प्रामाणिकपणा मराठी निबंध Essay on Honesty in Marathi Language

Essay on Honesty in Marathi Language – Honesty Is the best Policy Essay In Marathi प्रामाणिकपणा मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये प्रामाणिकपणा या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपण निबंधाला सुरुवात करण्यापूर्वी प्रामाणिकपणा म्हणजे काय हे जाणून घेवूया, प्रामाणिक पणा म्हणजे आपल्याला वर कितीही वाईट वेळ, संकटे आणि बिकट परिस्थिती जरी आली तरी आपण सत्याचा मार्ग न सोडणे म्हणजेच खर्या मार्गाने जाने. पण काही लोक असे असतात कि त्याच्यावर जरी थोड्सी जरी वाईट परिस्थिती आली तरी ते वाईट किंवा खोट्या मार्गावर जातात कारण त्यांना असे वाटते कि असे वागले तरच आपल्या सर्व गोष्टी पूर्ण होतात आणि ते असे देखील म्हणतात कि खरे वागून किंवा प्रामाणिक पानाने वागून कधी कोणाचे भले झाले आहे का.

 essay on honesty in marathi language

essay on honesty in marathi language

प्रामाणिकपणा मराठी निबंध – Essay on Honesty in Marathi Language

Honesty Essay in Marathi

अनेक लोक असे आहेत कि जे प्रामाणिक पाने वागतात परंतु काही लोकांच्या बाबतीत असे घडते कि ते सर्वांच्या सोबत चांगले, प्रामाणिकपणे आणि कधीही कोणाशी खोट न बोलून सुध्दा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचानिनन सामोरे जावे लागते तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संकटे येतात आणि ते असा विचार करतात कि मी कोणाचीही फसवणूक करत नाही किंवा कोणाशीही खोटे बोलत नाही त्याचबरोबर सर्वांच्यासोबत प्रामाणिक पणाने वागतो परंतु माझ्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतात.

असे का होते तर असे होण्याचे कारण म्हणजे हा देवाचा संकेत असतो कारण या अडचणींच्या नंतर देवाला तुमचे खूप चांगले करायचे असते म्हणून कधीही तुम्ही चांगले वागून देखील तुमच्या जीवनामध्ये अडचणी आणि संकटे येत असतील तर खचून जावू नका तर त्याला धैर्याने सामोरे जा आणि त्यातून बाहेर येण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा.

प्रामाणिकपणा हा आपण मनामध्ये अगदी खोलवर विचार करून विकसित करता येणारा एक गुण आहे जो गुण आपल्याला आयुष्यामध्ये एक सुंदर जीवन जगण्याची कला शिकवतो तसेच प्रामाणिकपणा हा गुण आपल्यामध्ये कोणाच्या सांगण्यावरून किंवा मग कोणाच्या वागण्याकडे पाहून विकसित होत नसतो तर तो आपण स्वता आत्मसात करून त्याबद्दल विचार करून तो विकसित करायचा असतो. प्रामाणिकपणा हा असा गुण आहे ज्यामुळे प्रामाणिक पने वागणारा पुरुष कधीच कुठेच तटत नाही म्हणजेच त्याच्या कामामध्ये अनेक अडचणी  आणि संकटे येतात पण त्यांचे काम हे अनेक अडचणींचा सामना करून देखील पूर्ण होतेच.

प्रामाणिक पणाचा हा गुण आपण आपल्यालामध्ये वाढवायचा म्हटला तर हा गुण आपल्यामध्ये वाढत नाही तर हा गुण आपल्यामध्ये वाढण्यासाठी प्रमानिक्पानाचे धडे आणि विचार हे आपल्यामध्ये लहानपणी पासूनच बिंबवले पाहिजेत ज्यामुळे आपल्यामध्ये आयुष्यभर प्रामाणिक वागण्याची सवय लागते.

आपण ज्यावेळी शाळेमध्ये असतो त्यावेळी आपण सर्व गोष्टी समजून घेण्याच्या स्टेजमध्ये असतो त्यामुळे मला असे वाटते कि आपल्या सर्वांना शाळेमध्ये असताना चांगले संस्कार शिकवले पाहिजेत जसे कि खोटे बोलू नये तर नेहमी खरे बोलावे, कोणालाही फसवू नये किंवा कोणाचाही विश्वासघात करू नये, कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास देवू नये, स्वताची कामे स्वत करावीत म्हणजे स्वावलंबी व्हावे, सगळ्यांशी प्रामाणिकपणे वागावे, आई वडिलांची आयुष्यभर काळजी घ्यावी, जीवनात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये.

अशा प्रकारचे अनेक संस्कार शिकवणारे उपदेश हे शाळामध्ये असतानाच मुलांच्या मनामध्ये भरवले पाहिजेत आणि प्रामाणिकपणे वागणे देखील शाळेमध्ये असताना शिकवले जावे. मला माझ्या प्रामाणिकपानाची एक गोष्ट सांगाविशी वाटते कारण मला त्यामुळे खूप आनंद झाला होता. ज्यावेळी मी शाळेमध्ये ४ इयत्ते मध्ये शिकत असताना आमच्या शाळेच्या एका तासामध्ये शाळेची साफसफाई सुरु होती आणि आम्ही शाळेतील साफसफाई करण्यामध्ये गुंग होतो आणि सफाई करत असताना मला १०० रुपये पडलेले सापडले होते.

त्यावेळी मी प्रामाणिकपणा दाखवला आणि ते १०० रुपये मी तेथे उपस्थित असलेले आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या कडे दिले त्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळी सरांनी मला स्टेजवर बोलावले आणि सगळ्यांच्या समोर मी १०० रुपये सरांच्याकडे देऊन प्रामाणिकपणा दाखवला त्यामुळे माल कौतुक केले आणि त्यावेळी माझा आनंद गगनात मावत नव्हता.

त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी प्रामाणिक असले पाहिजे ज्यामुळे आपले जीवन सुलभ आणि सुंदर बनून जाईल. सध्या आपण पहिले तर सर्व ठिकाणी खोटे बोलले जाते किंवा समोरच्या व्यक्तीला खोटे सांगितले जाते आणि त्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये फसवणूक केली जाते. तसेच आजची परिस्थिती पहिली तर आज अनेक लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळते कि आता खोट्याचे जग आले आहे आणि खोट्यालाच या जगामध्ये किमत दिली जाते परंतु मला असे वाटते कि खोट्याचे जे जग आहे.

हे फक्त काही काळासाठी टिकणारे जग आहे आणि ते थोडेच दिवस आपल्याला चांगले दिसते आणि मग ते थोड्या दिवसाने कोसळून पडते. म्हणून जगातील प्रत्येक माणसाने प्रामाणिक पणाचा धडा घेतला पाहिजे किंवा आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे म्हणजे त्यामुळे आपले देखील चांगले होईल आणि मग त्या समोरच्या व्यक्तीची देखील फसवणूक होणार नाही.

खोटे बोलून आणि खोटे वागून सर्वकाही मिळवता येते परंतु सुख, समाधान आणि स्वभिमान हे मिळवता येत नाही परंतु जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर प्रामाणिकपणे किंवा खरे पणाने वागलो तर आपल्याकडे जे आहे त्यामध्ये देखील आपण समाधानी राहू शकतो त्याचबरोबर आपल्याला कमी गोष्टींच्या मध्ये देखील सुख आणि समाधान मिळू शकेल.

आम्ही दिलेल्या essay on honesty in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रामाणिकपणा मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Honesty Essay in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on honesty in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Honesty Is the best Policy Essay In Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!