डोडो पक्षाची माहिती Dodo Bird Information In Marathi

Dodo Bird Information In Marathi डोडो पक्षी माहिती कबुतराच्या प्रजातीपासून जन्माला आलेला डोडो हा एक पक्षी हिदी महासागरामधील मॉरीशियस या बेटावर आढळून येत होता पण आता हा पक्षी पूर्णपणे नामशेष झाला आहे. डोडो हा पक्षी शरीराने जाड असल्यामुळे या पक्ष्याला उडता येत नव्हते. डोडो हा पक्षी ‘रॅफिडे’ कुळातील आहे आणि या पक्ष्याचे शास्त्रीय नावरॅफस ककुलाटस’ असे आहे. या पक्ष्याच्या मुख्यता तीन प्रजाती होत्या त्या म्हणजे रॅफस सॉलीटेरस, फस क्यूक्यूलेटस, पेझोफॅप्स सॉलीटेरस ह्या आहेत.

डोडो हा पक्षी आकाराने आणि वजनाने टर्की पेक्षा मोठा होता या पक्ष्याचे सुमारे वजन २२ ते २३ किलो इतके होते. या पक्षाचा निळ्या राखाडी रंगाचा पिसारा, एक २३ सेंटी मीटर काळ्या रंगाचे बिल ज्यावर टोकदार टोक , मोठे डोके, लहान निरुपयोगी पंख, पिवळ्या रंगाचे पाय आणि त्याच्या पाठीमागे लांब कुरळे पंख होते.

Dodo Bird Information In Marathi
Dodo Bird Information In Marathi / dodo pakshi

डोडो पक्षाची माहिती – Dodo Bird Information In Marathi

नावडोडो
प्रकारपक्षी
कुळरॅफिडे
शास्त्रीय नाव (dodo scientific name)रॅफस ककुलाटस
उंची३.५ फुट
वजन१० ते १७ किलो

डोडो पक्ष्याचा इतिहास ( history of dodo bird )

डोडो या पक्ष्याचा प्रथम उल्लेख १५९८ मध्ये डच खलाश्यांनी केला होता. त्यानंतर या पक्ष्याचे आक्रमक शिकारी आणि खालाश्यान काढून या पक्ष्यचा शिकार केला गेले. १६६२ मध्ये शेवटचे काही डोडो पक्षी पाहायला मिळाले. पण या पक्ष्याबद्दल असेही म्हणातले जाते कि पक्षी महासागरातील मॉरीशियस बेटावर अस्तित्वात होता परंतु या पक्ष्याने १६ व्या शतकच्या सुरुवातीस माणसांना पहिलेच नव्हते कारण १६ व्या शतकामध्ये मॉरीशियस बेटाचा शोध लागला होता.

या पक्ष्याला पक्ष्याला पकडणे खूप सोपे असायचे म्हणून या पक्ष्याला (stupid) पक्षी या नावाने हि ओळखले जायचे आणि पकडण्यास सोपे असल्यामुळे लोक या पक्ष्याचा मोठ्या प्रमाणात शिकार करू लागले आणि त्यामुळेच १६६२ मध्ये हा पक्षी नामशेष झाला.

डोडो हा पक्षी नामशेष होण्याची कारणे ( reasons for extinction )

डोडो हा पक्षी फक्त हिंदी महासागरातील मॉरीशियस बेटावर पाहायला मिळायचा ज्यावेळी १६ व्या शतकात नाविकांच्या लक्षात आले कि डोडो हा पक्षी पकडणे खूप सोपे आहे. हे पक्षी खाण्यासाठी इतके चविष्ठ लागत नव्ह्वते पण ते पकडण्यास सोपे असल्यामुळे या पक्ष्यांचा शिकार करून हे खाल्ले जात होते. त्याचबरोबर तेथील लोक मॉरीशियस बेटावर स्थायिक होण्यास सुरुवात केली त्यामुळे डोडो या पक्ष्याचे नैसर्गिक निवास्थान पूर्णपणे नष्ट झाली. जेव्हा मॉरीशियसबेटावर माकडांची, मांजरांची आणि डुक्कर या सारख्या प्राण्यांची संख्या हि खूप वाढू लागले आणि हे प्राणी सुध्दा या पक्ष्यांचा शिकार करू लागले तसेच या पक्ष्यांची अंडी खाऊ लागले.

डोडो या पक्ष्याचे डीएनए संशोधन ( DNA research )

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि लंडन मधील नॅचरल हिस्ट्री संग्रलायामधील डोडो डीएनए रिसर्चच्या गटाने डोडोच्या अनुवंशिक उत्पतीवर प्रकाश टाकला आहे आणि मॉरीशियस बेटावर या पक्ष्यांची हि प्रजाती वेगळी होण्याचे अनेक मार्ग सिध्द केले आहेत. डोडो हा पक्षी पूर्णपणे नामशेष झाला आहे आणि या पक्ष्याचा उत्पत्तीचा इतिहास इतका समजला नाही. अत्यंत कमी पुराव्याच्या आधारे वैज्ञानिकांनी डोडोचे इतर पक्ष्याशी असलेला संबध स्पष्ट करण्यासाठी संघर्ष केला आहे. डोडो हा पक्षी कबुतर, पोपट आणि किनारपट्टीवरील इतर शिकारी पक्ष्यांशी प्रत्येक गोष्टीशी जोडला आहे.

ऑक्सफोर्ड नमुना डीएनए संशोधनासाठी उपलब्ध एकमेव जिवंत मऊ उत्तींचे प्रतिनिधित्व करते. अलीकडच्या काळात ऑक्सफोर्डच्या बायोमॉक्युलस सेंटर प्राणीसंग्रहालयाचे ऑक्सफोर्ड विभाग आणि लंडन मधील नॅचरल हिस्ट्री संग्रालयामधील संशोधकांना डोडो या पक्ष्याचे छोटे छोटे तुकडे मिळवण्यात यश आले. मऊ उत्कासह या एकमेव अस्तित्वात असलेला नमुना असल्याने हा डोडो या पक्ष्याच्या डीएनए संशोधनासाठी अस्तित्वात असलेला एक महत्वाचा नमुना होता. डोडो डीएनए ची तुलना रॉ्ड्रीग्ज बेटावरील विलुप्त डोडोसारखा दिसणारा पक्षी, सॉलीटेअरच्या जनुक क्रमांकाशी, कबुतर आणि कबुतराच्या ३५ प्रजाती तसेच पक्ष्यांच्या इतर गटांशी केली गेली.

डीएनएने हे सिध्द केले कि डोडो आणि सॉलीटेअरच्या सर्वात जवळचे नातेवाईक आहेत. या पक्ष्याच्या डीएनए संशोधनात असे दिसून आले आहे कि डोडो हा पक्षी कबूतर पक्ष्याशी संबधित आहे. तसेच बायोमॉक्युलस सेंटरचे माजी संचालक प्रोफेसर अलान कुपर यांनी डोडो आणि त्यांचे नातेवाईक एकमेकांपेक्षा वेगवेगळे कसे होते ह्याचे वर्णन केले.

डोडो पक्ष्याविषयी तथ्ये ( facts of dodo bird ) 

  • डोडो पक्षी हे हिदी महासागरामधील मॉरीशियस या बेटावर राहत होते.
  • डोडो या पक्ष्याला सर्वप्रथम पोर्तुगीज खलाश्यांनी पहिले होते.
  • १६०० मध्ये जिवंत डोडो पक्षी भारतामध्येही आणले होते.
  • निकोबार कबुतर हा डोडो या पक्ष्याचा सर्वात जवळचा नातेवाईक होता.
  • जसे शहामृग पक्ष्यांना उडता येत नाही तसेच डोडो या पक्ष्यांना सेखील उडता येत नाही.
  • मादा डोडो पक्षी एका वेळी एकच अंडे घालते.
  • डोडो या पक्ष्याचे मांसाचा लोक आहारामध्ये वापर करत होते पण डोडो या पक्ष्याच्या मांसाला चिकन सारखी चव नसते.
  • डोडो या पक्ष्याचे काही नमुने अजूनही संग्रालयामध्ये संग्रहित करून ठेवले आहेत.
  • डोडो या पक्ष्याला वॉलोबर्ड या नावानेही ओळखले जात होते.
  • अलीसाच्या अॅडव्हेंचर इन वंडरलँड डोडो या पक्ष्याचा उल्लेख आहे.
  • कुत्रा, माकडे, मांजर आणि डुकरे हे प्राणी या पक्ष्याचे शत्रू होते.
  • डोडो या पक्ष्याला मूर्ख पक्षी म्हणून ओळखले जात होते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा डोडो पक्षी dodo bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. dodo bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about dodo bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही डोडो पक्षाविषयी dodo pakshi राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या dodo bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!