क्रिस्टियानो रोनाल्डो माहिती मराठी Cristiano Ronaldo Information in Marathi

Cristiano Ronaldo Information in Marathi क्रिस्टियानो रोनाल्डो माहिती मराठी फुटबॉल खेळ म्हटलं तर सर्वात आधी ओठांवर नाव येतं ते क्रिस्तियानो रोनाल्डो. फुटबॉल विश्वातील जगातील सर्वात उत्तम खेळाडू म्हणून क्रिस्तियानो रोनाल्डो यांची ओळख आहे. क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी आपल्या खेळाने सर्वांना आपलंसं केलं आहे. संपूर्ण जगाच्या प्रत्येक कोण्यामध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे चाहते पहायला मिळतील. आजच्या लेखामध्ये आपण क्रिस्तियानो रोनाल्डोची फुटबॉल विश्‍वातील कारकीर्द पाहणार आहोत व त्यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

cristiano ronaldo information in marathi
cristiano ronaldo information in marathi

क्रिस्टियानो रोनाल्डो माहिती मराठी – Cristiano Ronaldo Information in Marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य

क्रिस्तियानो रोनाल्डो यांचा जन्म पोर्तुगालमधील फंचर येथे झाला. ५ फेब्रुवारी १९८५ ही त्यांची जन्मतारीख आहे. क्रिस्तियानो रोनाल्डो यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांची आई मारिया डोलोरेस डाॅस सॅतोस अवेरो ह्या एक गृहिणी आहेत तर त्याचे वडील जोस डिनिस अवेरो यांनी नगरपालिकेत माळीचं काम केलं होतं. क्रिस्तियानो यांचं बालपण हालाखीच गेलं.

परंतु तेच घरातील सर्वात छोटे सदस्य होते म्हणून घरच्यांकडून नेहमीच त्यांना प्रेम मिळालं. रोनाल्डो यांच्या या नावामागे एक‌ गंमत आहे. त्यांचे वडील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांचे खूप मोठे चाहते होते कारण ते एक प्रसिद्ध अभिनेता देखील होते. म्हणून रोनाल्डोच्या वडिलांनी त्यांना रोनाल्डो हे नाव दिलं. क्रिस्तियानो रोनाल्डो यांचं फारसं शिक्षण झालं नाही आहे.

अगदी ते लहान असतानाच त्यांनी फुटबॉल खेळायला सुरुवात केली त्यांना या खेळाबद्दल आवड निर्माण झाली आणि त्यांनी पुढे फुटबॉल वरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. रोनाल्डो अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आले आहेत त्यांनी त्यांच्या बऱ्याच इंटरव्यू मध्ये सांगितलं होतं की ते कसे खूप लहान घरांमध्ये राहायचे तिथे त्यांना त्यांची एक खोली आपल्या बहिणी भावांसोबत शेअर करावी लागायची.

रोनाल्डो यांनी जेव्हा शिक्षण सोडलं तेव्हा त्यांच्या आईने त्याला फुटबॉल मध्ये करिअर करण्यासाठी पाठिंबा दिला. मध्यंतरी यांना काही हृदय विकार झाला होता ज्यामुळे त्यांना फुटबॉल खेळणं अशक्य झालं होतं परंतु त्यांनी लगेचच उपचार घेऊन लेझर शस्त्रक्रिया केली आणि काही काळ विश्रांती नंतर ते पुन्हा मैदानामध्ये उतरले. आणि तेव्हापासून यशाची वाट सुरु झाली.

रोनाल्डो 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे मद्यपान केल्यामुळे निधन झाले आणि या कारणास्तव रोनाल्डो त्यांना कुठलंही व्यसन नाही आहे. क्रिस्तियानो रोनाल्डो यांचा जॉर्जिना रोड्रिक्स यांच्यासोबत विवाह झाला आहे. आणि सध्या या दांपत्याला चार मुलं आहेत आणि लवकरच या गोड कुटुंबामध्ये अजून दोन जुळी मुलं समाविष्ट होणार आहेत. हि गोड बातमी रोनाल्डो यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्यांच्या चाहत्यांन‌ सोबत शेअर केली आहे.

