Demat Account Information in Marathi डीमॅट अकाऊंट विषयी माहिती ज्या लोकांना शेअर मार्केट विषयी आवड आहे आणि आकर्षण देखील आहे त्यांच्या डीमॅट (demat) किंवा डीमॅट अकाऊंट म्हणजे काय ? हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच हे डीमॅट अकाऊंट का उघडले जाते त्याचा वापर कशासाठी केला जातो आणि कसे वापरले जाते या सर्व प्रश्नांबद्दल आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. डीमॅट अकाऊंट हे ऑनलाइन खाते आहे आणि शेअर मार्केटचा एक महत्वाचा भाग आहे. हे खाते आपण ऑनलाइन उघडू शकतो आणि त्यामध्ये शेअर्स, डिबेंचर्स आणि बॉंड्स या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक व्यवहार ऑनलाइन रित्या नमूद केले जातात.
जर आपल्याला शेअर बाजारात कोणत्याही लिस्टेड कंपनीचे शेअर खरेदी करायचे असल्यास किंवा तुम्हाला तुमच्या जवळ असणारे शेअर विकायचे असल्यास डीमॅट अकाऊंट असणे गरजेचे असते कारण हे अकाऊंट असल्याशिवाय कोणत्याही शेअरची खरेदी – विक्री होऊ शकत नाही.
डीमॅट अकाऊंट हे आपल्या बँकेमध्ये असणाऱ्या खात्यासारखेच काम करते परंतु डीमॅट अकाऊंट हे ऑनलाइन असते आणि ते इलेक्ट्रॉनिक प्रकारे हाताळले जाते. डीमॅट अकाऊंट मध्ये आपल्याला तीन प्रकारचा डीमॅट शुल्क भरावा लागतो तो म्हणजे वार्षिक देक्भाल शुल्क, व्यवहार शुल्क आणि संरक्षक शुल्क.
डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे – Demat Account Information in Marathi
डीमॅट अकाऊंट म्हणजे काय ?
What is demat accout in Marathi ? ज्या व्यक्तीला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला आवडते त्या व्यक्तींचे डीमॅट अकाऊंट असणे आवश्यक असते. डीमॅट अकाऊंट खाते बहुतेक ऑनलाइन पद्धतीने उघडले जाते आणि ऑनलाइन पध्दतीने हाताळले जाते. हे खाते आपण ऑनलाइन उघडू शकतो आणि त्यामध्ये शेअर्स, डिबेंचर्स आणि बॉंड्स या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक व्यवहार ऑनलाइन रित्या नमूद केले जातात.
जर आपल्याला शेअर बाजारात कोणत्याही लिस्टेड कंपनीचे शेअर खरेदी करायचे असल्यास किंवा तुम्हाला तुमच्या जवळ असणारे शेअर विकायचे असल्यास डीमॅट अकाऊंट असणे गरजेचे असते कारण हे अकाऊंट असल्याशिवाय कोणत्याही शेअरची खरेदी – विक्री होऊ शकत नाही.
- नक्की वाचा: आयपीओ बद्दल माहिती
डीमॅट चे पूर्ण स्वरूप काय आहे ?
Dematerialisation Meaning in Marathi डीमॅट (demat) या शब्दाचे पूर्ण स्वरूप डीमटेरियलाझेशन (Dematerialisation) असे आहे.
डीमटेरियलाझेशन म्हणजे काय ?
डीमटेरियलाझेशन (dematerialisation) म्हणजे जी भौतिक शेअर प्रमाणपत्रे असतात त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूप देते त्यामुळे शेअर मार्केट मधील गुंतवणुकदार जगातील कोणत्याही भागातून आपले खाते किंवा व्यवहार करू शकतो.
डीमॅट अकाऊंट उघडण्याचे फायदे
- जर आपण ऑनलाइन डीमॅट अकाऊंट उघडले तर आपण जगामध्ये कोणत्याही ठिकाणी राहून आपल्या मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप वरून आपण शेअर मार्केट विषयी किंवा आपल्या शेअर्सशी संबधित असणारे कोणतेही व्यवहार अगदी सहज करू शकतो त्यामुळे जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमचे डीमॅट अकाऊंट असले तर ते फायद्याचे असू शकते.
