दाढ दुखीवर सोपा उपाय Dadh Dukhi Var Gharguti Upay

dadh dukhi var gharguti upay – dat dukhane upay in marathi दात दुखणे घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये दात दुखणे या वर उपाय या बद्दल माहिती घेणार आहोत. दात हा एक आपला महत्वाचा अवयव आहे कारण आपण जे अन्न खातो ते दाताने चांगले चाऊन मग ते गिळतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दाताचे अनन्य साधारण महत्व आहे कारण आपले दात आहेत म्हणून आपण अनेक चांगले चांगले पदार्थ खाऊ शकतो. दात किडू न देणे किंवा दातांना कोणतीही समस्या होऊ नये म्हणून आपण दात कीडण्याअगोदरच जबाबदारी घेतली पाहिजे.

जर आपले दात किडले असतील तर आपल्याला दात दुखीची समस्या उद्भवू शकते. ज्यावेळी आपले दात जास्त प्रमाणात किडतात त्यावेळी ती कीड दातांच्या आतपर्यंत जाते आणि त्यामुळे दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये वेदना सुरु होतात आणि ह्या वेदना आपल्या डोक्यापर्यंत पोहचतात. तसेच जर तुम्हाला जर काही हिरड्यांच्या समस्या देखील जाणवत असतील तर त्यामुळे देखील तुमचे दात दुखू शकतात.

अचानकपणे दात दुखीचा अनुभव हा बहुतेकदा सर्वांनाच आला असेल कारण आपल्या दातांची कीड हि हळू हळू वाढत असते आणि ज्यावेळी हि कीड खूप वाढलेली असते त्यावेळी आपल्याला अचानकपणे दात दुखी उद्भवू शकते. आपला आहार, सतत बदलणारी जीवन शैली आणि मानसिक ताणाव अश्या अनेक प्रकारच्या कारणामुळे देखील दात दुखणे हि समस्या उद्भवू शकते.

काही वेळा दात दुखणे हि समस्या काही काळजी करण्यासारखी नसते तर काही वेळा हि समस्या काळजी करण्यासारखी असते त्यावेळी त्या संबधीत व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन दातांच्यावर योग्य ते उपचार करून घेतले पाहिजेत. कारण दात दुखत असल्यामुळे आपले कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही आणि त्यामुळे आपलेच नुकसान होते आणि म्हणून दात दुखी वर ताबडतोब निदान आणि उपचार करणे कधीही फायद्याचे ठरते. चला तर आता आपण दात दुखी रोखण्यासाठी उपाय काय काय आहेत ते पाहूयात.

dadh dukhi var gharguti upay
dadh dukhi var gharguti upay

दाढ दुखीवर सोपा उपाय – Dadh Dukhi Var Gharguti Upay

दात दुखणे याचे मुख्य कारण काय आहे ? 

जर आपले दात किडले असतील तर आपल्याला दात दुखीची समस्या उद्भवू शकते. ज्यावेळी आपले दात जास्त प्रमाणात किडतात त्यावेळी ती कीड दातांच्या आतपर्यंत जाते आणि त्यामुळे दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये वेदना सुरु होतात आणि ह्या वेदना आपल्या डोक्यापर्यंत पोहचतात.

दातदुखी ची कारणे – causes of teeth pain 

अचानकपणे दात दुखीचा अनुभव हा बहुतेकदा सर्वांनाच आला असेल कारण आपल्या दातांची कीड हि हळू हळू वाढत असते आणि ज्यावेळी हि कीड खूप वाढलेली असते त्यावेळी आपल्याला अचानकपणे दात दुखी उद्भवू शकते. अश्या प्रकारे दात दुखण्याची अनेक कारणे आहेत.

 • दात किडणे हे दात दुखीचे मुख्य कारण आहे.
 • जर हिरड्या संक्रमित झाल्या असतील तरी देखील दात दुखीची समस्या उद्भवू शकते.
 • गर्भधारणेमुळे दात दुखी समस्या उद्भवू शकते म्हणजेच गर्भधारणेदरम्यान हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे दात किडणे आणि हिरड्यांना आलेली सूज होऊ शकते.
 • हृदयाच्या समस्यांमुळे दात दुखण्याची संवेदना होऊ शकते.

दातदुखीची लक्षणे – symptoms of teeth pain 

 • दातदुखीची समस्या हि अनेक कारणांच्यामुळे होते आणि त्याची काही लक्षणे खाली दिलेली आहेत.
 • तुमच्या दाताभोवतीचा भाग सुजलेला असेल तर तुमचे दात दुखण्याची शक्यता असू शकते.
 • जर तुम्हाला डोकेदुखी आणि ताप येत असेल तर अश्या केस मध्ये देखील दात दुखी होऊ शकते.

दातदुखी कमी करण्यासाठी उपाय – teeth pain home remedy in marathi

dad dukhi var upay

दात हा एक आपला महत्वाचा अवयव आहे कारण आपण जे अन्न खातो ते दाताने चांगले चाऊन मग ते गिळतो त्यामुळे आपल्या दाताची चांगल्या प्रकारे निगा राखणे खूप गरजेचे आहे. जर दात एकदा किडले कि ते संपूर्ण किडतात आणि त्यामुळे आपण आपले दात चांगले असतानाच त्याची निगा राखली तर ते खराब होणार नाहीत. चला तर आता आपण आपले पाय चांगले ठेवण्यासाठी उपाय पाहूयात.

 • लवंग हे दातदुखीवर वापरला जाणारा खूप पूर्वीचा घटक आहे. लवंग मध्ये दाहक विरीधी गुणधर्म असतात जे दातदुखी पासून आराम मिळू शकते. जर तुम्ही लवंग तोंडामध्ये ठरून ठेवल्यास तुमची दातदुखी थोड्या प्रमाणात कमी होऊ शकते त्याचबरोबर एक भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये ५ ते ६ लवंग घाला आणि ते पाणी चांगले उकळा आणि ते थोडे कोमात होऊ द्या. आता हे पाणी गाळून घ्या आणि त्या पाण्याचे दिवसातून ४ ते ५ वेळा गुळण्या करा यामुळे देखील दातदुखी कमी होऊ शकते.
 • काकडी त्याच्या सुखदायक आणि थंड प्रभावासाठी ओळखली जाते आणि अशा प्रकारे दातदुखीवर उपाय म्हणून आश्चर्यकारकपणे कार्य करते. या मध्ये हेमोस्टॅटिक प्रभाव देखील आहेत जे वेदनाग्रस्त भागात रक्त प्रवाह रोखतात, ज्यामुळे वेदना कमी होते. जर तुम्ही काकडी आणि लिंबू रस मिक्स करून याचे मिश्रण दुखत असलेल्या भागाला लावले तर यामुळे देखील दातदुखीवर आराम मिळतो.
 • चहाचे झाड, थाईम आणि पेपरमिंट सारखी तेले, वेदना आणि सुन्नपणा कमी करण्यास मदत करू शकतात. चहाच्या झाडाच्या तेलामध्ये जंतुनाशक आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात ज्यामुळे संसर्ग टाळता येतो. दातदुखी कमी करण्यासाठी पेपरमिंट तेल देखील स्वतःच वापरले जाऊ शकते. थायम तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ तसेच अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याचे मानले जाते, ज्यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो. वेदनादायक भागावर काही थेंब लावण्यासाठी कापसाच्या छोट्याश्या बोळ्याचा वापर करा आणि वेदना असणाऱ्या भागास तेल लावल्यानंतर काही वेळातच ते काम करण्यास सुरुवात करेल.
 • कांदे देखील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक असतात आणि दातदुखीवर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत करतात. कांदा हा दातदुखीच्या विविध घरगुती उपचारांपैकी एक आहे जो संक्रमणास कारणीभूत जंतू नष्ट करून वेदनापासून आराम देऊ शकतो. ज्यावेळी तुमचे दात दुखत असतील त्यावेळी चिरलेला थोडा कांदा दुखत असलेल्या दाताने चाऊन तो कांदा थोडा वेळ ( ५ ते ७ मिनिटे ) त्या दाताखाली तसाच ठेवा आणि मग तो थोड्या वेळाने तोंडातून काढून टाका.
 • आईस पॅक हे दातदुखी दूर करण्यासाठी हे सर्वात सोपा उपाय आहे. बर्फ हा भाग सुन्न करू शकतो आणि प्रभावित दाता जवळ ठेवल्यास एखाद्या व्यक्तीला सामान्यतः आरामदायी वाटू शकते.
 • टीबॅगमधील टॅनिन दातदुखीपासून काही प्रमाणात आराम मिळवू शकतात. वेदना कमी होईपर्यंत ओल्या आणि किंचित उबदार टी बॅगप्रभावित दातावर काही मिनिटे धरून ठेवा त्यामुळे वेदना कमी होऊन थोडा आराम मिळू शकतो. पेपरमिंट टी सारख्या टीबॅगमध्ये मेन्थॉल असते, ज्यामध्ये सुन्न करणारे गुणधर्म असतात ज्याचा उपयोग थंड आणि वेदना कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.
 • दातदुखी वर पेरूची पाने देखील उपायकारक आहेत. पेरूची पाने स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुऊन घ्या आणि मग ती पाने पाण्यामध्ये एक भांड्यात घाला आणि हे पाणी चांगले उकळा आणि थंड झाले कि ते गाळून घ्या आणि त्या पाण्याचे दिवसातून ४ ते ५ वेळा गुळण्या करा यामुळे देखील दातदुखी कमी होऊ शकते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या dadh dukhi var gharguti upay माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दाढ दुखीवर सोपा उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dat dukhane upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि teeth pain home remedy in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dad dukhi var upay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!