गुलाब जामुन रेसिपी मराठी Gulab Jamun Recipe in Marathi

Gulab Jamun Recipe in Marathi – khavyache gulab jamun गुलाब जामुन रेसिपी मराठी गुलाब जामून या पदार्थाचे नाव घेताच कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण हा पदार्थ तितकाच स्वादिष्ट आणि मधुर असतो. गुलाब जामून हा एक गो पदार्थ असून हा पदार्थ भारतामध्ये खूप आवडीने खाल्ला जातो आणि हा पदार्थ भारतातील लोकप्रिय गोड पदार्थांपैकी एक आहे. गुलाब जामून हि डिश भारतातील सर्वात जुन्या गोड डिशमधील एक आहे, म्हणून हा डिशला भारतातील पारंपारिक डिश म्हणून ओळखले जाते. आता वेगवेगळ्या प्रकारे गुलाब जामून पदार्थ बनवला जातो पण पूर्वीच्या काळी खव्यापासून बनवला जाणारा गुलाब कामान प्रकार खूप स्वादिष्ट लागतो

आणि आज देखील कित्येक लोक गुलाब जामून बनवण्यासाठी हीच पध्दत वापरतात. गुलाब जामून हा पदार्थ भारतातील अतिशय लोकप्रिय पदार्थ असून हा पदार्थ विवाह सोहळ्यामध्ये, पार्ट्यांमध्ये, सणांच्यामध्ये आणि इतर काही आनंदाच्या समारंभामध्ये बनवले जातात. तसेच हि डिश अशी आहे कि आपण हि रात्रीच्या जेवणासोबत किंवा जेवण झाल्यानंतर देखील खावू शकतो.

गुलाब जामनचे गोळे हे खवा किंवा मावा या पसून बनलेले असतात आणि ते गोळे तळून ते पाकामध्ये घातले जातात. भारतामध्ये असणाऱ्या या लोकप्रिय पदार्थाची आज आपण या लेखामध्ये रेसिपी पाहणार आहोत.

gulab jamun recipe in marathi
gulab jamun recipe in marathi

गुलाब जामुन रेसिपी मराठी – Gulab Jamun Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ४५ मिनिटे
पाककलाभारतीय

गुलाबजामुन ची माहिती ?

गुलाब जामनचे गोळे हे खवा किंवा मावा या पसून बनलेले असतात आणि ते गोळे तळून ते पाकामध्ये घातले जातात.

गुलाब जामून कसे बनवतात – how to make gulab jamun recipe in marathi

गुलाब जामून हा एक भारतामध्ये खूप खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि हा पदार्थ आपण अगदी सोप्या पध्दतीने घरामध्ये बनवू शकतो. सध्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये गुलाब जामून हा पदार्थ वेगवेगळ्या पध्दतीने बनवला जातो पण गुलाब जामून हा पदार्थ बनवण्याची पारंपारिक पध्दत म्हणजे आपण गुलाब जामून मध्ये खवा वापरून गुलाब जामून बनवणे.

खवा हा आपण घरामध्ये देखील बनवू शकतो किंवा आपण खवा बाजारातून देखील अनु शकतो. चला तर मग पाहूयात घरच्या घरी स्वादिष्ट आणि मधुर गुलाब जामून कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ४५ मिनिटे
पाककलाभारतीय

गुलाब जामून बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make gulab jamun 

गुलाब जामून बनवण्यासाठी जे साहित्य ( खवा सोडून ) लागते ते बहुतेक घरामध्ये उपलब्ध असू शकते आणि जर नसेल तर आपण बाजारातून विकत अनु शकतो आणि आपण जो गुलाब जमून बनवण्यासाठी खवा वापरणार आहोत तो खवा देखील आपण बाजारातून विकत अनु शकतो किंवा घरी बनवू शकतो हे आपल्यावर अवलंबून असते. आता आपण पाहू गुलाब जामून बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

 • अर्धा किलो खवा ( घरगुती किंवा बाजारातून विकत आणलेला ).
 • अर्धी वाटी मैदा.
 • अर्धा किलो साखर.
 • अर्धा लिटर पाणी.
 • १ चमचा वेलची पावडर.
 • तेल ( तळण्यासाठी ).

गुलाब बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make gulab jamun recipe 

आता आपण पाहूयात गुलाब जमान कसे बनवतात आणि ते बनवण्यासाठी केली जाणारी कृती.

