चंद्रपूर जिल्हा संपूर्ण माहिती Chandrapur District Information in Marathi

chandrapur district information in marathi – history of chandrapur district in marathi चंद्रपूर जिल्हा संपूर्ण माहिती, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भारताच्या दक्षिण मध्य भागामध्ये असणारा चंद्रपूर जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तसेच या जिल्ह्याचा इतिहास देखील पाहणार आहोत. चंद्रपूर हे शहर महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे शहर आहे आणि हे शहर नागपूर या शहरापासून १०० ते १५० कि.मी अंतरावर आहे या शहराला सुपर थर्मल पॉवर स्टेशन असणारे शहर म्हणून ओळख मिळाली आहे आणि हे शहर लाकूड, कोळसा, तेंदूपत्ता आणि इतर वनोपज खनिजांच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

चंद्रपूर ह्या शहराला किंवा या जिल्ह्याला पर्यटन स्थळांचा देखील वारसा लागला आहे कारण महाराष्ट्रातील प्रसिध्द अभयारण्यापैकी एक म्हणजे ताडोबा अभयारण्य आणि अंधारी व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर शहरापासून ४५ कि.मी आहे म्हणजेच हि या शहराजवळील प्रमुख ठिकाणे आहेत. त्याचबरोबर चंद्रपूर शहरामध्ये ८ व्या शतकामधील एकूण नऊ प्राचीन लेण्या आहेत आणि या लेण्यांच्यावर मोठ्या प्रमाणात बौध्द शिल्पे कोरलेली आहेत.

तसेच चंद्रपूर मध्ये रमाला तलाव गार्डन, भद्रावती येथील जैनमंदिर, सोमनाथ मंदिर तसेच महाकाली मंदिर देखील आकर्षणे आहेत. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये एकूण १५ तालुके आहेत आणि या जिल्ह्याला १९६४ च्या अगोदर चंदा या नावाने ओळखले जायचे आणि मग १९६४ नंतर या जिल्ह्याचे नाव हे चंद्रपूर असे पडले आणि मग चंद्रपूर हेच नाव प्रचलित होत गेले आणि सध्या या जिल्ह्याला चंद्रपूर जिल्हा म्हणूनच ओळखले जाते. चला तर आता आपण चंद्रपूर जिल्ह्याविषयी खाली आणखीन माहिती घेवूया.

chandrapur district information in marathi
chandrapur district information in marathi

चंद्रपूर जिल्हा संपूर्ण माहिती – Chandrapur District Information in Marathi

जिल्ह्याचे नावचंद्रपूर जिल्हा
जवळचे शहरनागपूर (१०० ते १५० कि.मी अंतरावर)
पूर्वीचे नावचंदा
पर्यटनस्थळेताडोबा अभयारण्य, अंधारी व्याघ्र प्रकल्प, लेणी, रमाला तलाव गार्डन, भद्रावती येथील जैनमंदिर, सोमनाथ मंदिर तसेच महाकाली मंदिर

चंद्रपूर हे शहर कश्यासाठी प्रसिध्द आहे ?

या शहराला सुपर थर्मल पॉवर स्टेशन असणारे शहर म्हणून ओळख मिळाली आहे आणि हे शहर लाकूड, कोळसा, तेंदूपत्ता आणि इतर वनोपज खनिजांच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास – history of chandrapur district in marathi

चंद्रपूर या शहराचा इतिहास हा खूप जुना आहे म्हणजेच या शहराचा इतिहास हा द्वापार युगाच्या पौराणिक युगापर्यंतचा आहे. त्या काळामध्ये या शहरामध्ये चंद्रहास नावाचा राजा राज्य करत होता आणि या राजाने या शहराचे नाव हे इंदुपूर असे ठेवले होते. नंतर या शहराचे नाव हे चंद्राचे शहर किंवा चंद्रपूर असे होते. पण मधल्या काळात या शहरावर खांडक्या शाह हा राज्य करत होता आणि त्यांने त्याच्या काळामध्ये या शहराचा विकास केला.

मग नंतर ज्यावेळी ब्रिटीश हे भारतामध्ये आले त्यावेळी त्यांनी चंद्रपूर या शहरावर देखील कब्जा केला आणि त्यावेळी त्यांनी या शहराचे नाव चंदा असे बदलून करण्यात आले परंतु १९६४ नंतर याचे नाव परत चंद्रपूर असे ठेवण्यात आले आणि मग हेच नाव प्रचलित झाले आणि आता या शहराला चंद्रपूर या मावानेच ओळखले जाते. १९ व्या शतकामध्ये ह्या राजघराण्याचा शेवटचा वारस मरण पावल्यानंतर हे शहर ब्रिटीश राजवटीकडे गेले आणि मग नंतर स्वातंत्र्यानंतर हे शहर महाराष्ट्र सरकारकडे सोपवले आणि या शहराचा विकास होत गेला.

चंद्रपूरच्या इतिहासावर सविस्तर माहिती 

चंद्रपूर या शहरावर हिंदू आणि बौध्द राजांनी राज्य केले. १७५१ पर्यंत या शहरावर गोंड राजांनी राज्य केले त्यांनतर या शहरावर मराठ्यांनी देखील राज्या केले आणि ज्यावेळी वंशाचा शेवटचा राजा रघुजी भोसले १८५३ मध्येमरण पावला आणि त्यांनतर चंद्रपूर या शहरासह नागपूर हा भाग देखील ब्रिटीशांच्या राजवटी खाली गेला.

मग १८५४ मध्ये चंद्रपूरचा स्वातंत्र्य जिल्हा तयार झाला आणि १८७४ मध्ये त्यामध्ये तीन तहशील करण्यात आले ते म्हणजे वरोरा, मुल आणि ब्रह्मपुरी. १८७४ मधेच गोदावरी हा जिल्हा रद्द करण्यात आला आणि चार तहशील हे चंद्रपूरला जोडून एक तहशील बनवण्यात आले. १९०५ मध्ये चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी तहशिलीमधून जमीनदारांच्या सहभागाने गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

१९५६ मध्ये राज्याच्या पुनर्रचनेनंतर जिल्हा मध्य प्रदेशातून मुंबई राज्यामध्ये हस्तांतरित करण्यात आला आणि १९६० मध्ये हा जिल्हा महराष्ट्राचा भाग बनला. प्रशासकीय सोयीसाठी आणि औद्योगिक आणि कृषी विभागासाठी हा जिल्हा पुन्हा चंद्रपूर मध्ये विभागला गेला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, भद्रावती, नागभीर, मुल, गोंडपिपरी, सिंदेवाही, साओली, कोरपना, राजुरा, जिवती, पोभूर्ना आणि बल्हारशाह हे तालुके आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण १५ तालुके आहे आणि ते कोणकोणते ते आपण खाली पाहूया.

  • चंद्रपूर.
  • वरोरा.
  • चिमूर.
  • ब्रह्मपुरी.
  • भद्रावती.
  • नागभीर.
  • मुल.
  • गोंडपिपरी.
  • सिंदेवाही.
  • साओली.
  • कोरपना.
  • राजुरा.
  • जिवती.
  • पोभूर्ना.
  • बल्हारशाह.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे – tourist places 

ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे आणि प्रसिध्द अभारण्य आहे जे व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखले जाते. या अभयारण्यामध्ये आपल्याला वाघ हे थेट मोकळ्या भागामध्ये फिरत असलेले पहायला मिळतात आणि या अभयारण्यामध्ये पर्यटकांची देखील मोठी गर्दी असते. ताडोबा व्याघ्रप्रकल्पमध्ये एकूण ८० पेक्षा जास्त वाघ आहेत आणि हा व्याघ्रप्रकल्प आपण खुल्या जीपमधून पाहू शकतो.

  • महाकाली मंदिर – chandrapur mahakali mandir history in marathi

चंद्रपूर या शहरामध्ये एक महाकाली मंदिर आहे जे खूप प्रसिध्द आणि प्राचीन आहे आणि या मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमेच्या सुमारास या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि त्यावेळी लाखी भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. महाकली मंदिर हे चंद्रपूर शहरामधील प्रसिध्द मंदिरापैकी एक आहे आणि या मंदिरामध्ये गणेशाचे, हनुमंताचे आणि शनीचे देखील मंदिर आहे. महाकाली मंदिर हे प्राची असल्यामुळे मानादिराची कला पाहण्यासारखी आहे.

  • भद्रावती जैन मंदिर 

भद्रावती जैन मंदिर देखील या शहरातील लोकप्रिय मंदिर आहे आणि हे मंदिर चंद्रपूर शहरापासून ३२ कि.मी अंतरावर आहे. भद्रावती जैन मंदिर हे देखील खूप पुरातन आहे आणि या मंदिरामध्ये सुरेख अश्या मुर्त्या विराजमान आहेत.

  • लेणी 

चंद्रपूर शहरामध्ये ८ व्या शतकामधील एकूण नऊ प्राचीन लेण्या आहेत आणि या लेण्यांच्यावर मोठ्या प्रमाणात बौध्द शिल्पे कोरलेली आहेत.

  • इतर ठिकाणे 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंधारी व्याघ्र प्रकल्प, रमाला तलाव गार्डन आणि सोमनाथ मंदिर देखील आहे.

चंद्रपूर जिल्ह्याविषयी काही महत्वाची तथ्ये – facts 

  • चंद्रपूर हे शहर महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे शहर आहे आणि हे शहर नागपूर या शहरापासून १०० ते १५० कि.मी अंतरावर आहे.
  • ताडोबा अभयारण्य, अंधारी व्याघ्र प्रकल्प, लेणी, रमाला तलाव गार्डन, भद्रावती येथील जैनमंदिर, सोमनाथ मंदिर तसेच महाकाली मंदिर हे काही चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाची आकर्षणे आहेत.
  • चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण १५ तालुके आहेत.
  • या जिल्ह्याला १९६४ च्या अगोदर चंदा या नावाने ओळखले जायचे आणि मग १९६४ नंतर या जिल्ह्याचे नाव हे चंद्रपूर असे पडले.
  • हे शहर लाकूड, कोळसा, तेंदूपत्ता आणि इतर वनोपज खनिजांच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

आम्ही दिलेल्या chandrapur district information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चंद्रपूर जिल्हा संपूर्ण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते  या article मध्ये update करू, मित्रांनो हि chandrapur gond raja history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!