Chocolate Cake Recipe in Marathi चॉकलेट केक रेसिपी केक म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते आणि त्यांत चॉकलेट केक म्हटलं तर काय सांगायला नको कारण असे खूप लोक आहेत ज्यांना चॉकलेट केक आवडतो आणि ते चॉकलेट केक खाण्यासाठी वेढे होतात आणि म्हणूनच आज आपण चॉकलेट केक कसा बनवायचा ते पाहणारा आहोत. सध्या कोणत्याही कार्यक्रमाला केक कट करणे हि एक प्रथा झालेली आहे आपण बहुतेक कार्यक्रमामध्ये पाहतो कि केक कट केला जातो आणि त्या कार्यक्रमाचा आनंद वाढवला जातो जसे कि साखरपुडा असो वा उद्घाटन समारंभ असो, कोणत्याही गोष्टीचे सेलिब्रेशन असो, वाढदिवस असो किंवा मग रिसेप्शन पार्टी असो केक हा कट केला जातोच.
म्हणून जर आपल्याला घरच्या घरी केक बनवता आले तर किती चांगले होईल. आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवू शकतो जसे कि साधा केक, चॉकलेट केक, मॅगो केक, ब्लॅक फॉरेस्ट केक, बटर स्कॉच यासारख्या फ्लेवरचे अनेक केक बनवू शकतो तसेच सध्या खूप लोक घरामध्ये वारंवार करून पाहणारे केक म्हणजे बिस्कीट केक आणि रवा केक हे देखील बनवण्यासाठी खूप सोपे आहेत.
आणि ते आपण घरामध्ये अगदी सहजपणे बनवू शकतो आणि त्याला आपल्याला हवे असल्यास आयसिंग करू शकतो. आज आपण या लेखामध्ये चॉकलेट केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
चॉकलेट केक रेसिपी मराठी – Chocolate Cake Recipe in Marathi
तयारी करण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
केक भाजण्यासाठी लागणारा वेळ | ४५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास |
बनवण्याची पध्दत | सोपी |
- मैदा : मैदा हा केक बनवण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे कारण यामध्ये सर्व साहित्य घालून त्याचे बॅटर बनवले जाते.
- कोको पावडर आणि चॉकलेट सिरप : कोको पावडर आणि चॉकलेट सिरप केकच्या बॅटर घातल्यामुळे केकला चॉकलेटचा फ्लेवर येतो.
- साखर : केकमध्ये पिठी साखर वापरल्यामुळे ती लगेच विरघळते आणि साखरेमुळे केकला गोडपणा येतो.
- बेकिंग सोडा आणि पावडर : बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे आपला केक चांगला हलका आणि मऊ होतो आणि चांगला फुगतो देखील.
चॉकलेट केक हा खूप लोकांना आवडतो त्यामुळे काही लोक तो बेकरीतून सारखा सारखा आणण्याच्या ऐवजी घरी कसा चांगल्या प्रकारे बनवता येईल यासाठी प्रयत्न करतात आणि जर पहिलाच प्रयत्न बिघडला तर आपले प्रयत्न सोडून देतात पण जर आपण केक एक – दोन वेळा करून पहिला तर तो तिसऱ्या वेळी चांगला बनू शकतो. चॉकलेट केक हा खास करून लहान मुलांना खूप आवडतो आणि म्हणूनच आता आपण चॉकलेट केक कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारी करण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
केक भाजण्यासाठी लागणारा वेळ | ४५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास |
बनवण्याची पध्दत | सोपी |
चॉकलेट केक बनवण्यासाठी कोको पावडर, चॉकलेट सिरप, मैदा आणि काही इतर साहित्य लागते आणि कोको पावडर, चॉकलेट सिरप हे आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते त्यामुळे ते आपल्याला बाजारातून आणावे लागते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. चॉकलेट बनवण्यासाठी कोको पावडर, चॉकलेट सिरप, मैदा, बेकिंग सोडा / पावडर आणि साखर हे महत्वाचे साहित्य लागते. चला तर मग आता आपण केक बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ वाटी मैदा.
- १ वाटी तूप.
- १ वाटी साखर ( बारीक केलेली / पिठी साखर ).
- १ वाटी लोणी.
- २ अंडी.
- १ मोठा कप दुध.
- १/२ चमचा खायचा सोडा.
- १/२ चमचा बेकिंग सोडा.
- ३ ते ४ चमचे कोको पावडर.
- २ चमचे चॉकलेट सिरप.
आता आपण वर दिलेले साहित्य वापरून चॉकलेट केक कसा बनवायचा ते पाहूयात.
- चॉकलेट केक बनवताना सर्वप्रथम अंडी घ्या आणि ती फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा बिटरच्या सहाय्याने एकजीव करून घ्या
- मग त्यामध्ये साखर आणि मैदा घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या आणि आता लोणी घाला आणि चांगले एकजीव करून घ्या किंवा फेटून घ्या.
- मग त्यामध्ये बेकिंग सोडा, खायचा सोडा, कोको पावडर आणि चॉकलेट सिरप घाला आणि ते एकजीव करा किंवा बिटरच्या सहाय्याने केकचे बॅटर चांगले फेटून घ्या.
- आता ज्या कुकरमध्ये तुम्ही केक भाजण्यासाठी ठेवणार आहात त्या कुकरची शिट्टी आणि रिंग काढा आणि त्यामध्ये एक वाटी किंवा प्लेट ठेवा.
- त्यानंतर ज्या भांड्यामध्ये केकचे बॅटर घालणार आहात त्या संपूर्ण भांड्याला आतून लोणी लावा आणि त्यावर मैदा भुरभुरा म्हणजे आपला केक भांड्याला चिकटणार नाही.
- आता केकचे बॅटर चांगले एकत्र करा आणि लगेचच केक ज्या भांड्यामध्ये भाजणार आहात त्यामध्ये ओता आणि ते भांडे २ ते ३ वेळा टॅप करा त्यामुळे त्या भांड्यामध्ये असणारी हवा निघून जाईल आणि बॅटर भांड्यामध्ये चांगले पसरेल.
- आता कुकर गॅसवर मोठ्या आचेवर गरम करा आणि त्यामध्ये केक बॅटरचे भांडे ठेवा त्यावर काजू आणि बेदाणे टाकून कुकरचे झाकण घालून १० ते १५ मिनिटे केक मोठ्या आचेवर भाजा आणि त्यानंतर २५ ते ३० मिनिटे मंद आचेवर केक भाजा.
- ३० मिनिटांनी झाकण उघडून पहा आपला केक फुगला असेल. त्यामध्ये चाकू घालून बघा चाकुला जर पीठ लागले नाही तर आपला केक बेक झालेला असतो.
- आता थोड्या वेळाने केकचे भांडे कुकर मधून काढून केकच्या कडा सैल करा आणि केक हलक्या हाताने एक प्लेटमध्ये काढा.
- तुमचा चॉकलेट केक तयार झाला. या केकेला तुम्ही आयसिंग देखील करू शकता.
टिप्स (Tips)
- केकमध्ये आपण ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घाला किंवा घालू नका.
- जर तुम्हाला केक ओव्हनमध्ये भाजायचा असल्यास तुम्ही ३२५ ते ३५० डिग्रीवर केक भाजू शकता.
आम्ही दिलेल्या chocolate cake recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चॉकलेट केक रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या veg chocolate cake recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chocolate rava cake recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chocolate cake recipe in cooker in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट