला सावित्री या पंजाब मधील प्रतिष्ठान घराण्यातील रायबहादुर सूरदास यांच्या कन्या होत्या. सावित्री या बिरबल सहानी त्यांच्या अर्धांगिनी होत्या आणि या शब्दाप्रमाणे सावित्री यांनी बिरबल यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये साथ दिली. इतकेच नव्हे तर त्यांच्या संशोधन कार्यामध्ये हि सावित्री यांचा सहभाग असायचा. कधी जीवाश्म, काढणे छायाचित्र काढणे अशी कामे त्या करायच्या.

बिरबल सहानी यांचं मौलिक संशोधन: लहानपणापासून बिरबल सहानी यांना जीवाश्म वगैरे बघायला मिळाले त्यांच्या राहत्या घराच्या अवतीभवती अतिशय सुंदर रमणीय निसर्ग असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच वनस्पती या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण झाली होती. पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यावर बिरबल सहानी यांचा परिचय प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. ए सी सीवर्ड यांच्याशी झाला आणि यांच्या दिग्दर्शनाखाली वेगवेगळे नवीन नवीन संशोधन सुरू झालं.

शिवाय बिरबल सहानी यांची भेट श्रेष्ठ प्रा. चा गोनल यांच्याशी झाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केलं. बिरबल सहानी यांच पहिल संशोधन १९१५ साली न्यू फायटोलॉजेस्ट कॉमेडी या जर्नल ऑफ बॉटनी मध्ये प्रकाशित झालं आणि बिरबल सहानी यांचा विज्ञान क्षेत्रामध्ये प्रभाव वाढू लागला.

बिरबल सहानी यांना वनस्पती बद्दल असणारी तीक्ष्ण दृष्टी आणि त्यांचे कठोर परिश्रमामुळे त्यांचा दुसरा पेपर देखील प्रकाशित झाला ज्यामध्ये बिरबल सहानी यांनी नेफरोलेपिस व्हॅलिआओबेलसचे मिश्रित विश्लेषण केलं ज्यामध्ये त्यांनी असा शोध लावला होता की एक आगळीवेगळी फर्न मादी वनस्पती लांबलचक वेली तयार करतात आणि त्या जंगली वनस्पतींवर चढतात.

या वेलीं मध्ये मध्यभागी नवीन फांद्या निघतात आणि मादी झाडे वर येतात. पुढे बिरबल सहानी यांनी फॉसिल प्लांट या विषयावर प्रबंध केला आणि त्यांना लंडन विद्यापीठातर्फे डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. बिरबल सहानी यांचे संशोधन सर्वप्रथम जिवंत वनस्पतींवर सुरू होतं नंतर त्यांनी भारतीय वनस्पतींच्या अवशेषांवर अभ्यास सुरू केला. बिरबल सहानी यांच प्रामुख्याने संशोधन जीवाश्म बार्ज आणि जीराडान्सवर सुरू होते.

भारतामध्ये ही वनस्पती अस्तित्वात होती आणि तिच्या वर्गीकरणाच्या समस्येवर त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे संशोधन खूप पुढे न्यायचं होतं म्हणून भारतामध्ये जीवाश्म बार्ज आणि जीरादानांचे अग्रगण्य भंडार स्थापन करायचं त्यांचं स्वप्न होतं. भारतातील आसाम हे तिसर्‍या युगातील सौम्य वनस्पतींनी भरलेल आहे हे बिरबल सहानी यांनी सिद्ध करून दाखवलं.

वनस्पतींवर गाढा अभ्यास करून संपूर्ण जगाला वेगवेगळ्या वनस्पती बद्दल त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण आणि मनोरंजक अशी माहिती सांगितली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचे संशोधन करून त्या मध्ये किती प्रकारच्या प्रजाती असू शकतात हे शोधून काढलं. बिरबल सहानी हे मुद्रा शास्त्रज्ञ आणि वनस्पती शास्त्रज्ञ या विषयांमध्ये अग्रगण्य होते.

बिरबल सहानी हे इंडीयन सायन्स काँग्रेस च्या वनस्पती विज्ञान विभागाचे १९२१ व 1१९३८ तर १९२६ शालेय भूविज्ञान विभागाचे अध्यक्ष होते. इसवी सन १९३५ मध्ये पॅरिस येथे आयोजित केलेल्या नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या तृतीय दशवार्षिक समारंभासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिरबल सहानी यांची निवड करण्यात आली होती.

इतकच नव्हे तर इसवी सन १९३६ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे अधिक छत्र होण्याचा बहुमान यांना मिळाला होता. इसवी सन १९३७ व १९३८ पर्यंत बिरबल सहानी नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस चे अध्यक्ष होते. तर १९४० मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष झाले. बिरबल सहानी यांनी आपल्यावर पडलेली सर्व जबाबदारी अतिशय कुशलतेने व निष्ठेने पार पाडली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे त्यांनी केलेलं काम हे अवर्णनीय आहे.

प्रा. बिरबल सहानी

शिक्षण पूर्ण झाल्यावर बिरबल सहानी आपल्या मायदेशी भारतात परतले आणि तिथून पुढे बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी वनस्पती शास्त्रज्ञाचे प्राध्यापक म्हणून सेवा दिली. पुढे बिरबल सहानी यांची नियुक्ती लाहोर येथील पंजाब विद्यापीठांमध्ये झाली तिथेही बिरबल सहानी यांनी अध्यापनाचं काम केलं. पुढे लखनौच्या विद्यापीठात वनस्पतीशास्त्रज्ञ विभागाचे अध्यक्ष म्हणून बिरबल सहानी यांची निवड करण्यात आली.

इसवी सन १९३३ मध्ये बिरबल सहानी यांची लखनऊ विद्यापीठाचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली. लखनऊ येथे १९४३ मध्ये भूविज्ञान विभागाची स्थापना झाली आणि त्या वेळी आचार्य म्हणून डॉक्टर बिरबल सहानी यांची नियुक्ती करण्यात आली. वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून बिरबल सहानी यांनी वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान दिलं आहे.

याशिवाय एक शिक्षक म्हणून ते अतिशय कुशल होते विद्यार्थ्यांना लहानातील लहान गोष्ट समजावून सांगण्याची त्यांची पद्धत जगावेगळी होती. त्यांनी फक्त चांगली शिकवण दिली नाही तर पॅलिओ बॉटनी या विषयावरचं त्यांचं संशोधन त्यांनी चांगल्या पद्धतीने लोकांसमोर समजावून मांडण्याचा प्रयत्न केला.

वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून वनस्पतींवर असणारी त्यांची दृष्टी इतकी तीक्ष्ण होती की मातीत गाडलेल्या जीवाश्म अवशेषांचा काय वय असू शकत आणि ते कसे विकसित झाले असतील हे देखील ते सहज सांगू शकत होते. इतकेच नव्हे तर दगडी झाडापासून त्यांनी अभ्यास केला होता भाषेवर त्यांचा उत्तम पगडा होता हडप्पा, मोहेंजोदडो आणि सिंधू खोऱ्यातील वनस्पती वर त्यांनी वेगवेगळे निष्कर्ष काढले होते.

पेंटोझायली हा नवीन व विलुप्त प्रकट बीज वनस्पतींपैकी जीवाश्म वनस्पतींचा गट बिरबल सहानी यांनी शोधून काढला. तृतीया कल्पातील म्हणजेच सुमारे ६.५० कोटी ते १.२ कोटी वर्षांपूर्वी च्या काळातील असलेला अझोला या जलनेचा शोध व पूर्व परमियन युगातील म्हणजेच सुमारे २७.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील असलेला झायगाॅप्टेरिस प्रायमॅरिया या वनस्पतींची ओळख जगाला बिरबल सहानी यांनी करून दिली.

हे एक महत्त्वपूर्ण संशोधन ठरलं. लखनऊ येथे बिरबल सहानी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुळे निधन झालं. इसवी सन १९५० मध्ये आंतरराष्ट्रीय वनस्पतिविज्ञान परिषदे करिता बिरबल सहानी यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती परंतु त्याआधीच त्यांचे निधन झाले.

आम्ही दिलेल्या birbal sahni information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बीरबल साहनी यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या birbal sahni information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of birbal sahni in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये birbal sahni information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!