Essay on Bhukamp in Marathi – Essay On Earthquake in Marathi भूकंप निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये भूकंप या विषयावर निबंध लिहिणार आहोत. मानवाला अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते आणि निसर्गाचे शोषण देखील मानवामुळेच झाले आहे. मानवाने सर्व ठिकाणी प्रदूषण करून ठेवले आहे जसे की हवा प्रदूषण, माती प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि प्लॅस्टिक प्रदूषण आणि यासारख्या वातावरणातील अनेक घटकांचे प्रदूषण केले आहे आणि याचाच परिणाम हा निसर्गावर होत आणि आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते आणि त्यामधील एक भयंकर आपत्ती ज्याच्या समोर मानवाचे काहीच चालत नाही ते म्हणजे भूकंप ( earthquake ).
भूकंप ( earthquake ) हा एक नैसर्गिक आपत्तीचा प्रकार आहे ज्यापुढे कोणताही माणूस काहीच करू शकत नाही. त्याला आपल्याला सामोरे जावेच लागते आणि भूकंप झाल्यामुळे आपल्या घरांचे किंवा इतर संपत्तीचे नुकसान होते तसेच निसर्गाचे देखील नुकसान होते तसेच भूकंप झाला की वातावरणामध्ये देखील मोठा बदल होतो. चला तर आता आपण भूकंप म्हणजे काय, भूकंप कश्यामुळे होतो आणि भूकंप झाल्यानतर काय परिणाम होतात या बद्दल खाली माहिती घेवूयात.
भूकंप निबंध मराठी – Essay on Bhukamp in Marathi
Essay On Earthquake in Marathi
आपण निबंधाच्या सुरुवातीस भूकंप म्हणजे काय हे समजून घेवूया म्हणजे तुम्हाला पुढे दिलेली सर्व माहिती चांगल्या प्रकारे समजू शकेल. जेव्हा पृथ्वीच्या भूभागातील हालचालिंमुळे उर्जेचे उत्सर्जन होवून पृथ्वीच्या भूभागात भुकंप लहरी निर्माण होतात आणि या भुकंप लहरींमुळे जमिनीच्या आतमध्ये हालचाली चालू होतात जसे कि भूकवच अचानक काही वेळ हादरने, जमिनीचे कंपन होणे, जमीन हलणे किवा थरथरणे, जमिनीला भेगा पडणे याला भुकंप म्हणतात.
भुकंप हि एक अशी आपत्ती आहे कि ज्यापुढे कोणाचेच काही चालत नाही म्हणजेच आपण भूकंप कोणत्याही प्रकारे थांबवू शकत नाही तर त्याला मानवाला सामोरे जावे लागते आणि भुकंप कुठल्याही ठिकाणी आपल्या न कळत होऊ शकतो म्हणजेच आपल्याला भूकंप होणार आहे याची कल्पना नसते कारण तो अचानक येतो आणि भूकंप चालू झाला कि घरातील वस्तू हलतात तसेच खालची जमीन हलायला लागते.
आपण विज्ञान मध्ये शिकलोच आहोत कि आपल्या पृथ्वीवरील जमिनीच्या खाली वेगवेगळे थर आहेत आणि जर या थरांमध्ये काही बिघाड झाला तर भुकंप होतो. आपल्याला भुकंपाबद्दल बर्याचश्या बातम्या ऐकायला मिळतात. अलीकडेच नेपाळमध्ये झालेला भीषण भूकंप ज्यामध्ये बरेच लोक गेले होते त्याचबरोबर पाकिस्तानलाही काही भूकंपाचे धक्के बसले आहेत. आधुनिक काळामध्ये विज्ञानामध्ये शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले तसेच अनेक समस्यांच्यावर उपाय शोधून कडले तसेच श्स्त्रज्ञांनी भूकंपाचे मापन करण्यासाठी देखील एक उपकरण शोधून काढले आणि यामुळे भूकंपाचे मापन करणे सोपे झाले.
शास्त्रज्ञ भूकंपाच्या लाटा मोजू शकतात आणि या लाटा मोजण्यासाठी एक उपकरण वापरले जाते त्याला सिस्मोमीटर म्हणतात. भूकंपाचा मापक इन्स्ट्रुमेंटच्या खाली भूकंपाच्या लाटा शोधतो आणि त्यांना झिग-झॅगची मालिका म्हणून रेकॉर्ड करतो. भूकंपाचे भूमीचे भूगर्भातील वेळ, ठिकाण आणि तीव्रता भूकंपाच्या नोंदीने नोंदवलेल्या माहितीवरून वैज्ञानिक ठरवू शकतात. हा रेकॉर्ड भूकंपाच्या लाटांनी प्रवास केलेल्या खडकांविषयी देखील माहिती प्रदान करते. तसेच भूकंपाच्या घटना एकतर धक्क्याच्या तीव्रतेनुसार मोजली जातात. तीव्रता भूकंपाच्या वेळी सोडल्या गेलेल्या उर्जाशी संबंधित असते. याचे परिमाण ० ते १० मध्ये परिपूर्ण संख्येने व्यक्त केली जाते.
अनेकजण असे म्हणतात कि भूकंप हा देवाचा क्रोध आहे जो देव माणसावर काढतो. भूकंप हा जपानीमध्ये कंपने होवून होतो जसे कि जमिनीचा थरथर, जमीन हादरने, किंवा जमिनीला भेगा पडून भूकंप होतो आणि यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होते आणि या नुकसानामध्ये समाविष्ट असणाऱ्या गोष्टी म्हणजे घरे, शाळा, मंदिरे, सार्वजनिक, राजकीय इमारती, वेगवेगळ्या प्रकारची कार्यालये, शैक्षणिक कार्यालये, रस्ते, छोटे – मोठे पूल, रेल्वे, रेल्वे ट्रॅक, वीज, बंधारे या सारख्या गोष्टींचे नुकसान होते आणि परिणामी मानवाचे अनेक प्रकारे नुकसान होते.
भूकंप एक नैसर्गिक धोका आहे, जर मोठ्या प्रमाणावर हादरा बसला तर लोकांच्या जीवनाचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. पुढे भूकंपाचे तत्काळ घातक परिणाम दिलेले आहेत ते म्हणजे जमीन थरथरणे किवा हलणे, चिखल, आग, जमिनीचे विस्थापन, बर्फलोट, धारण आणि नद्यांना येणारे पूर, संरचनात्मक संकुच, सुनामी हे सारख्या गोष्टी भूकंप झाल्यामुळे होऊ शकतात.
पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली वेगवेगळे लहर ( waves ) निर्माण होतात आणि लहरी निर्माण झाल्यामुळेच भुकंप होतात. लहरींचा परिणाम पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर दिसून येतो. त्याच प्रकारे, लहरींची तीव्रता आगामी भूकंपाचा परिणाम दर्शवितो. भूकंप लहरींचे ती प्रकार आहेत आणि ते म्हणजे प्राथमिक लहर, दुय्यम लहर आणि पृष्ठभाग लहर. प्राथमिक लहर हि कोणत्याही भूकंपाची सुरवात असते आणि या प्रकारच्या लहरींमुळे कोणतेही नुकसान होत नाही.
हे पृथ्वीवर सामान्यत: शून्य ते तीन पर्यंत अणुभट्टीचे कंपन तयार करतात. तसेच दुय्यम लहर हा भूकंपाचा दुसरा टप्पा आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती बुद्धीने काम केल्यास या भुकंप लहरी नियंत्रित करता येतात. हि लहर चार ते सात अणुभट्टीचे कंपन तयार करू शकतात ज्यामध्ये वाहन, घर, फर्निचर आणि इतर तत्सम आणि भिंतींमध्ये क्रॅक पडू शकतात किवा एकाच प्रकारचे थरथरणे सुरू होते तसेच या लहरीमुळे घरांच्या खिडक्या हलू लागतात. पण पृष्ठभाग लहर हि भूकंपातील सर्वात धोकादायक लहर ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होते त्याचबरोबर जीवित हानी सुध्दा होऊ शकते.
बर्याच वेळा या लहरींचे रूप इतके भयानक असते की आजूबाजूला फक्त नाश दिसतो. या लहरी पृथ्वीवर सातपेक्षा जास्त अणुभट्टीचे कंपन तयार करू शकतात तसेच या लहरी आठ ते दहा अणुभट्ट्यांपर्यंतच्या कंपना पर्यंत पोहोचते. ज्यामध्ये मोठ्या इमारती आणि पूल पडतात, पूर, अगदी त्सुनामी देखील येवू शकते अश्या प्रकारे आपल्या भूकंपाला सामोरे जावे लागते.
भूकंपाचे दोन प्रकारे वर्गीकरण केले आहे ते म्हणजे नैसर्गिक भूकंप आणि कृत्रिम भूकंप. जरी भूकंप रोखणे आपल्या हातामध्ये नसले तरी त्यापासून होणारे अधिक नुकसान आपण रोखू शकतो. जर आपण भूकंपाच्या वेळी घरातील गॅस सिलेंडर आणि विजेचा मुख्य स्विच काढला तर बचाव होऊ शकतो. जर जमीन हादरत असेल आणि तुमच्या घरातील वस्तू हलत असतील तर घर, ऑफिस किंवा बंद इमारतीमधून बाहेर येवून मोकळ्या मैदानात उभे राहा तसेच कोणत्याही खोल जागेजवळ, समुद्र, तलाव, नदी, विहीर आणि जुन्या घराच्या जवळ उभे राहू नका. यासारख्या गोष्टी केल्या तर आपला बचाव होऊ शकतो
आम्ही दिलेल्या Essay on Bhukamp in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भूकंप निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay On Earthquake in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट