गजानन दिगंबर माडगूळकर माहिती मराठी Ga Di Madgulkar Biography in Marathi

Ga Di Madgulkar Biography in Marathi – Ga Di Madgulkar Information in Marathi गजानन दिगंबर माडगूळकर माहिती मराठी गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा. मराठी चित्रपट सृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. गदिमा यांनी आपल्या उत्तम कलागुणांनी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये मानाचे स्थान मिळवले. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये असं कोणतंही क्षेत्र उरलं नसेल ज्यामध्ये गदिमा यांनी काम केलं नसेल. अगदी कथाकार ते निर्माता व कवी पासून ते वक्ता पर्यंत. आजच्या लेखामध्ये आपण कविश्रेष्ठ आणि थोर साहित्यकार गदिमा यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

ga di madgulkar biography in marathi
ga di madgulkar biography in marathi

गजानन दिगंबर माडगूळकर माहिती मराठी – Ga Di Madgulkar Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)गजानन दिगंबर माडगूळकर
जन्म (Birthday)१ ऑक्टोंबर १९१९
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील सांगली येथील शेटफळे या गावात
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)चित्रपट सृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व
मृत्यू (Death)१४ डिसेंबर १९७०

Ga Di Madgulkar Information in Marathi

जन्म

मूळ नाव गजानन दिगंबर माडगूळकर परंतु गदिमा नावाने प्रसिद्ध. गदिमा यांचा जन्म १ ऑक्टोंबर १९१९ मधला. महाराष्ट्रातील सांगली येथील शेटफळे या गावात दिगंबर बळवंत माडगूळकर आणि बनुताई दिगंबर माडगूळकर यांच्या पोटी गदिमा यांचा जन्म झाला. गदिमा हे एका सामान्य घरातील होते घराची परिस्थिती हालाखीची होती.

गदिमा यांचे शिक्षण आटपाडी कुंडल आणि औंध येथून पूर्ण पडल. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा नापास झाले. गदिमा यांचे सुरुवातीचे दिवस गरिबीमध्ये गेले त्यामुळे शिक्षणाला टाळा लागला. गदिमा यांचे शिक्षण अपूर्णच राहिलं.

कारकीर्द

गदिमा हे मराठी चित्रपटसृष्टी मध्ये एक कथाकार, पटकथाकार, संवाद, लेखक, गीतकार, अभिनेता व निर्माता होते. व एक मराठी साहित्यकार म्हणून कवी, कथालेखक, कादंबरीकार, नाटककार, संपादक आणि वक्ता होते. इतकेच नव्हे तर ते स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी देखील होते. एकाच व्यक्तीमध्ये इतके कलागुण असणे ही काही सामान्य बाब नाही आहे. अर्थातच ते एक अष्टपैलू कलाकार होते. गदिमा यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि ख्याती बद्दल सांगायचं झालं तर शब्ददेखील अपुरे पडतात.

महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, लोकजीवन लोकशैली त्यांना चांगलीच ठाऊक होती आणि त्यातूनच एक मराठमोळा साहित्यिक कलाकार जन्माला आला. मराठी कवितां त्यांनी एक नवीन ओळख निर्माण करून दिली. आणि संपूर्ण महाराष्ट्राचे ते लाडके गदिमा म्हणून ओळखू जाऊ लागले. वयाच्या सतराव्या वर्षी गदिमा यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली या दोन चित्रपटांच्या माध्यमातून सहाय्यक नट भूमिका साकारत त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये प्रवेश केला. गीत लेखनाची संधी त्यांना भक्त दामाजी व पहिला पाळणा या चित्रपटांच्या माध्यमातून मिळाली.

गदिमा यांना प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात लोकशाहीर रामजोशी या चित्रपटांमधून झाली. या चित्रपटामुळे गदिमा यांच्यातील कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार जागा झाला आणि मराठी चित्रपट सृष्टी मध्ये सर्वत्र गदिमा यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये गदिमा यांनी एक उत्कृष्ट कथाकार, पटकथाकार, संवाद, लेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता म्हणून ठसा उमटवला. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये गदिमा यांनी भली मोठी कारकीर्द उभारली आहे.

जवळपास १५७ पटकथा आणि दोन हजारांहून अधिक मराठी गाणी गदिमा यांनी लिहिली आहेत. रामजोशी, वंदे मातरम, पुढचे पाऊल, गुळाचा गणपती, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊन-पाऊस, सुवासिनी, जगाच्या पाठीवर, प्रपंच, मुंबईचा जावई, गदिमा यांचे हे चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरले. गीत निर्मितीच्या बाबतीत गदिमा यांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. त्यांनी निर्माण केलेल्या गीतांचा एक वेगळाच लय असायचा. गदिमा यांची गीत निर्माण करण्याची शैली वेगळी होती.

अगदी सहज सोपे शब्द वापरून ते गीत निर्माण करायचे. सोबतच मराठी मनाला आकर्षित करणारी त्यांची रचना होती त्यामुळे त्यांची गीते सुप्रसिद्ध ठरली. गदिमा यांनी अगदी प्राचीन मराठी काव्याला देखील अर्वाचीन काळामध्ये प्रसिद्ध करून दाखवलं. अगदी गोरी गोरी पान, एक तळ्यात होती बदके पिले सुरेख, मामाच्या गावाला जाऊया, नाच रे मोरा यांसारख्या बालगीतां पासून ते एक धागा सुखाचा, जग हे बंदीशाळा, या चिमण्यांनो परत फिरा रे, राजहंस सांगतो, घनघन माला नभी दाटल्या, बुगडी माझी सांडली ग, फड सांभाळ तुर्याला आला, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, विठ्ठला तू वेडा कुंभार, गदिमा यांनी तयार केलेली ही रेंज अप्रतिम व अफाट आहे.

