दिलेर खान इतिहास Diler Khan History in Marathi

diler khan history in marathi दिलेर खाण इतिहास आज आपण या लेखामध्ये दिलेर खाण यांच्याविषयी माहिती आणि याचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. दिलेर खाण हा एक मुघल सेनापती होता आणि त्यांने औरंगजेबसाठी काम केले होते. दिलेर खान हा पश्तून वंशातील मनसबदार नवाब दर्या खान याचा मुलगा होता. दिलेर खान पेशावर खोऱ्यातील दौडझाई जमातीच्या बाकलजाई शाखेचा होता. दिलेर खानाचे वडील दर्या खाण हे बारबर गावचे होते आणि ते घोड्यांचे व्यापारी होते. दिलेर खान हे मुघल सेवेसाठी हजार झाली आणि त्यांनी शाहजहानपुरची स्थापना १६४७ मध्ये केली.

आणि त्याचा भाऊ बहादूर खान याला याला सुभेदार बनवले आणि नंतर १६७७ मध्ये त्याने हरदोई जिल्ह्यामध्ये शाहाबाद शहराची स्थापना केली. दिलाखाण याने मुरारबाजी यांना पुरंदरच्या लढाई मध्ये मारले होते तसेच भूपालगडच्या शिवाजी महाराजांच्यावर मुघलांचा विजय होण्यासाठी तो कारणीभूत आहे. चला तर आता आपण दिलेर खाण याच्या विषयी आणखीन माहिती घेवूया.

diler khan history in marathi
diler khan history in marathi

दिलेर खान इतिहास – Diler Khan History in Marathi

                          नाव

दिलेर खाण
गावबारबर
वडिलांचे नावनवाब दर्या खान
ओळख

                                          औरंगजेबाच्या दरबारातील सेनापती

दिलेर खान कोण होता ?

दिलेर खान हा पश्तून वंशातील मनसबदार नवाब दर्या खान याचा मुलगा होता आणि दिलेर खाण हा एक मुघल सेनापती होता आणि त्यांने औरंगजेबसाठी काम केले होते.

दिलेर खाण कश्यासाठी ओळखला जातो ?

दिलेर खाण याने मुरारबाजी यांना पुरंदरच्या लढाई मध्ये मारले होते तसेच भूपालगडच्या शिवाजी महाराजांच्यावर मुघलांचा विजय होण्यासाठी तो कारणीभूत आहे.

दिलेर खानची मराठ्यांच्या विरोधातील मोहीम

शिवाजी महाराजांना पाडाव करण्याचे औरंगजेबाचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेल्यानंतर त्याने मराठ्यांचे पाडाव करून दख्खनमध्ये मुघलांची सत्ता स्थापन करण्यासाठी दिलेर खानसह राजे जयसिंग यांना पाठवले. डीलर खानने सर्वप्रथम पुरंदर हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले पण मिर्जा राजे जयसिंग यांना माहित होते कि पुरंदर या किल्ल्यावर द्वाज फडकवने तितके सोपे नाही नि म्हणून मिर्जा राजे जयसिंग यांनी दिलेर खानला आपले सैन्य वज्रगडावर नेण्यासाठी सांगितले कारण वज्रगडापासून हाकेच्या अंतरावर पुरंदर हा किल्ला होता.

आणि त्यांना माहित होते कि वज्रगड हा हाती घेतल्यानंतर आपल्याला तोफखान्याने पुरंदर हा किल्ला अगदी सहजपाने घेता येईल अशी खात्री होती. १३ एप्रिल १६६५ मध्ये दिलेर खानला वज्रगड घेण्यास यश मिळाले आणि यावेळी दिलेर खान आणि मिर्जा राजे जयसिंग यांनी वज्रगडावर तोफांच्या सहाय्याने विजय साजरा केला आणि मग दिलेर खानने आता पुरंदर कडे आपले लक्ष वळवले.

१६ मे १६६५ मध्ये पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी आणि दिलेर खान यांच्यामध्ये लढाई सुरु झाली आणि यामध्ये शेवट पर्यंत मुरारबाजी लढले पण ते या लढाई मध्ये ते मरण पावले आणि दिलेर खाण हा लढतच होता आणि यामुळे अनेक सैनिक जखमी होत होते तसेच मरण पावत होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करण्याचे ठरवले आणि मग पुरंदरचा तह झाला आणि पुरंदर किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्यात आले.

पुरंदरचा तह करण्यासाठी औरंगजेबला दिलेर खानची कशी मत झाली ?

ज्यावेळी औरंगजेब बादशहा च्या फौजी महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशाह ला धडा शिकवण्यासाठी आणि मुघलांच्या मुळे महाराष्ट्रातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत हे मोठी बाजारपेठ असणाऱ्या शहरावर छापा घातला. सुरत हि मुघलांची एक मोठी बाजारपेठ होती आणि या शहरावर छापा घालून लक्षावधी रुपयांची लुट मिळवली पण या लुटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली नीती सोडली नाही.

पण या सुरातेवरील लुटीमुळे औरंगजेब भयंकर चिडला आणि त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी ३ मार्च १६६५ मध्ये मिर्जाराजे जयसिंग हा त्याचा सेनापती आणि आपला विश्वासू सरदार दिलेर खानाला पाठवून दिले आणि ते प्रचंड सैनिकांसह दक्षिण महाराष्ट्रामध्ये येवून पोहचले त्यावेळी स्वराज्यावर खूप मोठे संकट आले होते.

पुरंदर हा शिवाजी महाराजांचा प्रचंड मोठा आणि बळकट किल्ला होता आणि तो घेतल्याशिवाय शिवाजी महाराजांचा विमोड होऊ शकत नाही हे दिलेर खानाला चांगलेच माहित होते त्यामुळे त्यांनी ३१ मार्च १६६५ मध्ये पुरंदरला वेढा घातला. दिलेर खानची आणि मीर्जाराजे जयसिंग यांची फौज खूप मोठी होती पण पुरंदर या किल्ल्याचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे हा खूप जिद्दीचा आणि धैर्याचा होता आणि त्यांनी अगदी नेटाने हा किल्ला लढवला पण १ महिन्याच्या अथक परीश्रमानंतर दिलेर खानाला पुरंदर जवळ असणारा वज्रगड पाडण्यास यश मिळाले.

मुरारबाजी देशपांडे यांना पराक्रमाची पराकाष्ठा केली पण त्यांना या लढाई मध्ये वीरमरण आले आणि हा किल्ला त्यांना राखता आला नाही. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना लक्षात आले कि मीर्जाराजेशी प्रतिकार करणे सोपे नाही आणि त्याचबरोबर एक एक किल्ला वर्षभर लढवता येईल पण विनाकारण माणसे देखील मरतील म्हणून त्यांनी १८ मे १६६५ मध्ये शिवाजी महाराजांना रघुनाथ पंथांना बोलणी करण्यासाठी पाठवले आणि आपण शरणागती पत्करली.

त्यांनी मुघलांसोबत तह करायचा असे त्यांनी ठरवले आणि ते स्वता मिर्जाराजे जयसिंग याच्याकडे गेले आणि शिवरायांनी पुरंदरवर होणारे युध्द थांबवले आणि तहाचे कलम ठरवले गेले आणि याच तहाला इतिहासामध्ये “पुरंदरचा तह”. अशा प्रकारे दिलेर खाण मुळे छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला.

आम्ही दिलेल्या diler khan history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दिलेर खान इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या diler khan death history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!