कृती १ : पाक बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

 • सर्वप्रथम एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये अर्धा किली साखर घालून त्यामध्ये अर्धा लिटर पाणी घ्या.
 • आणि हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि साखर विरघळेपर्यंत ते ढवळत रहा. मग त्यामध्ये थोडी वेलची पावडर घालून ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
 • मग ते थोडे शिजवा म्हणजेच याचा कच्चा पाक बनवून गॅस बंद करा.
 • तुमचा पाक तयार झाला, आता हा थोडा वेळ बाजूला ठेवा.

कृती २ : गुलाब जामून बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

 • सर्वप्रथम एका मोठ्या बाऊल मध्ये खवा घ्या आणि तो चांगला मळून एकजीव करून घ्या.
 • मग त्यामध्ये अर्धी वाटी मैदा घाला आणि खवा आणि मैद्याचे मिश्रण चांगले एकत्र करून मळून घ्या.
 • ते मळलेल पीठ १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा त्यामुळे मैदा खव्यामध्ये चांगला मिक्स होईल.
 • १० ते १५ मिनिटांनी त्या खव्याचे छोटे छोटे म्हणजेच पेढ्या एवढे गोळे करून घ्या. असे सर्व पीठाचे गोळे करून घ्या.
 • तळण्या अगोदर सर्व गोळे बनवून घ्या त्यामुळे गोळे तळताना सर्व गोळे एकदम तळता येतील.
 • आता एका कढईमध्ये गोळे तळण्यासाठी तेल घाला आणि ते मोठ्या आचेवर गरम करा आणि तेल गरम झाले कि गॅसची आच मध्यम करा आणि त्यामध्ये एक एक करून तेलामध्ये जितके गोळे मावतील तितके गोळे टाकून ते गोळे लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्या.
 • कढईतील तेलामध्ये ४ ते ५ गोळे टाका आणि ते टाळून घ्या म्हणजेच कढईमध्ये जास्त गोळ्यांची गर्दी करू नका.
 • अश्या प्रकारे सर्व गोळे बॅच मध्ये तळून घ्या.
 • तेलातील गोळ्यांना लालाल्सार रंग आला कि ते गोळे तेलातून काढून टीस्यू पेपर वर काढावे त्यामुळे गोळ्यांच्या मधील जास्तीचे तेल निघून जाई.
 • आता हे गोळे थोडे गार झाले कि ते पाका मध्ये टाका आणि ते पाकमध्ये हलक्या हाताने चांगले एकत्र करा आणि ते ३० मिनिटांच्यासाठी पाकामध्ये मुरु द्या.
 • तुमचे गुलाब जामून खाण्यासाठी तयार झाले.

घरगुती पध्दतीने खवा कसा बनवावा – how to make home made khawa in marathi

घराच्या घरी खवा बनवणे खूप सोपे आहे, आपल्या खवा बनवण्यासाठी १ लिटर किंवा २ लिटर दुधाची आवश्यकता असते. १ लिटर दुधापासून पाव किलो खवा बनू शक्ती तर २ लिटर दुधामध्ये अर्धा किलो खवा बनू शकतो.

 • सर्वप्रथम एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये १ लिटर दुध घाला आणि ते गॅसवर मोठ्या आचेवर ठेवा आणि दुध एकदा चांगले उकळून घ्या.
 • दुध चांगले उकळून घेतल्यानंतर गॅसची आच मंद करून ते दुध सतत ढवळत राहून ते चांगले घट्ट गोळा होईपर्यंत शिजवा.
 • दुधाचा घट्ट गोळा झाला कि समजायचे कि आपला खवा तयार झाला.

गुलाब जामून उत्तम बनण्यासाठी दिलेल्या काही टिप्स – tips to make perfect gulab jamun 

 • आपण गुलाब जामून बनवण्यासाठी लागणारा खवा घरी देखील बनवू शकतो आणि तुम्हाला घरी बनवण्यास वेळ नसेल तर बाजारातून विकत अनु शकतो.
 • बाजारातून विकत आणलेला खवा ताजा असावा.
 • खव्यामध्ये प्रमाण वापरून जर मैदा घातला तर गुलाब जामून फुटणार नाहीत त्यामुळे रेसिपी मध्ये वरती सांगितले आहे तितकेच मैद्याचे प्रमाण अर्धा किलो खव्यासाठी वापरा.

आम्ही दिलेल्या gulab jamun recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुलाब जामुन रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rava gulab jamun recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि milk powder gulab jamun recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ravyache gulab jamun recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!