वायू प्रदूषण मराठी निबंध Air Pollution Essay in Marathi

Air Pollution Essay in Marathi – Essay On Air Pollution in Marathi वायू प्रदूषण मराठी निबंध आजच्या युगामध्ये औद्योगिकीकरणाचे, कारखान्यांचे तसेच, वाहनांचे प्रमाण इतके वाढले आहे की यांच्यामुळे निर्माण होणारे वायुप्रदूषण हे त्याच्या संबंधित कारणीभूत घटकांच्या दुप्पट पटीने वाढत आहे. मित्रहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वायुप्रदूषण म्हणजे काय? आणि वायुप्रदूषण झालं आहे हे कसं ओळखायचं? तर मित्रांनो, आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले घटक जसे की मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती तसेच, जीवजंतू इत्यादींच्या आरोग्याला हानिकारक असलेले वायु जेंव्हा मोठ्या प्रमाणावर हवेमध्ये मिसळून, या सर्व घटकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करायला लागतात, तेंव्हा खऱ्या अर्थाने वायुप्रदूषण झाले आहे.

असे आपणा सर्वांना म्हणता येते. मित्रहो, जेंव्हा विज्ञानात प्रगती झाली नव्हती तेंव्हा पूर्वीच्या काळी केवळ मनुष्याच्या आरोग्याला हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायुप्रदूषण होण्यास जबाबदार आहेत, असे समजले जात असायचे.

कारण, त्याकाळी हवा प्रदुषणाचे प्रमाण आजच्यापेक्षा कितीतरी पटींनी कमी होते, परंतू, ज्याप्रमाणे वायुप्रदुषणाचे प्रमाण वाढत गेले, त्याप्रमाणे कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या केवळ मनुष्याला लागू न होता, प्राण्यांना, पक्ष्यांना आणि कित्येक वनस्पतींना देखील लागू होत गेली. शिवाय, या संदर्भात कित्येक पुरावे देखील समोर आले.

air pollution essay in marathi
air pollution essay in marathi

वायू प्रदूषण मराठी निबंध – Air Pollution Essay in Marathi

Essay On Air Pollution in Marathi

याखेरीज, सध्याच्या युगात सततपणे होणाऱ्या हवामानाच्या बदलास जबाबदार असणारे अनेक घटकचं आजच्या वाढत्या वायुप्रदूषणाला देखील कारणीभूत असल्याचे सिध्द झाले आहे. जेंव्हा वायू, कण आणि अनेक जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांचा हानीकारक स्वरूपात अथवा भरपूर प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला जातो.

तेंव्हा वायुप्रदूषण ही समस्या उद्भवते. शिवाय, अशा प्रकारच्या हवा प्रदूषणामुळे मनुष्याला विविध प्रकारचे रोग, अलर्जी शिवाय, कित्येक वेळा मृत्यू यांसारख्या परिणामांना सामोरे जावे लागते.

त्याचबरोबर, इतर सजीवांना देखील जसे की प्राणी, पक्षी, शेतातील अन्न पिके, विविध फुलांच्या वनस्पती यांनाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकते. एकंदरीत, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटकांना भरपूर  प्रमाणात नुकसान पोहोचवू शकते. खरंतर, मानवी क्रिया तसेच, नैसर्गिक प्रक्रिया या दोन्ही क्रिया भरपूर प्रमाणावर वायूप्रदूषण निर्माण करू शकतात.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे, अलीकडच्या काळात केवळ मानवनिर्मित वातावरणातील हवा प्रदूषणामुळे जवळजवळ २.१ दशलक्ष ते ४.२१ दशलक्ष इतक्या लोकांचा अकाली मृत्यू झाला आहे. अशा या वायूप्रदुषणास कारणीभूत अथवा जबाबदार ठरणाऱ्या प्रदूषित घटकांना प्रदूषके असे म्हणतात.

तसेच, नैसर्गिक हवेतील जे पदार्थ मनुष्य, प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक अथवा उपयुक्त जंतू इत्यादी. जीवांच्या आरोग्यास आणि त्यांच्या जीवनास खूप हानिकारक आहेत, त्याचबरोबर जे पदार्थ हवामान बदलास देखील कारणीभूत आहेत, त्या पदार्थांना  प्रदूषक घटक असे म्हटले जाते.

याखेरीज, मित्रहो आपण जर वायुप्रदुषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम सखोलरित्या पहायला गेलो, तर आपल्या लक्षात येईल की वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा आपल्या श्वसनसंस्थेवर होतात. वरील माहितीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अनेक प्रकारचे प्रदूषक घटकं आपल्या श्वसनव्यस्थेवर जोरदार हल्ला चढवतात.

शिवाय, ओझोन अथवा नायट्रोजन डायॉक्साईड यांसारखे वायु आपल्या फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. यांतील, ओझोन हा वायू आपल्या  फुफ्फुसांमधील पेशींना पूर्णपणे नष्ट करून, आपली फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे मनुष्याचा दमा अथवा अस्थमा वाढीस लागतो.

दुसरीकडे, नायट्रोजन ऑक्साईड हा घातक वायू आपल्या श्वसन नलिकेतून फुफ्फुसांत जातो, ज्यामुळे आपली फुफ्फुसे व श्वसन नलिका, असे दोघेही हा वायु आपल्या शरीरात पूर्णपणे विरघळवण्यासाठी जास्तीत जास्त कफाची निर्मिती करतात आणि याचा परिणाम म्हणजे आपणा सर्वांना काहीवेळा दीर्घकालीन सर्दी होते.