गदिमा यांचे माझा होशील का? हे गाणं दक्षिण भारतापर्यंत पोहोचलं. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये गदिमा यांचा वावर तर होताच परंतु हिंदी चित्रपटसृष्टी ही त्यांनी सोडली नाही. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये २५ पटकथा लिहून गदिमांनी हिंदी चित्रपटसृष्टीवरतीही वर्चस्व गाजवलं. दो आंखें बारह हाथ, नवरंग, गूंज उठी शहनाई, तूफान और दिया हे सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गदिमा यांचेच होते. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपटांच्या कथा गदिमांच्या लेखणीतून उतरल्या होत्या.

गदिमा यांना वाचनाची व लेखनाची आवड वि.स.खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत असताना लागली. तिथूनच त्यांच्या लेखणीला वेग आला आणि पुढे, सुगंधी-वीणा, जोगिया, चार संगितिका, गीतरामायण, काव्यकथा, चैत्रबन, गीतगोपाल, गीतसौभद्र अशी काव्यनिर्मिती गदिमा यांच्याकडून तयार झाली. वाड़मय प्रकारातील कथा, कादंबरी, आत्मचरित्र यातही गदिमांनी लेखन केलेल आहे.

एकूण ३७ पुस्तके गदिमांनी लिहिलेली आहेत. त्यामध्ये लपलेले ओघ, बांधावरच्या बाभळी, कृष्णाची करंगळी, बोलका शंख, वेग आणि इतर कथा, थोरली पाती, तुपाचा नंदादीप, चंदनी उदबत्ती, भाताचे फुल, सोने आणि माती, तीन चित्रकथा, कलावंताचे आनंद पर्यटन (प्रवास वर्णन) तीळ आणि तांदूळ असे लघुकथा संग्रह.

वाटेवरल्या सावल्या, मंतरलेले दिवस यांसारखे आत्मचरित्रपर लिखाण. दे टाळी ग घे टाळी, मिनी, शशांक मंजिरी, नाच रे मोरा असे बालवाडमय. तुलसी, रामायण व शब्दरंजन, अक्षर धरती यांसारखे मासिकांचे संपादन. आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे या कादंबऱ्या. युद्धाच्या सावल्या, परचक्र अशी नाटके हे सगळं गदिमा यांच्या नावावर आहे. गदिमा यांनी रचलेलं महाकाव्य गीतरामायण मुळे गदिमा यांना महाकवी व आधुनिक वाल्मिकी ही पदवी प्राप्त झाली.

गदिमा यांच्या मित्राने नभोराणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे हा आग्रह गदिमा यांच्याकडे धरला होता या आग्रहातून एक महाकाव्य जन्माला आलं. वाल्मिकींनी रामायणात २८००० श्लोकांत मध्ये रामकथा लिहिली आहे. आणि हीच रामकथा गदिमा यांनी एकूण ५६ गीतात शब्दबद्ध केली आहे. गीत रामायण हे एकाच कवीने वर्षभर रचलेलं, एका संगीतकाराने संगीतबद्ध केलेलं वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव अभूतपूर्व संगीत कार्यक्रम ठरला होता.

हा संगीत कार्यक्रम १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत पुणे आकाशवाणीने प्रसारित केला होता. गदिमा यांच्या या महाकाव्याने पुढे हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी या विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर केलं.

राजकीय क्षेत्र

गदिमा यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी सोडली तर त्या व्यतिरिक्त ही एक भारत स्वातंत्र्य सेनानी व राजकारणी म्हणून देखील ठसा उमटवला आहे. गदिमा यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग होता परंतू, परंतु प्रत्यक्ष लढा न देता त्यांनी शाहिरी, पोवाडा लिहून जनजागृती केली. त्यावेळी शाहीर निकमांसारख्यांनी गदिमांचे पोवाडे गाऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकच हाहाकार उडवला होता.

राजकारणात देखील गदिमा यांचा सहभाग होता. साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून गदिमा यांनी बारा वर्षे विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य म्हणजेच आमदार होते. काँग्रेस पक्षाशी गदिमा यांचे चांगले संबंध होते. परंतु प्रत्येक नेत्याचे गदिमा हे आवडते होते.

पुरस्कार

गदिमा यांच्या सारखे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभल हे आपले भाग्यच आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी गदिमा यांना अनेक पुरस्कार बहाल केले गेले. १९६९ मध्ये गदिमा यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. गदिमा हे संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे सुवर्णपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६९ मध्ये ग्वाल्हेरला येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद गदिमा यांच्याकडे होतं.

१९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदाचा मान गदिमा यांच्याकडे होता. तसेच गदिमा यांनी लिहिलेल्या चित्रपटांना कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांच्या उत्कृष्ट लेखनासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. तसेच त्यांच्या बऱ्याच पुस्तकांना राज्य व केंद्र शासनाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

मृत्यू

गदिमा ज्यांनी ५८ वर्षाच्या आयुष्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नावलौकिक मिळविला. तो काळ मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ मानला जातो. १४ डिसेंबर १९७० रोजी गदिमा यांचे निधन झालं. पुण्यामध्ये गदिमा यांच्या अंत्ययात्रेला जनसागर पहायला मिळाला. गदिमा यांची गाणी, साहित्य लेखन, चित्रपट, गीतरामायण मराठी रसिकांच्या नेहमीच स्मरणात राहील.

आम्ही दिलेल्या Ga Di Madgulkar Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गजानन दिगंबर माडगूळकर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Ga Di Madgulkar information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Ga Di Madgulkar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “गजानन दिगंबर माडगूळकर माहिती मराठी Ga Di Madgulkar Biography in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!