महात्मा ज्योतिबा फुले माहिती Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सेवक आणि समाज सुधारक देखील होते. यांनी महाराष्ट्रामधील समाजामध्ये सुधारणा घडवून आणली. भारताचे हे पहिले असे समाज सुधारक आहेत ज्यांनी महिला शिक्षण ही योजना सगळ्यांसमोर आणली. महिलांनादेखील शिक्षणाचा अधिकार आहे तसेच त्यांना देखील त्यांच्या मताप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. महिलांना देखील स्वातंत्र्य मिळावं म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी नेहमीच कष्ट घेतले. बाल विवाह प्रथा बंद करून जातिभेद नष्ट करून महात्मा फुले यांनी महिलांसाठी विद्यालय स्थापन केली.

आज स्त्रियांना जे प्रशिक्षण दिलं जातं ते अमलात आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी रक्ताचं पाणी केलं होतं. स्त्रियांना शिक्षण देणे हेच त्यांचे उद्दिष्ट होतं. जे त्यांनी साकार करून दाखवलं. आजच्या ब्लॉग मध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुले या महान पुरुषाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

mahatma jyotiba phule information in marathi
mahatma jyotiba phule information in marathi

महात्मा ज्योतिबा फुले माहिती – Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

नाव (Name)महात्मा ज्योतिबा फुले
जन्म (Birthday)११ एप्रिल १८२७
जन्मस्थान (Birthplace)कटगुण येथे सातारा जिल्ह्यात
वडील (Father Name)गोविंदराव फुले
आई (Mother Name)चिमना फुले
पत्नी (Wife Name)सावित्रीबाई फुले
मृत्यू२८ नोव्हेंबर १८९०

वैयक्तिक आयुष्य :

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घराण्याच साताऱ्या वरून पुण्याला स्थलांतर झालं होतं. ११ एप्रिल १८२७ महात्मा ज्योतिराव फुले यांची जन्मतारीख होय. महात्मा ज्योतिराव फुले यांच मूळ नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असं आहे. परंतु ते महात्मा फुले, ज्योतिबा फुले, ज्योतिराव फुले या नावांनी देखील प्रसिद्ध होते.

इसवीसन १८४० मध्ये महात्मा फुले यांचं लग्न सावित्रीबाई यांच्याशी झालं. सावित्रीबाई या नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या कन्या होत्या. त्यावेळी सावित्रीबाई फक्त सात वर्षाच्या होत्या तर महात्मा फुले १३ वर्षाचे होते. सावित्रीबाई यांनी महात्मा फुले यांना त्यांच्या आयुष्यातील या खडतर प्रवासामध्ये खूप प्रोत्साहित केलं.

ह्या उच्च विचारसरणी असलेल्या दाम्पत्याने महाराष्ट्रामध्ये दलित समाजाला मिळणारी तुच्छ वागणूक तसेच स्त्री-पुरुष भेदभाव जातीभेद वर्णभेद या सगळ्या तसेच जुन्या चालीरीती मोडीत काढल्या आणि समाजामध्ये क्रांती घडवून आणली. त्यांनी त्यांचा वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून आयुष्यभर समाजात बदल घडवून आणण्यासाठी झटत राहिले.

शिक्षण 

महात्मा ज्योतिबा फुले यांचा खरा जन्म कटगुण येथे सातारा जिल्ह्यात झाला. महात्मा फुले यांचा मूळ आडनाव गोरे असं होतं परंतु पेशव्यांच्या काळामध्ये महात्मा फुले यांचे वडील आणि त्यांचे दोन चुलते फुले विकण्याचे काम करायचे त्यामुळे त्यांना फुले असं आडनाव पडलं. पुढे त्यांच्या घराण्याचं स्थलांतर पुणे येथे झालं पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे त्यांनी त्यांचं पुढचं आयुष्य काढलं.

