Chicken 65 Recipe in Marathi चिकन ६५ रेसिपी मराठी चिकन ही एक प्रसिद्ध मसालेदार आणि स्वादिष्ट दक्षिण भारतीय स्टार्टर म्हणून सर्व्ह केले जाते आणि हे नॉन व्हेजीटेरियन लोकांच्या आवडीच्या डिश मधील एक आहे . चिकन ६५ ही एक मांसाहारी पाककृती आहे जी वाढदिवसाच्या पार्टी, किटी पार्टी आणि कोणत्याही छोट्या पार्टीसाठी योग्य आहे. चिकन ६५ हा असा पदार्थ आहे जो भारतामध्ये नॉन व्हेजीटेरियन लोकांच्यामध्ये प्रसिध्द आहेच पण या पदार्थाने भारताच्या बाहेरील देशांमध्ये देखील लोकप्रियता मिळवलेली आहे. आज या लेखामध्ये चिकन ६५ कसे बनवायचे या बद्दल माहिती घेणार आहोत.
चिकन 65 रेसिपी मराठी – Chicken 65 Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
कॅलरी | ३७२ कॅलरीज |
चिकन ६५ म्हणजे काय ?
हे दही आणि मसाल्यांमध्ये मॅरीनेट केले जाते आणि मग ते तेलामध्ये टाळून घेवून टोमॅटो केचपमध्ये मिक्स करून सर्व्ह केली जाते आणि हे मॅरीनेट केलेले चिकन आणि मसालेदार सॉसचे हे अप्रतिम कॉम्बिनेशन नॉन व्हेजीटेरियन लोकांना खूप आवडते आणि हे त्याच्या आवडत्या यादीमध्ये मध्ये नक्कीच असते.
चिकन ६५ हि लोकप्रिय डिश दक्षिण भारतातील असून हि डिश दक्षिण भारतातील चेन्नई या शहरातील हॉटेल बुहारीमध्ये सर्वप्रथम बनवण्यात आली होती.
- नक्की वाचा: चिकन बिर्याणी रेसिपी
चिकण ६५ मध्ये वापरले जाणारे मुख्य साहित्य – key ingredients
- चिकन : चिकन ६५ मध्ये वापरले जाणारे चिकन हे ताजे आणि चांगल्या दर्ज्याचे असावे त्यामुळे आपली चिकन ६५ चांगले स्वादिष्ट आणि कुरकुरीत होण्यास मदत होते.
- टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस : चिकन मॅरीनेट करून ते तेलामध्ये तळले जाते आणि ते टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस मध्ये फ्राय केले जाते.
- तेल : मॅरीनेट केलेले चिकन हे आपल्याला तळण्यासाठी तेल हे आवश्यक असते त्यामुळे तेल हा घटक चिकन ६५ बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य घटक मनाला जातो.
चिकन ६५ हि रेसिपी दक्षिण भारतीय डिश असून हि डिश घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळामध्ये बनते. चिकन ६५ हि भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवली जाते आणि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चिकन ६५ चे प्रकार बनवले जातात. आज आपण ह्या लेखामध्ये चिकन ६५ हि डिश कशी बनवायची ते पाहणार आहोत.
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
कॅलरी | ३७२ कॅलरीज |
चिकन ६५ तयार करण्यासाठी जास्त साहित्य लागत असले तरी या डिशच्या चवीमुळे आपण हि डिश करायला घातलेल्या साहित्याचा चांगला वापर झाल्याचे समाधान देखील मिळते. आता आपण पाहू चिकन ६५ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
मॅरीनेटसाठी आवश्यक साहित्य
- १ अंडे.
- १ चमचा कॉर्नफ्लोअर.
- ३ चमचा दही .
- 3 चमचा धने पावडर.
- ½ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद पावडर.
- २ चमचे आले-लसूण पेस्ट.
- मीठ ( आवश्यकतेनुसार ).
सॉस आणि इतर साहित्य
- ४ चमचे टोमॅटो सॉस.
- १ चमचा रेड चिली सॉस.
- ½ चमचा फूड कलर ( पर्यायी ).
- १ चमचा चिरलेला लसून.
- २ ते ३ चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
- ६ ते ७ कढीपत्ता.
- तेल ( तळण्यासाठी ).
कृती १ : सर्वप्रथम चिकन मॅरीनेट करून घ्या
- चिकन मॅरीनेट करण्यासाठी एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये चिकन तुकडे, धनेपूड, हळद, आले लसूण पेस्ट, अंड्यामधील पांढरे द्रव, कॉर्नफ्लोअर आणि दही घाला.
- त्याचबरोबर या मिश्रणामध्ये मीठ ( चवीनुसार ) घाला.
- सर्व साहित्य चांगले मिसळून घ्या.
- आणि हे मिश्रण फ्रिज मध्ये ३ ते ४ तासांच्या साठी ठेवा.
कृती २ : चिकन तळण्यासाठी केली जाणारी कृती
- चिकन ३ ते ४ तास मॅरीनेट केल्यानंतर ते रेफ्रिजरेटरमधून काढा.
- नंतर ते तळण्यासाठी कढई गॅसवर मध्यम आचेवर तेल गरम करून तेल गरम झाल्यावर त्यात एक एक करून चिकन टाका (टीप : तेलामध्ये जितके चिकन तुकडे मावतील तितके तुकडे टाकून तळून घ्या)
- सर्व चिकन एका बॅचमध्ये घालू नका (२ ते ३ बॅचमध्ये तळून घ्या).
- चिकन चांगले लालसर रंगावर तळून घ्या.
- आता तळलेले चिकन टिश्यू पेपरवर काढून बाजूला ठेवा. तळलेल चिकन टिश्यू पेपरवर काढण्याचे कारण जादाचे तेल टिश्यू पेपरमध्ये शोषून घेतले जाते.
कृती ३ : सॉस आणि चिकन मिक्स करण्यासाठी केली जाणारी कृती
- आता तवा गरम करून त्यामध्ये २ चमचे तेल घाला.
- तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला लसूण घाला आणि दुसऱ्यांदा परतून घ्या त्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला आणि एक मिनिट परतून घ्या.
- मग त्यामध्ये लाल मिरची सॉस, हिरवी मिरची सॉस आणि लाल फूड कलर घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि नंतर त्यामध्ये तळलेले चिकन घाला. चिकन चांगले मिक्स करून घ्या आणि ५ मिनिटे मंद आचेवर शिजवा (चिकन सतत हलवत रहा).
- तुमचे चिकन ६५ सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.
- आपण चिकन जीतका वेळ मॅरीनेट करू तितकेच ते टेस्टला चांगले बनेल.
- मॅरीनेट प्रक्रियेमध्ये जर आपण अंडे वापरले नाही तर चालतील.
- आपण कॉर्नफ्लोअर पीठा ऐवजी तांदळाचे पीठ किंवा मैदा देखील वापरू शकतो.
- चिकन तुकडे मध्यम किंवा मंद आचेवर तळावे.
आम्ही दिलेल्या chicken 65 recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चिकन 65 रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chicken 65 recipe in marathi video download या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chicken 65 madhurasrecipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chicken 65 recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट