जल प्रदूषणाची संपूर्ण माहिती Water Pollution Information In Marathi

water pollution information in Marathi पाणी (जल) म्हणजे जीवन होय. आपल्या सूर्यमालिकेत पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. कारण पृथ्वीवर जल आहे. पण मानवाने विज्ञानाच्या साह्याने खूप प्रगती केली आहे. पृथ्वी शिवाय अजून इतरही ग्रहांवर सजीवसृष्टी असेल का याचा शोध घेण्यासाठी पृथ्वीवरील बऱ्याच देशांनी इतर ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व शोधण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा पार पडल्या. अगदी सूर्यमालिकेतील मंगळ, गुरू, शनी, बुध, शुक्र यासारख्या सर्व ग्रह हां पर्यंत तसेच चंद्र व टायटन सारख्या उपग्रहांवर देखील मोहिमा आखल्या आहेत. यावरून आपल्याला असे दिसून येते की जल हे सजीवांसाठी किती महत्त्वाचे आहे.

water-pollution-information-in-marathi
water pollution information in marathi/water pollution in marathi

जल प्रदूषणावर माहिती (water pollution information in Marathi)

नमस्कार मित्रांनो , तर आपण आज जल प्रदूषण या विषयावर माहिती पाहणार आहोत. या सदरामध्ये आपण जल प्रदूषण म्हणजे, काय त्यामागील कारणे कोणती, त्याचे काय परिणाम होतात व जल प्रदूषण रोखण्याचे कोण कोणते उपाय आहेत, यावर भाष्य करणार आहोत.(jal pradushan mahiti marathi)

वायू प्रदूषणाची माहिती 

जल प्रदूषण म्हणजे काय? (What is water pollution in Marathi ?)

शुद्ध पाण्यामध्ये जेव्हा अशुद्ध घटक हे नैसर्गिक किंवा नैसर्गिक रित्या मिसळले गेले जातात ज्यामुळे ते सजीवांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते तेव्हा याला जल प्रदूषण असे म्हणतात. असे जल प्रदूषण होण्यासाठी  वैयक्तिक स्तरापासून ते जागतिक स्तरापर्यंत बरेच घटक कारणीभूत असतात. जेव्हा पाण्यामध्ये झाडांचा पालापाचोळा ,माती ,कचरा यांसारखी स्थायू स्वरूपातील घटक आणि कारखान्यातून निघणारे रसायने, सांडजल यासारखी द्रव स्वरूपातील घटक मिसळल्याने जितके जल प्रदूषण होते तितकेच पाण्याचे तापमान वाढल्याने ही होते. म्हणजेच पाण्याचे वाढते तापमान हे जल प्रदूषणास कारणीभूत असते.

जल प्रदूषण विचारात घेताना पृथ्वीच्या पृष्ठावरील जल म्हणजेच पृष्ठीय जल आणि भूजल म्हणजेच पृथ्वीच्या पोटातील जल या दोन प्रकारांचा विचार केला जातो. पृष्ठभागावरचे जल म्हणजे तळे, नदी, समुद्र, महासागर यामध्ये झालेल्या प्रदूषणाचा विचार केला जातो. तसेच जल प्रदूषणासाठी अशुद्ध घटक पाण्यामध्ये मिसळण्यासाठी एक ठराविक केंद्रबिंदू असतो आणि काही वेळेस ठराविक केंद्रबिंदू नसतोही.

जल प्रदूषणाची कारणे! (Causes of water pollution!)

  • जल प्रदूषणासाठी मानवनिर्मित वा अनैसर्गिक तसेच नैसर्गिक घटक कारणीभूत असतात. या बरोबरच रासायनिक ,भौतिक आणि रोगकारक घटक तसेच सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकही जल प्रदूषणास जबाबदार असतात. वीज प्रकल्पामध्ये पाण्याचा वापर मोठमोठ्या कूलिंग टॉवर्समध्ये शितलक म्हणून केला जातो. अशामुळे पाण्याचे तापमान सामान्य तापमानापेक्षा वाढते.
  • ज्वालामुखी ,वादळ, भूकंप , शेवाळाची पैदास या कारणाने मुळे ही पाण्याच्या गुणवत्तेत आणि पर्यावरणीय संरचनेत खूप मोठ्या प्रमाणात बदल घडतात. जल प्रदूषणामध्ये पृष्ठ भागावरील जल प्रदूषण ,सागरी जल प्रदूषण, भूजलाचे जल प्रदूषण इत्यादी प्रदूषणाची कारणे पाहूयात. घराघरातून निघणारे सांडजल, कारखान्यातून निघणारे रासायनिक द्रव्य इत्यादी घटक हे सरळ नदी-नाले, तलाव यांमध्ये सोडले जातात. त्यामुळे भूपृष्ठीय जल प्रदूषण होते.
  • कारखान्यांमधून निघणारे रासायनिक द्रव्ये तसेच प्लास्टिक कचरा हा नद्यांमधून सरळ समुद्रामध्ये महासागरांत पर्यंत पोचतो आणि अशावेळी सागरी जल प्रदूषण होते. जगातील 90 टक्के निरुपयोगी प्लास्टिक हे नद्या मार्फत  महासागरापर्यंत पोहोचते. अशा साखरी प्रदूषणासाठी चीन, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, व्हिएतनाम ,श्रीलंका ,थायलंड ,मलेशिया आणि नायजेरिया हे देश मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.
  • त्यानंतर सांड जल ,खाते आणि कीटकनाशक इ घटक पाण्यामध्ये मिसळल्यामुळे ते जल जेव्हा जमिनीमध्ये झिरपते तसेच घरगुती आणि कारखान्यातील अनावश्यक जल जेव्हा जमिनीमधून झिरपून भूजला पर्यंत पोहोचते तेव्हा भूजल प्रदूषण होते.
  • कारखान्यातून निघणारे पाईप गळती तसेच शहरातील लोकांना जल पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या मोठ्या मोठ्या मधून होणारी गळती तसेच सांडजल  निचरा करण्याची जागा अशासारखे ठिकाणा मधून आपल्याला निश्चित जल प्रदूषण होण्याची स्त्रोत सापडतात. आणि त्याबरोबरच
  • निश्चित स्त्रोत सापडत नाहीत,उदाहरणार्थ शेतामध्ये वापरली जाणारी खते , नायट्रोजन  हे मोठ्या प्रमाणात जलसिंचन मुळे पाण्यामध्ये मिसळले जाते. शहरी भागात ज्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जातात तसेच रस्ते महामार्ग आणि शहरी वस्त्या या ठिकाणीसुद्धा प्रदूषित किंवा दूषित जल हे नाल्यांमध्ये वाहून नेले जाते.