१८३४ ते १८३८ पर्यंत महात्मा फुले यांनी पंतोजीच्या शाळेत मराठी शिक्षण घेतलं. महात्मा फुले यांचं प्राथमिक शिक्षण संपलं त्यानंतर त्यांनी पुढे भाजी विकण्याचा व्यवसाय चालू ठेवला. महात्मा फुले यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यामधील स्कॉटिश हायस्कूलमध्ये झालं. महात्मा फुले हे अतिशय हुशार होते त्यामुळे त्यांनी अवघ्या पाच वर्षांमध्ये त्यांच संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांच्या याच हुशारीने त्यांनी पुढे महिलांसाठी शिक्षण व्यवस्था देखील सुरू केली.

त्यांनी त्यांच्या पत्नीला देखील शिक्षण दिलं. महात्मा ज्योतिराव फुले यांची उच्च विचारसरणी कबीर चे दोहे वाचून तयार झाली. महात्मा ज्योतिराव फुले तसे लहानपणा पासूनच वेगळ्या विचारांचे होते त्यांचे विचार काही साधारण नव्हते. ते स्वतः सुशिक्षित होते म्हणूनच त्यांनी समाज देखील सुशिक्षित बनवण्याचा प्रयत्न केला.

राजकीय आयुष्य :

महात्मा ज्योतिराव फुले हे एक समाज सुधारक, प्रबोधक आणि मराठी लेखक होते. ज्योतिराव फुले यांच्या मते समाजातील सम विषम ही प्रस्तावना मिटवून टाकनं अत्यंत गरजेच होते. त्या काळी समाजात स्त्री-पुरुष भेदभाव केला जायचा तसेच मागासलेल्या लोकांना म्हणजेच मागासवर्गीय लोकांना तुच्छ वागणूक मिळायची.

जाती आणि धर्म यावरून देखील लोकांमध्ये वाद-विवाद व्हायचे जे खालच्या जातीचे ते वाईट असतात त्यांच्या घरचं पाणी देखील प्यायचं नाही असा समज होता. अश्या जुनाट चालीरिती मोडून टाकण्यासाठी महात्मा फुले यांनी अपार प्रयत्न केले सगळ्यात आधी तर त्यांनी स्त्री शिक्षणावर जोर दिला त्यांच्यामध्ये स्त्रियांनी शिक्षण घेणं अतिशय महत्त्वाचं होतं. स्त्रियांन सोबतच त्यांनी मागासलेल्या मुला-मुलींना देखील शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.

शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे असं त्यांचं मत होतं. मग ते कुठल्याही प्रकारचं शिक्षण असू दे. माणसाचं वागणं बोललं चांगलं असनं गरजेच आहे. आणि या सगळ्या गोष्टी शिक्षण घेतल्यावरच समजतात शिक्षण घेतल्यावरच जगण्याला खरा अर्थ येतो असं महात्मा फुले यांचे मत होतं.

महात्मा फुले यांनी त्यांच्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामधून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दशा किती वाईट आहे त्याचं वर्णन केलं आहे. महात्मा फुले यांनी समाजातील सगळ्या जातीय धर्मीय लोकांना समान वागणूक मिळावी म्हणून सत्यशोधक समाज याची स्थापना केली. जाती आणि धर्म भेद काळा-गोरा हे सगळं ईश्वरनिर्मित नसून हे सर्व मानवनिर्मित आहे.

उच नीच या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत आणि याच गोष्टींना रोखण्यासाठी महात्मा फुले आणि त्यांची पत्नी यांनी अतोनात प्रयत्न केले महात्मा फुले यांची उच्च विचार सरणी आपल्या महाराष्ट्राला लाभली होती. त्यासोबतच शाहू आणि आंबेडकर यांच्यासारखे थोर व्यक्तिमत्वांचे विचारसरणी असणारे लोक महाराष्ट्रात क्रांती घडवून आणत होते त्यामुळेच आपल्या महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हटले जाते.

महात्मा फुले यांचे हे थॉमस पेन याच मानवी अधिकार हे पुस्तक वाचुन प्रभावित झाले होते. तर त्यांच्या सोबतच शिवाजी महाराजांची विचारसरणी त्यांना प्रभावित करत होती महात्मा फुले यांना महात्मा अशी पदवी देखील मिळाली आहे. महात्मा फुले यांनी १८५१ मध्ये भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींची शाळा सुरू केली.

