Purandar Fort Information in Marathi पुरंदर किल्ल्याची माहिती मराठी पुरंदर हा १२०० वर्षापूर्वीचा हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सासवड या गावाजवळ आहे जेथे सिंहगड सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगररांगा मध्ये आहे तेथेच पुरंदर हा किल्ला देखील त्याच डोंगररांगामध्ये वसलेला आहे. पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता त्यामुळे या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्व लाभले आहे तसेच सर्वांना माहित असलेला आणि इतिहासात प्रसिध्द असलेला ‘पुरंदरचा तह’ जो छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्जाराजे जयसिंग यांच्यामध्ये झाला होता.
या गडावरून देखील सिंहगड, विचित्रगड आणि राजगड आपल्याला पाहायला मिळतात कारण हे सर्व किल्ले एकाच डोंगररांगेमध्ये विस्तालेले आहेत. असे म्हणतात कि ज्यावेळी हनुमान ज्यावेळी द्रोणागिरी पर्वत उचलून नेत होते त्यावेळी त्यामधील काही भाग कोसळून खाली पडला होता ज्याला इंद्रनील पर्वत म्हणतात आणि जसे इंद्राचे स्थान बलाढ्य आणि पराक्रमी होते तसेच या पुरंदरचे देखील होते.
पुरंदर किल्ला माहिती – Purandar Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | पुरंदर |
स्थापना | १३५० |
संस्थापक | यादव राजवंशाच्या काळामध्ये |
जिल्हा | पुणे |
जवळचे गाव | सासवड |
किल्ल्याची उंची | १४०० फुट |
प्रकार | गिरिदुर्ग |
डोंगररांगा | सह्याद्री ( भुलेश्वर ) |
पुरंदर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील सासवड या गावाजवळ आहे आणि पुरंदर हा किल्ला पुण्यापासून ४५ किलो मीटर आहे. आपल्याला बापदेव घाट, कात्रज घाट आणि दिवे घाट ओलांडून पुढे गेले कि हा किल्ला दिसतो. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला १४०० फुट उंच असून हा सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगरांमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी दिमाखात उभा आहे आणि या किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची ४४७२ फुट उंचीवर आहे.
- नक्की वाचा: पन्हाळा किल्याची माहिती
या किल्ल्याच्या निर्मिती १३५० मध्ये यादव राजवंशाच्या काळामध्ये झाली होती आणि त्यानंतर या किल्ल्यावर अनेक वंशांनी राज्य केले. हा किल्ला भुलेश्वर पर्वतरांगेवर असल्यामुळे या गडावरून सिंहगड, वज्रगड, विचित्रगड, राजगड हे एकाच पर्वत रांगेवर असलेले गडांचे दर्शन आपल्याला पुरंदर गडावरून होते. हा किल्ला मुख्यता दोन भागामध्ये विभागाला गेला आहे किल्ल्याच्या खालच्या बाजूला माची म्हणतात आणि या माचीच्या उत्तर दिशेला छावणी आणि दवाखाना आहे. या किल्ल्याच्या वरच्या भागाला बालेकिल्ला म्हणतात. बाल्लेकील्ल्य्वर जाण्यसाठी एक मोठा दरवाजा आहे ज्याला दिल्ली दरवाजा म्हणतात.
पुरंदर किल्ल्याचा इतिहास – Purandar Fort History in Marathi
पुरंदर ह्या किल्ल्याला मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. हा किल्ला १३५० मध्ये यादवांच्या काळामध्ये बांधला होता आणि पुरंदर किल्ल्याचे नाव हे भगवान परशुराम यांच्या नावावरून ठेवले होते असे काही इतिहासकारांनी सांगितले आहे. त्यानंतर हा किल्ला यादवांच्या कडून पर्शियन राज्यांच्या ताब्यात गेला आणि पर्शियन वंशाने या किल्ल्याचे पुन्हा बांधणी केली.
