dhantrayodashi information in marathi – dhanteras information in marathi धनत्रयोदशी माहिती मराठी, दिवाळी हा भारतामध्ये साजरा केला जाणारा एक मोठा सण आहे आणि हा सण भारतामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो. दिवाळी या सणाला दिव्यांचा सण म्हंटले जाते त्यामुळे दिवाळी या सणाला आपल्याला सगळीकडे दिव्यांची रोशनाई दिसते तसेच दिवाळी या सणामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या मोठ मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात तसेच वेगवेगळ्या प्रकारचा फराळ बनवला जातो तसेच दिवाळी मध्ये गायीचे पूजन केले जाते, लक्ष्मी कुबेर पूजन केले जाते आणि फटके देखील उडवले जातात आणि दिवाळी दोन ते तीन दिवस खूप उत्साहाने साजरी केली जाते.
आणि यामध्ये लोक आपल्या सर्व चिंता, काळजी आणि दुख विसरून जातात आणि उत्सवाचा आनंद घेतात. धनत्रयोदशी हा देखील एक दिवाळीच्या सणाचा भाग आहे आणि पाच दिवस साजरी केल्या जाणाऱ्या दिवाळी या सणाचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि आज आपण या लेखामध्ये धनत्रयोदशी विषयी माहिती घेणार आहोत.
धनत्रयोदशी माहिती मराठी – Dhantrayodashi Information in Marathi
धनत्रयोदशी विषयी माहिती – dhanteras information in marathi
धनत्रयोदशी हा पाच दिवस साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि या सणाला धनतेरस या नावाने देखील ओळखले जाते. धनत्रयोदशी हा सण अनेक वेगवेगळ्या अर्थानी साजरा केला जातो म्हणजेच काही ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचा उद्देश घरामध्ये सुख, शांती आणि समृध्दी तसेच पतीचे आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर या दिवसविषयी लोकांचे असे देखील मत आहे कि धनत्रयोदशी हा दिवाळी साजरी करण्यासाठी शुभ आणि उत्सवी वातावरण साजरे करते.
धनत्रयोदशी किंवा धनतेरस हि अश्विन महिन्यामधील १३ व्या दिवशी साजरी केली जाते आणि या दिवश लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते आणि या दिवसाचे महत्व हे व्यापारी वर्गामध्ये खूप असते आणि त्या दिवशी घरामध्ये तसेच दुकानांच्या मध्ये देखील मोठ्या श्रध्देने पूजन केले जाते.
धनत्रयोदशीसंबधित सांगितली जाणारी पौराणिक कथा
काही मागच्या काळामध्ये हिमा या नावाचा एक राजा होता आणि त्याचे एक राज्य होते आणि तो राज्यावर चांगला न्याय करत होता तसेच आपल्या प्रजेशी प्रेमाने वागत होता आणि राज्यामध्ये प्रेमाने राहत होता. या राज्याला एक मुलगा होता आणि या मुलाविषयी ज्योतिष्यांनी अशी भविष्यवाणी केली होती कि राजाचा मुलगा त्याच्या वयाच्या १६ व्या वर्षी सर्पदंश होऊन मरण पावणार आहे आणि हे ऐकल्यानंतर राजाला मात्र आपल्या मुलाची चिंता वाटू लागली कारण त्याला आपल्या मुलाचे प्राण वाचवायचे होते.
त्याने अनेक ठिकाणी विचारपूस करून अनेक उपाय केले मग त्याने एका प्रसिध्द ज्योतिष्याच्या सल्ल्यानुसार आपल्या मुलग्याचे लग्न एक भाग्यशाली कुंडली असलेल्या मुली सोबत केले. मुलगा जस जस सोळाव्या वर्षाच्या जवळजवळ येईल तस तसे राजाला भीती वाटू लागली कि आपल्या मुलाचा सोळाव्या वर्षी खरोखर मृत्यू होईल कि काय. ज्योतिष्याने असे सांगितले होते कि तो मुलगा ज्या दिवशी सोळाव्या वर्षामध्ये पहिले पाऊल टाकेल त्यावेळी त्याचा साप चाऊन मृत्यू होईल.