१८५२ मध्ये महात्मा फुले यांनी पूना लायब्ररीची स्थापना केली. १८५२ मध्येच वेताळ पेटीत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा स्थापन केली. १६ नोव्हेंबर १८५२ रोजी मेजर कँडी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकार द्वारे विश्रामबाग वाडा मध्ये महात्मा फुले यांचा सत्कार करण्यात आला. विधवा विवाहास साह्य केले.

बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवांच्या केशवपनाची विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांनी अस्पृश्यांना दुष्काळ काळात स्वतःच्या विहिरीतून पाणी दिले. शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध अहमदनगर येथे खतं फोडीचे बंड घडवून आणले. दारूची दुकाने सुरू करण्यास सरळ निषेध केला.

विल्यम हंटर शिक्षण आयोगा समोर निवेदन दिले आणि त्यामध्ये प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे आणि मोफत देण्याची मागणी केली. ११ मे १८८८ मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांना “महात्मा” ही पदवी देण्यात आली.

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य 

शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे. शिक्षण नसेल तर जीवनाला काही अर्थ नाही आहे. शिक्षणाशिवाय माणूस अपूर्ण आहे. जीवन काय असतं? ते कसं जगावं, जीवन जगताना कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या गोष्टी करू नयेत त्याशिवाय आज जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे या सगळ्या गोष्टी एक सुशिक्षित माणूसच समजू शकतो. म्हणून महात्मा फुले यांनी आधी स्वतःचे शिक्षण घेतल्यास पण समाजाला सुशिक्षित करण्याचा देखील विडा उचलला. म्हणतात ना मुलगी शिकली प्रगती झाली.

एक शिकलेली मुलगी स्त्री समाजामध्ये सुधारणा घडवून आणू शकते तसेच आपल्या कुटुंबाला देखील सुशिक्षित बनवू शकते. म्हणूनच महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण काय असतं हे समाजाला दाखवून देण्यासाठी हलचाल सुरू केली. र्पूर्वीच्या काळामध्ये म्हणजेच जवळपास एकोणिसाव्या शतकामध्ये शिक्षण हे फक्त पुरुषांसाठीच असतं तसंच प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार हा पुरुषांनाच असतो आणि स्त्रिया ह्या फक्त चूल आणि मूल इतक्याच गोष्टींसाठी असतात असा समज होता.

त्यावेळी स्त्रियांसाठी शाळा सुरू नव्हत्या त्यामुळे महात्मा फुले यांना समाजातील हा भेदभाव काढून टाकायचा होता. त्यांना समाजामध्ये प्रगती घडवून आणायची होती. महात्मा फुले यांचे प्रमुख उद्दिष्ट महिलांना शिक्षण देणं, बालविवाहाची प्रथा थांबवणं जातिभेद आणि वर्णभेद थांबवण महत्त्वाचं समजलं. त्यासाठी महात्मा फुले यांनी तसेच कार्य देखील करायला सुरुवात केली त्यांनी महिलांसाठी शैक्षणिक शाळा सुरू केल्या.

महात्मा फुले यांनी स्वतः वयाच्या एकविसाव्या वर्षी समाजाच्या बुरसटलेल्या विचारांना मोडीत काढून महिलांसाठीची भारत देशातील पहिली शाळा पुणे येथे स्थापन केली. परंतु समाजातील लोकांचा महात्मा फुले यांच्या अशा वागण्यास थेट नकार होता त्यामुळे महात्मा फुले यांच्या महिलांच्या शाळेत कोणच मुलींना शिकवण्यासाठी शिक्षक बनून यायला तयार नव्हतं.

तेव्हा महात्मा फुले यांनी स्वतः धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि त्यांना शिक्षिका बनवलं. त्यावेळी सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला अध्यापिका आणि शिक्षिका होत्या. महात्मा फुले यांना या शाळा स्थापन करण्यासाठी अनेक संकटांना तोंड द्यावं लागलंऋ लोकांनी महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचा खूप छळ केला इतकेच नव्हे तर त्यांच्या चेहर्‍यावर शेण फेकलं गेलं, तरीही महात्मा फुले थांबले नाही त्यांनी महिलांसाठी ची पहिली शाळा १९४८ मध्ये स्थापन केली त्यानंतर पुढे त्यांनी सहा शाळा स्थापन केल्या.

ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना – Mahatma Jyotiba Phule Yojana information in Marathi 

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही योजना गरीब लोकांसाठी काढण्यात आली आहे. या योजनेमध्ये गरीब लोक किंवा दुर्बल लोक महागड्या शस्त्रक्रिया किंवा थेरपी किंवा दवाखान्यात होणारे अनावश्यक खर्च भरू शकत नाहीत त्यांच्यासाठी काढण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र मध्ये अमलात आणली गेली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे. या योजनेमध्ये एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देखील मिळू शकते. या योजनेच्या अर्जासाठी अर्जदाराकडे कुठल्याही रंगाचे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे गरजेचे आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे असे अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

ही योजना खास करून अशा लोकांसाठी बनवली आहे ज्या लोकांना महागडे आरोग्य उपचार परवडत नाही. तसेच जे शेतकरी नैसर्गिक आपत्तींचा सामना करतात ते देखील या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. या योजनेमध्ये अर्जदाराची आरोग्य तपासणी केली जाते एकदा का त्याच्या रोगाची खात्री पटली की त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेऊन पुढे खर्चाचा तपशील काढला जातो आणि तो तपशील आरोग्य मित्रांना दिला जातो ही प्रक्रिया चोवीस तासांमध्ये होते.

त्या प्रक्रियेनंतर रुग्णावर उपचार सुरू होतात परंतु रुग्णावर उपचारा दरम्यान कुठल्याही प्रकारचा खर्च लादला जात नाही. या योजनेअंतर्गत आरोग्य सेवांचा लाभ अगदी मोफत मध्ये घेता येतो. इतकच नव्हे तर या योजनेमध्ये अर्जदाराला दीड लाखाच दरवर्षी विमा संरक्षण देखील मिळतं. ही योजना खरंतर शस्त्रक्रियेचा खर्च ज्यांना झेपत नाही त्यांच्यासाठी काढण्यात आली आहे.

त्यामुळे अशा काही शस्त्रक्रिया आहेत ज्याच्या खर्च मोफत व्हावा म्हणून लोक या योजनेसाठी अर्ज करतात. त्यातीलच काही शस्त्रक्रिया म्हणजे सर्वसाधारण शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा यांच्या शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, स्त्रीरोग शस्त्रक्रिया,

पोट व जठर शस्त्रक्रिया, बालरोग शस्त्रक्रिया, प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया, कर्करोग, संसर्गजन्य रोग, हृदयरोग अशा अजून अनेक रोगांचा आणि शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

 जोतीराव गोविंदराव फुले पुस्तके 

महात्मा फुले हे स्वतः एक मराठी लेखक होते त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारचे साहित्य लेखन केलं त्यामधील काही साहित्य लेखन म्हणजे तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी १८५५ मध्ये लिहिले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत पोवाडा देखील लिहिला. ब्राम्हणांचे कसब हे पुस्तक १८६९ मध्ये लिहलं. गुलामगिरी हे पुस्तक १८७३ मध्ये लिहिलं.

१८३३ मध्ये शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक लिहिलं. सत्सार अंक १ आणि सत्सार अंक २ ही दोन पुस्तके १८८५ मध्ये लिहली. इशारा हे पुस्तक देखील महात्मा फुले यांनी १८८५ मध्येच लिहिलं. सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी हे पुस्तक महात्मा फुले यांनी इसवीसन १८८७ मध्ये लिहिलं.

मृत्यू:

महात्मा फुले यांचे निधन २८ नोव्हेंबर १८९० मध्ये पुणे येथे झालं.

आम्ही दिलेल्या mahatma jyotiba phule information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about mahatma jyotiba phule in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mahatma phule information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mahatma jyotiba phule in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनराठी.नेट

2 thoughts on “महात्मा ज्योतिबा फुले माहिती Mahatma Jyotiba Phule Information in Marathi”

  1. महात्मा फुले यांचे नाव जोतीराव गोविंदराव फुले असे आहे फुले ज्योतीराव असे नव्हे आपण त्यांची स्वाक्षरी पहावी ही विनंती

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!