Essay on Fish in Marathi मासा निबंध मराठी, मछली जल की रानी है जीवन उसका पानी है। लहानपणी वाचलेली ही कविता माशांच्या जीवन शैलीच थोडक्यात वर्णन करते. मासा हा प्रामुख्याने पाण्यामध्ये आढळणारा प्राणी आहे मासा हा जलचर प्राणी आहे. माशाची शरीररचना ही सर्वांनाच आकर्षित वाटते म्हणून मासा हा प्राणी सर्वांनाच आवडतो. शिवाय मोठ्या प्रमाणात मासे अन्न व पोषणाचे प्रमुख स्त्रोत आहेत प्रामुख्याने नदीमध्ये तलावांमध्ये किंवा समुद्रामध्ये मासे आढळून येतात. मनुष्यासाठी मासे हे एक पौष्टिक अन्न मानलं जातं माशांमध्ये प्रथिने असतात जे माणसासाठी पौष्टिक असतात.
माशांमध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस यांसारखी मुख्य खजिने माशांमध्ये आढळून येतात. माशाची शरीर रचना म्हणजे लांबट व दोन्ही टोकांना निमुळते व प्रवाहरेखित असते. माशांचे गोड्या पाण्याचे मासे, खाऱ्या पाण्यातील मासे आणि दोन्ही पाण्याचा संयोग होतो अशा नदीच्या मुखातील मासे असे हे तीन प्रमुख प्रकार मानले जातात.
मासा निबंध मराठी – Essay on Fish in Marathi
10 Lines On Fish in Marathi
माशाच्या शरीराचे एकूण तीन भाग असतात सर्वात पहिला भाग म्हणजे डोके नंतर धड आणि मग शेपटी असे तीन भाग असतात. माशाच्या शेपटीच्या टोकास उच्च पक्ष असतो. माशाच्या डोक्याच्या पुढच्या भागात जबडा असतो आणि सोबतच वरती नाकपुड्या यांची जोडी आणि बाजूला दोन डोळे असतात. माशाच्या डोक्याच्या पश्च भागी दोन्ही बाजूंकडून कप्पे असतात याला क्लोमकक्ष असे देखील म्हंटलं जातं. या कक्षांमध्ये लालबुंद क्लोम असतात आणि या क्लोम च्या साह्याने मासे पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन शोषतात आणि याच्या साह्याने त्यांची श्वसन प्रक्रिया सुरू असते.
माशांचा हा भाग एक वैशिष्ट्यपूर्ण इंद्रिय म्हणून मानला जातो. आणि या दोन बाजूला असणाऱ्या क्लोम पक्षांच्या अगदी मध्य भागामध्ये माशांच हृदय असतं. माशाचा मेंदू हा त्याच्या डोक्याच्या पुढच्या मध्यभागी हाडांच्या कवटीत लांबट आकाराचा असतो. माशांच्या शरीरावर वेगवेगळ्या भागांमध्ये पक्ष असतात त्यांच्या धडाचा देह गुहेत जठर, आतडे म्हणजेच पचनसंस्थेचे इंद्रिय असतात आणि त्यासोबतच हृदय, यकृत, मूत्रपिंड, जनन इत्यादी माशांच्या शरीराचे महत्त्वाचे अवयव सामावलेले असतात.
माशाचा आकार ठरलेला नसतो मासा कोणत्याही आकाराचे प्रकाराचे पहायला मिळतात हाताच्या मूठी मधून सटकून जाईल इतका छोटा मासा ते हाताच्या मूठी मध्ये मावणार नाही इतका मोठा मासा असे माशांचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आढळून येतात. प्रत्येक माशाची शरीर रचना थोडीफार वेगळी असते.
