गौतम बुद्ध संपूर्ण माहिती Gautam Buddha Information In Marathi

‘हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर’

gautam buddha information in marathi असे संत तुकडोजी महाराज ज्यांच्याबद्दल म्हणतात ते ‘गौतम बुद्ध’ gautam buddha in marathi. ज्या काळात संपूर्ण भारतात हिंसा, अशांती, अधःश्रद्धा आणि अधर्म यांचे प्रमाण वाढले होते त्या काळात शांती आणि अहिंसेचे प्रतिक असणारे गौतम बुद्ध अवतरले. भगवान बुद्धांनी अवतरीत होऊन सर्व लोकांना बंधनातून मुक्त केले. गौतम बुद्ध एक युगप्रवर्तक होते ज्यांनी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात आपल्या ज्ञानाने ज्योत पेटवली. म्हणूनच त्यांना ‘लाईट ऑफ आशिया’ म्हणून संबोधले जाते.

gautam-buddha-information-in-marathi

gautam buddha information in marathi / gautam buddha in marathi

गौतम बुद्ध संपूर्ण माहिती Gautam Buddha Information In Marathi

गौतम बुद्ध जीवन परिचय gautam buddha in marathi

नावसिद्धार्थ
जन्मई.स.पू. ६२३/५६३ लुंबिनी, नेपाळ
कार्यबौद्ध धर्माचे संस्थापक
पत्नीयशोधरा
अपत्येराहुल
वडीलराजा शुद्धोधन
आईमहाराणी महामाया
मृत्यू (निर्वाण)ई.स.पू. ५४३/ ई.स.पू ४८३, कुशीनगर, उत्तरप्रदेश, भारत

क्षत्रिय कुळामध्ये ई.स. पूर्व ५६९ मध्ये वैशाखी पोर्णिमेस नेपाळमधील लुंबिनी मधील उद्यानात एका शालवृक्षाखाली महाराणी महामाया यांच्या पोटी एका राजकुमाराचा जन्म झाला. त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्यांची मातृभाषा पाली होती. त्यांचा पिता शुद्धोधन शाक्य या लहानश्या गणराज्याचा राजा होता. पाली प्राकृत भाषेत शुद्धोधन म्हणजे शुद्ध तांदळासारखा सुद्ध म्हणजे शुध्द आणि ओदन म्हणजे तांदूळ आणि त्यांची पत्नी महाराणी महामाया म्हणजेच मायादेवी. सिद्धार्थच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर सिद्धार्थचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला.

त्यामुळे सिद्धार्थ यांना गौतम या नावाने ओळखले जाते. वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्धार्थ गौतम यांचा राजकुमारी यशोधरा यांच्याशी विवाह झाला. आणि त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला. गौतमबुद्ध, शाक्यमुनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही वेगवेगळी नवे त्यांना देण्यात आली.

गौतम बुद्ध यांची जीवन कथा

सिद्धार्थच्या जन्मानंतर एका ऋषीने असे भविष्य वर्तविले होते कि, एकतर हा मुलगा चक्रवर्ती व पराक्रमी सम्राट होईल किंवा महाज्ञानी व विरक्त होईल. राजाच्या घरी जन्माला आल्यामुळे वैभवशाली आयुष्य लाभलेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. मातेचे छत्र हरवल्यानंतर त्याचे पालनपोषण त्यांच्या मावशीने पोटच्या पोराप्रमाणे केले. त्यांना आवश्यक ते ज्ञान त्यांना देण्यात आले. वडील शुद्धोधन यांनी सिद्धार्थला चक्रवर्ती राजाच बनविण्याचा ध्यास घेतला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा सिद्धार्थला वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच राहावा अशी राजा शुद्धोदनाची इच्छा होती.

लहानपणापासूनच सिद्धार्थला अलौकिक अशी बुद्धिमता लाभली होती. तो गंभीर, चिंतनशील वृत्तीचा होता. त्याला बालपणीच ध्यानधारणेची आवड होती.

एक दिवस गावातून फेरफटका मारण्यासाठी ते रथातून निघाले होते. त्यावेळी ज्या वास्तव सत्यापासून त्यांना दूर ठेवण्यात आले होते तेच त्यांना पाहायला मिळाले. त्यांच्या मनाला विषण्ण करणारी दृष्ये त्यांना पाहायला मिळाली. रोगाने पछाडलेला जीर्ण शरीराचा रुग्ण, वार्धक्याने वाकलेला एक म्हातारा, प्रेतयात्रा त्यांना दिसली. घर भरून उरलेले दारिद्र्य त्यांनी पहिले. या सगळ्या गोष्टी पाहून ते सुन्न होऊन गेले. आपले सुख अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडून गेले आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला.

त्यांनतर त्यांनी एक संन्यासी जाताना पाहिला. त्यावेळी त्यांचे मन कशातच रमेनासे झाले. त्यांना कळून चुकले कि सगळ्यापासून सुटका पाहिजे असेल तर संसाराचा त्याग करून सन्यास हाच अंतिम मार्ग आहे. त्यांनी ऐन तारुण्यात वयाच्या २९ व्या वर्षी प्रिय पत्नी यशोधरा, पुत्र राहुल यांचे अंतिम दर्शन घेऊन ते राजवाड्याबाहेर पडले. त्यांच्या सोबतीला सारथी चन्न कंठक घोड्यासह उभा होता.

तपश्चर्या आणि ज्ञानप्राप्ती

सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थ मानवतेच्या कल्याणाच्या शोधात निघाले. ऐहिक सुखाचा पूर्ण त्याग हे सूत्र त्यांनी धारण केले होते. ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. ज्ञानाच्या शोधात त्यांनी दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. दोघांनीही आपला वारसा चालविण्यासाठी त्यांना निवडले पण स्वजनाच्या उद्धारासाठी सिद्धार्थने त्यांना नकार दिला.

आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ४९ वर्षाच्या अखंड अविरत तपस्येनंतर ई.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ‘दिव्य ज्ञानप्राप्ती’ झाली. ह्या वृक्षाला बोधिवृक्ष म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञान असणारा मनुष्य.

बुद्धांनी दिलेल्या सारनाथ येथील पहिल्या प्रवचनास ‘धम्मचक्रप्रवर्तक’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. यामध्ये त्यांनी बौद्ध धर्माची मुलतत्वे सांगितली. ते सांगतात, मनुष्यप्राणी दुःख, दैन्य, दारिद्र्यात रहात आहे. हे सर्व दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.

बौद्ध धर्माची शिकवण

बौद्ध धर्म हा तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वात महान धर्म आहे. बौद्ध तत्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. बौद्ध धर्माचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व लेणी ह्या मोर्य कलेच्या प्रतीकांच्या रुपाने स्पष्ट दिसतो.

जातीभेद, राष्ट्रभेद दूर करून आपल्या बौद्ध धर्माचा आणि तत्वांचा प्रसार भारताबरोबरच इतर  देशातही झाला आहे. त्यांनी धर्मचक्र प्रवर्तनाचे कार्य केले. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माचा न पुसणारा छाप पडला आहे. भगवान बुद्धांनी पाली या लोकभाषेतून अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. यासाठी त्यांनी चार आर्यसत्ये (दुःख, तृष्णा, दुःख निरोध, प्रतिपद), अष्टांग मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशिले सागितली.

या जगात जे काही आहे ते सर्व नश्वर आहे. मानवाचे सर्व वासना, भावना, इच्छा व आसक्ती, आवड ही मानवी जीवनाच्या दुःखाला कारणीभूत ठरतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब करण्याचा उपदेश बुद्ध देतात. उत्तरप्रदेश मधील सारनाथ येथे धर्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करताना नीती व सदचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निर्वाणाच्या समीप पोचण्यासाठी अष्टांग मार्ग सांगितला. त्यांच्या धर्माची तीन अंगे आहेत- शील, समाधी, प्रज्ञा.

समाज जीवनावरील प्रभाव

  • बौद्ध तत्वज्ञानातील अहिंसा, सर्व प्राणीमात्रावरील प्रेम व सहानुभूती या विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला.
  • वैचारिक स्वातंत्र्य– कोणत्याही प्रकारच्या शंका उपस्थित न करता वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या विचारपद्धतीवर परिणाम झाला.
  • पंचशील तत्त्वे पालन करण्याचा उपदेश केल्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला.
  • जातीभेद, वर्णभेद, सामजिक दर्जा ह्या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता तत्व प्रस्थापित केली.
  • लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन बिंबवण्यासाठी सहाय्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आइन्स्टाइन सारख्या अनेक विचारवंतानी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगितले आहे.
  • करुणा, प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार,अहिंसा, क्षमाशीलता, शिलसंवर्धन, यांसारख्या नैतिक सिद्धांतावर भर देण्यात आला.
  • बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. तक्षशीला व नालंदा ही विद्यापीठ प्राचीन काळात नावारूपास आली होती.
  • माणसाला माणसासारखे जीवन जगण्यासाठी, सदाचारयुक्त होता आले पाहिजे अशी शिकवण दिली.
  • भारतीय संस्कृतीचा परदेशात पसार केला. नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया, तैवान, मंगोलिया, सिंगापूर, लाओस आदि देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून जगातील जवळजवळ २०० पेक्षा अधिक देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.
  • बौद्ध धर्माने भारताच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे.

निर्वाण

कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मातील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत. उत्तरप्रदेश मधील कुशीनगर येथे ई.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. कुशीनगर येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्युनंतर परीनिर्वाण प्राप्त केले होते.

आम्ही दिलेल्या sant gautam buddha information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गौतम बुद्ध gutam buddha mahiti  यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gautam buddha information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gautam buddha in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “गौतम बुद्ध संपूर्ण माहिती Gautam Buddha Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!