मुलीने आपली युक्ती चालवायची ठरवली आणि राजाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या अधाल्यादिवाशी तिने एक युक्ती लाध्व्याची ठरवलं आणि तिने आपले सर्व दागिने आणि घरातील दागिने हे घराच्या मुख्य दरवाजापाशी ठेवले आणि तिने आपल्या नवऱ्याला देखील न झोपण्याची सुचना दिली. ती देखील रात्रभर जागीच राहिली आणि दरवाजापाशी बसून राहिली. आता मात्र त्या मुलाला सर्पदंश होण्याची वेळ जवळ येत होती म्हणून यमदेवांनी सापाचे रूप घेतले आणि साप घराच्या दरवाज्यापाशी आला.
सोन्याच्या दागिन्यांचा ठीगारा इतका होता कि त्या दागीण्यंचा प्रकाश सर्वत्र पडला होता त्यामुळे त्या प्रकाश्यामुळे त्या सापाला कात दिसत नव्हते आणि ती मुलगी देखील सुंदर आणि मधुर गाणी रात्रभर म्हणत बसली होती आणि या मधुर गाण्यांचा आस्वाद घेत साप देखील दारामध्ये थांबला.
त्यामुळे राज्याच्या मुलाला सर्पदंश करण्याची वेळ निघून गेली आणि ज्योतिष्याने सांगितल्या प्रमाणे सोळाव्या वर्षामध्ये होणारा मृत्यू टळला आणि यमाला वेळ निघून गेल्यामुळे ते ध्येय सोडावे लागले. या कथेपासूनच धनत्रयोदशी दिवशी दागिन्याची पूजा केली जाते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील केली जाते.
धनत्रयोदशी पूजा विधि मराठी – dhanteras meaning in marathi
धनत्रयोदशी हा पाच दिवस साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि या सणाला धनतेरस या नावाने देखील ओळखले जाते. धनत्रयोदशीची पूजा हि सूर्यास्तानंतर संध्याकाळी लक्ष्मीची आणि घरामध्ये असणाऱ्या दागिन्यांची पूजा करून केली जाते. त्याचबरोबर या दिवशी लोक धनत्रयोदशी ची कथा वाचली जाते आणि घराच्या प्रत्येक दाराच्या बाहेर दिवे लावले जातात आणि दिवे लावण्याचा असा विश्वास आहे कि लक्ष्मी मातेला आपल्या घरी येण्यासाठी आपल्या घरातील आणि घराबाहेरील परिसर हा प्रकाशमय केला जातो जेणे करून लक्ष्मी आपल्या घरी येईल.
त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते तसेच कुंकू आणि तांदळाच्या पीठाचे मिश्रण केले जाते आणि त्याचे पाय हे आपल्या घरामध्ये उटवले जाते आणि अश्या प्रकारे घरामध्ये धनतेरस पूजा करून वातावरण चांगले बनवले जाते.
धनत्रयोदशी विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – questions
धनत्रयोदशी का साजरी केली जाते ?
हिंदूंच्या पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हे औषध आणि आयुर्वेदाचे देव आहेत. मानवजातीच्या भल्यासाठी आणि रोगापासून मुक्त होण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करणारे म्हणून धन्वंतरी ओळखले जाते. धन्वंतरीच्या शुभ दिवशी आयुर्वेदाचा देव आणि धन्वंतरी त्याच्या बुध्दीसाठी आणि आयुर्वेदाने तीव्र असणारे आणि जुने आजार बरे करण्यासाठी पूजन केले जाते.
धनत्रयोदशी म्हणजे काय ?
धनत्रयोदशी हा पाच दिवस साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि या सणाला धनतेरस या नावाने देखील ओळखले जाते. धनत्रयोदशी हि घरामध्ये सुख, शांती निर्माण व्हावी म्हणून लक्ष्मीचे पूजन आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना म्हणून साजरी केली जाते.
धनत्रयोदशीमध्ये विशेष काय ?
आपण वर पाहिल्याप्रमाणे या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी घरे आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छता केली जाते तसेच नुतनीकरण आणि शुभ स्थापना हा या उत्सवाचा उद्देश आहे. शेतकरी देखील त्यांच्या सुशोभित गुरांची पूजा करतात कारण ते त्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत्र आहे.
आम्ही दिलेल्या dhantrayodashi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर धनत्रयोदशी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dhanteras information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि dhanteras puja in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट