इको फ्रेंडली होळी निबंध Eco Friendly Holi Essay in Marathi

Eco Friendly Holi Essay in Marathi इको फ्रेंडली होळी निबंध आज आपण या लेखामध्ये इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पूरक होळी या विषयावर निबंध लिहिणार आहे. भारत हा देश संस्कृती प्रधान देश आहे आणि भारतामध्ये असे अनेक सन साजरे केले जातात आणि त्यामधील जास्त करून सन हे हिंदू धर्माशी निघडीत असतात. होळी या सणाला इंग्रजीमध्ये festival of colors असे म्हणतात तर या सणाला हिंदीमध्ये होलिकादहन किवा होलिकोत्सव म्हणून ओळखले जाते. होळी हा सण जरी हिंदूंचा असला तरी जगभरामध्ये हा सण विविध जातींचे लोक सुध्दा साजरा करतात.

होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो त्यामध्ये पहिल्या दिवस होळी दहन करतात आणि दुसऱ्या दिवशी रंगाने एकमेकांच्या अंगावर रंग टाकून खेळले जाते त्याला धुलीवंदन देखील म्हणतात. होळी हा सण फाल्गुनी पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो आणि हा भारतामध्ये अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. होळी या सणाबद्दल हिंदू लोकांचा असा समाज आहे कि येणाऱ्या वसंत ऋतूचा विपुल रंगांचा आनंद घेण्यासाठी हा रंगांचा सण साजरा केला जातो आणि हिवाळ्याला निरोप दिला जातो.

eco friendly holi essay in marathi
eco friendly holi essay in marathi

इको फ्रेंडली होळी निबंध – Eco Friendly Holi Essay in Marathi

पर्यावरणपूरक होळी

होळीच्या पहिल्या दिवशी होलिकाच्या प्रतिमा जाळल्या जातात आणि लोक होलिका आणि प्रल्हादाची कहाणी लक्षात ठेवण्यासाठी प्रकाशझोत लावतात. अग्नीच्या देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या मुलांसह माता अग्नीच्या भोवती पाच फेऱ्या काढतात. त्याचबरोबर दुसर्या दिवशी रंगीत पावडर आणि पाणी एकमेकांवर ओतले जाते. राधा आणि कृष्णाच्या देवतांची पूजा केली जाते आणि रंग खेळला जातो ज्याला मराठी संस्कृती मध्ये रंग पंचमी या नावाने देखील ओळखले जातो.

पूर्वी जरी होळी हा सन एक संस्कृती किंवा वसंत ऋतूचे आगमन करण्यासाठी खेळला जात असला तरी सध्या होळी या सणाचे रूप पूर्णपणे बदलेले आहे. आणि होळी हा सन जरी आपली संस्कृती जपणारा सन असला तरी आता हा सन एक पर्यावरणाच्या ह्रासाचा एक भाग बनला आहे.

How to Celebrate Eco Friendly Holi Essay in Marathi

पूर्वी खेळल्या जाणाऱ्या होळीमध्ये आणि आज खेळल्या जाणाऱ्या होळीमध्ये खूप फरक आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये उत्सव असला कि जास्त व्यापारीकरण होत नव्हते आणि त्यावेळी वासात ऋतूमध्ये फुलणाऱ्या फुलांच्यापासून होळीसाठी नैसर्गिक रंग बनवके जायचे. पण काही काळ सरत गेला आणि झाडे नष्ट झाली आणि फुलांचे देखील प्रमाण खूप कमी झाले आणि तेव्हा पासून रासायनिक रंग बनवण्यात आले. सध्या आधुनिक जगामध्ये मोठ्या प्रमाणात होळी आणि रंगपंचमी खेळली जाते आणि मोठ्या पप्रमाणात रंगाची उधळण केली जाते.

तसेच रंग लोकांना लावले जातात पण हे रंग रासायनिक रित्या बनवलेले असतात ज्याच्यापासून आपल्या त्वचेला धोका असतो तसेच पर्यावरणाला देखील धोका असतो. पण उद्योजक व्यापाराच्या दृष्टीने अनेक रासायनिक रंगाचे उत्पादन करतात आणि ते बाजारामध्ये विकतात परंतु हे आपल्या पर्यावरणाला हानिकारक ठरू शकते.

तसेच आपण होळी सणामध्ये शक्यतो सगळीकडे पाहतो कि होळी हा सन देशभरामध्ये साजरा केला जातो आणि तसेच देशाच्या बाहेर देखील साजरा केला जातो आणि हा साजरा करत असताना कित्येक लोक पाण्याचा वापर करतात आणि ते पाणी एकमेकांच्यावर मारतात आणि त्यामुळे पाण्याची नासाडी होते.

पाणी हे एक नैसर्गिक स्त्रोत्र आहे आणि आपण मनुष्य जातीने त्याचा अपव्यय न करता ते जपून वापरले पाहिजे. तसेच या सणामध्ये जे होळीचे दहन केले जाते त्याला नैसर्गिक इंधनाचा म्हणजेच लाकूड याचा वापर केला जातो तर दहन करण्यासाठी पाला आणि थोड्या प्रमाणात गोवऱ्यांचा वापर केला तर लाकूड जास्त संपणार नाही आणि लाकडाचा अभाव होतोय म्हणून झाडे तोडली जाणार नाहीत.

सध्या आपण जे बाजारामध्ये विकले जाणारे रंग घेतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायने असतात ज्यामुळे या प्रकारचे रंग लावल्यामुळे आपल्या त्वचेला हानी पोहचू शकते तसेच त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून होळी खेळण्यासाठी रंग घरीच बनवू शकतो आणि ते देखील नैसर्गिक रित्या आणि जर तुम्हाला घरी रंग बनवण्यासाठी वेळ नसेल तर बाजारामध्ये असे अनेक विक्रेते असतात जे नैसर्गिक रित्या बनवलेले रंग विकतात आणि आपण त्यांच्याकाधून नैसर्गिक रंग घेवू शकतो.

होळीच्या दहनासाठी लाकूड जाळणे हि एक मोठी समस्या आहे आणि असे म्हटले जाते कि गुजरात राज्यामध्ये प्रत्येक बोनफायर मध्ये सुमारे १०० किलो लाकडे जाळली जातात आणि या होळी सणाच्या वेळी गुजरात मध्ये एकूण ३०००० पेक्षा जास्त शेकोट्या पेटवल्या जातात आणि त्यामुळे लाकूड खूप वाया जाते आणि याचा परिणाम सरळ पर्यावरणावर होतो कारण त्या ठिकाणाचा लाकडाचा साठ कमी होतो आणि त्यामुळे लोक लाकडाच्या अभावामुळे अनेक झाडे तोडतात किंवा दहनासाठी लाकूड लागते म्हणून ते लोक झाडे तोडतात आणि मग ते बाजारामध्ये विकले जाते.

परंतु या कारणामुळे बाजारातील अनेक झाडे तोडली जातात आणि त्यामुळे निसर्गातील झाडांचे प्रमाणत कमी होते आणि त्याचा परिणाम हा निसर्गावर होतो. भारतामध्ये होळी खेळताना होळीच्या वेळी रासायनिक रंगाचा तर वापर केला जातो परंतु होळी खेळताना लोक एकमेकांच्या अंगावर बादली भरून पाणी टाकतात आणि त्यामुळे पाणी खूप मात्रे होते आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो त्यामुळे रंग पंचमी खेळताना पाण्याचा वापर न करता कोरडी होळी केली पाहिजे.

जर तुम्हाला इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पूरक होळी ( eco friendly holi ) खेळायची असेल तर आपण ती वेगवेगळ्या प्रकारे खेळू शकतो. होळी खेळताना पाण्याचा वापरा न करता कोरडी रंगांची होळी खेळ तसेच बाजारातील रसायनीक आणि जास्त प्रमाणात रसायने वापरलेले आणि कृत्रिम पध्दतीने बनवलेले रंग न वापरता होळी किंवा रंग पंचमी खेळण्यासाठी नैसर्गिक किंवा नैसर्गिक पध्दतीने बनवलेले रंग वापरा.

तसेच फुलांची उधळण करून होळी साजरी करा तसेच होळी खेळण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या किंवा फुग्यांचा वापर करू नका. आपण जी होळीच्या दहनासाठी आग केली जाते त्यामध्ये पर्यावरणामध्ये पडलेला कचरा जाळा आणि आपण अश्या प्रकारे इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पूरक होळी आनंद घेवू शकतो आणि पर्यावरणाला काही इजा न पोहचवता आपण आपली संस्कृती देखील जपू शकतो.

आम्ही दिलेल्या eco friendly holi essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इको फ्रेंडली होळी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on eco friendly holi in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि how to celebrate eco friendly holi essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!