मासे पाण्याशिवाय जगू शकत नाहीत त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांना पाण्याखालीच घालवावं लागतं. माशांमध्ये बाह्य जननेंद्रिय नसतात म्हणूनच मादी तिच्या पिल्लांना पाण्यामध्येच जन्म देते मादी अंडी पाण्यामध्ये सोडते आणि मग त्यानंतर नर मासा त्या अंड्यांवर पूजननं पेशींचा वर्षाव करतो. आणि अंड्यांची पुढची वाढ म्हणजेच फलन आणि त्यांचा विकास हा पाण्यामध्येच होतो. ह्या अंड्यांच प्रौढ अवस्थे मध्ये रूपांतर साधारणता अठरा ते वीस तासानंतर होतं हा कालावधी प्रत्येक माशाची प्रजाती आजूबाजूचे वातावरण यावर आधारित असतो.
साधारणता बहुतांश मासे थोड्या दिवसांमध्ये प्रौढ अवस्थे मध्ये येतात तर ईल या माशाच्या प्रजातीला प्रौढ अवस्थे मध्ये येण्यासाठी तीन किंवा चार वर्ष लागतात तर लॅंप्री या माशाला सुमारे पाच वर्ष लागतात. परंतु काही मासे असतात ज्यांच्यामध्ये बाह्य जननेंद्रिय असतात आणि म्हणून मादी मासा आपल्या पिलांना गर्भाशयामध्ये वाढवते. संपूर्ण विश्वामध्ये माशांच्या २८ हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. आणि या प्रजातींना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.
या प्रजातींना वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन लाख १८ हजार वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आपल्या पृथ्वीवर वेगवेगळे जीव आढळून येतात आणि त्यांच्या मध्ये असणारे वैशिष्ट्ये आपल्याला आकर्षित करतात तसंच काही माशांच्या बाबतीमध्ये देखील आहे. माशांचे वेगवेगळे प्रकार व वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि त्यांचे गमतीदार अशी वैशिष्ट्ये देखील आहेत. पापलेट, रावस, सुरमई, बांगडा ही सगळी नावं तर आपल्या सगळ्यांनाच परिचयाची आहेत.
पाणी हे माशांचं जीवन असतं जर मासा पाण्यातुन बाहेर आला तर तू मरू शकतो किंवा मरतोच परंतु मडस्किपर या प्रजातीचा मासा त्याच्या पंखांच्या सहाय्याने जमिनीवर फिरू शकतो. बहुतांश मासे हे अंडी घालून त्यांच्या बाळांना जन्म देतात परंतु शार्क यांच्यासारखे मासे आपल्या गर्भाशया मध्येच बाळांना जन्म देतात. आणि शार्क हा असा एकमेव माशाची प्रजाती आहे ज्याला पापण्या आहेत. माशांमध्ये इलेक्ट्रिकल ईल हा नावाचा मासा आपल्या शिकाऱ्याला आपल्या जाळ्यांमध्ये ओढण्यासाठी त्याला इलेक्ट्रिक झटका देतो.
या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे या माशाच्या शरिरातून मोठ्या प्रमाणावर विद्युत लहरी निर्माण होतात आणि ज्या मुळे जर एखाद्या माणसाने देखिल या माशाला स्पर्श केला तर क्षणभरातच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. हा मासा साधारणता ६०० वोल्टेज पर्यंत विजेचा झटका देऊ शकतो आणि यामधून त्याला स्वतःला कोणताही त्रास जाणवत नाही परंतु इतरांसाठी मात्र हा विद्युत झटका प्राणघातक आहे. संपूर्ण विश्वामध्ये अगदी छोटेसे किंवा विशाल असे जीव आढळून येतात आणि या माशांमधील असा विशाल जिव म्हणजे व्हेल.
हा मासा साठ फुटांपेक्षा देखील जास्त लांबीची आहे आणि जगातील सर्वात मोठ्या माशाची प्रजाती म्हणून ओळखली जाते. मासे हे खाण्यासाठी पौष्टिक असतात परंतु माशातील स्टोन फिश या नावाची प्रजाती सर्वात विषारी मासा म्हणून ओळखली जाते आणि जर एखाद्या व्यक्तीने हा मासा खाल्ला तर परिणामी त्याचा मृत्यू होऊ शकतो.
सेल्फिश नावाच्या प्रजातीचा मासा याचं वैशिष्ट्य म्हणजे हा मासा खूप वेगाने पोहोतो या माशाच्या होण्याचा वेग इतका वेगवान आहे की हा मासा वेगाने चालणाऱ्या कार पेक्षाही वेगाने पोहतो. तर सी हॉर्स प्रजातीचा मासा याच्या पोहण्याचा वेग खूपच मंद आहे या माशाच्या पोहण्याची गती इतकी मंद आहे की हा मासा नेहमी थांबलेला दिसतो. माशांमध्ये देखील वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात व त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या शक्तीदेखील असतात. डॉल्फिन हा मासा झोपताना त्याच्या मेंदूचा फक्त अर्धा वापर करतो म्हणजे या माशाचा अर्धा मेंदू झोपतो.
माशांच्या प्रजाती वरून त्यांची शरीररचना ठरवली जाते तसेच स्टार फिश प्रजातीचा मासा ज्याच्या मध्ये मेंदू नसतो. हा मासा त्याच्या त्वचेच्या सहाय्याने आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची माहिती घेतो. शार्क हा मासा जवळपास ३५० दशलक्ष वर्षांपासून पृथ्वीवर आहेत. तर जेलीफिष हा मासा सुमारे ६५० दशलक्ष वर्षांपासून पृथ्वीवर आहेत. तसेच ब्ल्यू व्हेल मध्ये इतकी शक्ती असते की हा मासा काहीही न खाता जवळपास सहा महिने जगू शकतो.. माशांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती पृथ्वीवर आढळून येतात परंतु यांच संरक्षण करणे देखील आपली जबाबदारी आहे.
आज-काल वायूप्रदूषण, जलप्रदूषण इतकं वाढल आहे की याचा परिणाम कुठे ना कुठे समाजातील या घटकांवर देखील होतो. जलप्रदूषणामुळे अनेक मासे जवळपास दिवसाला ५० हजारांहून अधिक मासे मरण पावतात. शिवाय प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे देखील माशांना आपला जीव गमवावा लागतो. मासे प्लास्टिक खातात त्यामुळे प्लास्टिक मधील विषारी घटकांमुळे त्यांचा मृत्यू होतो. म्हणूनच माशांचे देखील स्थलांतर होते मासे जर त्यांना आवशक्य असं वातावरण मिळत नसेल तर मासे मोठ्या संख्येने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात.
माशांच्या स्थलांतराच मुख्य हेतू असतो प्रजनन, अन्नर्जन किंवा प्रतिकूल परिस्थितीतून सुटका करणे. काही मासे खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यामध्ये स्थलांतर करतात तर काही मासे गोड्या पानातून खाऱ्या पाण्यामध्ये स्थलांतर करतात. मत्स्य शेती हा व्यवसाय देखील एक उत्कृष्ट व्यवसाय आहे. परंतु मत्स्यपालन किंवा मस्य शेती हा व्यवसाय सुरू करण्यामागे एक मुख्य कारण म्हणजे आज आपल्या देशामध्ये माशांची कमतरता जाणवू लागली आहे म्हणूनच हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.
कारण मासे खाण्यासाठी तर पौष्टिक असतातच परंतु काही दुर्मिळ माशांच्या साहाय्यतेने वेगवेगळी औषध तयार करण्यास देखील मदत होते. म्हणूनच भविष्यामध्ये माशांची कमतरता जाणवू नये यासाठी मत्स्यपालन व मत्स्यशेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालवला जातो. समुद्राच्या तळाशी वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी छोट्या मोठ्या आकाराचे मासे बघायला मिळतात.
आपल्या पृथ्वीवर आढळणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या मोठ्या जीवाची काळजी घेणे हे आपली जबाबदारी आहे आज-काल माशांच्या प्रजाती फार कमी होऊ लागल्या आहेत आणि याला सर्वस्वी कारण म्हणजे माणूस आहे. इतिहासात किंवा शास्त्रीय अभ्यासामध्ये आणि संस्कृतीमध्ये माशांना एक वेगळे स्थान देण्यात आलं आहे.
आम्ही दिलेल्या essay on fish in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मासा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my favourite pet fish in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my pet fish in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये 10 Lines On Fish in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट