दादा कोंडके माहिती मराठी Dada Kondke Biography in Marathi

Dada Kondke Biography in Marathi – Dada Kondke Information in Marathi दादा कोंडके माहिती मराठी बोट लावीन तिथे गुदगुल्या असं म्हणत दादा कोंडके यांनी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू म्हणून दादा कोंडके यांची ओळख होती. दादा कोंडके यांचा काळ मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ ठरला. दादा कोंडके मराठी चित्रपट सृष्टीतील एक उत्तम अभिनेता आणि चित्रपट निर्माता होते. मराठी चित्रपट सृष्टीतील दादा कोंडके हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. ते एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, गीतकार, निर्माता आणि लेखक होते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण दादा कोंडके यांचा जीवन परिचय जाणून घेणार आहोत.

dada kondke biography in marathi
dada kondke biography in marathi

दादा कोंडके माहिती मराठी – Dada Kondke Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)दादा कोंडके
जन्म (Birthday)८ ऑगस्ट १९३२
जन्म गाव (Birth Place)नायगाव, लालबाग मुंबई
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)मराठी अभिनेते आणि चित्रपट निर्माते

Dada Kondke Information in Marathi

जन्म

कृष्णा कोंडके हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि चित्रपट निर्माते होते. आणि ते दादा कोंडके या नावाने प्रसिद्ध होते. दादांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी नायगाव, लालबाग मुंबई येथे झाला. मुंबईतील मोरबाग भागात दादांच्या कुटुंबियांचं किराणा चे दुकान होतं व त्यांचे वडील एका मिलमध्ये कामाला होते. दादांनी त्यांचे लहानपणीचे दिवस नायगाव येथे घालवले तेथीलच एका शाळेत त्यांचे शैक्षणिक आयुष्य देखील पूर्ण झालं.

दादांना तरुण वयातच उपजीविकेसाठी मार्ग शोधावा लागला म्हणूनच त्यांनी आपल्या बाजार नावाच्या स्थानिक किराणा दुकानात नोकरी करणं स्वीकारलं. दुर्दैवाने काही दुर्दैवी घटनांमुळे दादा कोंडके यांनी लहानपणीच आपलं कुटुंब गमावले होते. पुढील येणाऱ्या दिवसांमध्ये दादा कोंडके यांनी आपल्या मनोरंजन कारकिर्दीची सुरुवात एका बँड द्वारे केली आणि पुढे एक रंगमंच अभिनेता म्हणून काम करू लागले. दादा कोंडके यांचा नलिनी यांच्याशी विवाह झाला होता परंतु काही कारणास्तव त्या दोघांना घटस्फोट घ्यावा लागला.

कारकीर्द

दादांना तरुण वयामध्ये अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागला. दादांचा मूळ स्वभावच विनोदी व खोडकर होता आणि म्हणूनच त्यांनी लोकांना हसवण्यासाठी मनोरंजनाची मशाल हाती घेतली. दादा एका बँड पथकामध्ये सामील झाले आणि त्यामुळे दादांना बँडवाले दादा म्हणून एक वेगळी ओळख मिळाली. याच दरम्यान दादा समाज सेवेमध्ये देखील गुंतलेले होते यातूनच दादांना छोटी-मोठी नाटके मिळण्यास सुरुवात झाली. आणि दादा एक रंगमंच अभिनेता म्हणून काम करू लागले दादा कोंडके हे सेवा दलाच्या अनेक सांस्कृतिक कार्यात सामील होते जी काँग्रेस पक्षाची स्वयंसेवक संघटना होती.

आणि मग त्या काळात दादा कोंडके वसंत सबनीस यांच्या सारख्या मराठी रंगमंचावरील व्यक्तिमत्त्वानां भेटले, ते प्रसिद्ध मराठी लेखक होते. दादासाहेब आणि वसंत सबनीस यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर या दोघांनी मिळून ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक काढलं. वसंत सबनीस यांनी लिहिलेलं हे नाटक दादांच्या आयुष्यामध्ये आणखीन बहार घेऊन आलं.

हे नाटक भरपूर गाजलं प्रेक्षकांना या नाटकातील दादांची भूमिका आवडली जवळपास या नाटकाचे दीड हजारांच्या वर प्रयोग केले गेले आणि या नाटकांमुळे दादा कोंडके हे एक प्रसिद्ध नाट्य कलावंत म्हणून नावाजले जाऊ लागले. दादा कोंडके यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये ते द्विअर्थी विनोद करायचे.

त्यांचं हे वैशिष्ट्य प्रेक्षकांच्या फारच पसंत पडलं. अचुक टायमिंग साधत विनोदाचा बॉम्ब फोडणारे दादा कोंडके यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केलं. त्यापुढे सण १९६९ मध्ये भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे दादांचं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण झालं. हा चित्रपट इतका गाजला की या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय फिल्म अवर्ड देखील मिळाला. सन १९७१ मधील दादा कोंडके यांचा सोंगाड्या हा चित्रपट प्रदर्शित झाला.

या चित्रपटामुळे दादा कोंडके निर्माते झाले. या चित्रपटाने दादा कोंडके यांना भरपूर यश मिळवून दिलं हा चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त सुपरहिट झाला या चित्रपटातील “माळाच्या मळ्यामध्ये कोण ग उभी” हे गाणं आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. सोंगाड्या या चित्रपटामुळे दादा कोंडके यांच्या मध्ये एक आत्मविश्वास जागा झाला आणि त्यांनी चित्रपट निर्माता म्हणून आपल्या आयुष्यात एक नवीन सुरुवात केली. यातूनच कामाक्षी पिक्चर्स हीच निर्मिती संस्था उभारली गेली. दादा कोंडके यांची प्रमुख नायिका होती ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण.

