मकर संक्रांति माहिती मराठी 2024 Makar Sankranti Information in Marathi

Makar Sankranti Information in Marathi 2022 मकर संक्रांति माहिती मराठी भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये अनेक जातीचे लोक राहतात आणि अनेक धर्म व त्यांचे धार्मिक सण उत्सव साजरे केले जातात. भारतामध्ये एकूण २८ राज्य आहेत. आणि या प्रत्येक राज्याचे वेगळं असं अस्तित्व आहे, महत्त्व आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे सण साजरे होतात. ज्याची काही शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणं असतात. असंच आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण सणाची माहिती जाणून घेणार आहोत. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात प्रत्येक बारा कोस‌नंतर वेगवेगळी भाषा वापरली जाते.
अशाच प्रकारे भाषे सोबत हे प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण साजरे केले जातात. आजच्या या लेखामध्ये आपण मकर संक्रांती या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांति हा सण का साजरा करतात? व या सणाचं असणारं पारंपारिक व शास्त्रीय महत्त्व या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.
makar sankranti information in marathi
makar sankranti information in marathi

मकर संक्रांति माहिती मराठी – Makar Sankranti Information in Marathi

सणमकरसंक्रांत
दिन 14 जानेवारी
वारशुक्रवार
संक्रांतीचा क्षण दुपारी 02:43
संक्रांती घटी22 (दिनमना)
संक्रांतीचा चंद्रवृषभ

मकर संक्रांति का साजरी करतात 

प्रत्येक सणाला एक वेगळे महत्त्व असतं. सण साजरा करण्याच्या पाठीमागे एक शास्त्रीय व वैज्ञानिक कारण असतं. तेच कारण मकर संक्रांती या सणामागे देखील आहे. प्रामुख्याने मकर संक्रांति हा सण वर्षाच्या सुरुवातीला येतो म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये हा सण येतो. हा सण साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये सूर्य हा देवासमान मानला जातो.

सूर्याची रोज सकाळी नितीनियमाने पुजा केली जाते. आता तुम्ही म्हणाल सूर्याचा आणि मकर संक्रातीचा काय संबंध तर, तर मकर की एक रास आहे आणि दरवर्षी सूर्य जानेवारी महिन्यामध्ये मकर राशी मध्ये प्रवेश करतो. या प्रक्रियेला मकर संक्रांति असे म्हटले जाते. मकर संक्रांति हा प्रामुख्याने जानेवारीमध्ये येणारा सण आहे. इसवी सन सोळाशे पासून मकर संक्रांती या सणाच्या अनेक तारखा बदलत गेल्या आहेत.

सोळाव्या शतकामध्ये हा सण ९ किंवा १० जानेवारी या तारखेला यायचा. कालांतराने जसजसं शतक बदलत गेलं तसतसं या तारकांमध्ये देखील बदल जाणवला. प्रत्येक शतकामध्ये एक‌ एक तारीख पुढे सरकते आणि येणाऱ्या काही शतकांमध्ये मकर संक्रांतिची तारीख जानेवारीच्या अंतिम हप्त्यांमध्ये येण्याची शक्यता आहे.

जसा मी वरती सांगितलं त्याप्रमाणे भारतात प्रत्येक सण‌हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि भारतामध्ये विविध प्रांत असल्यामुळे एकच सण वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. सूर्य देवासमान आहे म्हणूनच भारतातील बऱ्याच प्रांतांमध्ये मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो.

उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन प्रांतांमध्ये मकर संक्रांत हा सण लोहडी किंवा लोहरी या नावाने साजरा केला जातो. पंजाब, हरियाणा या भागा मध्ये लोहरी हा सण १३ जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. तिकडे या सणाचं विशेष असे महत्त्व आहे. हिवाळा असल्यामूळे हा सण शेकोटी पेटवून साजरा केला जातो.

ही शेकोटी पेटवण्यासाठी छोटी मुलं घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटी साठी लागणार्‍या साहित्या साठी पैसे गोळा करतात‌. त्यामध्ये उसाचे पेर, तांदूळ, तिळाचे दाणे असं साहित्य टाकतात आणि लोहरी देवाची पूजा करतात. पूर्व भारतामध्ये बिहार प्रांतांमध्ये मकर संक्रांतीची “संक्रान्ति” आणि “खिचडी” अशी दोन नावे आहेत. तर आसाम मध्ये संक्रांतीला भोगळी बिहू या नावाने ओळखलं जातं.

गुजरात व राजस्थान मध्ये तर मकर संक्रातीला पतंगनो तहेवार या नावाने ओळखलं जातं. या सणाच्या निमित्ताने गुजरात मधील लोक धान्य, तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवून दान करतात. तसेच गहू बाजरी यांची खिचडी बनवली जाते. सर्वजण पतंग उडवून हा सण साजरा करतात. गुजरातमध्ये हा सण अगदी मोठ्या थाटा मध्ये साजरा केला जातो.

इतकच नव्हे तर या सणाच्या दिवशी बरेच पर्यटक गुजरात मधील पतंगोउत्सव पाहण्यासाठी विशेष गर्दी करतात. या सणाला गुजरात मध्ये उतरान म्हणून ओळखलं जातं. दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये संक्रांति हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो. हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस भोगी पोंगल असतो त्या दिवशी होळी पेटवली जाते आणि त्यामध्ये उपयोगी नसलेल्या वस्तू  टाकल्या जातात.

मुली बायका होळीभोवती नाच गानी करतात. दुसऱ्या दिवशी सूर्य पोंगल हा सण साजरा केला जातो. या मध्ये तांदूळ, दूध, यांची खीर करून तिचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. तिसरा दिवस हा मूडू किंवा कननू पोंगल या नावाने ओळखला जातो. आणि या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. शिवाय या दिवशी भावाचं चांगलं व्हावं भावाला चांगला आयुष्य लाभावे म्हणून पूजा करून बहिणी भावांना ओवाळतात.

मकर संक्रांति हा सण भारतामध्ये इतक्या थाटामाटात उत्साहाने साजरा केला जातो. कि फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरील अनेक देशांमध्ये संक्राती हा सण आनंदाने साजरा केला जातो. नेपाळ मध्ये हा सण माघी या नावाने साजरा केला जातो. थायलंडमध्ये सोंग्क्रान या नावाने मकर संक्रांती साजरी केली जाते. तर लाओस मध्ये पिमालाओ आणि म्यानमारमध्ये थिंगयान या नावाने मकर संक्राती साजरी केली जाते.

मकर संक्रांति हा सण कोणत्या ऋतूमध्ये येतो?

भारतातील सर्व सण ऋतूंशी जोडलेले असतात. मकर संक्रांति हा सण हिवाळा या ऋतूमध्ये येतो. हा सण या ऋतूमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे संक्रांतीच्या वेळी थंडीच वातावरण असतं. आणि थंडीमध्ये अंगाला उष्णतेची उभे ची गरज असते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ खाल्ले जातात. तीळ व गूळ हे उष्ण पदार्थ आहेत.

तसेच वेगवेगळ्या शेंगभाज्या खाल्ल्या जातात. संक्रांतीच्या दिवशी सकाळ सकाळी पतंग उडवले जातात. पतंग उडवले जाण्याच मुख्य कारण म्हणजे सकाळी पतंग उडवल्याने सूर्याची करणे शरीराला लागतात आणि त्यामधून शरीराला आवश्यक असणार विटामिन डी मिळते ज्यामुळे थंड हवेमुळे होणारऱ्या रोगा पासून आपला बचाव होतो.

तिळगुळ का देतात?

मकर संक्रांतीला तिळाचे लाडू किंवा वड्या आणि तीळगूळ देण्याचा मुख्य कारण म्हणजे हा सण थंडीच्या दिवसांमध्ये येतो. आणि थंडी मध्ये मानवी शरीराला उष्णतेची गरज असते तीळ व गुळ हे उष्ण पदार्थ आहेत. ज्वारी व बाजरी च्या पिठामध्ये तीळ टाकून त्यांच्या भाकऱ्या केल्या जातात. त्या शिवाय त्याच्या जोडीला हरभरा, गाजर, मटार, चवळीची शेंग आणि तिळाच मिश्रण असलेली भाजी करण्याची पद्धत आहे.

या भाजीमध्ये अन्य भाज्यांचे देखील मिश्रण असल्यामुळे शरीरासाठी खूपच आरोग्यदायक आहे. या दिवशी तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटले जातात याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षभरात झालेल्या चुका, गैरसमज, अपमान, राग या सर्व गोष्टी विसरून आपण आपल्या परिवाराला मित्र-मैत्रिणींना तिळगुळाचे लाडू देतो.

जेणेकरून आपल्या नात्यातील कडवटपणा जाईल आणि ह्याच्या पुढे संपूर्ण वर्षभर गोडवा रहावा. माणसाने कितीही चुका केल्या तरी आपण त्यांना नेहमीच माफ केलं पाहिजे आणि सर्वांनीच मिळून मिसळून आनंदित राहिले पाहिजे असा संदेश हा सण आपल्याला देत असतो.

मकर संक्रांतीचे महत्व – makar sankranti importance in marathi

दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सूर्याचे उत्तरायण सुरू होते. सूर्य वर्षाच्या सुरुवातीला मकर राशीमध्ये संक्रमण करतो. आणि याच प्रक्रियेला मकर संक्रांत असे म्हटले जाते. सूर्याची किरणे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिणी या अंक्षांशावर लंबरूपात पडायला सुरुवात होतात. आणि या दिवसापासून सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकत जातो. अगदी प्राचीन काळापासून सूर्य हा देवासमान मानला जातो.

आणि मकर संक्रांत हा सण सौर कालगणनेशी संबंधित आहे. त्यामुळे हा सण भारताचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. पौष महिन्यामध्ये हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत या सणाच्या आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रात होऊन गेल्यावर दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते आणि त्याशिवाय हवेतील गारवा देखील कमी होतो आणि उष्णता वाढायला सुरुवात होते.

प्राचीन ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीचे महत्व सांगितलं गेलं आहे. महाभारतामध्ये कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शरशय्येवर ‌उत्तरायणाची वाट पाहत होते. त्याला इच्छामरण वरदान मिळालं होतं. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झालं त्याच दिवशी त्यांनी आपल्या प्राणाचा त्याग केला. उत्तरायणाचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो. हा सण साजरा करण्याचा दुसरा मुख्य कारण म्हणजे ह्या सणामध्ये थंडीच वातावरण असतं आणि या सणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या खायला मिळतात. हा सण आरोग्य घेऊन येतो.

मकर संक्रांती पूजा विधी

मकर संक्रातीची सुरुवात या भोगी या सणापासुन होते. भोगी हा सण मकर संक्राती या सणाच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. हा सण आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी शेंगभाज्या, फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी केली जाते.

हा पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात. शिवाय भोगीच्या दिवशी भोगीची भाजी अशी विशेष भाजी देखील बनवली जाते. या भाजीमध्ये वांगी बटाटा, हिरवागार घेवडा, पापडी, हरभराचे हिरवेगार दाने, कोनफळ, गाजर, भुईमूग आणि इतर सर्व प्रकारचे शेंगभाज्या असतात व त्यांची भोगीची भाजी केली जाते. मकर संक्रातीच्या दिवशी सुगड पूजन केल जात.

सुगड म्हणजे एक छोटं मटक असतं या मटक्या मध्ये गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, चींचा, तांदळाचे दाणे, हळदीकुंकू, सुपारीचा खन, घेवडा यांसारखे पदार्थ टाकून सुहासिनी सुगड पुजतात. मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.

संक्रांत सण देवस्थानी मानला जातो. या देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आणि आपल्या प्रजेला मुक्त केलं होतं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.

मकर संक्रांती कशी साजरी करावी

भारतामध्ये मकर संक्रांती या सणाचं फार मोठ आणि विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतामध्ये हा सण अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी सुहासिनी पूजा करतात. भोगीची भाजी बनवतात आणि देवाला त्याच नैवेद्य दाखवतात. मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात या दिवशी सर्वजण काळया रंगाचे कपडे घालतात.

हा सण नवीन दांपत्य साठी शुभ मानला जातो. म्हणूनच नवीन दांपत्य मकर संक्रांत हा सण आनंदाने साजरा करतात. नव्या नवरीला या दिवशी काळ्या रंगाची साडी भेटवस्तू म्हणून दिली जाते. नव्या नवरीला नवऱ्याला हलव्याचे दागिने घातले जातात. या दिवशी आपण कोणतीही गोष्ट दान करू शकतो. त्यामध्ये श्रमदान, रक्तदान, वस्त्र दान अन्नधान्य या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

असं म्हणतात आपण ज्या ज्या गोष्टी या दिवशी दान करू त्या गोष्टींची कमतरता सूर्यदेव आपल्याला कोणत्याही जन्मात पडू देणार नाही. महाराष्ट्रामध्ये हा सण तीन दिवस चालतो. मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत अशा प्रकारे हा सण तीन दिवस चालतो. किंक्रांतीच्या दिवशी बायका हळदीकुंकू समारंभ ठेवतात.

या दिवशी स्त्रिया एकमेकींना धान्याचं वाण देतात. आहार दृष्ट्या हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. शेतकरी बांधवांसाठी देखील हा सण आनंद घेऊन येणारा सण आहे. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी शेतातून पिकलेल्या भाज्यांचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. हा सण वर्षाच्या सुरुवातीला येतो. तिळगुळ देऊन नवीन वर्षाची गोड गोड सुरुवात केली जाते.

या सणाच्या दिवशी पौष्टिक नैवेद्य केला जातो म्हणजे पुढच्या संपूर्ण वर्ष आरोग्याचे जावो अशी यामागची भावना असते. मराठी बांधवांचे वर्षाच्या बारा महिने सण असतात आणि वर्षातील पहिल्या महिन्यातला पहिला सर हा मकरसंक्रांत असतो म्हणूनच खूपच उत्साहाने हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांति हा सण सर्वांच्याच आवडीचा आहे.

Makar Sankranti Haldi Kunku Information in Marathi

आम्ही दिलेल्या makar sankranti information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर makar sankranti in marathi मकर संक्रांति माहिती मराठी makar sankranti information in marathi 2022 बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sankranti information marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि makar sankranti importance in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये makar sankranti in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!