घोड्याची माहिती Horse Information In Marathi

Horse Information In Marathi घोडा माहिती मराठी घोडा हा प्राचीन काळापासून वापरला जाणारा एक संवेदनशील प्राणी आहे म्हणूच प्राचीन काळामध्ये घोड्याचा वापर वाहतुकीसाठी , युद्धामध्ये तसेच प्रवास करण्यासाठी केला जात होता आणि हे आपण कित्येक वेळा इतिहासामध्ये शिकलोच आहोत. घोडा हा प्राणी त्याच्या चालीवरून, वफादारीसाठी आणि अज्ञाधारकतेसाठी प्रसिध्द आहे घोडा ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने न थकता धावू शकतो. घोडा हा शाकाहारी प्राणी आहे कारण ते धान्य किवा गवत खातात. घोडा हा असा प्राणी आहे कि जो बसून आणि उभारून विश्रांती घेतो.

ते जास्ती जास्त उभे राहूनच विश्रांती घेतात कारण त्यांना उभे राहण्यापेक्षा बसण्यासाठी जास्त शक्ती खर्च करावी लागते. घोडे सहसा आपल्या पिल्लांना रात्रीच जन्म देतात व ते जन्मलेले पिल्लू दोन ते तीन तासामध्ये उभारते व चालते सुद्धा आणि ते घोड्याचे पिल्लू ४ वर्षात पूर्णपणे मोठे होते.

horse-information-in-marathi
घोडा या प्राण्याबद्दल माहिती

घोड्याची माहिती – Horse information in marathi

 

घोड्या बद्दलचे काही तथ्य – facts of horse

 • घोड्याचे डोळे इतर प्राण्यांपेक्षा मोठे असतात व ते डोळे तोंडाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला असल्यामुळे ते ३६० डीग्रीमध्ये पाहू शकतात.
 • घोडा बसून तसेच उभारूनहि झोपू शकतो.
 • घोड्याचे डोळे मोठे असल्यामुळे तो अंधारातही स्पष्टपणे बघू शकतो.
 • इंग्रजीमध्ये नर घोड्याला ‘stallion’ तर मादा घोड्याला ‘mare’ असे म्हणतात.
 • घोड्यांचे पिल्लांना हि नावे असतात नर पिल्लांना ‘colt’ म्हणतात तर मादा पिल्लांना ‘filly’ म्हणतात.
 • घोड्याला ४० दात असतात व घोड्यांचा मेंदू माणसाच्या मेंदूच्या अर्ध्या वजना इतके असते.
 • घोड्याचे पोट लहान असल्यामुळे त्यांना जास्त आहाराची गरज नसते व ते दिवसातून ३४ ते ३५ लिटर इतके पाणी पितात.
 • त्यांच्या तळ पायाला एक लोखंडी नाल बसवलेली असते जेणेकरून खडकाळ भागातुल धावताना त्यांच्या पायाचे संरक्षण होईल.
 • घोड्याचे पिल्लू जन्माच्या काही तासांनंतरच चालतात आणि धावतात.
 • जगभरात ३०० हून अधिक घोड्यांच्या जाती आहेत.
 • घोड्यांच्या दातावरून घोड्याच्या वयचा अंदाज लावू शकतो.
 • ३००० वर्षापूर्वी पासून माणसांनी घोडे पाळले आहेत.
 • कुत्र्याबद्दल विशेष तथ्ये देखील आपण वाचू शकता.

घोड्याचा इतिहास – History of horse

घोडा हा एक वन्य प्राणी असून सुरवातीच्या काळामध्ये त्यांच्या त्वचेसाठी किवा मांसासाठी त्यांचा शिकार केला जायचा व त्यांचे मांसा शिजवून खाल्ले जायचे आणि त्यांच्या त्वचेचा वापर कपडे बनवण्यासाठी केला जायचा. त्यांच्या शिकार सोबतच त्यांना लोक पाळू हि लागले जेणेकरून लोकांना वस्तू वाहून नेता याव्या म्हणून किवा आपल्याला त्यावर स्वार होता यावे म्हणून.

इ.स १९०० मध्ये ट्रोजन हॉर्स या घोड्याची प्रतिमा ट्रॉय शहरमध्ये प्रथमच उघडकीस आली याआधीही चीन आणि इजिप्त या दोन्ही देशांमध्ये सुमारे इ.स १२०० मध्ये रथ ओढण्यासाठी घोड्यांचा वापर केला जात होता. त्यानंतर घोड्यांचा उपयोग सैन्यात हि होवू लागला सैन्य घोड्यावर स्वार होवून युद्धासाठी जावू लागले तसेच युद्धाचे रथ ओढण्यासाठी त्यांचा वापर झाला.

१८ व्या आणि १९ व्या शतकात घोड्यांचा वापर कुत्र्यांसोबत शिकार करण्यासाठी करू लागले त्याचबरोबर horse racing हा खेळ आत्ताच्या काळात खूप चर्चेत असणार खेळ आहे आणि हा खेळ लोक्कांना आकर्षित करत आहे.

घोड्याचा आकार – horse size

लहान घोडे : काही लहान घोड्यांच्या जाती हि अस्तित्वात आहेत लहान घोड्यांची जाती खुर (hoof) ते खांद्यापर्यंत 30 इंच इतकी लहान असू शकते व लहान घोड्यांचे वजन ५४ ते ५५ किलो इतके असू शकते
मोठे घोडे : मोठ्या घोड्यांची जाती खुर (hoof) ते खांद्यापर्यंत ६९ इंच इतकी मोठी असू शकते व मोठ्या घोड्यांचे वजन ९९० ते ९९८ किलो इतके असू शकते

घोड्याचा आहार – horse diet

घोडे हे शाकाहारी प्राणी असल्यामुळे ते गवत खातात. परंतु पाळीव प्राणी असलेल्या घोड्यांना अनेकदा कोंडा, धान्य, ओट्स, बार्ली आणि गवत देखील खायला दिले जाते. काही घरगुती घोड्यांना चाटण्यासाठी मीठ आणि खनिज ब्लॉक्स देखील दिले जातात त्यातून त्यांना nutrition मिळते. चांगला घोडा आपल्या शरीराच्या वजनाच्या 2 टक्के गवत खातो.

घोड्यांच्या जाती – Horse Breeds

६ प्रसिध्द भारतीय घोड्यांच्या जाती
भारत हा देश घोड्यांच्या अनेक जातीसाठी प्रसिध्द आहे या देशातील आलेली प्रत्येक घोड्याची जातीला एक विशिष्ठ वैशिष्ट्ये आहेत. काही प्रसिध्द घोड्यांची माहित खाली दिलेली आहे.

१. काठियावाडी घोडा – Kathiawari Horse

काठियावाडी घोडा हा गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील काठियावाड द्वीपकल्पातील घोडा आहे आणि हा घोडा वाळवंटात राहतो. त्याची स्टॅमिना ही जागतिक दर्जाची असतो त्याचबरोबर हे घोडे उबदार प्रदेशात, गरम तापमानात आणि कमीतकमी कमी प्रमाणात अन्न किंवा पाण्याच्या ठिकाणी राहू शकतात. या घोड्याचा वापर युद्ध घोडा, घोडदळ माउंटमध्ये तसेच सैन्य दलात पोलिसांचा घोडा म्हणून वापरला.

२. मारवाडी घोडा – Marwari horse

मारवाडी घोडा हा मारवाड प्रदेश राजस्थान राज्यातील एक दुर्मिळ जातीचा आहे या घोड्याच्या कानात टीप देवून या घोडयाला ओळखणे सोपे. मारवाडी घोडा आणि काथियावाडी घोडा दिसायला एक सारखेच असतात. १९३० मध्ये या जातीचे घोडे पूर्णपणे नष्ट झाले होते त्यामुळे भारतातून या घोड्यांची निर्यात करण्यास बंदी घातली होती. या जातीमध्ये राखाडी रंगाचे घोडे खूप मौल्यवान आहेत तसेच या जातीतील काळा रंगाचा घोडा दुर्दैवी आणि मृत्यूचे प्रतिनिधित्व करणारा मानला जातो.

३. स्पीती घोडा – spiti horse

स्पीती घोड्याला पहाडी घोडा असेही म्हटले जाते हा घोडा हिमाचल प्रदेश मध्ये डोंगरावर राहणारा घोडा आहे. या घोड्यांना कवर करण्यासाठी स्टॅलियन वापरला जातो हा स्टॅलियन एक वर्ष वापरला जातो व वर्षानंतर तो परत बदलला जातो.

४. मणिपुरी पोनी – Manipuri Pony

मणिपुरी पोनी हा घोडा अरब आणि वन्य घोडे किंवा तिबेटी पोनी या घोड्यांच्या जातीचे एकत्रीकरण करून निर्माण केलेली जात आहे. ह्या घोड्याचा वापर रेसिंग आणि भारतामध्ये पोलो खेळण्यासाठी केला जातो. हि एक भारतामध्ये विकसित झालेली प्राचीन जात आहे.

५. भूटिया घोडा – bhutia horse

भूटिया घोडा या जातीच्या घोड्याची उत्पत्ती सिक्कीम व दार्जिलिंग येथून झाली असून हे घोडे मंगोलिया किंवा तिबेटी जातीसार्खेच असतात त्याचबरोबर हे घोडे आकाराने लहान अहून ते डोंगरावर राहायला पसंत करतात. तिथल्या वातावरणमुळे या जातीत कठोरपणा निर्माण केला आहे जो इतरत्र सापडणे कठीण आहे.

६. झनिस्कारी घोडे – Zaniskari horse

हि पर्वतीय घोड्याचा आणखी एक लहान जाती आहे जी उत्तर भारतातून आली आहे . हे कारगिलमधील झेंस्कर खोऱ्यात सापडलेली जात आहे आणि हे घोडे स्पिती घोड्यांसारखेच असतात.झनिस्करी घोडे नियमितपणे प्रवास करतात किंवा उच्च उंच ठिकाणी काम करू शकतात. अशा साहसी किंवा कृषी घोड्यांसाठी पॅक प्राणी असे बक्षीसे दिली जातात. निश्चित-पायाची जाती घेऊन जाणे आणि तापमान -40 सीपेक्षा कमी तापमान हाताळू शकते. इतर भारतीय घोड्यांच्या जातींप्रमाणेच हा घोडाही अथलेटिक आणि पोलो या खेळासाठी वापरला जातो.

जगातील काही प्रसिध्द घोड्यांच्या जाती

घोडा हा जगातील सर्वात आवडत्या प्राण्यांपैकी एक प्राणी तो असंख्य पिढ्यांपासून जगभरातल्या जंगलात आढळणारा प्राणी आहे आणि त्यातील काही प्रसिध्द जाती खाली दिल्या आहेत.

१.अरबी घोडे – arabian horse information in marathi

अरबी घोडा हा जगातील सर्वात लोकप्रिय घोड्याची जात आहे आणि त्याची उत्पत्ती अरबी द्वीपकल्पातून झाली आहे. अरबी घोड्याची जात जगातील सर्वात सहज ओळखल्या जाणार्‍या घोड्यांच्या जातींपैकी एक आहे. संपूर्ण इतिहासामध्ये अरबी घोडे युद्ध आणि व्यापार करण्यासठी वापरले होते. घोड्यांची जात धैर्यवान, संवेदनशील आणि बुद्धिमान प्राणी आहे.

२.कॅरोलिना मार्श टकी – carolina marsh tucky horse information in marathi

कॅरोलिना मार्श टकी घोडा हा सर्वात उपयुक्त पशु जातींपैकी एक आहे कारण त्यांना राखणे सोपे आहे आणि अगदी कठीण परिस्थितीतही ते टिकू शकतात. कॅरोलिना मार्श टकी हा घोडा दक्षिण कॅरोलिना या अमेरिकन राज्याच्या वसाहतीत दिसणारा स्पॅनिश घोडा आहे.

३.मॉर्गन घोडे – morgan horse information in marathi

मॉर्गन घोडा अमेरिकेत विकसित केलेल्या घोड्यांच्या जातींपैकी एक आहे. या घोड्यांचा वापर कोच घोडे आणि रेसिंगसाठी होतो.

४.थोरग्रेड (thoroughbred horse information in marathi

थॉरब्रेड एक घोड्याची जात असून रेसिंगसाठी चांगली ओळखली जाणारी जात आहे. त्यांच्या चापळपणा आणि वेग यासाठी हे घोडे प्रसिध्द आहेत. रेसिंग व्यतिरिक्त, शो जंपिंग, एकत्रित प्रशिक्षण, पोशाख, पोलो आणि कोल्हा शिकार यासारख्या अनेक शाखांमध्ये या घोड्यांचा वापर केला जातो.

५. क्वॉर्टर हॉर्स – quarter horse information in marathi

क्वॉर्टर हॉर्स हा एक अमेरिकन जातीचा घोडा आहे. हा घोडा ५५ घन मैल प्रतितास वेगाने धावतो आणि घोड्यांच्या शर्यतीत इतर घोड्यांच्या जातींना मागे टाकण्याच्या विलक्षण क्षमतेसाठी प्रसिध्द आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा बलवान असा घोडा कसा आहे व त्याचे जीवन कसे आहे. horse information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही घोड्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

(ghode chi mahiti) आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!