ताडोबा अभयारण्य माहिती Tadoba National Park Information in Marathi

Tadoba National Park Information in Marathi – Tadoba Abhayaranya ताडोबा अभयारण्य माहिती ताडोबा नॅशनल पार्क विषयी माहिती जे लोक वन्य जीव प्रेमी आहेत आणि ज्यांना वन्य प्राण्याच्या विषयी जाणून घेण्याचे आणि त्यांना पाहण्यासाठी आकर्षण आहे त्यांने हे ताडोबा नॅशनल पार्क / ताडोबा राष्ट्रीय उद्यान / ताडोबा अभयारण्य खूप चांगले ठिकाण आहे. ताडोबा नॅशनल पार्क हे भारतामध्ये महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम स्थापण झालेले उद्यान आहे ज्याची स्थापना इ. स १९५५ मध्ये झाली. ताडोबा नॅशनल पार्क / ताडोबा राष्ट्रीय उद्यान / ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठे आणि सर्वात जुने अभयारण्य आहे.

ज्याला ‘ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प’ या नावाने देखील ओळखले जाते. या भायाराण्याचे ताडोबा हे नाव ताडोबा किंवा तारू ह्या देवाच्या नावावरून ठेवले आहे जो तेथील स्थानिक देव आहे. ताडोबा नॅशनल पार्क हे नागपूर ह्या मुख्य शहरापासून १५० किलो मीटर अंतरावर आहे आणि या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १७२७ चौरस किलो मीटर आहे.

त्याचबरोबर या अभयारण्यामध्ये असणारा हा व्याघ्र प्रकल्प भारतातील ४७ व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. या अभयारण्यामध्ये वाघ, भारतीय बिबट्या, सांबार, हरण, नाग साप, जंगली मांजरे, नीलगाय, मोर, धारीधार हायना, अस्वल या सारखे वन्य जीव पाहायला मिळतात.

tadoba national park information in marathi
tadoba national park information in marathi

ताडोबा अभयारण्य माहिती – Tadoba National Park Information in Marathi

अभयारण्याचे नावताडोबा नॅशनल पार्क / ताडोबा राष्ट्रीय उद्यान / ताडोबा अभयारण्य / ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
राज्यमहाराष्ट्र
जिल्हाचंद्रपूर
स्थापनाइ. स १९५५
अभयारण्याचे क्षेत्रफळ१७२७ चौरस किलो मीटर
अभयारण्याचे प्रवेश द्वारकोलारा प्रवेशद्वार आणि मोहुर्ली प्रवेशद्वार
अभयारण्यामध्ये आढळणाऱ्या वनस्पतीयेथे साग, हिरडा, महुआ मधुका, ब्लॅक प्लम, बीजा, धौड, बांबू, भेरिया, हळद, तेंदू आणि इतर काही वनस्पती आढळतात
अभयारण्यामध्ये आढळणारे प्राणीवाघ, भारतीय बिबट्या, सांबार, हरण, नाग साप, जंगली मांजरे, नीलगाय, मोर , धारीधार हायना, अस्वल या सारखे वन्य जीव पाहायला मिळतात.

ताडोबा नॅशनल पार्क विषयी माहिती

ताडोबा उद्यानला भेट देण्यासाठी आपल्याला त्याच्या प्रवेशद्वारातून आत जावे लागते या अभयारण्याला २ प्रवेशद्वार आहेत ते म्हणजे कोलारा प्रवेशद्वार आणि मोहुर्ली प्रवेशद्वार त्याचबरोबर ताडोबा राष्ट्रीय उद्यान तीन स्वतंत्र वन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. ते म्हणजे ताडोबा उत्तर श्रेणी, कोल्सा दक्षिण श्रेणी आणि मोरहुर्ली श्रेणी.

ताडोबा अभयारण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथे आढळणारे वाघ जे आपण खुल्या जीप्सिमधून पाहू शकतो. या अभयारण्याचे मुख्य आकर्षण वाघ आहेत म्हणून या अभयारण्याला ‘ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प’ या नावाने देखील ओळखले जाते आणि हे उद्यान भारतातील ४७ व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे.

त्याचबरोबर या अभयारण्यामध्ये वाघ, भारतीय बिबट्या, सांबार, हरण, नाग साप, जंगली मांजरे, नीलगाय, मोर, धारीधार हायना, अस्वल या सारखे वन्य जीव पाहायला मिळतात.

ताडोबा जंगलाची वनस्पती दक्षिण उष्णकटिबंधीय कोरड्या पर्णपाती प्रकारची आहे आणि सुमारे ६२६ चौरस किमीवर पसरलेल्या आहेत आणि येथे साग, हिरडा, महुआ मधुका, ब्लॅक प्लम, बीजा, धौड, बांबू, भेरिया, हळद, तेंदू आणि इतर काही वनस्पती आढळतात.

इतिहास

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना महारष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इ. स १९५५ मध्ये झाली आणि हे उद्यान राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर इ. स १९८६ मध्ये राष्ट्रीय उद्यानाशेजारी अंधारी वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यात आले. इ. स १९९५ मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प’ सुरु करण्यात आला जो भारतातील ४१ वा व्याघ्र प्रकल्प होता.