इ. स. १६४६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या पुरंदर या किल्ल्यावर हल्ला केला आणि तो आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. त्यानंतर मुगल सरदार मिर्जाराजे जयसिंग यांनी दिलेर खानच्या मदतीने १६६५ मध्ये या किल्ल्यावर आक्रमण केले आणि हा किल्ला औरंगजेबचय ताब्यात गेला. त्यावेळी पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे हे होते आणि या लढाई मध्ये त्यांना वीरमरण आले. याच वेळी म्हणजे १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महराजांनी औरंगजेबाशी पुरंदरचा पहिला तह केला.
- नक्की वाचा: शिवनेरी किल्याची माहिती
त्यावेळी शिवाजी महाराजांना औरंगजेबाला ४ लाख पौंड द्यावे लागणार होते आणि इ. स. १६७० मध्ये हा तह संपला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर पुन्हा आक्रमण केले आणि किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला पण १७७६ मध्ये मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये दुसरा तह झाला आणि १८१८ मध्ये या किल्ल्यावर इंग्रजांनी कब्जा केला. इंग्रज लोक या किल्ल्याचा उपयोग कैद खाण्यासारखं करू लागले.
पुरंदरचा वेढा व तह इतिहास
ज्यावेळी औरंगजेब बादशहा च्या फौजी महारात्रामध्ये धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशाह ला धडा शिकवण्यासाठी आणि मुघलांच्या मुळे महाराष्ट्रातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत हे मोठी बाजारपेठ असणाऱ्या शहरावर छापा घातला. सुरत हि मुघलांची एक मोठी बाजारपेठ होती आणि या शहरावर छापा घालून लक्षावधी रुपयांची लुट मिळवली पण या लुटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली नीती सोडली नाही. पण या सुरातेवरील लुटीमुळे औरंगजेब भयंकर चिडला आणि त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला.
शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी ३ मार्च १६६५ मध्ये मिर्जाराजे जयसिंग हा त्याचा सेनापती आणि आपला विश्वासू सरदार दिलेर खानाला पाठवून दिले आणि ते प्रचंड सैनिकांसह दक्षिण महाराष्ट्रामध्ये येवून पोहचले त्यावेळी स्वराज्यावर खूप मोठे संकट आले होते. पुरंदर हा शिवाजी महाराजांचा प्रचंड मोठा आणि बळकट किल्ला होता आणि तो घेतल्याशिवाय शिवाजी महाराजांचा विमोड होऊ शकत नाही हे दिलेर खानाला चांगलेच माहित होते त्यामुळे त्यांनी ३१ मार्च १६६५ मध्ये पुरंदरला वेढा घातला.
दिलेर खानची आणि मीर्जाराजे जयसिंग यांची फौज खूप मोठी होती पण पुरंदर या किल्ल्याचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे हा खूप जिद्दीचा आणि धैर्याचा होता आणि त्यांनी अगदी नेटाने हा किल्ला लढवला पण १ महिन्याच्या अथक परीश्रमानंतर दिलेर खानाला पुरंदर जवळ असणारा वज्रगड पाडण्यास यश मिळाले. मुरारबाजी देशपांडे यांना पराक्रमाची पराकाष्ठा केली पण त्यांना या लढाई मध्ये वीरमरण आले आणि हा किल्ला त्यांना राखता आला नाही.
- नक्की वाचा: प्रतापगड किल्याची माहिती
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना लक्षात आले कि मीर्जाराजेशी प्रतिकार करणे सोपे नाही आणि त्याचबरोबर एक एक किल्ला वर्षभर लढवता येईल पण विनाकारण माणसे देखील मरतील म्हणून त्यांनी १८ मे १६६५ मध्ये शिवाजी महाराजांना रघुनाथ पंथांना बोलणी करण्यासाठी पाठवले आणि आपण शरणागती पत्करली.
त्यांनी मुघलांसोबत तह करायचा असे त्यांनी ठरवले आणि ते स्वता मिर्जाराजे जयसिंग याच्याकडे गेले आणि शिवरायांनी पुरंदरवर होणारे युध्द थांबवले आणि तहाचे कलम ठरवले गेले आणि याच तहाला इतिहासामध्ये “पुरंदरचा तह” म्हणतात. या तहामध्ये स्वराज्यातील २३ किल्ले मुघलांना देण्यात आले त्यामध्ये पुरंदर, कोंढाणा, कर्नाळ, वज्रगड, इसागड, तिकोना, लोहगड, तुंग, नरदुर्ग, माहुली, रोहिडा, पालसखोल, रुपगड, माणिकगड, सरूपगड , बख्तगड, मरकगड, अंकोला, रूपगड, सकारगड, भांडरदुर्ग, मानगड आणि सोनगड हे २३ किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावे लागले.
त्याचबरोबर असेही ठरले कि ज्यावेळी मुघलांना गरज भासेल तेव्हा त्यांनी आपले सैनिक घेवून हजार राहणे, शिवाजी महाराजांकडे १२ किल्ले आणि १ लाख होन ( होन हे शिवकालीन चलन होते ) वार्षिक उत्पन्नाचे प्रदेश राहिले तसेच संभाजी महाराजांना मुघलांच्या दरबारातील पंच हजारी मनसबदारी देण्यात आली अश्या प्रकारे पुरंदरचा तह झाला.
किल्ल्यावरील प्रेक्षणीय ठिकाणे
पुरंदरेश्वर मंदिर :
पुरंदरेश्वर हे एक गडावरील महादेवाचे मंदिर आहे आणि या मादिरामध्ये इंद्र देवाची दीड फुट उंचीची मूर्ती आहे. या मंदिराचा जीर्णोध्दार थोरल्या बाजीराव याने केला होता.
रामेश्वर मंदिर :
हे पेशव्याचे खाजगी मंदिर होते आणि हे आपल्याला गडावर पुरंदरेश्वर मंदिराच्या पाठीमागे पाहायला मिळते.
बिनी दरवाजा :
किल्ल्यावर जो खालचा भाग आहे त्याला माची म्हणतात त्या माचीवर आपल्याला एकमेव दरवाजा पाहायला त्या दरवाज्याला बिनी दरवाजा म्हणतात तसेच या दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्यला पहारेकारांच्या देवड्या पाहायला मिळतात.
खंदकडा :
खंदकडा हा पुरंदर किल्ल्याच्या माचीवर आहे आणि आपल्याला तो बिनी दरवाजातून आत गेल्यानंतर लगेच समोर पाहायला मिळतो पण या कड्यावर जाण्यासाठी आपल्याला दिल्ली दरवाज्यातून जावे लागते या कड्या जवळ एक बुरुज देखील पाहायला मिळतो.
वीर मुरारबाजी देशपांडे पुतळा :
माचीवरील बिनी दरवाज्यातून आतमध्ये उजवीकडे गेल्यानंतर आपल्याला वीर वीर मुरारबाजी देशपांडे पुतळा पाहायला मिळतो.
पद्मावती तळे :
वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या पुतळ्यापासून थोडे पुढे गेले कि हे तळे आपल्याला पुरंदर किल्ल्यावर पाहायला मिळते.
किल्ल्यावरील इतर ठिकाणे :
शेंदार्याचा बुरुज, केदारेश्वर दरवाजा, भैरवखिंडी, पुरंदर माची आणि दिल्ली दरवाजा.
पुरंदर किल्ला फोटो:
पुरंदर किल्ल्यावर कसे जाल ?
पुरंदर या किल्ल्यापासून सर्वात जवळचे मुख्य शहर पुणे आहे आणि आपण पुणे या शहरामध्ये येवून किल्ल्यापर्यंत बसने किवा टॅक्सी जावू शकतो. पुण्यापासून हा किल्ला ३० किलो मीटर आहे.
टीप : पुरंदर हा किल्ला आपण सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत पाहू शकतो.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, पुरंदर किल्ला purandar fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत.
purandar fort information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of purandar fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही पुरंदर किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या purandar killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही purandar fort history in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
खूप छान माहिती दिलीत त्याबाबद्दल धन्यवाद .
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!!
गडावर जाण्यासाठी वेळ मर्यादा कमी करण्यात आली आहे .
दुपारी 3.30 नंतर गडावर प्रवेश दिला जात नाही. तसेच गडावर जाण्यासाठी सोबत अधिकृत ओळखपत्र असावे .
😭😭