जल प्रदूषणाचे परिणाम! (Consequences of water pollution!)

  • पाण्याच्या वाढलेल्या तापमानामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, पाण्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात सागरी जीवांचा मृत्यू होतो, मासे मरतात. त्यामुळे अन्नसाखळी कोलमडते आणि जैवविविधता धोक्यात येते.
  • प्रदूषित पाण्यातील प्लास्टिक हे विशारी रसायनी शोषून घेते. आणि अशा मुळे अशी प्लॅस्टिकचे जेव्हा माशांच्या तोंडात जाते तेव्हा सागरी जलचरांवर पुन्हा एकदा त्याचा विपरीत परिणाम होतो.
  • याबरोबरच दूषित पाण्यामुळे मानवी आरोग्यास सुद्धा धोका निर्माण होतो. दूषित पाण्यामुळे निरनिराळे साथीचे रोग पसरतात. कॉलरा , हगवण यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. मानवी शरीरात 70 टक्के जल असते त्यामुळे जल शुद्धीकरण करून ग्रहण करणे हे मानवासाठी सोयीचे असते.
  • 2015 मध्ये 1.8 दशलक्ष जल प्रदूषणामुळे मानवी मृत्यू झाले आहेत. भारत आणि चीन हे देश जल प्रदूषणासाठी उच्च स्थानावर आहेत. चीनमधील  90 टक्के प्रदूषित जल हे शहरी भागातील आहे.
  • प्रदूषित जल मापन ही ठराविक पद्धतीने केले जाते. त्यामध्ये भौतिक रासायनिक आणि जैविक घटकांचा विचार केला जातो. अशावेळी दूषित पाण्याचा नमुना घेऊन तो सरकारी एजन्सी आणि संशोधन संघटनेकडे तपासणीसाठी दिला जातो. त्या नमुन्यामध्ये पाण्याचे तापमान आणि स्थायु स्वरूपातील अशुद्धता यासारख्या भोवती घटकांचा तसेच पीएच ,जैवरासायनिक ऑक्सिजनची आवश्यकता,  रासायनिक ऑक्सिजनची आवश्यकता, तेल आणि ग्रीस यांसारख्या रासायनिक घटकांचा विचार केला जातो. याबरोबरच पाण्यातील जैविक परिस्थितीकी सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी प्राणी आणि सूक्ष्मजीविय निर्देशकांचा तसेच वनस्पतींचा वापर केला जातो.

जल प्रदूषण रोखण्यासाठी उपाय! (Measures to prevent water pollution!)

  • जल प्रदूषण रोखण्यासाठी सरकार आपल्या पातळीवर विविध योजना राबवत असते. पण वैयक्तिक पातळीवर आपली ही जबाबदारी आहे.
  • व्यवस्थित सांडपाण्याचा निचरा करणे. गळणारी पाईप लाईन्स हे दुरुस्त करून करून त्या जागी नवीन पाईपलाईन बसवणे त्यामुळे पाण्याची गळती कमी होईल.
  • कारखान्यातून निघणाऱ्या प्रदूषित पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक आणि  विषारी प्रदूषके असल्यामुळे अशा पाण्याचा सुरक्षितपणे निचरा करणे.
  • पाळण्याची तापमान संतुलित ठेवणे म्हणजेच पाण्यातून अनावश्यक उष्णता बाहेर काढून टाकणं. त्याबरोबरच काही वनस्पतींमध्ये पाण्यातील अनावश्यक घटक आणि रोगकारक घटक बाहेर काढून टाकण्याची नैसर्गिक क्षमता असते, अशा वनस्पतींची वाढ करणे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि जल प्रदूषण कशामुळे व का होते ? व त्याचे दुष्परिणाम  काय आहेत त्याच बरोबर ते रोखण्याचे उपाय देखील आपण या लेखात पाहिले आहेत. water pollution information in Marathi language pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच water pollution in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही जल प्रदूषणाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या jal pradushan mahiti marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!