बोरन्हाण मराठी माहिती Bornhan Information in Marathi

bornhan information in marathi – bornahan meaning in marathi बोरन्हाण मराठी माहिती, भारतामध्ये अनेक प्रकारच्या रूढी आणि परंपरा ह्या चालवल्या जातात तसेच अनेक वेगवेगळे सण देखील साजरे केले जातात आणि बोरन्हाण हा एक मकर संक्रांतीचा भाग आहे आणि बोरन्हाण हे लहान मुलांना मकर संक्रांतीच्या काळामध्ये घातले जाते आणि आज आपण या लेखामध्ये बोरन्हाण का घातले जाते आणि त्याचे महत्व काय आहे या सर्व गोष्टींच्याविषयी खाली आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतामध्ये लहान मुलांना बोरन्हाण घालणे हि एक मराठी संस्कृती आहे.

अनेक भारताच्या अनेक भागामध्ये लोकांना माहित आहे कि बोरन्हाण म्हणजे नेमके काय असते. बोरन्हाण हे मुख्यता लहान मुलांना बदलत असणाऱ्या ऋतूंची बाधा होऊ नये म्हणून घातले जाते आणि यामध्ये त्यांच्या अंगावर चिरमुरे, उसाचे छोटे छोटे तुकडे, बोरे, शेंगा, हरभरे आणि चॉकलेट अश्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींचे मिश्रण केले जाते आणि त्या मिश्रणाने बोरन्हाण घातले जाते.

आपल्या घरातील लहान मुलांना बोरन्हाण घालणे म्हणजे हा आपल्या घरातील एक प्रकारचा कार्यक्रम असतो आणि हा बोरन्हाण कार्यक्रम हा मकर संक्रांतीपासून रथसापतमीपर्यंत कधीही एक चांगला दिवस पाहून केले जावू शकते.

bornhan information in marathi
bornhan information in marathi

बोरन्हाण मराठी माहिती – Bornhan Information in Marathi

मकर संक्रांत म्हणजे काय ?

मकर संक्रांत हा एक भारतीय सण आहे जो सर्वत्र भारतामध्ये जानेवारी महिन्यामध्ये साजरा केला जातो आणि या सणादिवशी लोक एकमेकांना भेटतात तसेच शुभेच्छा देतात तसेच तिळगुळ देऊन तील गुळ घ्या आणि गोड गोड बोला अश्या शुभेच्छा देखील देतात आणि या दिवशी लोक काळे कपडे देखील घालतात.

बोरन्हाण म्हणजे काय – bornahan meaning in marathi

बोरन्हाण हे लहान मुलांना बदलत्या ऋतूंची बाधा होऊ नये म्हणून घातले जाते आणि हे बोरन्हाण मकर संक्रांति पासून रथसप्तमी पर्यंत कधीही क चांगला दिवस बघून केले जाते आणि यामध्ये लहान मुलांच्या अंगावर चिरमुरे, उसाचे छोटे छोटे तुकडे, बोरे, शेंगा, हरभरे आणि चॉकलेट अश्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींचे मिश्रण केले जाते आणि बोरन्हाण घातले जाते.

बोरन्हाण कसे केले जाते

बोरन्हाण हा एक मकर संक्रांतीशी जोडलेला एक भाग आहे आणि एक एक लहान मुलांचा कौतुक सोळला मनाला जातो आणि हा घरातील एक प्रकारचा कार्यक्रम असतो कारण आपल्याला त्यासाठी अनेक प्रकारे तयारी करावी लागते आणि हे करताना आनंदाचे वातावरणदेखील असते. बोरन्हाण हे लहान मुलांना मकर संक्रांति पासून रथ सप्तमीपर्यंत कधीही कोणताही चांगला दिवस बघून केला तरी चालतो.

बोरन्हाण हे १ वर्षापासून ते ५ वर्षाच्या मुलांचे घातले जाते आणि बोरन्हाण घालताना त्या मुलाला तिल्गुलाचे दागिने म्हणजेच गळ्यामध्ये तिळगुळाची माळ घातली जाते, हातामध्ये तिळगुळाच्या दोन बांगड्या घातल्या जातात तसेच कमरपट्टा आणि डोक्यावर तिळगुळाचा किरीट घातला जातो आणि यामध्ये मुलींचे आणि मुलांच्या दागीण्यामध्ये फरक असतो तसेच मुलांना त्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील घातले जातात आणि मुलांच्यासाठी काळा कुर्ता आणि मुलींच्यासाठी काळ्या रंगाचे फ्रॉक घातले जातात.

अश्या प्रकारे त्यांना काळ्या रंगाचे कपडे घालून आणि त्यावर हलव्याचे दागिने घालून नटवले जाते आणि त्यांना पाटावर बसवले जाते आणि त्यांचे अवक्षण करून त्यांना बोरे, भुईमुगाच्या शेंगा, चिरमुरे, चॉकलेट, वाटण्याच्या शेंगा, ओले हरभरे आणि ऊस या सारख्या आपल्यालाकडे उपलब्ध असलेल्या मिश्रणापासून बोरन्हाण घातले जाते तसेच इतर लहान मुलांना बोलावून काही भेटवस्तू दिल्या जातात आणि अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हौशेनुसार हा सोहळा करत असतात.