शिवाय, अशा प्रकारची अनेक दिवसांची सर्दी जुनी झाल्यास, त्यांतील जीवाणूंचा आपल्याला परत संसर्ग होतो आणि आपली परिस्थिती अजुन गंभीर बनते. त्याचबरोबर मित्रहो, कार्बन मोनॉक्साईड हा वायू आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या हिमोग्लोबिन या घटकामध्ये ऑक्सिजन या वायुऐवजी स्वतः मिसळून जातो आणि आपल्या शरीरातील सर्व भागांत पोहोचतो.

खरंतर, हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने हा वायु आपल्या शरीरात राहिल्यास किंवा जास्त संपर्कात आल्यास आपला मृत्यूही ओढवू शकतो. परंतू, वायुप्रदुषणाचे असे विपरित परिणाम किंवा दुष्परिणाम केवळ मनुष्यावरचं नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर देखील होतात. याखेरीज, सल्फर डायॉक्साईड आणि नायट्रोजन डायॉक्साईडमुळे आम्लधर्मी पावसाची निर्मिती होते, ज्यामुळे निर्माण होणारे विपरीत परिणाम परत मातीतील जीवजंतुवर तसेच पिकांवर होतो.

मित्रहो, याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या वेळी जर शेतामध्ये आम्लधर्मी पाऊस पडला तर त्यामुळे, शेतातील गहू, ज्वारी यांसारख्या पिकांवर रोग पडतो ज्यामुळे, ही पीक खाण्यायोग्य न राहता, पूर्णपणे खराब होतात. खरंतर, अशी अनेक निदर्शने आपल्या शास्त्रज्ञांच्या समोर आली आहेत.

याखेरीज, सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे वायुप्रदूषण कमी जास्त होण्यामध्ये आपल्या हवामानाच्या बदलाचा मोठा वाटा असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमान शिवाय, वातावरणातील वरच्या भागातील तापमान इत्यादी प्रकारचे हवामान प्रदूषण पसरवण्यात अथवा  एकवटण्यात महत्त्वाची कामगिरी बजावत असते.

तसेच, वार्‍याचा वेग आणि दिशा हे घटक या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे कार्य करतात. उदाहरणार्थ; मुंबई  शहरामध्ये प्रदूषक घटकांची निर्मिती जास्त असूनही, प्रदूषणाची पातळी मात्र पुणे शहरापेक्षा बरीच कमी असते.

कारण, मुंबईतील हवा प्रदूषण हे तेथील समुद्रावरील वार्‍यांमुळे बऱ्याच प्रमाणात वाहून जाते तर दुसरीकडे मात्र पुणे शहराच्या सभोवतालच्या उंच टेकड्यांमुळे प्रदूषित हवा वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, पुणे शहरात हवा प्रदूषणाची पातळी मुंबईपेक्षा जास्त असल्याचे आढळून येते.

तसेच, आपल्या देशामध्ये अनेक प्रदेश असे आहेत की जिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसतानाही, वार्‍याबरोबर मात्र दुसर्‍या ठिकाणांहून हवा प्रदूषके वाहून आणली जातात. ज्यामुळे, मुख्य हवामान प्रदूषणाच्या स्रोताचे ठिकाण हे प्रदूषणमुक्त राहून सभोवतालचा परिसर मात्र पूर्णपणे हवा प्रदूषणमय होऊन जातो.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गावाजवळील साखर कारखान्यांच्या आजूबाजूचा परिसर. मित्रहो, आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने अतिसूक्ष्म आकाराच्या धूलिकणांच्या प्रमाणात भरपूर प्रमाणात वाढ झाली आहे.

शिवाय, शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार अनेक शहरांमध्ये साधारणतः १० मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांमध्ये, २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांचे प्रमाण हे ७ टक्क्यांपेक्षाही जास्त आढळून येते. खरंतर, हेच प्रमाण गेल्या दोन-तीन दशकांपूर्वी अगदी ५ टक्यांपेक्षाही खूप कमी होते.

शिवाय, आजच्या काळात आपल्या भारतातील जवळजवळ सगळीच मोठमोठी शहरे हवा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. खासकरून, यांमध्ये पुणे, दिल्ली, कानपूर आणि कर्नाटकातील बेंगलोर ही शहरे संपूर्ण जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणली जातात. तसं पाहायला गेलं तर सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांची मर्यादा आपल्या आरोग्यासाठी केवळ काही तासांसाठी ५० पीपीएम इतकी आहे.

परंतू, वर नमूद केलेल्या शहरांमध्ये मात्र हीच मर्यादा वर्षातील एकूण ३६५ दिवस ५० पीपीएमपेक्षा देखील कितीतरी पटीने अधिक आढळून येते. शेवटी मित्रहो, या वाढत्या हवा प्रदूषणाच्या समस्येकडे आपण सर्वांनी गंभीरतेने लक्ष दिले पाहिजेत आणि त्यासाठी लवकरात लवकर कोणत्या  उपाययोजना करता येतील? याचा विचार देखील केला पाहिजे. तरच, वायुप्रदुषणाच्या विषारी विळख्यातून आपल्या सर्वांची सुटका होईल.

                     तेजल तानाजी पाटील

                        बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या air pollution essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वायू प्रदूषण मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या air pollution in marathi essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Essay On Air Pollution in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vayu pradushan marathi nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!