- डीमॅट खात्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे या खात्यामध्ये आपण आपला शेअर अगदी सुरक्षित ठेवू शकतो.
- म्युचुअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड या सारख्या गुंतवणुकी देखील डीमॅट खात्यामध्ये जमा होऊ शकतात.
- डीमॅट खाते हे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असल्यामुळे कागदपत्रे चोरीला किंवा हरवण्याची शक्यता नसते.
- डीमॅट खाते असल्यास आपण शेअर्स खरेदी करू शकतो तसेच विक्री देखील करू शकतो.
डीमॅट अकाऊंटचे प्रकार – types of demat account
तीन प्रकारची डीमॅट अकाऊंट आहेत आणि ती खाली दिलेली आहेत.
रेगुलर डीमॅट खाते – regular demat account
रेगुलर डीमॅट या खात्याचा वापर भारतीय नागरिक ऑनलाइन खरेदी केलेले शेअर्स ठेवण्यासाठी वापरू शकतात.
रीपॅट्रीयेबल खाते – repatriable demat account
हे डीमॅट खाते एनआरआय साठी आहे आणि हे अकाऊंट असणारे लोक परदेशामध्ये निधी हस्तांतरित करू शकतात. खाते एक एनआरई खात्याशी संबधित असणे आवश्यक असते.
नॉन रीपॅट्रीयेबल खाते – non repatriable demat account
नॉन रीपॅट्रीयेबल खाते हे डीमॅट खाते देखील एनआरआय साठी असते.
- नक्की वाचा: झेरोधा मध्ये डिमॅट खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा
- नक्की वाचा: एंजल ब्रोकिंग माहिती
डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी लागणारी कागद पत्रे – documents required to open demat account
डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी असणारी प्रक्रिया हि सर्व वित्तीय संस्थांमध्ये एकसमान असते. आपल्याला फक्त त्यासाठी लागणारी कागदपत्रे द्यावी लागतात.
ओळखीचा पुरावा
- पॅन कार्ड – पॅन कार्ड हे गुंतवणूक दारासाठी अनिवार्य आहे ( ओळखीच्या स्वीकार्य पुराव्यावर अर्जदाराचे छायाचित्र असावे )
युआयडी किंवा युनिक आयडेंटीफिकेशन नंबर
- हे तुमचे आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदान कार्ड असू शकते.
खालीलपैकी कोणत्याही एजन्सीने जारी केलेले ओळख पत्र
- केंद्र किंवा राज्य सरकार
- PSU कंपनी
- नियामक संस्था
- विद्यापीठे
- आयसीएआय, आयसीडब्लूएआय सारख्या व्यावसायिक संस्था त्याच्या सदस्यांसाठी ते जारी करू शकतात
- व्यावसायिक बांका किंवा सार्वजनिक वित्तीय कंपन्या.
उत्पन्नाचा पुरावा
- आयटीआर कॉपी
- पगार स्लीप
- ऑडीट केलेल्या वार्षिक खात्यांची फोटो कॉपी
- कायदेशीर डीपीसह डीमॅट खात्याचे विवरण
- मालमत्तेची मालकी सिध्द करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
पॉवर ऑफ अॅटर्नी
- इतर कागदपत्रांच्या सोबत तुम्हाला दलालाला दिलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नी सारख्या कागदपत्रावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
डीमॅट अकाऊंट कसे उघडायचे – how to open demat account in marathi
- डीमॅट अकाऊंट उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी असते आणि हे अकाऊंट उघडण्यासाठी थोड्याच कागदपत्रांची आवश्यकता असते. डीमॅट अकाऊंट कसे उघडायचे यासाठी खाली प्रक्रिया दिलेली आहे.
- डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी खालील दिलेल्या प्रक्रियेचे अनुकरण करा.
- सर्व प्रथम तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड लिंक आहे कि नाही ते पहावे नसल्यास ते करून घ्यावे.
- त्यानंतर या लिंक वर म्हणजेच एंजल ब्रोकिंग मध्ये डीमॅट खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करावे.
