ट्युलिप फुलावर निबंध Essay on Tulip Flower in Marathi

Essay on Tulip Flower in Marathi ट्युलिप फुलावर निबंध आज आपण या लेखामध्ये ट्युलिप या फुलावर (essay on tulip flower) निबंध लिहिणार आहोत. जगामध्ये पाहायला गेले तर अनेक प्रकारची वेगवेगळी फुले पाहायला मिळतात तसेच ती वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळे सुंगध असणारी फुले असतात आणि त्यामधील काही फुले हि पाहिल्यावर मन अगदी बहरून जाते तसेच मनाला अगदी आनंद मिळतो तशीच ट्युलिप ची देखील फुले असतात जी पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते आणि जर आपण ट्युलिप या फुलाची शेती केलेली पहिले तर तो आनंद आणि वेगळाच असतो कारण ते दृष्यच खूप सुंदर आणि आनंददायी असते.

ट्युलिपची बाग हि खूप सुंदर असते आणि तेथे वेगवेगळ्या रंगाची फुले हि ठराविक भागामध्ये असतात त्यामुळे ते दृष्य डोळ्यांना छान दिसते. ट्युलिप हे फुल जरी विदेशी असले तरी हे फुल भारतामध्ये देखील पिकवले जाते आणि हे भारतामध्ये मुख्यता काश्मीर मध्ये पिकवले जाते कारण या फुलान्च्यासाठी एकदम थंड हवामान लागते आणि ते थंड हवामानामध्ये चांगले येवू शकतात.

ट्युलिप ह्या फुलाचे नाव टोलीबन या इराणी शब्दापासून आले आहे आणि टोलीबन या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये पगडी असा होतो आणि पगडी म्हणजे काय हे सर्वांना माहित असेलच आणि जर माहित नसेल तर पगडी म्ह्जेच लांब कापडाने डोक्यावर टोपीसारखी रचना करणे आणि पगडी हि आपल्या देशामध्ये अनेक लोक बांधतात जसे कि ब्राह्मणी पगडी किंवा शीख पगडी.

टोलीबन या इराणी शब्दच अर्थ पगडी असा होतो कारण ट्युलिप हे फुल जर उलटे केले तर ते पगडी सारखे दिसते. ट्युलिप या फुलाला जगामध्ये लोकप्रियता मिळालेली आहे म्हणजेच या फुलालाल मागणी जगभरामध्ये आहे आणि या फुलांची शेती हि एशिया, अफगाणिस्तान, इराणी, टर्की, चीन, कुमाऊ आणि भारतामधील काश्मीर या देशामध्ये आढळतात. ट्युलिप ची फुले हि शक्यतो वसंत ऋतूमध्ये चांगल्या प्रकारे फुलू शकतात तसेच या फुलांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी त्यांना थंड हवामान लागते त्यामुळे त्याची शेती हि जेथे थंड वातावरण असते त्या ठिकाणीच केली जाते.

essay on tulip flower in marathi
essay on tulip flower in marathi

ट्युलिप फुलावर निबंध – Essay on Tulip Flower in Marathi

Tulip Flower Essay in Marathi

ट्युलिप ची फुले हि वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळे सुगंध असणारी असतात आणि हे त्या फुलाच्या प्रकारावर अवलंबून असते. ट्युलिप या फुलाच्या ४ उप प्रजाती आणि १०० प्रजाती आहेत आणि हा फुलांचे ३००० हजारहून अधिक प्रकार आहेत. ट्युलिप हे लिली या कुटुंबातील असून ह्या फुलाचे झाड एकदा लावल्यानंतर २ वर्षासाठी चांगले राहू शकते आणि या फुलाची लावणी हि आपण जसे सामन्यता बिया किंवा रोपे लावून फुलांची झाडे वाढवतो तसेच ट्युलिप या फुलाची लावण बल्ब या त्याच्या बिया पासून केली जाते.

आणि हा बल्ब ७ ते ८ इंच खड्ड्यामध्ये रोवला जातो आणि त्यावर माती घालून मुजवला जातो आणि त्याला अवश्यक तेवढे पाणी दिले जाते आणि त्याची चांगल्या प्रकारे वाढ केली जाते. ट्युलिप या फुलालाल जास्त प्रमाणत पाणी घातले तर ते सोडत नाही. तसेच ट्युलिपच्या देठाला एकाच फुल येते म्हणून या फुलाला ‘cut flower’ म्हणून देखील ओळखले जाते कारण हे फुल देठाला एकच फुल येत असल्यामुळे ते देठा सोबत कट केले जाते. ट्युलिप या फुलाची लावणी हि ज्या भागामध्ये आपण ट्युलिप फुले लावणार आहोत.

