वडाचे झाड निबंध मराठी Essay on Banyan Tree in Marathi

Essay on Banyan Tree in Marathi वडाचे झाड निबंध मराठी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे त्या प्रदेशावर अवलंबून आणि तेथील हवामानावर अवलंबून येणारी झाडे पाहायला मिळतात आणि झाड हे माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देते आणि गाड्यांच्या मधून येणारा कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते. त्याचबरोबर झाड आपल्याला फळे, फुले तसेच सावली देते. झाडांपासून मिळणाऱ्या लाकडांचा उपयोग इमारती बांधण्यासाठी होतो तसेच झाडाच्या लाकडांचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी, कागद तयार करण्यासाठी तसेच काही वनस्पतीचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी हि होतो.

झाडे हि नेहमीच मानवाच्या जीवनातील योगदान आहेत. झाड हे आपल्याला अन्न आणि ऑक्सिजन पुरविते जे मानवी जीवनातील दोन मूलभूत घटक आहेत. ते मानवी जीवनात आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांचा पुरवठा करतात. झाडे आपल्याला निवारा देतात तसेच झाडांच्यामुळे पर्यावरणातील हवा स्वच्छ राहते.

तसेच झाडे कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि त्या बदल्यात, ते श्वास घेण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवतात. आणि अश्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये झाडांचे अनन्य साधारण महत्व आहे. आज आपण या लेखामध्ये वडाचे झाड (banyan tree) यावर निबंध लिहणार आहोत.

essay on banyan tree in marathi
essay on banyan tree in marathi

वडाचे झाड निबंध मराठी – Essay on Banyan Tree in Marathi

Banyan Tree Essay in Marathi

भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला खूप महत्व आहे आणि हे महत्व सावित्रीमुळे मिळाले आहे. कारण सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली गेले होते आणि तिने त्याचे प्राण देवाकडे प्रार्थना करून त्याच झाडाखाली परत आणले होते आणि त्यावेळी पासून स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वाडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या नवऱ्याला चांगले आणि उदंड आयुष्य लाभूदे म्हणून प्रार्थना करतात.

राष्ट्रीय झाड म्हणून ओळख असणारे वडाचे झाड हे बहुधा देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये दिसतात परंतु हि वडाची झाडे एका विशिष्ट मातीमध्ये वाढतात. वडाचे झाड हे मोरेसी कुटुंबातील एक झाड आहे जे २९ ते ३० मीटरपेक्षा उंच आणि २० सेंटी मीटर लांबीचे असते. वडाचे झाड हे एक विशाल झाड असते आणि या झाडाची विशेषता म्हणजे या झाडाची मुळे हि झाडाच्या फांदीतून येतात.

आणि मग ती मोठी होतील तशी जमिनीमध्ये शिरतात रासेच या झाडाचे खोड देखील खूप लांब असते आणि ते जाड देखील असते. त्याचबरोबर वडाच्या झाडाची पाने हि कोवळी असताना थोडी लालसर रंगाची असतात आणि ती जस जशी मोठी आणि जून होतील तशी त्यांचा रंग गडद हिरवा होत जातो.

तसेच वडाच्या झाडाला हिरवट रंगाची छोटीशी फळे आणि फुले देखील असतात आणि हि फळे पिकली कि लाल रंगाची होतात आणि हि फळे फांदीवर येतात. जर वडाचे झाड जुने असेल किंवा त्याची वाढ पूर्णपणे झाली असेल तर हे वडाचे झाड वातावरणामध्ये एका तासामध्ये ७१२ किलो इतका ऑक्सिजन सोडतात.

ऑक्सिजन हा घटक मानवी जीवनासाठी आणि प्राण्यांच्यासाठी देखील महत्वाचा घटक आहे आणि हे घटक वडाच्या झाडातून खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकतो त्यामुळे लोकांनी गावामध्ये एक – दोन वडाची झाडे लावणे खूप गरजेचे आहे. आणि आपण जेवढावेळ वडाच्या झाडाखाली बसतो तेवढे ऑक्सिजनचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढते.

तसेच वडाचे झाड फक्त ऑक्सिजन सोडत नाहीत तर ते जितक्या प्रमाणात ऑक्सिजन सोडतात तितक्याच प्रमाणामध्ये कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेतात त्यामुळे हवेतील प्रदुषण देखील कमी होते. त्याचबरोबर भारतातमध्ये या झाडाच्या पानांचा वापर प्लेट्स म्हणून केला जातो तसेच फर्निचर, दरवाजा इत्यादी बनवण्यासाठी या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो पाने, बियाणे आणि झाडाची साल विविध रोग आणि विकारांसाठी उपयुक्त आहेत.

जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत आणि त्यामधील काही झाडे मोठी आहेत तर काही झाडे लहान आहेत आणि जगातील सर्वात मोठ्या झाडांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे वडाचे झाड आहे तसेच हे झाड जगातील इतर झाडांच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन पुरवठा करणारे झाड म्हणून देखील ओळखले जाते. वडाच्या झाडाला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावे आहेत.

जसे कि या झाडाला मराठी मध्ये वटवृक्ष किंवा वड म्हणतात, हिंदीमध्ये या झाडाला बर्गद किंवा बड म्हणतात, इंग्रजीमध्ये बनियन ट्री, कन्नड मध्ये याला आला, संस्कृत मध्ये वट किंवा न्यग्रोध म्हणतात. अश्या प्रकारे या झाडाला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत. वडाची झाडे हि विशिष्ट प्रकारच्या मातीमध्ये वाढतात आणि हि झाडे भारत, बांगला देश, पाकीस्थान या देशामध्ये वाढते आणि हे भारतामध्ये सर्व ठिकाणी वाढते.

वडाच्या इतर फायद्यासोबत त्याच्या अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. वटवृक्ष किंवा वडाचे झाड हे त्यांच्या पानांच्यापासून ते मुळा पर्यंत वेगवेगळ्या कारणासाठी उपयुक्त असते. आपण वर पाहिल्याप्रमाणे वडाचे झाड हे एका तासामध्ये ७१२ किलो इतका ऑक्सिजन सोडते त्यामुळे त्या झाडाजवळील वातावर खूप शुध्द राहते आणि जर एखादा माणूस जर झाडाजवळ बसला तर त्याची शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते.

त्याचबरोबर वडाच्या झाडाच्या सर्व घटकांचा आपल्या शरीराला काही ना काही उपयोग होतोच जसे कि जर आपण जर आपले दात दुखत असतील किंवा दातामधून कळ किंवा रक्त येत असल्यास आपण जर वडाच्या झाडाचा चिक लावला आणि तो १० मिनिटे तसाच ठेवला तर दात दुखणे किंवा दातातून कळ येणे कमी होते.

तसेच जर आपल्याला विंचू चावला असेल तर विष काढण्यासाठी वडाच्या चिकाचा वापर केला जातो. तसेच आपण कित्येक वेळा पाहतो कि वडाच्या झाडाच्या साली निघतात आणि जर आपण या साली थोड्या बारक्या करून त्या आपल्या साध्या काढ्यामध्ये जास्त प्रमाणात घातल्या तर मधुमेहाचा धोका देखील कमी होतो.

तसेच वडाच्या ज्या पारंब्या असतात त्याचा काही भाग काढून घेवून त्याचा रस काढून तो पिला तर ते पोटातील जंतांच्यासाठी तसेच टपावर अगदी गुणकारी आहे. तसेच कोणाला सांधे दुखीच त्रास होत असल्यास वादाच्या झाडाची पाने थोडी गरम करून दुखणाऱ्या भागावर लावली तर सांधेदुखी पासून थोडा आराम मिळतो.

तसेच वडाच्या झाडाचे अनेक फायदे आहेत जसे कि आपण हे चेहरा उजळण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी याचा उपयोग होतो तसेच केसाच सौंदर्य वाढवण्यासाठी देखील वडाच्या झाडाच्या घटकाचा उपयोग केला जातो तसेच मधुमेहावर उपचार करण्यासाठी आणि इतर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वडाचे झाड उपयुक्त आहे.

वडाचे झाड हे खूप उपयुक्त असल्यामुळे ते गावामध्ये लावले पाहिजे. कारण त्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि हवा देखील शुद्ध राहते. वडाचे झाड हे एकदा लावले कि १०० ते २०० वर्ष जगू शकते. अश्या प्रकारे वडाचे झाड हे माणसाच्या अनेक कामाचा किंवा कृतीचा साक्षीदार बनू शकते, मानवाला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू देते, तसेच प्रदूषित हवेचे रुपांतर शुद्ध हवेमध्ये करते. अश्या प्रकारे वडाचे झाड मानवी जीवनामध्ये एक महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे वडाची झाडे तोडण्या ऐवजी ती लावली पाहिजेत.

आम्ही दिलेल्या essay on banyan tree in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वडाचे झाड निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on banyan tree in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि banyan tree essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vadache zad nibandh in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!