- वरील लिंक वरून आपण जर खाते काढले तर आम्ही आमच्या प्रीमियम ग्रुप मध्ये आपणास सामील करून घेऊ व दररोज मार्केट संबंधित माहिती तसेच दररोज Calls विनामुल्य उपलब्द करून दिले जातात.
- खालील पेज वर तुमची सगळी माहिती भरावी आणि continue वर क्लिक करावे.
(टीप: खालील नंबर टाकताना आधाराला लिंक असणे गरजेचे नाही. हा नंबर अकाउंट मध्ये वापरला जाणारा नंबर आहे)
- खालील सगळी माहिती अचूक भरावी आणि View Plan वर क्लिक न करता proceed करावे.
- ह्या पेज वर तुमची जन्म तारीख टाकावी आणि Offline aadhar ला क्लिक करावे तर तुम्हाला खालील पेज दिसेल
- इथे तुम्हाला डाउनलोड आधार झिप वर करावे लागेल. डाउनलोड आधार झिप वर क्लिक केल्यास एक नवीन पेज ओपन होईल खालील प्रमाणे आणि जुने पेज तसेच ओपन असेल. इथे तुम्हाला आधार नंबर टाकावे लागेल आणि SEND OTP करावे लागेल
- Send OTP केल्यावर खाली तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि CODE तुम्हाला १२३४ टाकायचा आहे. आणि DOWNLOAD वर क्लिक करून एक Offline फाईल download करायची आहे.
- तुमचे अकाउंट ओपनिंग चे जुने पेज जे ओपन आहे खालील प्रमाणे तिथे तुम्हाला Upload aadhar zip file वर क्लिक करायचे आहे.
- Upload aadhar zip file वर क्लिक केल्यावर तुम्हाला कॉम्पुटर मध्ये डाउनलोड केलेली फाईल शोधून खालील प्रमाणे ओपन करायची आहे.
- ओपन केल्यावर १२३४ हा कोडे टाकून upload करायचा आहे खालील प्रमाणे,
- upload झाल्यावर खालील सर्व माहिती भरावी आणि continue करावे.
- इथे सर्व documents अपलोड करावे. बँक स्टेटमेंट ची गरज नाही लागत जर क्लायंट ला future and Option नसेल पाहिजे तर
- इतर मोबाइलला आधार नंबर लिंक आहे असा सिलेक्ट करा आणि continue करा.
- इथे तुम्हाला आधार नंबर टाकून Send otp करा आणि आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाइलला नंबरवर otp जाईल तो otp टाका आणि पुढे चला.
- इथे तुम्हाला तुमचा दहा सेकंदचा विडिओ काढावा लागेल. जर क्लायंट तुमच्या सोबत नसेल तर “सेंड लिंक ऑन मोबाइल” वर क्लिक करा म्हणजे लिंक क्लायंटच्या मोबाइलवर जाईल आणि क्लायंट स्वतः विडिओ काढेल (सेल्फी विडिओ)
- जर क्लायंट तुमच्या सोबत असेल आणि तुम्ही विडिओ काढला तर तुम्हाला खालील स्क्रीन दिसेल अथवा तुम्ही क्लायंट कडून कन्फर्म करा कि त्यांनी विडिओ काढला कि नाही
- इथे तुम्हाला दोन दिवस नंतरची तारीख टाकायची आहे आणि set appointment करायचा आहे. (इथे दिलेल्या माहितीवरून तुम्हा क्लायंटला भेटायला कोणी नाही येत.)
- इथे तुमची अकाउंट उघडण्याची प्रक्रिया संपलेली आहे.
- तुम्ही येथे खाते उघडल्यास तुम्हाला आमच्याकडून मोफत खरेदी विक्री चे संकेत अगदी मोफत भेटतील. प्रक्रिया संपली कि आमच्याकडून तुम्हाला CALL केला जाईल.
तुम्ही डीजीटल डीमॅट खाते देखील निवडू शकता जेथे अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन असते.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये demat account information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर demat account information in marathi pdf म्हणजेच “डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे” demat account information in marathi wikipedia या पर्यटण स्थळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या dematerialisation meaning in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि demat account project for 12th in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट