वाढते प्रदूषण निबंध मराठी Essay On Pollution In Marathi

Essay On Pollution In Marathi – Vehicle Pollution Essay in Marathi वाढते प्रदूषण निबंध मराठी वाहन प्रदूषण निबंध आज आपण या लेखामध्ये वाहन प्रदूषण या विषयावर निबंध लिहिणार आहोत. सध्याच्या आधुनिक काळामध्ये वाहनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आपण जिकडे पाहू तिकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारची वाहने पाहायला मिळतात. आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो कि वाहन प्रदूषण म्हणजे काय, पण वाहन प्रदूषण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वाहनांच्या मधून येणाऱ्या प्रदूषित धुरामुळे पर्यावरणातील वातावरण बिघडते किंवा हवा अशुध्द होते किंवा मग वायू प्रदूषण होते आणि त्यालाच वाहन प्रदूषण (vehicle pollution) म्हणतात.

कोणत्याही प्रकारची वाहने जसे कि दुचाकी, चारचाकी, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असतात आणि त्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ये जा करण्यासाठी, मालाची वाहतूक करण्यासाठी तसेच इतर कामांच्यासाठी उपयुक्त असल्या तरी हि वाहने आपल्यासाठी तितकीच घटक देखील असतात.

Essay On Pollution In Marathi
Essay On Pollution In Marathi

वाढते प्रदूषण निबंध मराठी – Essay On Pollution In Marathi

Pollution Essay in Marathi

सध्या जगामध्ये तसेच भारतामध्ये देखील वाहनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि वाहनाशिवाय मनुष्याला जगणे मुश्कील झाले आहे आणि जगातील प्रत्येक मनुष्याला वाहन वापरल्याशिवाय कोणतेच काम करता येत नाही म्हणजेच मनुष्याला वाहची खूप सवय लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या वापरामध्ये झपाट्याने वाढ होत गेली आणि वापरात असणाऱ्या वाहनांची संख्या हि २०२० मध्ये १.४ अब्ज इतकी झाली आणि सध्या त्यापेक्षा अधिक झाली असावी.

अश्या प्रकारे दिवसेंदिवस वाहनांचा वापर हा वाढतच चालला आहे. वाहनांच्या अधिक वापरामुळे वायू प्रदूषण म्हणजेच हवा प्रदूषण तर होताच आहे परंतु वाहनाच्या अति वापरामुळे नैसर्गिक इंधन देखील खूप संपत आहे म्हणजेच वाहने चालण्यासाठी त्यामध्ये पेट्रोल, डीझेल घालावे लागते आणि हे दोन्हीहि नैसर्गिक इंधन आहे.

वाहनांच्या मधून बाहेर पडणारा धूर हा हवे मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकते आणि त्यामुळे हवेचे प्रधुषण होते म्हणजेच हवेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात असतो आणि याचा परिणाम मनुष्याच्या शरीरावर होऊ शकतो म्हणजे प्रत्येक मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन महत्वाचा असतो म्हणजेच आणि हा ऑक्सिजन आपल्याला शुध्द हवेपासून मिळत असतो.

आणि आपण हवेतील ऑक्सिजन घेवून कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतो पण सध्या वाहनांच्या मुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे वातावरणातील सर्व हवा अशुध्द झाली आहे आणि लोकांना अनेक तब्येतीच्या तक्रारीला सामोरे जावे लागत आहे. वाहने हि वायू प्रदूषणाची मुख्य स्त्रोत्र आहेत आणि वाहनांच्या मुळे वायू प्रदूषण हे कोणकोणत्या कारणामुळे होत असे तर ते वाहनांच्या अपुऱ्या देखभाली मुळे, वाहनांच्या मध्ये असणारे जुने ऑटोमेटीव्ह तंत्रज्ञान, जुनी वाहने, २ स्ट्रोक इंजिन, खराब रस्ता या वाहनांच्या कारणांच्या मुळे वायू प्रदूषण होते.

तसेच वाहनांच्या मधून बाहेर पडणारा कार्बन मोनोऑक्साईड हा देखील एक प्रदूषणाचा स्त्रोत्र आहे ज्यामुळे रंगहीन आणि गंधहीन वायू निर्माण होतो. तसेच कार्बन मोनोऑक्साईड हा आपल्या शावासाद्वारे आपल्या शरीरामध्ये गेला तर आपल्याला हृदयाला, मेंदूला आणि शरीराच्या काही इतर अवयवांना ऑक्सिजनची वाहतूक रोखली जाते. त्याचबरोबर कार ट्रक, गॅस पंप आणि इतर संबंधित स्त्रोतांमधून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जित होतो.

सल्फर डायऑक्साइड हे वातावरणात सोडले जाणारे आणखी एक प्रमुख प्रदूषक आहे. वाहनांच्या मुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते आणि याचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर तसेच निसर्गावर देखील होतो. सध्या आपण सामोरे जात असलेला एक प्रदूषणाचा परिणाम म्हणजे ग्लोबल वर्मिग. या यामुळे मनुष्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे म्हणजेच वातावरणामध्ये अचानक बदल घडून आलेले दिसतात, तसेच एकाद्या वर्षी खूप जास्त पाऊस पडतो किंवा एकाद्या वर्षी काहीच पाऊस पडत नाही, भूकंप, वादळ, सुनामी यासारख्या अनेक नैसर्गिक समस्यांना मनुष्याला सामोरे जावे लागते आहे.

Vehicle Pollution Essay in Marathi

वाहनांच्या प्रदूषणामध्ये मोटार वाहने किंवा कोणत्याही ऑटोमोबाईलद्वारे पर्यावरणामध्ये हानिकारक धूर आणि इतर सामग्रीचा समावेश होतो. प्रदूषक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पदार्थांचे मानवी आरोग्यावर आणि सामान्य परिसंस्थेवर अनेक वाईट परिणाम होतात. शहरी भागामध्ये वाहनांच्यामुळे होणारे वायू प्रदूषण हे जास्त प्रमाणात आहे कारण ग्रामीण भागामध्ये वाहने वापराचे प्रमाण हे खूप कमी असते आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये वायू प्रदूषण हे खूप कमी असते.

मोठ्या महानगरांमधील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचे मुख्य कारण उद्योगांव्यतिरिक्त वाहनाद्वारे होणारे प्रदूषण आहे. अधिक लोक लहान शहरांमधून मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत असल्याने, वाहनांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होत आहे. मोठ्या शहरांमध्ये विविध आजार वाहनांच्या प्रदूषणामुळे होत आहेत.

आपण जरी वायू प्रदूषण पूर्णपणे नष्ट करू शकत नसलो तरी आपण त्याचे प्रमाण कमी करू शकतो. म्हणजेच गाड्यांचा वापर हा गरजेनुसार केला पाहिजे तसेच आपण जास्त प्रमाणात झाडे लावली पाहिजेत कारण झाड हे माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देते आणि गाड्यांच्या मधून येणारा कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते त्यामुळे वातावरण शुद्ध राहते.

पण आपल्याला जर शुद्ध वातावण हवे असेल तर झाडे लावणे गरजेचे आहे कारण ते दुषित वायू शोषून घेवून त्याचे रुपांतर ऑक्सिजन मध्ये करतात आणि आपल्याला शुद्ध हवा देतात म्हणूनच आपल्या आजूबाजूला झाडांची हिरवळ असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागामध्ये झाडे जास्त असल्यामुळे तेथील हवा शुध्द असते. सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

म्हणजेच बसेसची संख्या वाढवली आहे, विविध शहरांमध्ये मेट्रो, पायाभूत सुविधांचा विकास, रस्त्यांच्या जाळ्यात सुधारणा. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनाचा प्रचार करणे तसेच इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्यांच्या जास्त वापर करणे. मोठ्या शहरातून जुनी किंवा जास्त प्रदूषित वाहने बाहेर काढणे त्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी होयील. अश्या प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण वाहनांच्या मुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

अश्या प्रकारे आपण वाहनांच्यामुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्याचा सर्व बाजूनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे आपल्यावर येणाऱ्या नैसर्गिक संकटांचा म्हणजेच भूकंप, सुनामी, पर्यावरनामध्ये होणारे बदल या सारख्या सर्व गोष्टींचा धोका कमी केला पाहिजे. अश्या प्रकारे आपण आपला निसर्ग जपला पाहिजे आणि आपले चांगले आयुष्य घडवले पाहिजे.

आम्ही दिलेल्या vehicle pollution essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वाढते प्रदूषण निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay On Pollution In Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vehicle pollution essay in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!