Chicken Fry Recipe in Marathi चिकन फ्राय रेसिपी मराठी चिकन फ्राय हि बनवण्यासाठी खूप सोपी आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर बनणारी रेसिपी आहे. हि मसाला चिकन फ्राय रेसिपी आपण रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकतो कारण ती झटपट म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनणारी रेसिपी आहे. ज्या लोकांना मांसाहारी पदार्थ आवडतात जसे कि चिकन मसाला, चिकन लॉलीपॉप, चिकन बिर्याणी इत्यादी आणि त्यामधील एक सोपा, स्वादिष्ट आणि लगेच बनणारा नॉनव्हेज पदार्थ म्हणजे चिकन फ्राय आणि आज आपण या लेखामध्ये चिकन फ्राय कसा बनवौअच ते पाहणार आहोत.
हा एक नॉनव्हेज लोकांच्यासाठी खास पदार्थ असून आपण हा रोटी, नान, चपाती किंवा ब्रेडसोबत साइड डिश म्हणून खाऊ शकतो. तुम्ही ही रेसिपी आठवड्याच्या रात्रीच्या जेवणासाठी, छोट्या पार्टीसाठी, कौटुंबिक जेवणासाठी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी बनवू शकता. चला तर आता आपण चिकन फ्राय कसा बनवायचा ते पाहूयात.
चिकन फ्राय रेसिपी मराठी – Chicken Fry Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ८ ते १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
वाढणी | २ ते ३ व्यक्ती |
चिकन फ्राय रेसिपी हि एक मांसाहारी रेसिपी आहे जी आपण गडबडीच्या वेळी रात्रीच्या जेवणासाठी, छोट्या पार्टीसाठी, खास प्रसंगी किंवा आपल्याला खावेसे वाटत असल्यास आपण बनवू शकतो. जे लोक मांसाहारी आहार खातात त्याच्यासाठी लहानमुलांच्यासाठी तसेच मोठ्यांच्यासाठी देखील अगदी उत्तम रेसिपी आहे. हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. आता आपण चिकन फ्राय रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत.
तयारीसाठी लागणारा वेळ | ८ ते १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
वाढणी | २ ते ३ व्यक्ती |
चिकन फ्राय बनवण्यासाठी चिकन, कांदा, टोमॅटो, गरम मसाला हे मुख्य साहित्य लागते त्याचबरोबर चिकन फ्राय बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते त्यामधी काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते पण ते साहित्य आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग चिकन फ्राय बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- नक्की वाचा: चिकन 65 रेसिपी मराठी
मुख्य साहित्य
- ५०० ग्रॅम चिकन ( छोट्या छोटय तुकड्यांमध्ये कट करून घेणे ).
मॅरीनेटसाठी साहित्य
- १ चमचा लिंबाचा रस.
- १ चमचा काळी मिरी पावडर.
- मीठ (आवश्यकतेनुसार).
- १ मोठा चमचा तेल.
- १ कांदा ( बारीक चिरलेला ).
- अर्धा चमचा आले चिरून.
- ४ ते ५ लसूण पाकळ्या.
- २ हिरव्या मिरच्या.
- १ मध्यम आकाराचा टोमॅटो ( चिरलेला ).
- दीड चमचा धने पावडर.
- १ चमचा चिकन मसाला पावडर.
- १ चमचा लाल तिखट.
- १/३ चमचा हळद पावडर.
- मीठ (चवीनुसार).
- अर्धा चमचा कोथिंबीर ( चिरलेली ).
आता आपण वर दिलेले साहित्य वापरून अगदी स्वादिष्ट चिकन फ्राय कसा बनवायचा ते पाहूयात.
- प्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये चिकन घाला आणि नंतर त्यामध्ये लिंबाचा रस, काळी मिरी पावडर आणि मीठ (चवीनुसार) सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्या.
- आता हे चिकन मॅरीनेट करण्यासाठी १० ते १५ मिनिटे त्या भांड्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवा.
- त्यानंतर लसूण, आले आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट बनवून बाजूला ठेवा.
- कढई गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि तेल गरम झाले की त्यात तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये चिरलेला कांदा घाला आणि कांदा किंचित सोनेरी होईपर्यंत परता नंतर त्यामध्ये आले, लसूण आणि हिरवी मिरचीचे मिश्रण घाला आणि एक सेकंद शिजवा.
- आता त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि चिकन काही मिनिटे शिजवा.
- चिकन गुलाबी रंग येईपर्यंत भाजा आणि त्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, चिकन मसाला पावडर घाला आणि शेवटी आवश्यकतेनुसार मीठ घाला आणि चांगले मिक्स करा.
- आता त्यावर झाकण लावून ते २ मिनिटे शिजवून घ्या आणि ते २ मिनिटे शिजवल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि तो मिक्स करा. यामध्ये टोमॅटो घातल्यामुळे त्याला पाणी सुटेल आता परत त्यावर झाकण ठेवून गॅसची आच मंद करून ५ मिनिटे शिजवा.
- मग यामध्ये १ ते दीड वाटी पाणी घाला आणि हे सर्व मिश्रण पाण्यामध्ये मिक्स करा आणि ते चांगले कोरडे होई पर्यंत शिजवून घ्या ( टीप : आता चिकन मध्यम आचेवर शिजवा ).
- आता चिकन शिजून कोरडे झाले कि गॅस बंद करा आणि ते बाऊल मध्ये काढा आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
- तुमची मसालेदार आणि रुचकर चिकन फ्राय रेसिपी सर्व्ह करण्यास तयार झाली.
- नक्की वाचा: चिकन लॉलीपॉप रेसिपी
चिकन फ्राय कश्यासोबत खाल्ला जातो – serving suggestions
- चिकन फ्राय आपण चपाती, रोटी नान किंवा पांढऱ्या भातासोबत खावू शकतो.
टिप्स (Tips)
- जर तुम्हाला हिरवी मिरची घातलेली आवडत नसेल तर तुम्ही चिकन फ्राय मध्ये हिरवी मिरची घातली नाही तरी चालेल.
- चिकन मॅरीनेट करताना ज्यावेळी आपण चिकनच्या तुकड्यांना लिंबू रस आणि काळी मिरी पावडर लावतो त्यावेळी आपण ते चिकनला राब करू शकतो त्यामुळे ते चिकनला चांगले लागेल.
- चिकन फ्राय बनवताना चिकन पूर्ण कोरडे होईपर्यंत शिजवावे परंतु चिकन खाली करपणार नाही याची काळजी घ्यावी.
- बाजारातून आणलेले चिकन स्वच्छ धुवून त्याच्या आपल्याला हवे तसे तुकडे करून घेवू शकतो.
आम्ही दिलेल्या chicken fry recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चिकन फ्राय रेसिपी मराठी chicken liver fry recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या malvani chicken fry recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chicken fried recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chicken fry recipe in marathi video Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट