एलन मस्क विषयी माहिती Elon Musk Biography in Marathi

Elon Musk Biography in Marathi – Elon Musk Information in Marathi एलन मस्क विषयी माहिती आजच्या लेखामध्ये आपण एक यशस्वी उद्योजक व व्यवसायिक एलन मस्क यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. एलोन मस्क हे स्पेस एक्‍स चे संस्थापक आहेत. तसेच, सीईओ आणि मुख्य अभियंता आहेत आणि टेस्ला चे सहसंस्थापक, सीईओ आणि उत्पादन आर्किटेक्ट.

elon musk biography in marathi
elon musk biography in marathi

एलन मस्क विषयी माहिती – Elon Musk Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)एलोन मस्क
जन्म (Birthday)२८ जून १९७१
जन्म गाव (Birth Place)दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया
राष्ट्रीयत्व (Citizenship)अमेरिकन
ओळख (Identity)उद्योजक व व्यवसायिक

जन्म

एलोन मस्क हे मूळचे दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया येथील आहेत. २८ जून १९७१ रोजी एलोन मस्क यांचा जन्म झाला. एलोन मस्क यांचे वडील एक अभियंता होते तर आई मॉडेल होती. लहानग्या एलोन मस्क ना अविष्कारां बद्दल बरीच आवड होती. लहानपणापासूनच एलोन मस्क यांना वाचन करायची आवड होती. तेही असल्या तसल्या पुस्तकांची नाही तर अशा पुस्तकांची जी महाविद्यालय विद्यार्थ्यांनीही वाचले नसतील.

अगदी दहा वर्षाचे असताना त्यांनी अतिशय कठीण पुस्तकांच वाचन केलेलं ज्यामुळे त्यांना कॉम्प्युटर मध्ये आवड निर्माण झाली. परंतु एलोन मस्क यांनी लहानपणीच आपल्या आई-वडिलांना वेगळे होताना बघितलं. एलोन मस्क दहा वर्षाचा असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. एलोन लहानपणापासूनच अतिशय चपळ आणि हुशार होते.

त्यांनी अगदी वयाच्या बाराव्या वर्षी पहिल सॉफ्टवेअर तयार केलं आणि ते विकूनही दाखवलं. गेम ब्लास्टर नावाचा हा व्हिडिओ गेम एलोन मस्क यांनी वयाच्या बाराव्या वर्षी तयार केला आणि हा गेम पीसी आणि ऑफिस टेक्नॉलॉजी कंपनीला $ ५०० साठी विकला. त्यांच्यात असणारी ही कौशल्य पुढे जाऊन ते यशस्वी उद्योजक बनणार याची खात्री देणारे शुभ चिन्ह होते.

इसवी सन १९८९ मध्ये एलोन यांनी कॅनडाच्या क्किन्स विद्यापीठात प्रवेश घेतला. इसवी सन १९९२ मध्ये पेनसिल्व्हेनिया येथील विद्यापीठात अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्राच शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये पदवी संपादन केली. पुढे एलोन मस्क कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठा मध्ये ‌एनर्जी फिजिक्समध्ये पीएचडी करण्यासाठी कॅलिफोर्नियाला गेले.

यशस्वी उद्योजक एलोन मस्क

एलोन मस्क यांना लहानपणापासूनच कम्प्युटरमध्ये आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी कम्प्युटर विषयीची वेगवेगळी पुस्तके वाचली. कम्प्युटर बद्दल आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न केला बाराव्या वर्षी त्यांनी स्वतःचे सॉफ्टवेअर निर्माण केलं. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये एक उद्योजक बनण्याची कौशल्य होती जी त्यांनी पुढे नेली आणि खरच एक यशस्वी उद्योजक होऊन दाखवलं.

एलोन मुस्क यांनी १९९५ मध्ये आपल्या आयुष्यातील पहिली कंपनी सुरू केली त्या कंपनीचं नाव होतं झिप २ कॉर्पोरेशन. ही कंपनी एलोन यांनी सुरू केली आणि अतिशय कमी वयामध्ये त्यांच्याकडे यश धावून आलं ही कंपनी अतिशय यशस्वी ठरली. झीप २ कार्पोरेशन ही कंपनी द न्यूयॉर्क टाईम्स आणि शिकागो ट्रिब्यून या दोन वेबसाईटसाठी सामग्री प्रदान करण्याचे काम करत होती.

पुढे १९९९ मध्ये झिप २ कंपनीने कॉम्पॅक कॉम्प्युटर कॉर्पोरेशनच्या विभागाने ३६० डॉलर दशलक्ष रोख किंवा ३४ डॉलर दशलक्ष स्टॉक पर्यायाने खरेदी केली. इसवी सन १९९९ मध्ये झीप २ ही कंपनी विकून जे पैसे मिळाले त्या पैशांची गुंतवणूक एलोन मस्क आणि त्यांचे भाऊ किंबल यांनी एक्स कॉम नावाच्या एका ऑनलाईन वित्तीय सेवा किंवा पेमेंट कंपनीत केली आणि त्यानंतर ही कंपनी काॅन्फिनिटिच्या कंपनीत समाविष्ट झाली आणि या दोन्ही कंपन्यांचे एकत्रीकरण झाल्यामुळे त्यांचे एकच नाव पेपल असं ठेवण्यात आलं.

पेपल कंपनी च्या स्थापने नंतर ही कंपनी ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्याच काम करायची परंतु २००२ मध्ये ईबेने १.५ अब्ज डॉलर मध्ये पेपल ही कंपनी खरेदी केली. एलोन मस्क हे एक यशस्वी उद्योजक आहेत आणि एक उद्योजक म्हणून समाजाबद्दल असणाऱ्या जबाबदारीची जाणीव त्यांना होती.

त्यांनी नेहमीच ही खात्री ठेवली की आपल्या कामातून समाजाला काहीतरी उपयोग होईल असंच केलं पाहिजे. आणि एलोन मस्क यांच्यामध्ये मानवजातीला जगण्यासाठी मानवतेला मल्टी प्लॅनेट प्रजाती मध्ये कन्व्हर्ट करणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी २००२ मध्ये एलोन मस्क यांनी परवडणारं व ज्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो असं रॉकेट बनवण्यासाठी स्पेस एक्‍स या कंपनीची स्थापना केली.

हे एक अंतराळ यान आहे जे चंद्र आणि मंगळावर तळ बनवण्याच्या दरम्यान जलद वाहतूक प्रदान करू शकतो. एलोन मस्क यांच्यामते अपयश हा एक पर्याय आहे. जर गोष्टी अयशस्वी होत नसतील तर आपण त्यामध्ये नवीनता आणत नाही. याच प्रकारे एलोन मस्क यांना या प्रकल्पामध्ये देखील लगेच यश मिळालं नव्हतं आणि त्यांचा हा प्रकल्प पहिल्यांदा फसला म्हणून त्यांनी लगेच हार मानली नाही.

लहानपणापासूनच त्यांनी कॉम्प्युटरचे ज्ञान देखील वेगवेगळी पुस्तके वाचूनच मिळवलं. तसेच त्यांना कुठलंही रॉकेट सायन्सची पदवी मिळाली नव्हती परंतु वेगवेगळे पुस्तक वाचून त्याच्यावरती सखोल अभ्यास करून त्यांनी पहिल्यांदा तीन वेळा रॉकेट प्रक्षेपित केले परंतु तिन्ही वेळा त्यांना अपयश आलं.

या काळामध्ये त्यांच्याकडील गुंतवणूकदार देखील कमी होत गेले आणि त्यांच्याकडे पैशाची देखील कमतरता भासत होती परंतु आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवून एलोन मस्क यांनी चौथ्यांदा राॅकेट प्रक्षेपित केलं आणि हा प्रयत्न यशस्वी ठरला. एलोन मस्क यांचं मंगळ ग्रहावर मानव वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न आहे.

स्पेस एक्स खाजगी संस्था आहे ज्याचे संस्थापक एलोन मस्क आहेत. टेस्ला मोटर्स ही एक अतिशय सुप्रसिद्ध मोटरची कंपनी आहे ज्याची स्थापना एलोन मस्क यांनी २००३ साली केली होती. मस्क टेस्ला मोटर्स कंपनीचे सहसंस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उत्पादन आर्किटेक आहेत.

या कंपनीच मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही कंपनी समाजाला परवडणारी मार्केट इलेक्ट्रिक कार त्यासोबतच बॅटरी उत्पादने आणि सौरभ छप्पर तयार करण्याचं काम करते. या कंपनीमध्ये एलोन मस्क हे कंपनीच्या उत्पादनांचे सर्व उत्पादन विकास व अभियांत्रिकी आणि डिझाईन बघण्याचं काम करतात.

अमेरिकेमधील सोलर सिटी ही कंपनी अमेरिकेतील अशी दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे जी सोलर पावर सिस्टीम पुरवते. सोलर सिटी ही कंपनी २००६ मध्ये एलोन मस्क यांच्या भावाने सुरु केली परंतु कंपनीला आर्थिक मदत इलोन मस्क यांनी केली. आता हल्ली २०१६ मध्ये सोलर सिटी ही टेस्ला कंपनी मध्ये समाविष्ट झाली आहे आणि सोलर सिटी आता पूर्णतः टेस्ला कंपनीसाठी काम करते.

हल्लीच्या जगामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सीला किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच डिसेंबर 2015 मध्ये एलोन मस्क यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रिसर्च कंपनी सुरू केली. ही कंपनी ओपन AI या नावाने कार्यरत आहे. यापुढे २०१६ मध्ये एलोन मस्क यांनी neuralic कंपनीचा को फाउंडर पद हाती घेतलं.

ही एक अशी कंपनी आहे जी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मानवी मेंदू या दोघांना जोडण्याचा प्रयत्न करते आणि मानवाचा हितासाठी ही कंपनी डिजिटल बुद्धिमत्तेला प्रगती देण्याच्या प्रयत्नात आहे. एलोन मस्क हे एक अतिशय यशस्वी उद्योजक एक अमेरिकन व्यवसायिक आहेत ज्यांनी आतापर्यंत बऱ्याच कंपन्या उभ्या केल्या आणि यशस्वीरीत्या त्यांचं सांभाळ केला.

त्या पुढे २०१७ मध्ये इलॉन मस्क यांनी बोरिंग आणि बोगदे तयार करण्यासाठी बोरिंग कंपनी सुरू केली या कंपनीची सुरुवात स्पेस एक्स पार्किंग च्या ग्राउंड मध्ये चाचणी करून झाली आणि होणाऱ्या वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने मोठे मोठे बोगदे बांधून मोठ्या शहरांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा एलोन मस्क यांचा प्रयत्न आहे.

युवा पिढीसाठी एलोन मस्क हे एक प्रेरणादायी उद्योजक ठरले आहेत. ते आज यशाच्या उंच शिखरावर आहेत याचं सर्व श्रेय ते आपल्या कठोर परिश्रमांना देतात. एलोन मस्क आपल्या कार्यामधून अनेक युवा तरुणांना व्यावसायिक क्षेत्रात येऊन व्यवसाय करण्याच आमंत्रण देत आहेत. प्रत्येक युवा तरुणासाठी ते आदर्श ठरले आहेत.

एलोन मस्क यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत त्यांच्यामते जर एखादी गोष्ट खूप महत्त्वाची असेल परंतु काही गोष्टी आपल्या विरोधात असतील तरीही आपण त्या केल्या पाहिजेत. अगदी वयाच्या दहाव्या वर्षामध्ये त्यांनी कम्प्युटर बद्दल स्वतःहून ज्ञान प्राप्त केलं आणि वयाच्या बाराव्या वर्षी स्वतःचं निर्मित सॉफ्टवेअर तयार केलं.

म्हणूनच इलॉन मस्क सांगतात कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. की ही गोष्ट शक्य आहे तेव्हाच अशक्य गोष्टीदेखील तुम्हाला शक्य होतील. इलॉन मस्क आज जगातील सर्वोत्कृष्ट उद्योजक म्हणून नावाजले जातात परंतु, त्यांच्या या यशाचा खरा मार्ग म्हणजे चिकाटी.

कितीही अपयश आले तरी त्यांनी आहार कधीच मानली नाही आपल्या कामाशी नेहमी चिकाटी ठेवली. चिकाटी खूप महत्त्वाची आहे आपल्याला हार मानण्यास भाग पाडल्या शिवाय आपण हार मानू नये असे एलोन मस्क यांचे मत आहे.

आम्ही दिलेल्या elon musk biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एलन मस्क विषयी माहिती माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या elon musk information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of elon musk in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये elon musk biography in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!