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाविषयी मनोरंजक आणि अनोखी तथ्ये – interesting facts about of tadoba national park 

  • ताडोबा अभयारण्यामध्ये साग, हिरडा, महुआ मधुका, ब्लॅक प्लम, बेल, बीजा, धौड, बांबू, धावडा, कुसुम, भेरिया, हळद, चिंचवा, तेंदू आणि इतर काही वनस्पती आढळतात.
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना महारष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इ. स १९५५ मध्ये झाली
  • या उद्यानामध्ये एक नदी आहे तिचे नाव अंधारी असे आहे तसेच येथे कोलसा आणि ताडोबा हि दोन तलाव आहेत.
  • ताडोबा अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १७२७ चौरस किलो मीटर आहे.
  • ताडोबा हे उद्यान वनस्पती आणि प्राण्यांच्या समृद्ध जैवविविधतेने ओसंडून गेलेले आहे आणि विविध आकार आणि रंगांच्या प्रजातींचे हे घर आहे.
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे १५ ऑक्टोबर ते ३० जून पर्यंत पर्यटकांना पाहण्यासाठी सुरु असते आणि बहुतेक हे अभयारण्य मंगळवारी बंद असते.
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील वाघांना उत्कृष्ट अशी सेलिब्रिटींची नावे दिली जातात जसे कि माया, मतकासूर, गीता, लारा, माधुरी, गब्बर, मल्लिका, अमिताभ, तारा आणि मोना.
  • ताडोबा हे बिबट्या आणि जंगली कुत्र्यांच्यासाठी अधिवास आहे.

ताडोबा उद्यानाविषयी काही महत्वाचे प्रश्न 

  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?

ताडोबा या राष्ट्रीय अभयारण्याचे मुख्य आकर्षण वाघ आहेत म्हणून या अभयारण्याला ‘ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प’ या नावाने देखील ओळखले जाते आणि हे उद्यान भारतातील ४७ व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे.

  • ताडोबा अभयारण्यात किती वाघ आहेत?

महाराष्ट्र वन विभागाच्या म्हनण्यानुसार ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये ११५ वाघ आणि १५१ बिबट्या आहेत असा अंदाज आहे.

भेट देण्याची उत्तम वेळ 

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला पर्यटकांच्यासाठी भेट देण्याचा अगदी उत्तम कालावधी म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे १५ ऑक्टोबर ते ३० जून कारण या वेळी हिवाळा असतो आणि या कालावधी मध्ये आपल्याला वाघ या प्रण्यासोबत इतर प्राणी देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण ताडोबा अभयारण्याला पावसाळ्यानंतर देखील भेट देवू शकतो कारण पावसाळ्यानंतर जंगल अगदी हिरवे गार आणि अर्षक दिसते.

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची सफारी कशी करावी आणि सफारी करण्याची वेळ 

ताडोबा राष्ट्रीय उद्यान समितीने ताडोबा उद्यान पाहण्यासाठी वेळ ठरवलेले आहेत ते खाली दिलेले आहेत.

ताडोबा वन्यजीव अभयारण्यात सफारी करण्यासाठी जिफ ची सुविधा आहे आणि ताडोबातील जीप सफारीची वेळ खालीलप्रमाणे आहे.

सकाळी : सकाळी ६.०० ते सकाळी १०.००  (सकाळी ८.०० पर्यंत प्रवेशाची परवानगी)

दुपारी जीप: दुपारी ३.०० संध्याकाळी ६.०० पर्यंत (संध्याकाळी ४.३० पर्यंत प्रवेशाची परवानगी)

ताडोबा राष्ट्रीय उद्यान पाहण्यास कसे जावे

हवाई मार्गाने 

जर तुम्हाला हे अभयारण्य पाहण्यासाठी विमानाने जायचे असल्यास तुम्ही पुणे किंवा मुंबई या शहरातून विमानाने नागपूरला जावू शकता कारण नागपूर हे शहर उद्यानापासून जवळ आहे. या उद्यानापासून नागपूर हे शहर १४० किलो मीटर अंतरावर आहे.

त्यामुळे नागपूरहून तुम्हाला बस किंवा टॅक्सी पकडून अभयारण्य पाहायला जावे लागेल. नागपूर या शहरातून ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला जाण्यासाठी कॅब उपलब्द आहेत.

रस्ता मार्गाने 

या अभयारण्यापासून जवळचे बस स्थानक चंद्रपूर आणि चिमूर येथे आहेत आणि या शहरांना महाराष्ट्रातील काही शहरे आणि शहरांमधून आपल्याला बस मिळू शकते.

रेल्वे मार्गाने 

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला रेल्वेने भेट देण्यासाठी चंद्रपूरचे रेल्वे स्टेशन (अभयारण्यापासून ४९ किलो मीटर) आणि नागपूरचे रेल्वे स्टेशन (अभयारण्यापासून १५१ किलो मीटर) हे २ मार्ग आहेत. तेथून तुम्ही बस किंवा टॅक्सी पकडून अभयारण्य पाहायला जावू शकता.

आम्ही दिलेल्या tadoba national park information in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ताडोबा अभयारण्य माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tadoba national park information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of yoga in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tadoba rashtriy udyan Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!