भारतीय फुटबॉल खेळाडूंची माहिती Indian Football Players Information in Marathi

Indian Football Players Information in Marathi फुटबॉल खेळाडूंच्या विषयी माहिती आज या लेखामध्ये आपण भारतीय फुटबॉल खेळाडूंविषयी माहिती घेणार आहोत पण सर्वप्रथम आपण फुटबॉल हा खेळ काय आहे, तो कसा खेळला जातो आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची गरज लागते. फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे फुटबॉल या खेळाला सॉकर या नावाने देखील ओळखले जाते. हा खेळ खेळत असताना खेळाडू आपले हात वगळता आपल्या शरीराचा कोणत्याही भागाचा वापर करून बॉल हलवू शकतो पण या खेळामध्ये बॉल पुढे ढकलण्यासाठी जास्तीत जास्त पायाचा वापर केला जातो.

पण बॉल पकडण्यासाठी गोलरक्षक हाताचा वापर करू शकतो. फुटबॉल खेळाचा मुख्य उद्देश विरोधी गटाला मागे टाकणे आणि जेव्हा बॉल गोल पोस्टच्या दरम्यान गोल रेषा ओलांडते तेव्हा गोल होतो आणि त्याचे गुण मिळतात.

indian football players information in marathi
indian football players information in marathi

भारतीय फुटबॉल खेळाडूंची माहिती – Indian Football Players Information in Marathi

सर्व काळातील लोकप्रिय भारतीय फुटबॉल खेळाडू आणि त्यांचे रेकॉर्ड्स

खेळाडूचे नाव सामने गोल
सुनील छेत्री११५७२
शब्बीर आली७२२३
आय. एम. विजयन६६२९
यन. पी. प्रदीप४२
संदेश जींगण३७
नारायण दास२९
अर्नब मोंडल२७
अनिरुध्द थापा२५

फुटबॉल म्हणजे काय ?

फुटबॉल म्हणजे एक हवा भरलेले आणि वरती कातडी असणारा मोठा पायचेंडू आणि तो खेळताना जो पायाने पुढे ढकलला जातो आणि गोल केला जातो.

फुटबॉल खेळामध्ये किती खेळाडू असतात ?

या खेळामध्ये ११ खेळाडू असतात हा खेळ २ स्लाईड्स मध्ये खेळला जातो.

भारतीय फुटबॉल खेळाची पार्श्वभूमी 

भारतामध्ये क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहेच पण फुटबॉल या खेळणेही लोकप्रियतेमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. . फुटबॉल हा खेळ भारतामध्ये पश्चिम बंगाल आणि ईशाण्यकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतामध्ये या खेळाची लोकप्रियता नागेंद्र प्रसाद यांच्यामुळे वाढली त्यामुळे यांना भारतामध्ये फुटबॉल या खेळाचे जनक मानले जाते.

सुरुवातीच्या काळामध्ये हा खेळ फक्त शाळेमध्ये खेळला जात होता पण या खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नागेंद्र प्रसाद यांनी बॉईज फुटबॉल क्लबची स्थापना केली आणि या नागेंद्र प्रसाद या व्यक्तीला फुटबॉलचा जनक म्हंटले जाते.

त्यानंतर हा खेळ ऑलंपीक मध्ये खेळला जावू लागला. भारताची फुटबॉल टीम १९५६ आणि १९५८ मध्ये ऑलंपीक मध्ये ४ स्थान मिळवले आणि येथूनच भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ सुरु झाला.

भारतातील काही लोकप्रिय फुटबॉल खेळाडू – popular indian football players 

भारतामध्ये फुटबॉल हा खेळ खूप पूर्वीच्या काळापासून खूप आवडीने खेळला जातो आणि या खेळाची सध्याची लोकप्रियता पूर्वीहून अधिक आहे. भारतातील तरुण पिढी हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळतात आणि भारतातील अनेक प्रसिध्द आणि या खेळामध्ये नाव कमवलेले खेळाडू नवीन फुटबॉल खेळाडूंच्यासाठी प्रेरणा बनतात. भारतातील काही प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूंची यादी त्यांच्या खेळ, कौशल्ये, चाली आणि रेकॉर्ड यावरून खाली दिले आहे.

सुनील छेत्री 

सुनील छेत्री यांचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ मध्ये भारताच्या आंध्र प्रदेश या राज्यामधील सिकंदराबाद या शहरामध्ये झाला. या खेळाडूच्या आईचे आणि वडिलांचे नाव के. बी. छेत्री आणि सुशीला छेत्री असे आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील देखील काही काळ फुटबॉलच्या टीम मध्ये खेळत होते. सुनील छेत्री यांनी आपल्या फुटबॉल खेळाची सुरुवात दिल्लीतील सिटी क्लबमध्ये सहभागी होवून केली.

