सापांची माहिती मराठी Snake Information in Marathi

Snake Information in Marathi  सापांची माहिती मराठी आज या लेखामध्ये आपण कशेरुका या सरपटणाऱ्या प्राणी वर्गातील साप या प्राण्याविषयी माहिती घेणार आहोत. जगभरामध्ये सापांच्या ३००० हून अधिक प्रजाती आहेत आणि त्यामधील बहुतेक ६०० प्रजाती ह्या विषारी आहेत. साप हे लांब, दंडगोलाकार शरीर, खवलेयुक्त शरीर, काटेरी जीभ आणि आणि त्यांना त्यांच्या डोळ्याला झाकण नसते आणि हा सरपटणारा प्राणी आहे. काही साप हे विष रहित असतात तर काही साप हे विषारी असतात आणि हे विष प्राणघातक असू शकते. साप या प्राण्याची दृष्टी आणि श्रवणशक्ती खूप कमी असल्या कारणामुळे साप आपली शिकार प्रामुख्याने कंपने, उष्णता आणि रसायनी संकेता द्वारे शोधतात.

snake information in marathi
snake information in marathi

सापांची माहिती मराठी – Snake Information in Marathi

साप कोठे राहतो ?

साप हा सरपटणारा प्राणी जंगलांमध्ये, गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश, वाळवंट, गोडे पाणी किंवा खारे पाणी या सारख्या सर्व ठिकाणी साप हा प्राणी आढळतो. साप शेतात, जंगलांमध्ये तसेच वस्ती असलेल्या भागात विविध प्रकारच्या निवासस्थानांमध्ये राहतात. ते दीमक टेकड्या, विटांचे ढीग, उंदीर बीळ किंवा अगदी घराच्या आत देखील आढळू शकतात.  

सापांचा आहार 

सर्व साप हे बहुतेक करून मांसाहारी असतात म्हणजे ते फक्त मांस खातात. साप हे उंदीर, लहान सरपटणारे प्राणी, कीटक, अंडी, बेडूक, सस्तन प्राणी, छोटेशे पक्षी या सारखा आहार खातात.

सापाचे प्रकार – Types of Indian Snakes 

घोणस साप  

घोणस साप हा आशियात आढळणारा वाईपरीडे कुटुंबातील एक विषारी साप आहे ज्याला रसेल विपर, पॅट्रिक रसेल, स्कॉटिश हर्पेटोलॉजिस्टन या नावानी देखील ओळखले जाते. भारतातील चार मोठ्या विषारी सापांपैकी घोणस हा एक विषारी दंश करणारा साप आहे. घोणस या सापांची मोठ्या प्रमाणात संख्या भारत, जावा आणि तैवान या देशांमध्ये आहे आणि हे साप मुख्यता शेतामध्ये किंवा जेथे उंदीर संख्या मोठ्या प्रमाणात आहे तेथे आढळतात.

वर्णन

घोणस सापाचे डोके लांब आणि सपाट आहे आणि ते त्रिकोणी आकाराच्या मानेपासून वेगळे आहे आणि दोन्ही बाजूला मोठ्या  स्पष्ट नाकपुड्या आहेत. तसेच हे साप पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांच्या शरीरावर गडद काळ्या रंगाचे ठीपके असतात ज्याला पांढऱ्या रंगाच्या कडा असतात आणि ठिपक्यांची संख्या २५ ते ३० इतकी असते.

हे असे ठिपके प्रत्येक सापाला असतातच असे नाही पण हे ठिपके त्यांच्या प्रजातींवर बदलतात तसेच या सापांचे मध्यम शरीर आणि १.५ ते २ मीटर म्हणजेच ५ फुट लांब वाढू शकतात.

सापाचे नावघोणस
इंग्रजीrusell viper
कुटुंबवाईपरीडे
रंगपिवळसर किंवा तपकिरी
लांबी१.५ ते २ मीटर
आयुष्य१० ते १५ वर्ष

किंग कोब्रा साप – King Cobra Snake Information in Marathi 

भारतीय किंग कोब्रा ( नाग साप ) हा जगातील सर्वात लांब आणि विषारी साप म्हणून ओळखला जाणारा साप आहे जी सामन्यात भारताच्या आग्नेय आशियातील जंगलामध्ये आढळतात. या प्रकारच्या सापाचे विष हे खूप विषारी असते आणि हे विष प्राणघातक असते जर या सापाने एकाद्या व्यक्तीला दंश केला तर त्या व्यक्तीचा जीव जावू शकतो. हे साप उंच प्रदेशातील जंगलांमध्ये तलाव आणि नाल्यांमध्ये राहतात.

वर्णन

भारतीय किंग कोब्रा ( नाग साप ) राखाडी किंवा पिवळट तपकिरी रंगाचा असतो आणि या प्रकारच्या सापाच्या शरीरावर पांढरे आडवे पट्टे असतात. या सापाची सरासरी लांबी हि दहा ते पंधरा फुट असते. हे साप जवळ जवळ २० ते २५ वर्ष जंगलांमध्ये जगू शकतात.

सापाचे नावनाग साप
इंग्रजीking cobra snake
रंगराखाडी किंवा पिवळट तपकिरी रंगाचा असतो
लांबीदहा ते पंधरा फुट
आयुष्य२० वर्ष

मण्यार साप 

मण्यार साप हा भारतीय उपखंडातील मूळचा अत्यंत विषारी साप आहे. हे ‘मोठ्या चार’ प्रजातींचे सदस्य आहेत जे बांगलादेश आणि भारतातील मानवांवर सर्वाधिक सर्पदंश करतात. मण्यार साप एकटे असतात आणि दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी सक्रिय असू शकतात.