त्या भागाच्या वातावरणावर ट्युलिप या फुलाची लावण केली जाते. हि फुले उत्तर भागामध्ये सप्टेंबर किवा ऑक्टोंबर मध्ये लावली जातात आणि दक्षिण भागामध्ये हि नोव्हेंबर किवा डिसेंबर मध्ये लावली जातात. या फुलांची लावण सप्टेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये झाल्यानंतर त्या फुलांची चांगल्या प्रकारे काळाजी घेतली जाते त्याला आवश्यक तेवढे पाणी आणि खत दिले जाते आणि त्याची चांगली वाढ होण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात आणि हि फुले वसंत ऋतूला सुरुवात झाली कि बहरायला सुरुवात होते.

ट्युलिप या फुलाची जगातील सर्वात महाग फुल म्हणू ओळख आहे त्यामुळे या फुलाची अधिक शेती हि नेदरलँड मध्ये केली जाते आणि तेथेच सर्वात अधिक उत्पादन देखील घेतले जाते. तसेच ट्युलिप फुलाचे जास्त उत्पादन भारतातील काश्मीरमध्ये आणि महाद्वीप मध्ये देखील घेतले जाते.

सर्वप्रथम या फुलाचे पिक हे आशियामध्ये घेण्यात आले त्यानंतर ऑस्ट्रोलीया या देशाने देखील १५५४ पासून ट्युलिप या फुलाचे उत्पादन घेण्यासा सुरुवात केली त्यांनतर १५७१ मध्ये हॉलंड आणि नंतर अमेरिकेने देखील या फुलाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आणि अश्या प्रकारे या फुलाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली आणि सध्या जगातील महाग फुले म्हणून या फुलांना ओळखले जाते.

ट्युलिप हि फुले दिसायला सुंदर असतात त्यामुळे या फुलांचा वापर शोभेची फुले म्हणून केला जातो तसेच या फुलांचा वापर जेवणामध्ये देखील केला जातो. जसे गुलाबाचे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या भावना दर्शवतात तसेच ट्युलिपच्या फुलाचे फुलाचे वेगवेगळे रंग हे वेगवेगळ्या प्रकारच्या भावना दर्शवतात आणि ट्युलिप ह्या फुलाला प्रेमाचे आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते.

ट्युलिपचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ट्युलिप या फुलाच्या १०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि ३००० हून जास्त प्रकार आहेत आणि हि वेगवेगळ्या प्रकारची फुले वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या सुगंधामध्ये असतात. ट्युलिपची फुले पांढरा, पिवळसर, लाल, तपकिरी, जांभळ्या, निळा, गुलाबी, फिकट गुलाबी, केशरी, मिक्स रंग आणि काळ्या अश्या रंगांच्यामध्ये असते.

ट्युलिपचे अनेक वेगवेगळे प्रकार आहे आणि त्यामधील काही म्हणजे क्विन ऑफ नाईट ट्यूलिप, अप्रीकॉट पॅरॉट ट्यूलिप, ब्लशिंग ब्युटी ट्यूलिप, ऑरेंज प्रीन्सेसा ट्यूलिप, एक्झॉटीक इम्पेरोर ट्यूलिप, ब्लॅक पॅरॉट ट्यूलिप, अक्रोपोलीस ट्यूलिप, द्रविण हायब्रीड ट्यूलिप आणि सिंगल ट्यूलिप असे अनेक ट्युलिप फुलाचे प्रकार आहेत. ट्युलिपचे फुल हे २ ते ३ दिवस चांगले टवटवीत राहू शकते. आपल्या भारतामध्ये ट्युलिप प्रेमी लोक असल्यामुळे भारतामध्ये लाल बाग, इंदिरा गांधी मेमोरिअल ट्यूलिप गार्डेन आणि लोधी गार्डन या बागांच्यामध्ये ट्युलिप फुले आहेत.

आम्ही दिलेल्या essay on tulip flower in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ट्युलिप फुलावर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Tulip Flower Essay in Marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि  माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!