गुढीपाडवा माहिती मराठी 2023 Gudi Padwa Information In Marathi

आपल्या संस्कृतीचे नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा या लेखामध्ये आपण Gudi Padwa information in Marathi विषयी जाणून घेणार आहोत. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आपण कोणतीही नवीन गोष्ट किंवा नवीन कार्य करावयाचे असल्यास आपण गुढीपाडवा या शुभ मुहूर्ताची वाट बघत असतो. चला तर मग जाणून घेऊयात gudi padwa in Marathi.

Gudi Padwa information in Marathi
Gudi Padwa information in Marathi

गुढीपाडव्याची माहिती – Gudi Padwa information in Marathi

चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र, पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण सोबत अयोध्येत परत आला आणि संपूर्ण अयोध्या नगरी आनंदाने अन् जल्लोषाने न्हाऊन गेली, संपूर्ण देशभर ह्या उत्सवाला नवं चैतन्य निर्माण झालं. समस्त भारत वासियांनी आपल्या अंगणात रांगोळी रेखाटून दारी गुड्या तोरणे उभ्या करून आपल्या दैवताच म्हणजेच प्रभू रामचंद्रच मोठ्या उत्साहानं स्वागत केलं होतं . त्याच दिवसापासून हा गुढ्या तोरणे उभे करण्याचा प्रघात सुरू झाला. अशा मताची अनेक लोक, विशिष्ट जनजाती आपल्या देशात आढळतात.

2023 गुढीपाडवा कधी व कसा साजरा केला जातो? – why gudi padwa is celebrated in Marathi

आपल्या महाराष्ट्रात चैत्रामध्ये हा सण साजरा करण्याची प्रथा रूढ झाली आहे. आपला मराठी महिना चैत्र आणि याच चैत्रापासून नवीन वर्षाची सुरुवात होते, म्हणून आपण गुढ्या उभारून घरी गोडाधोडाचा नैवैद्य करून पुरणपोळीचा खमंग जेवणाचा संगतीत हा गुढीपाडवा आपण साजरा करतो. दरवर्षी गुढी उभा करण्यासाठीची वेळूची काठी स्वच्छ धुवून आणली जाते.

एखाद नवं वस्त्र काठीच्या टोकाला अडकवून त्यावर तांब्याचे पात्र उलटे अडकवले जाते. सोबत साखरेची माळ , फुलांचा हार लाऊन ही गुढी उभारली जाते. घरातील सुवासिनी या गुढीला हळदी कुंकू लावून पंचारतीने मनोभावे ओवाळतात, अन् सुख व मांगल्याच्या गुढीकडून सौख्याचा आशीर्वाद मिळवतात.

याच दिवशी कुंकू लिंबाचा पाला, हरभऱ्याची भिजवलेली डाळ अन् गुळाचे मिश्रण घरातील सारी मंडळी ग्रहण करतात. आपल्याला चांगलं आरोग्य लाभो अन् उन्हाळ्यातील काही रोगांपासून मुक्ती मिळो, हीच कल्पना या लिंबू आणि गुळामध्ये लपलेली असते. म्हणूनच सर्वानी ह्या मिश्रणाचा आस्वाद घेणं सक्तीचं असतं.

मराठी बांधव याच दिवसापासून आपले नवीन वर्ष नव चैतन्याने साजरे करतात. या दिवशी प्रत्येक घरातील वातावरण आनंदमय असतं. सुवासिनी नवनव्या साड्यांनी सजलेल्या असतात, गळ्यात दागदागिने घालून गुढीपाडव्याच्या सोहळा साजरा करतात.

संपूर्ण परिसरात एक वेगळं चैतन्य बघायला मिळतं. सर्वांच्याच घराच्या गच्चीवरून, कौलारू छप्परावरून गुढीची दृश्य नजरेत एक नवचैतन्य भरत असतात. दिवसभर या गुढ्या प्रत्येकांच्या दारात मोठ्या रुबाबात ठाण मांडून अभिमानानं उभ्या असतात सायंकाळी ५ ते ६ पर्यंत गुढ्यांचा हा सोहळा मन प्रसन्न करून जातो.