ते बर्याचदा उंदीर छिद्र, सैल माती किंवा मलबाच्या खाली लपतात, म्हणून ते क्वचितच दिसतात. मण्यार साप अंडी घालण्यासाठी ओळखले जातात. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक मण्यार सापांसाठी वीण येते असे म्हटले जाते. एका वेळी मादा मण्यार साप ८ ते १२ अंडी घातली जातात आणि अंडी पानांच्या लिटरमध्ये घातली जातात.

वर्णन

या सापाचा रंग साधारणपणे काळा किंवा निळसर-काळा असतो आणि त्यावर सुमारे ४० पातळ, पांढरे क्रॉसबार जे अस्पष्ट असू शकतात किंवा आधीपासून अनुपस्थित असू शकतात. मण्यार साप हा एक मध्यम पातळ मध्यम आकाराचा साप आहे जो गुळगुळीत आणि चमकदार आहे. त्यांची सरासरी लांबी सुमारे ३ फूट (९० सेमी) आहे परंतु कमाल लांबी ६ फूट (१८० सेमी) पर्यंत वाढू शकते.

सापाचे नावमण्यार (manyar)
कुटुंबवाईपरीडे
रंगकाळा किंवा निळसर-काळा
लांबीसरासरी लांबी सुमारे ३ फूट (९० सेमी) आहे परंतु कमाल लांबी ६ फूट (१८० सेमी) पर्यंत वाढू शकते.
आयुष्य१० ते १७ वर्ष

अजगर – Indian rock python 

अजगर हा साप भारतीय उप महाद्विपामध्ये आढळणारी सर्वात मोठा बिन विषारी साप आहे आणि हा बोईडे कुटुंबातील आहे. अजगर हे साप दलदलीच्या प्रदेशात, खडकाळ, गवताळ प्रदेश किंवा घनदाट जंगलांमध्ये आढळतात.

वर्णन

अजगर ह्या प्रकारातील सामान्य सापाचा रंग फिकट पिवळसर रंगाचा असतो आणि त्यावर फिकट मातकट रंगाचे ठिपके असतात आणि या सापाची लांबी ९ ते १० मीटर पर्यंत असू शकते आणि  या सापाचा घेर २० ते २५ सेंटी मीटर इतका असतो.

सापाचे नावअजगर
इंग्रजीIndian rock python
रंगफिकट पिवळसर रंगाचा असतो आणि त्यावर फिकट मातकट रंगाचे ठिपके
लांबी९ ते १० मीटर
आयुष्य३० वर्ष

नाग पंचमी सण

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात आणि सापाला भारतामध्ये देवाचे महत्व दिले जाते आणि त्याची नागदेवता म्हणून पूजा केली जाते आणि वर्षातून एकदा नागपंचमी हा सण साजरा केला जातो.

हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्रावण महिन्यात ५ व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीचे महत्त्व म्हणजे सक्रिय सापांना शांत करणे आणि पावसाळ्यात जेव्हा साप त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून बाहेर पडतात तेव्हा पाऊस आणि पूर यामुळे त्यांना मानवांसाठी धोका होण्यापासून परावृत्त करणे.

या दिवशी नागांना आणि इतर सापांना दूध दिले जाते आणि दिवे लावून, मंदिरे फुलांनी सजवून आणि यज्ञ आणि मिठाई अर्पण करून त्यांची पूजा केली जाते.

नाग पंचमी उत्सवा कसा साजरा केला जातो 

भारताच्या कानाकोपऱ्यात हिंदू धर्मामध्ये नाग पंचमी हा सण मोठ्या उत्सहाणे साजरा केला जातो.

  • या दिवशी दुधामध्ये केशर आणि मध मिसळून ते सापांना दिले जाते.
  • मुंबईच्या शिराळेमध्ये नागपंचमीच्या एक आठवडा आधी लोक साप पकडतात.
  • त्यानंतर सापांना खायला दिले जाते आणि त्यांना पूर्ण आरोग्य दिले जाते.
  • तसेच नागांची मंदिरामध्ये पूजा केली जाते.
  • महाराष्ट्रामध्ये भिक्षा मागणारे लोक घरोघरी जाऊन ते नागांना सादर करतात.
  • त्याचबरोबर देशाच्या काही भागांमध्ये घरोघरी मातीच्या दोन नागोबांची पूजा केली जाते आणि त्यांना ल्हाया, शेगदाणे, दुध, धपाटे यांचा नैवैद्य दाखवला जातो.

सापाविषयी अनोखी तथ्ये – facts about snake 

  • जगभरामध्ये सापाच्या एकूण ३००० पेक्षा जास्त जाती आहेत आणि त्यामधील ६०० जाती विषारी आहेत.
  • साप हे पृथ्वीवर १३० दशलक्ष वर्षापासून अस्तित्वात आहेत.
  • सापाचे शरीर जितके गरम असते तितक्या लवकर ते आपले अन्न पचवू शकतात.
  • जगातील सर्वात वजनदार आणि लांब साप हा अजगर आहे कारण त्याचे वजन २७० किलो इतके असते आणि तो ९ ते १० मीटर लांब असू शकतो.
  • सापाला डोळ्याच्या पापण्या नसतात.
  • सापाची त्वचा गुळगुळीत आणि कोरडी असते.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये snake information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information of snake in marathi म्हणजेच “सापांची माहिती मराठी” sapachi mahiti या सापाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या sap mahiti या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information about snake in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट              

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!