महात्मा ज्योतिबा फुले निबंध Essay on Mahatma Phule in Marathi

Essay on Mahatma Phule in Marathi – Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi महात्मा ज्योतिबा फुले निबंध आज आपण या लेखामध्ये महात्मा फुले म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांना कोण ओळखत नाही, आपण सर्वजन यांना ओळखतो कारण हे एक समाजसुधारक आणि समाज सेवक होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक सामाजिक सेवा केल्या त्याचबरोबर त्यांनी समाजातील अनेक चुकीच्या रूढी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले तसेच अनेक वेगवेगळी सामाजिक कार्ये केली आहेत म्हणजेच त्यांनी महिलांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून तसेच महिला शिक्षणासाठी प्रयत्न केले तसेच त्यांना यामध्ये यश मिळाले तसेच त्यांनी जातीभेद आणि बालविवाह या प्रथांच्या विरुध्द ते लढले अश्या प्रकारे त्यांनी वेगवेगळी सामाजिक कार्ये केली. चला तर मग आता आपण महात्मा फुले यांच्यावर निबंध लिहूया.

essay on mahatma phule in marathi
essay on mahatma phule in marathi

महात्मा ज्योतिबा फुले निबंध – Essay on Mahatma Phule in Marathi

Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi

ज्योतिबा फुले यांचे नाव कोणाला माहित नाही आपण यांच्या बद्दल शाळेमध्ये शिकलोच आहोत. ज्योतिबा फुले हे आणखी एक लोकप्रिय समाजसुधारक आहेत आणि त्यांचे कार्य जातीविरोधी मोहिमेविषयी आहे. ज्योतिबा फुले या महान सामाजिक कार्यकर्त्याला महात्मा फुले या नावाने देखील ओळखले जाते. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्री बाई फुले यांना चांगल्या प्रकारे पाठींबा देवून स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यांनी अस्पृश्यता सारख्या सामाजिक आजारांविरुद्ध लढा दिला आणि विधवांच्या पुनर्विवाहासाठीही काम केले. त्यांनी बालहत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी अनाथाश्रम देखील स्थापन केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले असे आहे आणि महात्मा फुले यांचा जन्म हा महाराष्ट्र जिल्ह्यातील कटगुण या गावामध्ये ११ एप्रिल १८२७ मध्ये झाला. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव शेरीबा फुले आणि आईचे नाव चिमणाबाई फुले असे होते.

ज्यावेळी महात्मा फुले लहान होते त्यावेळी त्यांची आई वारली त्यामुळे ते त्यांच्या आईच्या संस्काराशिवाय मोठे झाले. महात्मा फुले यांनी आपले शालेय शिक्षण हे स्कॉटीश मिशन हायस्कूल मध्ये घेतले आणि ते शाळेमध्ये असताना हुशार म्हणजेच तल्लक बुध्दीचे होते. त्यांनी कायमच सामाज्यासाठी, गरीब लोकांच्यासाठी तसेच असहाय्य महिलांच्यासाठी अनेक प्रयत्न केले तसेच त्यांनी अनेक परंपरा आणि रूढी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले तसेच त्यांना काही मध्ये यश देखील मिळाले.

त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्यसाठी लढा दिला आणि त्यांना त्यामध्ये यश देखील मिळाले. तसेच ते अस्पृश्यता, बालविवाह आणि जातीभेत यासारख्या गोष्टींच्या देखील विरुध्द होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे लग्न वयाच्या १३ व्या वर्षी सावित्री बाई फुले यांच्यासोबत झाले. मग महात्मा ज्योतिबाफुले यांनी सावित्रीबाई यांना शिक्षण दिले आणि त्या शिक्षण घेवून शिक्षिका झाल्या. ज्यावेळ सावित्रीबाई शिक्षण घेत होत्या त्यावेळी त्यांना समाज्यातील अनेक अडचणींचा सामना करून शिक्षण घ्यावे लागले होते.

त्यांनी इ.स १८४८ मध्ये पुणे शहरामध्ये एक मुलींच्यासाठी शाळा स्थापन केली आणि मुलींना शिकवण्याची जबाबदारी हि सावित्रीबाई यांच्यावर सोपवली. मुलींना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अनेक अडचणी आणि समस्या सोडवत मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला तसेच त्यांनी मुलीन्च्यासाठीच शिक्षणाचा मार्ग मोकळा करून त्यांच्यासाठीच फक्त शाळा सुरु केली नसून त्यांनी अस्पृश्य मुलांच्यासाठी देखील शाळा सुरु केली.

त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा पुले यांनी विधवा पुनर्विवाहाला देखील पाठींबा दिला तसेच त्यांनी पुण्यामध्ये असताना त्यांच्या पत्नी आणि फुले यांनी भ्रुनहत्या प्रतिबंधक केंद्राची देखील स्थापना केली. इ.स १८७३ मध्ये त्यांनी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी आणि अनुयायांनी मिळून सत्यशोधक सामाज्याची स्थापना केली आणि एबे त्यांनी या सामाज्याची स्थापना करण्याचे मुख्य उदिष्ट होते कि समाज्यातील गरिब तसेच अस्पृश्य लोकांना न्याय मिळवून देणे तसेच समाजातील पीडितांच्यावर होणारा अन्याय या वर न्याय देणे तसेच त्यांना सत्यशोधक समाज्याच्या मार्फत समाजातील जातीभेत आणि अस्पृश्यता नष्ट करायची होती आणि सर्वांच्यासाठी एक समान समाज निर्माण करायचा होता.

त्यांनी महिलांना स्वातंत्र्य मिळावे तसेच महिलांना शिक्षन मिळावे यासाठी प्रयत्न केले आणि हि प्रेरणा त्यांना थॉमस पेन यांचे ‘ द राईट्स ऑफ मॅन हे प्रसिध्द पुस्तक वाचले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर त्या पुस्तकामधील विचारांचा खूप प्रभाव पडला आणि स्त्रीयाच्या शिक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरु केले. हे चांगले समाज सुधारक तर होतेच परंतु त्यांना लेखनाची आणि वाचनाची देखील खूप आवड होती आणि त्यांची काही पुस्तके कि खूप लोकप्रिय आहेत आणि लोक खूप आवडीने ती वाचतात.

त्यांची प्रसिध्द असणारी पुस्तके म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी आणि जर आपण हि पुस्तके वाचली तर आपल्याला समजते कि हे एक महान लेखक आणि विचारवंत देखील होते. तसेच त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना इ.स १८८८ मध्ये राव बहादूर यांच्या हस्ते महात्मा अशी पदवी बहाल करण्यात आली तसेच त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य अस्पृश्यांच्या ब्राह्मणांच्या शोषणातून मुक्तीसाठीघालवले आणि त्यामध्ये त्यांना यश देखील आले. सामाजिक कार्यकर्ते आणि सुधारक असण्यासोबतच ते व्यापारीही होते तसेच ते महापालिकेचे शेती करणारे आणि कंत्राटदारही होते. इ.स १८७३ ​​ते १८८३ दरम्यान त्यांनी पूना नगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले होते.

१८८८ मध्ये ज्योतिबांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते अर्धांगवायू झाले. आणि २८ नोव्हेंबर १८९० रोजी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन झाले म्हणजेच वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

अश्या प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या अडचणीतून आणि समस्यांच्यामधून मार्ग काढत अनेक जुन्या आणि चुकीच्या रूढी मोडीस काढल्या तसेच अस्पृश्यांच्यावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी लढा दिला, महिला शिक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढले अश्या प्रकारे अनेक सामाजिक कार्ये करून त्यांनी आपले जीवन सार्थ केले.

तसेच त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेवून समाजातील लोकांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे कामे केली तसेच सामाज्यामध्ये होणाऱ्या अन्याय विरुध्द अवाह उठवला तसेच भारतीय शिक्षणामध्ये मोठी भर टाकली आणि अश्या ह्या त्यांच्या मोलाच्या कामगिरीमुळे त्यांना आजही खूप महत्व आहे आणि त्यांचा आजही आदर केला जातो.

आम्ही दिलेल्या essay on mahatma phule in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on mahatma jyotiba phule in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!