ग्रामीण भागातील गुढीपाडव्याचा वेगळाच उत्साह या सणाच्या रूपाने द्विगुणित करत असतो. परंतु हल्ली शहरी भागात, सिमेंटच्या जंगली वातावरणात गुढ्या उभ्या करायला जागाच शिल्लक राहिली नाही. किंबहुना गगनचुंबी इमारतीत राहणारी जनता अशा अनेक सण उत्सवाला मुकलेले दिसतात. हाताच्या बोटांवर मोजले जाणारे लोकं, तीन चार फुटांची काठी लाऊन आपल्या फ्लॅट पद्धतीच्या घरात म्हणजेच खिडकीत या गुढीच आयोजन करतात.

तेंव्हा दिवसभरात त्याला अडकवलेली साखरेची माळ घरातल्याच मुलांनी फस्त केलेली असते. केवळ मुलांना सांगण्यासाठी काही मराठी बांधव अशा गुढीचा अटापिटा करतात. एक रूढ, परंपरा म्हणूनच अशा शॉर्टकट गुढीपाडव्याचा आस्वाद घेतला जातो.

गुढीपाडव्याचे कारण आणि महत्व ! – Reasons And Importance Of Gudi Padwa in marathi

पाडवा म्हटलं की मांगल्याचा , चैतन्याचा , उत्साहाचा सण. पण त्यामागील कथेत अनेक कल्पना दंतकथा लपलेल्या आहेत. महाभारतातील कुरुक्षेत्रावरील युद्ध जिंकल्यावर देखील कौरवांचा पराभव करून जेंव्हा मोठे यश घेऊन पांडव परततात तेंव्हाही हस्तिनापुरमध्ये गुढ्या उभारुन पांडवांच स्वागत केलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा राजसिंहासनावर आरूढ होतात, उत्तरेकडील गागाभट्टांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराजयाभिषेक झाला होता, तेंव्हाही संपूर्ण देशवासियानी शिवरायांच्या स्वागतासाठी दारोदारी गुढ्या तोरणे उभारून हा सोहळा साजरा केला होता. अशा अनेक कारणांनी या गुढीला महत्त्व आहे.

आजकाल या कलियुगात वेगवेगळ्या कारणांनी गुढ्या उभारण्यासाठी प्रथा आहे. आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य करणारे इंग्रज जेंव्हा आपल्या देशाला मुक्त करून निघून गेले, असंख्य देशबांधवांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता, देशाला गुलामगिरीतून मुक्त केले, स्वतः देशासाठी शहीद झाले अन् आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यावेळीही संपूर्ण देशात फटाक्यांच्या रोषणाईने, वाद्यांच्या गजरात स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला होता. त्यावेळी संपूर्ण देशभर गुढ्या तोरणे बांधून स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला होता.

त्यामुळे या गुढीला आपल्या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावातील सुधारणा व्हावी, गाव स्वच्छ हवे म्हणून शासनाने, ग्रामस्वच्छता, आदर्श गांवांच्या संकल्पना रुजवल्या आहेत. अशावेळी  जेंव्हा प्रशासन त्या त्या गावांची पाहणी करण्यासाठी गावात येतात, त्यावेळीही गुढी उभारुन दारात रांगोळी काढून ‘अतिथी देवो भव’ चा साक्षात्कार निर्माण केला जातो.

आपल्या महाराष्ट्रात मुलाला शाळेत घालण्याचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडव्याच्या दिवसाचा मुहूर्त ठरवलेला असतो, नवीन महागडी वस्तू , गाडी, बंगला घेण्यासाठीही हाच दिवस शुभ मानला जातो असा हा गुढी पाडवा अनेक रूपांनी अनेक सौदर्यांनी नटून दाखल होतो.

2023 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या – gudi padwa wishes in Marathi

गुढीपाडव्यानिमित्त लवकरच सुरेख असे शुभेच्छा संदेश घेऊन येऊ.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर gudi padwa in Marathi  म्हणजेच गुढीपाडवा या सणाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या gudi padwa information in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि gudi padwa in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!