रोनाल्डो यांनी फुटबॉल खेळातील कारकीर्द

रोनाल्डो एका गरीब कुटुंबातून आले होते. त्यांनी शिक्षण सोडून फुटबॉल क्षेत्रांमध्ये फुटबॉल खेळाडू म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या आईचा पाठिंबा होता. रोनाल्डो यांनी आपल्या लक्षणीय खेळामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेऊन खूप कमी वेळामध्ये स्वतःचं नाव मोठं करून दाखवलं. त्यांचे या खेळात असणारे कौशल्य असामान्य आहेत.

क्रिस्तियानो रोनाल्डो सोळा वर्षाचे असताना त्यांनी पोर्तुगालमधील स्पोर्टिंग सीपी क्लब मध्ये सहभाग घेतला रोनाल्डो यांना या खेळात असणारे ज्ञान व त्यांचे गुण बघून एका वर्षाच्या आत मध्ये रोनाल्डो यांचं या क्लबच्या अंडर सिक्सटीन संघ, अंडर एटीन संघ, अंडर एटीन बी संघ आणि फास्ट या संघांसाठी निवडण्यात आले. आणि एकाच संघामध्ये खेळणारे रोनाल्डो हे पहिले खेळाडू आहेत.

इसवी सन २००२ मध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी प्रीमियर लीग मधील पहिला सामना खेळला या सामन्यांमध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी मोरेन्स फुटबॉल क्लब विरुद्ध दोन गोल केले. स्पोर्टिंग क्लब डे पोर्तुगाल या क्लब मध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी २००२-२००३ पर्यंत वास्तव्य केलं. संपूर्ण हंगामामध्ये त्यांनी एकूण २५ राष्ट्रीय लीग सामने खेळले यामध्ये त्यांनी ३ गोल केले.

तीन राष्ट्रीय चषक सामने खेळले यामध्ये त्यांनी दोन गोल केले आणि युरोपियन स्पर्धांमध्ये तीन सामने खेळले. पुढे २००३ मध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो यांची मॅचेस्टर युनायटेड या क्लबमध्ये निवड करण्यात आली या क्लब द्वारे खेळताना क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी एकूण १६० राष्ट्रीय लीग सामने खेळले ज्यामध्ये त्यांनी ६३ गोल केले ३२ राष्ट्रीय चषक सामने खेळले ज्यामध्ये त्याने १४ गोल केले ४० युरोपियन स्पर्धा खेळल्या त्यामध्ये त्यांनी ११ गोल केले.

इसवी सन २००९ पासून क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी रेआल माद्रिद क्लब मधून खेळण्यास सुरुवात केली. हा क्लब फुटबॉल क्लब आहे आणि हा विश्वातील नावाजलेला मद्रिद स्पॅनिश फुटबॉल क्लब आहे जगातील सर्वात उत्तम फुटबॉल क्लब म्हणून या क्लबची ओळख आहे. इसवी सन २००९ ते २०१८ असा दीर्घ काळ क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी या क्लब साठी खेळण्यांमध्ये घालवला आहे. या क्लबसाठी खेळताना ४५१ गोल केले आहेत.

आणि रेआल मद्रिद या क्लब साठी सर्वाधिक गोल करणारा क्रिस्तियानो रोनाल्डो हा एकमेव खेळाडू आहे. रोनाल्डो याच फुटबॉल खेळातील कौशल्य इतके उत्कृष्ट आहेत की त्याचा खेळ बघण्यासाठी चाहते फार दूर दूर वरून येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणजे क्रिस्तियानो रोनाल्डो अशी त्यांची विशेष ओळख आहे.

इतकाच नावे तर रोनाल्डो यांनी चॅम्पियन्स लीग मध्ये देखील सर्वाधिक गोल केले आहेत. १३४ गोलचा विक्रम त्यांनी चॅम्पियन्स लीगमध्ये नोंदवला आहे. जो त्यांना सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरवतो. क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी युरोपियन चॅम्पियन्स लीगमध्ये एकूण सहा गोल केले आहेत. रोनाल्डो यांच्या तिचा वेग ताशी ३१ किलोमीटर आहे. म्हणजेच एका सेकंदामध्ये ३१ मीटर.

पुरस्कार आणि रेकॉर्ड

क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी पुरस्कार आणि रेकॉर्डची तर पूर्ण लिस्ट तयार केली आहे. क्रीडा क्षेत्रातील फुटबॉल या खेळा मध्ये त्यांची एक तरुण खेळाडू म्हणून कारकीर्द इतकी मोठी आहे की असा कुठलाच पुरस्कार नाही आहे जो त्यांनी मिळवला नसेल. संपूर्ण विश्वातील फुटबॉल क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे नाव पुढे येतं.

इसवी सन २००८ मध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो ह्यांनी बॅलन डि’ओर हा पुरस्कार मिळवला. २००८ आणि २०११ मध्ये युरोपियन गोल्डन शूज अवॉर्ड तर २००९ मध्ये फुटबॉल जगातील सर्वोच्च मानला जाणारा फिफा वर्ल्ड कप प्लेयर ऑफ द ईयर अवार्ड त्यांना प्राप्त झाला. युईएफए सर्वोत्कृष्ट खेळाडू इन युरोप हा पुरस्कार क्रिस्तियानो रोनाल्डो यांना २०१४ मध्ये प्राप्त झाला.

२००९ मध्ये पुन्हा एकदा फिफा पुरस्कार मिळाला. २००७ आणि २००६ मध्ये पीएफए प्लेयर्स ऑफ द इयर. २००७ मध्ये प्रीमियर लीग गोल्डन बुट अवर्ड. २०१८ आणि २००७ मध्ये प्रीमियर लीग प्लेयर ऑफ द मंथ. २०१२, २०११ आणि २०१० मध्ये युईएफए टिम ऑफ द इयर. २००६ मध्ये पीएएफ यंग प्लेयर ऑफ द इयर.

२००४ मध्ये ब्रावो पुरस्कार प्राप्त झाला. २०१४ मध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू ईएसपीवाय पुरस्कार मिळाला. २००७ आणि २००६ मध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो यांना एफडब्ल्यूए  फूटबॉलर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला. २०१४ मध्ये वर्ल्ड ॲथलिट ऑफ इयर साठी मिलिट स्पोर्ट्स अवॉर्ड. २००५ आणि २००४ मध्ये फिफप्रो स्पेशल यंग प्लेयर ऑफ द ईयर. तर २०१३ मध्ये एलपीएफ सर्वात मौल्यवान खेळाडू हा पुरस्कार मिळाला.

यासोबतच अनेक पुरस्कार क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी मिळवले आहेत. बॅलन डि’ओर हा पुरस्कार फुटबॉल खेळातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो जर तुम्ही एक फुटबॉल खेळाडू आहात आणि तुमच्याकडे हा पुरस्कार आहे तर याचा अर्थ तुम्ही एक यशस्वी आणि सुप्रसिद्ध खेळाडू आहात. हा पुरस्कार जिंकण्याचा मान क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी जवळपास पाच वेळा मिळवला आहे. आणि क्रिस्तियानो रोनाल्डो हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव फुटबॉल खेळाडू आहेत.

यासोबतच वर्ल्ड सॉकर प्लेयर ऑफ द ईयर पुरस्कार क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी सलग पाच वेळा जिंकला आहे. क्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारे खेळाडू म्हणून ओळखले जातात प्रोफेशनल लीग च्या दोन हंगामांमध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी चाळीस गोल करून नवीन विक्रम तयार केला आहे.

हा विक्रम करणारे ते पहिलेच खेळाडू आहेत. क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी टॉप ५ लिगमध्ये पन्नास गोल केले आहेत. त्यांचा हा विक्रम अजून कोणताही खेळाडू शकला नाही आहे. याच कारणास्तव क्रिस्तियानो रोनाल्डो हे जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल प्लेअर म्हणून ओळखले जातात.

आम्ही दिलेल्या cristiano ronaldo information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर क्रिस्टियानो रोनाल्डो माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ronaldo football player information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ronaldo wikipedia in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information on football player ronaldo in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!