तांबडी माती, सोंगाड्या, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, तेरे मेरे बीच मे, इत्यादी दादा कोंडके यांचे काही प्रसिद्ध चित्रपट आहेत. दादा कोंडके यांना चित्रपट सृष्टी मध्ये देखील बरऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी दादांचा सोंगाड्या चित्रपट प्रदर्शित होणार होता त्यावेळी कोहिनूर चित्रपटाच्या मालकांनी दादांचा हा चित्रपट रोखुन धरला होता कारण त्यांना देव आनंद यांचा तीन देवीया हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता.

हा वाद पुढे फारच वाढला आणि त्यामुळे दादा कोंडके यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेतली. बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाच्या मदतीला नेहमी धावून जायचे आणि त्यांनी दादा कोंडके यांची देखील मदत केली. बाळासाहेबांच्या आदेशा मुळे दादांचा सोंगाड्या या चित्रपटाचं प्रदर्शित झालं आणि या चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला. बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्माने दादा कोंडके प्रभावित झाले होते.

आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय पक्ष शिवसेनेची पाळेमुळे रोवण्यासाठी दादा कोंडके यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. दादा कोंडके अतिशय सक्रिय शिवसैनिक होते आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे आणि जनतेला प्रभावित करण्यासाठी ज्वलंत भाषणं करण्याच्या पद्धतीमुळे ते ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक भागांवर प्रभाव पाडू शकले. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये दादा कोंडके हे एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी द्विअर्थी संवादाची सुरुवात केली होती. या कारणास्तव दादांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागला.

द्विअर्थी चित्रपट असल्यामुळे ते सेन्सर बोर्डावर नाकारले जात होते. परंतु दादांनी आपले राजकीय हितसंबंध वापरून ही अडचण दूर केली. रौप्यमहोत्सवी चित्रपटांसाठी दादा कोंडके यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. दादांचे ९ चित्रपट सलग पंचवीस आठवडे सुपरहिट ठरले. आणि म्हणूनच दादांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवल गेल. ही फारच कौतुकाची बाब आहे आज वरील कोणत्याही निर्माता दादा कोंडके यांचा हा रेकॉर्ड तोडू शकला नाही आहे.

दादा कोंडके यांनी गीतकार म्हणून देखील काही गाणी लिहिली आणि दादांनी लिहिलेलं प्रत्येक गाणं हे एवर ग्रीन आहे. आजही दादा कोंडके यांनी लिहिलेली गाणे रसिकांना मंत्रमुग्ध करतात. वर ढगाला लागली कळ, थांब ग पोरी, गालावरची खळी तुझ्या, अंजनीच्या सुता, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, मोर हो गंगूबाई, पोरी जरास लावशील का, तुझ्या हिरीच पाणी लय गोड, रूप तुझं लय छान ग, देना एकच मुका, जोडी बैलाची खिल्लारी, दादांची अशी अनेक गाणी सुपर डुपर हिट ठरली.

दादा कोंडके यांचा एक वेगळ वैशिष्ट जे त्यांना इतरांपासून वेगळं आणि यशस्वी बनवलं ते म्हणजे दादांच्या द्विअर्थी संवादफेक. अक्षरशा प्रेक्षक वर्ग दादांच्या चित्रपटांची वाट बघायचे. दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळा दर्जा निर्माण करून दिला. मराठी चित्रपटसृष्टीला मानसन्मान मिळवून देण्यामध्ये दादा कोंडके यांचा फार मोठा वाटा आहे. दादा कोंडके यांचे चित्रपट सर्वात जास्त हे अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या सोबतचे आहेत.

दादा कोंडके यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये एक वेगळीच गंमत असायची आणि म्हणूनच अगदी सामान्यातून असामान्य व्यक्ती दादा कोंडके यांचे चित्रपट बघण्यासाठी गर्दी करायचे. राम राम गंगाराम, आगे की सोच, अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे, पळवापळवी, पांडू हवालदार, आली अंगावर, मुका घ्या मुका, एकटा जीव सदाशिव, येऊ का घरात, सासरचे धोतर, तुमच आमचं जमलं, तेरे मेरे बीच मे, गनिमीकावा, तांबडी माती, सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे दादा कोंडके यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते. आजही मराठी वाहिन्यांवर दादा कोंडके यांचे चित्रपट लागले की रसिका जन तितक्याच उत्साहाने ते चित्रपट अगदी नवीन असल्यासारखे बघतात.

मृत्यू

दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयातून चित्रपटातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भरभरून हसवलं आहे आणि भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. दादा कोंडके यांची गाणी आजही प्रेक्षकांना मन मोहित करतात. १४ मार्च १९९८ रोजी दादा कोंडके यांच्यासारख अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना कायमचं सोडून गेलं. दादा कोंडके यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टी वर आणि दादांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या मराठी भूमीला दादा कोंडके यांच्यासारख महान व्यक्तिमत्त्व लाभले हे आपलं भाग्यच आहे

आम्ही दिलेल्या dada kondke biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दादा कोंडके माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dada kondke information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of dada kondke in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Dada Kondke History in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!