बोरन्हाण का घातले जाते ?

  • बोरन्हाण का करावे असा प्रश्न हा सर्वांना पडतो परंतु श्री कृष्णांच्या काळामध्ये करी नावाचा एक राक्षस राहत होता आणि त्यावेळी त्याचे वाईट विचार किवा वाईट दृष्टी श्री कृष्णावर पडू नये म्हणून म्हणून श्री कृष्ण लहान असताना त्या वेळी श्री कृष्णाला सर्वप्रथम बोरन्हाण घातले होते आणि तेव्हा पासून हि प्रथा सुरु झाली आहे आणि सध्या हि प्रथा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते.
  • बोरन्हाण हे मुख्यता लहान मुलांना बदलत असणाऱ्या ऋतूंची बाधा होऊ नये म्हणून घातले जाते.

लहान मुलांना बोरन्हाण घालण्यासाठी काय काय वापरले जाते ?

लहान मुलांना बोरन्हाण घालण्यासाठी वेगवेगळे शेतातील साहित्य वापरले जाते तसेच इतर काही साहित्य देखील वापरले जाते. जसे कि बोरे, ऊसाचे छोटे छोटे तुकडे, ओले हरभरे, हिरव्या वाटाण्याच्या शेंगा, वाळलेल्या भुईमुगाच्या शेंगा, चिरमुरे, लाह्या आणि चॉकलेट या सारख्या साहित्यांचा वापर हा बोरन्हाण घालण्यासाठी केला जातो आणि आपण बोरन्हाण घालताना यापैकी जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचे मिश्रण करून घालू शकतो कारण आपल्याकडे एका वेळी सगळेच साहित्य असेल असे काही नाही.

बोरन्हाण विषयी विशेष तथ्ये – facts

  • लहान मुलांना बोरन्हाण हे मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत कधीही घातले जाते.
  • सर्वप्रथम बोरन्हाण हे लहान श्री कृष्णाना घातले होते आणि तेव्हापासून हि प्रथा सुरु झाली आहे.
  • बोरन्हाण हे १ वर्षापासून ५ वर्षापर्यंतच्या मुलांना घातले जाते.
  • बोरन्हाण घालताना मुलांना काळे कपडे, हलवायचे दागिने घातले जातात आणि त्यांचे अवक्षण करून त्यांना बोरन्हाण घातले जाते.
  • लहान मुलांना बोरन्हाण घालून त्या मुलांची नाळ हि आपल्या परंपरेशी आणि संस्कृतीशी जोडली जाते.
  • बोरन्हाणच्या मिश्रणामध्ये महत्वाचे साहित्य ऊसाचे छोटे छोटे तुकडे, चिरमुरे, बोरे, भुईमुगाच्या शेंगा.

FAQ

Q1. बोरणाहान म्हणजे काय?

बोरन्हाण हे लहान मुलांना बदलत्या ऋतूंची बाधा होऊ नये म्हणून घातले जाते आणि हे बोरन्हाण मकर संक्रांति पासून रथसप्तमी पर्यंत कधीही क चांगला दिवस बघून केले जाते आणि यामध्ये लहान मुलांच्या अंगावर चिरमुरे, उसाचे छोटे छोटे तुकडे, बोरे, शेंगा, हरभरे आणि चॉकलेट अश्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींचे मिश्रण केले जाते आणि बोरन्हाण घातले जाते.

Q2. आपण बोरनाहन का साजरा करतो?

बोरन्हाण हे मुख्यता लहान मुलांना बदलत असणाऱ्या ऋतूंची बाधा होऊ नये म्हणून घातले जाते.

Q3. बोर स्नान कसे करावे?

बोरन्हाण हे लहान मुलांना मकर संक्रांति पासून रथ सप्तमीपर्यंत कधीही कोणताही चांगला दिवस बघून केला तरी चालतो.
बोरन्हाण हे १ वर्षापासून ते ५ वर्षाच्या मुलांचे घातले जाते आणि बोरन्हाण घालताना त्या मुलाला तिल्गुलाचे दागिने म्हणजेच गळ्यामध्ये तिळगुळाची माळ घातली जाते, हातामध्ये तिळगुळाच्या दोन बांगड्या घातल्या जातात तसेच कमरपट्टा आणि डोक्यावर तिळगुळाचा किरीट घातला जातो आणि यामध्ये मुलींचे आणि मुलांच्या दागीण्यामध्ये फरक असतो तसेच मुलांना त्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील घातले जातात आणि मुलांच्यासाठी काळा कुर्ता आणि मुलींच्यासाठी काळ्या रंगाचे फ्रॉक घातले जातात.

आम्ही दिलेल्या bornhan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बोरन्हाण मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bornahan meaning in marathi या bornhan meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bornhan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!