Chicken Lollipop Recipe in Marathi चिकन लॉलीपॉप रेसिपी जर तुम्हाला गरमागरम आणि मसालेदार नॉनव्हेज रेसिपीज स्टार्टर मध्ये खायच्या असतील तर नॉन व्हेज या प्रकारामध्ये अनेक स्टार्टर रेसिपीज आहेत त्या म्हणजे चिकन ६५, चिकन नगेट्स, चिकन मंचुरियन आणि अगदी चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप हा नॉनव्हेज रेसिपीज स्टार्टर मध्ये खाल्ला जाणारा सर्वोत्तम स्टार्टर पर्याय आहे. त्याचबरोबर चिकन लॉलीपॉप हा एक बनवण्यासाठी अगदी सोपा आणि शिजवण्यासाठी देखील एक सोपा पदार्थ आहे जो अतिशय स्वादिष्ट आहे आणि हा पदार्थ आपण ५५ मिनिटे ते एक तासामध्ये बनवू शकतो.
चिकन लॉलीपॉप हा पदार्थ भारतातील असून हा भारतामध्ये अनेक ठिकाणी खूप अवदिनी बनवतात आणि खातात. हा पदार्थ छोट्या पार्टीमध्ये तसेच काही छोट्या किटी पार्टीला बनवला जातो. चिकन लॉलीपॉप हे खूप सोपे, स्वादिष्ट आणि मसालेदार असते आणि हे खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते.
ज्या नॉन व्हेजिटेरियन लोकांना देसी चायनीज पदार्थ प्रिय आहेत त्यांच्यासाठी हि रेसिपी एकदम उत्तम आहे आणि रेसिपी आपल्याला रस्त्यावर असणाऱ्या चायनीज गाड्यांच्या पासून ते मोठ मोठ्या हॉटेलमध्ये आपल्याला चिकन लॉलीपॉप खायला मिळते. चला तर मग पाहूयात चिकन लॉलीपॉप कसे बनवायचे ते पाहूयात.
चिकन लॉलीपॉप रेसिपी – Chicken Lollipop Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ७ ते ८ व्यक्ती |
चिकन लॉलीपॉप म्हणजे काय ?
चिकन लॉलीपॉप हे कोंबडीच्या तंगडी पासून बनवलेले असते ज्यामध्ये चिकन लेग मीठ, अंडे, लिंबू रस, मिरपूड, सोया सॉस आणि २ चमचे आले-लसूण पेस्ट घालून ते १० ते १५ मिनिटे मॅरीनेट करा आणि मग मॅरीनेट केलेले लॉलीपॉप कॉर्नफ्लोअर आणि मैद्याच्या पिठामध्ये बुडवून ते तेलामध्ये घाला आणि ते ६ ते ७ मिनिटे चांगले सोनेरी, लालसर रंग येईपर्यंत तळून घेतले जाते.
- नक्की वाचा: चिकन 65 रेसिपी मराठी
चिकन लॉलीपॉपसाठी लागणारे साहित्य – key ingredients
- चिकन लेग : चिकन लेग हा या रेसिपी मधील मुख्य घटक आहे. चिकन लेग हे स्वच्छ करून ते मॅरीनेट करा आणि ते मॅरीनेट केलेले लॉलीपॉप कॉर्नफ्लोअर आणि मैद्याच्या पिठामध्ये बुडवून ते तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- मैदा आणि कॉर्नफ्लोअर : मैदा आणि कॉर्नफ्लोअर देखील चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी महत्वाचे घटक आहेत कारण मॅरीनेट केलेले लॉलीपॉप मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या बॅटर मध्ये बुडवून तळले जाते.
- तेल : चिकन लॉलीपॉप तळण्यासाठी तेल हे महत्वाचा घटक आहे.
चिकन लॉलीपॉप रेसिपी – chicken lollipop masala recipe in marathi
चिकन लॉलीपॉप हा पदार्थ भारतातील असून हा भारतामध्ये अनेक ठिकाणी खूप अवदिनी बनवतात आणि खातात. ज्या नॉन व्हेजिटेरियन लोकांना देसी चायनीज पदार्थ प्रिय आहेत त्यांच्यासाठी हि रेसिपी एकदम उत्तम आहे आणि हा पदार्थ भारतातील लोक गाड्यावर असो किंवा मोठ मोठ्या हॉटेलमध्ये लोक आवडीने ऑर्डर करतात. चला तर मग चिकन लॉलीपॉप कसा बनवायचा आणि हा पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ७ ते ८ व्यक्ती |
चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी चिकन लेग हा महत्वाचा घटक असतो तसेच हे बनवण्यासाठी इतर महत्वाचे साहित्य देखील लागते त्यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्यला बाजारातून विकत आणावे लागतात. चला तर मग पाहूयात चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
- नक्की वाचा: बटर चिकन रेसिपी मराठी
- ७ ते ८ छोटे चिकन लेग
- १/२ चमचा मिरपूड
- २ चमचे सोया सॉस.
- ५ चमचे आले लसून पेस्ट.
- अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर.
- २ चमचे मैदा.
- १ अंडे.
- २ चमचे लिंबू रस.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- १ चमचा गरम मसाला.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- तेल.
- कृती १ : सर्वप्रथम चिकन लेग वरचे जास्तीचे मांस कापून टाका. तसेच तळाशी असणारे मांस खरवडून घ्या जेणेकरून हाडे स्वच्छ होतील आणि चिकन लेग लॉलीपॉप सारखा दिसेल.
- कृती २ : आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये चिकन लेग / लॉलीपॉप, मीठ, अंडे, लिंबू रस, मिरपूड, सोया सॉस आणि २ चमचे आले-लसूण पेस्ट घाला आणि हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करा आणि ते झाकून १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.
- कृती ३ : चिकन लेग मॅरीनेट होत असताना एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, ३ चमचे आले-लसूण पेस्ट, मीठ ( चवीनुसार ), लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि आवश्यकतेनुसार पाणी वापरून घट्ट पीठ तयार करा.
- कृती ४ : आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये लॉलीपॉप तळण्यासाठी तेल घाला आणि ते तेल गरम होऊ द्या.
- कृती ५ : तेल गरम झाल्यावर मॅरीनेट केलेले लॉलीपॉप कॉर्नफ्लोअर आणि मैद्याच्या पिठामध्ये बुडवून ते तेलामध्ये घाला आणि ते ६ ते ७ मिनिटे चांगले सोनेरी, लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या. चिकन लॉलीपॉप हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या म्हणजे ते खाताना मजा येई.
- कृती ६ : अश्या प्रकारे सर्व चिकन लॉलीपॉप कॉर्नफ्लोअर आणि मैद्याच्या पिठामध्ये बुडवून ते तेलामध्ये घाला आणि ते ६ ते ७ मिनिटे चांगले सोनेरी, लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या. ( टीप : तेलामध्ये जितके लॉलीपॉप मावतात तितके लॉलीपॉप टाकून ते तळून घ्या ).
- कृती ७ : हे गरमागरम चिकन लॉलीपॉप टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
चिकन लॉलीपॉप कश्या सोबत खाल्ले जातात – serving suggestion
चिकन लॉलीपॉप हे रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी सोबत खूप छान लागतो आणि बहुतेक ठिकाणी गरमागर आणि कुरकुरीत लॉलीपॉप हे या प्रकारच्या सॉस सोबत आणि चटणी सोबत सर्व्ह केले जातात.
आम्ही दिलेल्या chicken lollipop recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चिकन लॉलीपॉप रेसिपी माहिती crispy chicken lollipop recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chicken lollipop masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chicken lollipop recipe at home in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chinese chicken lollipop recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट