अक्षय तृतीया 2023 Akshay Tritiya Information in Marathi

Akshay Tritiya Information in Marathi अक्षय तृतीया मराठी माहिती अक्षयतृतीया हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आहे akshaya tritiya 2022 date. साडेतीन मुहूर्तापैकी एक. शास्त्रानुसार या दिवशी सत्ययुग आणी त्रेतायुग सुरुवात झाली असे मानले जाते. या दिवशी केलेले तप, दान हे अक्षय असते म्हणून याला “अक्षयतृतीया”असे म्हणतात. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा सन होय. या दिवशी लोक सोने, वाहन, कपडे अशा वस्तू खरेदी करतात कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तातील शुभ दिवस आहे.  बुधवार व रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेस येईल तो सर्वात उत्तम दिवस असे शास्त्रात सांगितले आहे.

या दिवशी दान देण्याची प्रथा असते कारण या दिवशी दानधर्म केल्यास आपले पुण्य वाढते असे मानले जाते म्हणून भुकेल्या व्यक्तीस अन्न तसेच गरिबांना वस्त्रे दान केली जातात. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती,  नरनारायण या जोड देवांची जयंती, बसवेश्वर जयंती, परशुराम जयंती असते. असे मानले जाते की या दिवशी सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीमध्ये असतात त्यामुळे या दिवशी केलेले कार्य हे शुभ मानले जाते. अक्षय तृतीया या सणाला आखाजीचा सण असे म्हटले जाते.

akshay tritiya information in marathi
akshay tritiya information in marathi

अक्षय तृतीया 2022 Date – Akshay Tritiya Information in Marathi

खांन्देशवासियांचा आवडता सण म्हणजे अक्षय तृतीया. खान्देशातील महिला वर्गांचा हा जिव्हाळ्याचा आणि भावनिक नाते असलेला सण म्हणून ओळखला जातो. अक्षय तृतीया पितरांचा सण असला तरी खान्देशात तो सासुरवाशिणी चा खास मौज-मस्ती चा सण म्हणून ओळखला जातो. सासुरवाशिणीना दोनदा माहेरी जाण्याचा योग येतो एक म्हणजे दिवाळी आणि दुसरे अक्षय तृतीया. आखाजी हा सण घरी आलेल्या सासुरवाशीनचा विसावाचा सन असतो. नवविवाहित तरुणीला तर या आखाजीचे वेध एक महिनाभर आधीच लागलेले असते. पहिल्या आखाजीला भाऊ आणि वडील सासुरवाशीण मुलीला घ्यायला येत असतात. त्यामुळे नवविवाहित मुली माहेरच्या लोकांची आतुरतेने वाट पाहत राहतात.  

खानदेशात मुलांची उन्हाळी सुट्टी ही आखाजीची सुट्टी म्हणूनच ओळखले जाते. दिवाळी इतकाच अक्षय तृतीया हा सण महत्त्वाचा मानला जातो कारण हा एक मुहूर्त आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी अक्षयतृतीया चा मुहूर्त साधतात. या सणाचा पुराणात देखील उल्लेख केले गेला आहे. या दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली अशी आख्यायिका देखील आहे. खान्देशाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अक्षय तृतीयेच्या संदर्भात असलेल्या ओव्या अक्षय तृतीया साजरा करणाऱ्या महिला झोपाळा खेळताना गुणगुणतात.    

आखाजीचा आखाजीचा मोलाचा सन देखा जी

निंबावरी निंबावरी बांधला छान झोका जी

माझा झोका माझा झोका चालला भिरभीरी जी

माझा झोका माझा झोका खेळतो वाऱ्यावरी जी

अक्षय तृतीया निमित्त सासुरवाशीन महिला माहेरी येतात. गौराईची विधिवत स्थापना करून झोपाळे खेळतात. या दिवशी घराघरात आमरस आणि पुरणपोळीचा बेत असतो. सासुरवाशीन महिला माहेरी येऊन पार्वतीचे रूप असलेल्या गौराची स्थापना करते. या गौराईची विधिवत पूजा केली जाते. शेंगदाणे, बोर, कापूस यांची माळ गौराईला लावण्यात येते. गौराई समोर पारंपारिक गीतांचा उखाणे घेण्याचा मजेशीर कार्यक्रम असतो. झोपाळे,  उखाणे उघड्या अशाप्रकारे आठ दिवस अक्षय तृतीयेचा सण साजरा होतो.

शेतीसंबंधी प्रथा

ज्येष्ठ आषाढ महिन्यात तयार होणारे धान्य अक्षय तृतीया या दिवशी दान करायचे असते. अक्षय तृतीयेचा मुहूर्त म्हणजे मंगल शुभकर दिवस असे मानले जाते. वास्तुशांतीसाठी तर हा दिवस विशेष होय. या दिवशी केलेले दान अक्षय टिकणारी असते. लोक या दिवशी पानपोई काढतात म्हणजे तहानलेल्या पांथराला जलदान करणे होय.पानपोई उभारण्यामागे जलदान करणे हा अर्थ असतो. काही लोक मांजरपोळ मध्ये जाऊन जनावरांना खाद्य देतात.

कृषीसंस्कृतीचा पालक बलराम होय. म्हणून काही लोक या दिवशी बलरामाची पूजा करतात. बलराम म्हणजे हलधर.हल म्हणजे नांगर.पाडव्याच्या मुहूर्तावर नांगरलेल्या जमिनीची मशागत करण्याचे काम अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण केले जाते कारण जमिनीतून भरभरून धान्य विकावे हीच शेतकरी वर्गाची भावना असते.

अक्षय तृतीयेदिवशी केली जाणारी कार्ये 

काही ठिकाणी स्त्रिया चैत्रगौरीची स्थापना करून हळदीकुंकू समारंभ करतात. हळदीकुंकवासाठी स्त्रियांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले, गजरा, कैरीचे पन्हे, भिजवलेले हरभरे देण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीया हार्दिक कुंकू करण्याचा शेवटचा दिवस असतो. अक्षय तृतीयेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणजे त्यांच्यामुळे आपणाला मनुष्यदेह मिळालेला आहे म्हणून पितरांचे स्मरण म्हणून पितरांच्या फोटोचे पूजन करून हार घालने, नैवेद्य दाखवणे तसेच त्यांच्या स्मरणात एक पाण्याचा कलश भरून तो कलश पाण्यासह दान करणे व वस्त्र देणे.

क्षय नाही तो अक्षय

दोन तिथि सूर्य मेळ

शुभारंभ हर्ष आनंद

भाग्याची अमृत्वेल

सत्ययुग त्रेतायुग

परशुराम हयग्रीव

नर नारायण जन्म

साडेतीन मुहूर्त ग

  

वैशाख शुद्ध तृतीया

धरतीची  फुले काया

उंच उंच झोके गेली

माहेरची गुढ माया

दान-धर्म गंगा स्नान

चैत्रगौरी विसर्जन

पितृ नी तीलतपर्ण

यथाशक्ती हे हवं

संकल्पित  शुद्ध कर्म

नामस्मरण पठाण

विष्णू सहित  लक्ष्मीचे

राहू अखंड स्मरण

अक्षय तृतीया महत्व

अक्षय तृतीया हा दिवस केवळ हिंदूच नव्हे तर जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन व पारशी लोक सुद्धा पाळतात. त्यांच्या परंपरांमध्ये या दिवसाला महत्त्व आहे. जैन धर्मामध्ये भगवान ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी वर्षभर तप केले. त्या काळात त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केले. त्यांच्या व्रताची समाप्ती झाल्यावर हस्तिनापूरच्या राजाने त्यांना उसाचा रस पाजला. हा दिवस अक्षय तृतीयेचा होता. या दिवशी जैन समाजात व्रत केले जाते. या दिवसाला आखातीज असे म्हटले जाते. पुराणात सांगितलेल्या वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर जमिनीत लावल्या तर त्या वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. या वनस्पती अक्षय मिळतात. या दिवशी सातूचे महत्त्व असते त्याचे सेवन करतात.

अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक शुभ दिवस असल्यामुळे पितरांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करावी जरुरी असलेल्या गरीब लोकांना दानधर्म करावे व शुभ दिवस असल्यामुळे सोने-चांदी वगैरे खरेदी करावे असे अनेक प्रकार वैशिष्ट्य असलेला हा दिवस मानला जातो. या दिवशी खरेदी केलेले सोने कधीच संपत नाही. कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वतः त्यांची रक्षा करतात असे समजले जाते.

अक्षय तृतीयाचे महत्व जेव्हा युधिष्टरने श्रीकृष्णाला विचारले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ही तिथी खूप पुण्यमय आहे. या दिवशी दुपारच्या अगोदर अंघोळी, जप,  तप, होम किंवा दान करणारा पुण्याचा भागीरथी होतो या दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात होते. याच्या वर आधारित एक कथा सुद्धा आहे.

प्राचीन काळात देव, ब्राह्मनावर श्रद्धा असणारा धर्मदास नावाचा एक वैश्य होता. त्याचे कुटुंब खूप मोठे होते. त्यामुळे तो सतत व्याकूळ राहायचा. त्याने दुसऱ्यांच्या कडून या व्रताचे महत्त्व ऐकले. काही दिवसांनी जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने गंगास्नान केले. नंतर देवी देवतांची पूजा केली. लाडू, पंखा, पाण्याने भरलेले कलश, गहू, मीठ, दही, तांदूळ, गुळ, सोने तसेच वस्त्र इत्यादी वस्तू ब्राह्मणाला दान केल्या. त्याची पत्नी सतत त्याला हे करण्यापासून रोखत होती आणि तो आजारीपण होता पण त्याने धर्म-कर्म आणि पुण्य दान करण्यापासून तो कधीही मागे फिरला नाही आणि त्यामुळेच हा वैश्य दुसऱ्या जन्मामध्ये कुशावतिचा राजा बनला. अक्षय तृतीयेला केलेल्या दानामुळे तो खूप धनवान आणि प्रतापी राजा बनला. एवढा धनवान असून तो कधीच आपल्या धर्मापासून विचलित झाला नाही.

अक्षय तृतीया 2022 date – akshaya tritiya 2022

शुक्रवार 14 मे 2021

अक्षय तृतीया पूजा मुहूर्त 

सकाळी 6 वाजून 4 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 35 मिनिटापर्यंत 
कालावधी: 06 तास 31 मिनिटे 

अक्षय तृतीया का साजरा केला जातो?

हिंदूंनी हा दिवस साजरा केला कारण त्यांच्या मते, अक्षय तृतीया हा दिवस आहे जेव्हा विस्डमचे महान देव, भगवान गणेश यांनी “महाभारत” नावाची महाकाव्य लिहिण्यास सुरवात केली. अक्षय तृतीया हा वर्षाचा सर्वात सुवर्ण दिवस मानला जातो कारण अक्षया या शब्दाचा अर्थ सर्वात “शाश्वत” असतो जो कधीही कमी होत नाही.

आम्ही दिलेल्या akshaya tritiya 2022 date माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर akshay tritiya in Marathi  म्हणजेच अक्षय तृतीयाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या akshay tritiya information in marathi language या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि akshaya tritiya marathi mahiti माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!