शेळी (बकरी) पालन माहिती Goat farm information in Marathi

Goat farm information in marathi भारतासारख्या देशांमध्ये ग्रामीण भागात पशु पालन हे खूप पूर्वीच्या काळापासून केले जात आहे आणि त्या पासून त्यंना खूप लाभ होत होता आणि अगोदरच्या काळात पशुपालन हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत्र होते. त्यामधील एक खूपच लोकप्रिय असणारे पालन म्हणजे शेळी (बकरी) पालन (goat farming in marathi). शेळी पालन हे पूर्वीचे लोक करायचे आणि त्यामधून त्यांना खूप फायदा मिळायचा कारण शेळ्यांचे दुध पौष्टिक असते आणि शेळ्यांच्या मांसाला हि बाजारात खूप मागणी असते.

काही अहवालांनुसार असे समजते कि देशामध्ये 12 कोटी हून अधिक शेळ्यांचे पालन केले जाते.  सदर लेखामध्ये शेळी पालन प्रकल्पाविषयी (goat farming project information in marathi) आपल्याला उपयुक्त अशी माहिती पुरविण्याचा प्रयत्न केला आहे.

goat-farm-information-in-marathi
goat farm information in marathi/goat farming in marathi
अनुक्रमणिका hide

शेळी पालन व्यवसाय (goat farm information in marathi) 

आत्ताच्या जगामध्ये लोक कुत्रा किवा मांजर पाळतात पण त्यांची खाण्याचा खर्च खूप असतो कारण आपल्या सर्वाना माहित आहे कि कुत्र्यांचा बाजारात मिळणारा आहार किती महाग असतो आणि ते मध्यम किवा गरीब लोक्कांना परवडणारे नसते आणि एवडे करूनहि त्यामधून काहीच फायदा होत नाही. पण शेळी पालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये कमी खर्चात खूप नफा होतो आणि हे सामान्य लोक्कांना परवडण्यासारखे असते म्हणून शेळी पालन हा एक स्वस्त आणि टिकणारा व्यवसाय आहे.

शेळी पालनासाठी कोणत्या प्रकारच्या शेळ्या निवडायच्या (selection of goat for goat farming in marathi)

शेळी निवडणे हे आपल्या शेळी पालनाच्या कारणावर अवलंबून असते. काही लोक त्यांच्या दुधासाठी शेळी पालन करतात, काही लोक त्यांच्या मास विकण्यसाठी करतात, लोकर विकण्यासाठी तसेच त्यांना पाळीव प्राणी म्हणून बाजारामध्ये विकण्यासाठी शेळी पालन करतात.

काही शेळ्यांचे प्रकार ज्या दुधासाठी आणि मासासाठी चांगल्या आहेत ( goat farm information in marathi)

सुरती ( surti )

सुरती शेळ्या भारतामध्ये दुधासाठी खूप प्रसिध्द जात आहे. ह्या जातीच्या शेळ्या जास्त प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचे दुध देतात त्यामुळे चांगला फायदा होतो. हि शेळ्यांची जात मुळची गुजरात मधून येणारी जात आहे. या प्रकारामध्ये मादा शेळ्या ह्या नर शेळ्यांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. सुरती शेळ्या ह्या शक्यतो पांढऱ्या रंगाच्या असतात.

शिरोही ( shirohi )

या प्रकारच्या शेळ्या मुळच्या राजस्थानी असून या शेळ्यांचा उपयोग उत्तर प्रदेश मध्ये शक्यतो त्यांच्या मासासाठी केला जातो.  मध्ये आढळतात आणि या शेली उष्णतेसाठी खूप प्रतिरोधक असतात. ह्या जातीच्या शेळ्या पिल्लांना वर्षातून दोन वेळा जन्म देतात आणि त्या एका वेळी एक किवा दोन पिल्लांना जन्म देतात.

जम्नापरी ( jamnapari )

जम्नापरी शेळी हि भारतामधील लोकप्रिय शेळी आहे जी शेळी पालनामध्ये असतेच. या प्रकारच्या शेळ्या दिसायला खूप सुंदर असतात आणि या शेळ्यांचा उपयोग दुध काढण्यासाठी केला जातो. या जातीच्या शेळ्या उत्तर प्रदेशमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.

मालाबरी ( malabari )

या प्रकारची जात वेगवेगळ्या दुसऱ्या जाती एकत्र करून विकसित झालेली शेळी आहे. या प्रकारच्या शेळ्या लवकर परिपक्वता दाखवतात आणि ८ ते १० महिन्यात त्या गर्भवती होतात.

ओस्मानाबदि (osmanabadi goat farming information in marathi)

ओस्मानाबदि शेळ्या ह्या दुधासाठी पाळल्या जातात. ह्या प्रकारच्या शेळ्या महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश मध्ये आढळतात.

जाख्राना ( jakhrana )

जाख्राना शेळ्या ह्या शक्यतो राजस्थान मध्ये आढळतात. या प्रकारच्या शेळ्यांचा उपयोग दुध काढण्यासाठी हि होतो आणि या शेळ्यांचे मास हि आहारामध्ये वापरले जाते.

शेळी पालन करण्याच्या पध्दती (methods of goat farming in marathi)  

शेळी पालन करायचे म्हंटले तर त्यामध्ये दोन पध्दती येतात. या पध्दती खाली दिल्या आहेत

  • अर्ध बंदिस्त शेळीपालन पध्दत.
  • बंदिस्त शेळी पालन पध्दत.

अर्ध बंदिस्त शेळीपालन पध्दत:

अर्ध बंदिस्त शेळी पालन हे एक पारंपारिक चालत आलेले शेळी पालन आहे ज्यामध्ये शेळ्यांना दिवस भर मोकळे चरण्यासाठी सोडलेले असते आणि संध्याकाळच्या वेळी त्यांना गोठ्यामध्ये बंद करून ठेवलेले असते. या प्रकारच्या शेळी पालनामध्ये कमी खर्च आणि जास्तीत जास्त नफा असे समीकरण असते कारण या शेळ्या दिवसभर चरण्यासाठी बाहेर असतात त्यामुळे यांच्या आहारावर जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत.

बंदिस्त शेळीपालन पध्दत:

बंदिस्त शेळी पालन पध्दत हि शक्यतो मोठ्या प्रकारच्या शेळी पालणासाठी वापरली जाते ज्यामध्ये ८० ते १०० शेळ्या असतात. या प्रकारच्या पध्दती मध्ये शेळ्यांना बाहेर चरण्यासाठी सोडले जात नाही त्यांना दिवसभर सुध्दा गोठ्यामध्ये बांधून ठेवलेले असते आणि त्यांना लागेल तेवढा चार आणि पाणी पुरवले जाते.

बंदिस्त गोठ्याचे नियोजन कसे करावे ?

  • बंदिस्त गोठ्यामध्ये शेळ्यांच्या वयोगटानुसार वेगवेगळे कप्पे करणे गरजेचे असते.
  • तसेच प्रत्येक शेळीला १६ ते २० sq ft जागा ठेवली पाहिजे.
  • दर तीन महिन्याला जंताचे औषध देणे
  • त्याच बरोबर शेळ्यांना खाण्यासाठी लागणारा चार, वैरण, वाळलेली वैरण, ओली वैरण तसेच वेगवेगळे खुराक जे शेळ्यांसाठी खास बनवलेले असते तसेच शेळ्या वनस्पतीचा पाला आवडीने खातात हे सर्वांनाच माहित आहे म्हणून सुबाभूळ आणि शेवरीचा पाला आणून ठेवणे.
  • गोठा वरचेवर स्वच्छ करणे आणि पाण्याने धुवून काढणे आणि शेळ्यांची बसण्याची जागाही स्वच्छ करणे.

शेळ्यांसाठी लागणारा वेगवेगळा आहार (different types of food for goat)

शेळ्यांसाठी लागणारा वेगवेगळा आहार जो आपण साठवून ठेवू शकतो .शेळ्यांसाठी ओट्स, मक्याचे दाने आणि सूर्यफुलाच्या बिया खायला घातल्या तर त्यामधून शेळ्यांना प्रोटीन, फायबर मिळते तसेच त्यांचे शरीर बळकट होण्यासाठी मदत होते. 

शेळी पालनापासून आपण कसा चांगला फायदा मिळवू शकतो (how to make profit from goat farming in marathi)

  • शेळ्या दुध देतात ते दुध खूप पौष्टिक असते आणि ते आपण जर योग्य दारामध्ये विकले तर त्यापासून फायदा मिळू शकतो.
  • त्याचबरोबर दुध देणाऱ्या शेळ्या विकल्या तर त्यापासूनही चांगला फायदा मिळतो.
  • शेळ्यांचे भारतात आहारामध्ये वापरले जाते आणि जर आपण शेळ्या मोठ्या करून त्यांना विकल्या तर त्याचा हि खूप फायदा होतो.
  • शेळ्यांची कातडी हि वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी वापरली जाते.
  • शेळ्यांचे विष्ट हे शेतामध्ये खात म्हणून वापरले जाते.
  • शेळ्या एका वेळी दोन पिल्लांना जन्म देवू शकतात त्यामुळे आपल्या जवळील शेळ्यांच्या संख्यांमध्ये भर पडते आणि आपल्याला त्याचा फायदा होतो.

शेळी पालन कर्ज योजना/शेळी पालन शेड अनुदान

शेळी पालनासाठी लागणाऱ्या कर्ज योजनेबद्दल किंवा अनुदानाबद्दल आम्ही लवकरच योग्य अशी माहिती पुरवू.

पाळीव प्राण्यांची महिती

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा शेळी पालन  कसे असतात, त्याच्या जाती कोणत्या व त्याचे जीवन कसे आहे. goat farm information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा.

तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही माहिती goat farming in marathi बद्दल राहिली असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद! तसेच goat farming in maharashtra marathi information या लेखाचा वापर करून आपण बकरी पालन करू शकता. या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!