या खेळाडूने ऑक्टोबर २००१ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या एशियन स्कूल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतल्यानंतर १२ वीचे शिक्षण सोडले. सुनील छेत्री हा एक भारतीय अंतराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दुसरा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून नाव मिळवले आहे.

सुनील छेत्री हा भरतील सर्वात सरस खेळणारा व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे जो आय-लीगमध्ये बेंगळुरू आरसीकडून खेळतो. त्याचबरोबर सुनील छेत्री या खेळाडूने एएफसी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व केले होते.

पुरस्कार 

या खेळाडूला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दुसरा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर या खेळाडूला २०११ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१९ मध्ये पद्मश्री मिळाले. या खेळाडूच्या ३४ व्या वाढदिवसादिवशी एएफसीने त्याला ‘एशियन आयकॉन’ असे नाव दिले आहे.

गुरप्रीत सिंग संधू 

गुरप्रीत सिंग संधू यांचा जन्म ३ फेबुवारी १९९२ मध्ये पंजाब मधील चमकौर साहिब या ठिकाणी झाला आणि त्याच्या आई – वडिलांचे नाव हरजीत कौर आणि तेजिंदर सिंग संधू असे होते. गुरप्रीत सिंग संधू याने वयाच्या ८ व्या वर्षापासून फुटबॉल खेळ खेळण्यासाठी सुरुवात केली होती आणि त्याने सन २००० या वर्षी सेंट स्टीफन्स या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला.

२००६ मध्ये त्याची यु १६ राज्य संघासाठी निवड झाली. या खेळाडूने २००९ – २०१० मध्ये एएफसी अंडर चॅम्पियनशिप पात्रतेमध्ये इराक अंडर १९ विरूद्ध भारताच्या अंडर १९ संघासाठी पदार्पण केले. त्यांनतर काही दिवस तो संघामध्ये दिसू शकला नाही आणि बहुतेक त्याच काळामध्ये त्याने स्टॅबेकमध्ये सामील झाला पण स्टॅबेकमध्ये सामील झाल्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघात बोलावण्यात आले.

मनवीर सिंग 

मनवीर सिंघ हा लोकप्रिय फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे ज्याचा जन्म ११ जून १९९५ मध्ये झाला आणि त्याचे वडील कुलदीप सिंग हे फुटबॉल मध्ये खेळत होते. त्याने आपल्या फुटबॉल खेळाची सुरुवात मिनर्वा अकॅडमी मोहम्मदन स्पोर्टिंग क्लबमध्ये सामील झाला. तो फॉरवर्ड पोझिशन म्हणून खेळतो.

देशातील सर्वात हुशार तरुण प्रतिभेमध्ये आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मनवीर ७१ व्या संतोष करंडकात बंगालकडून खेळला आणि खेळात त्याच्या गुणांमुळे त्याच्या संघाला विक्रमी ३२ वी संतोष करंडक जिंकण्यास मदत झाली. तुर्कमेनिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने भारतासाठी पहिला गोल केला आणि भारताचा सामना भारताच्या विजयाकडे वळवला होता.

संदेश झिंगन 

झिंगन यांचा जन्म २१ जुलै १९९३ मध्ये भारतातील चंदीगड उत्तराखंड या ठिकाणी झाला. संदेश झिंगन हा एक प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू आहे आणि त्याला संघामध्ये सेंटर बॅक खेळण्यासाठी ओळखला जातो. संदेश याने खेळाची सुरुवात हि सेंट स्टीफन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेवून केली.

अकॅडमी वतीने मँचेस्टर युनायटेड प्रीमियम कपच्या दक्षिण पूर्व आशियाई अंतिम फेरीत प्रथमच संघामध्ये आपले योगदान दिले. संदेश हा खेळाडू केरळ ब्लास्टर्स सारख्या राज्यस्तरीय संघांसाठी आणि भारतीय संघासाठी खेळतो. त्याने २०१५ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले.

पुरस्कार 

संदेश झिंगण याला २०२० मध्ये त्याच्या फुटबॉलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला.

अनिरुद्ध थापा 

अनिरुद्ध थापा हा एक लोकप्रिय फुटबॉल खेळाडू आहे ज्याचा जन्म १५ जानेवारी १९९८ मध्ये भारतामधील उत्तराखंड मधील देहरादून येथे झाला. त्याच्या मोठ्या भावाला फुटबॉल खेळताना पाहून अनिरुद्धलाही फुटबॉल खेळ खेळण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याने सेंट जोसेफ अकॅडमी मध्ये त्याच्या भावाबरोबर सुरुवातीचे शिक्षण सुरू केले.

अनिरुद्ध थापा हा भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू आहे जो इंडियन सुपर लीगच्या चेन्नई कडून आय लीगमध्ये मिनर्वा पंजाबसाठी मिडफिल्डर म्हणून खेळतो.

आम्ही दिलेल्या indian football players information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारतातील फुटबॉल खेळाडूंची नावे बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indian football player information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of indian football players in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये football khelachi mahiti marathi madhe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!