गुरु ठाकूर यांची माहिती Guru Thakur Information in Marathi

guru thakur information in Marathi गुरु ठाकूर यांची माहिती, भारतीय संगीत क्षेत्रामध्ये असे अनेक गीतकार, नाटककार होऊन गेले आणि आज देखील अनेक नाटककार, संगीतकार आणि चित्रपट अभिनेते आपली छाप या क्षेत्रामध्ये सोडत आहेत आणि अश्याच गीतकार, पटकथा लेखक, नाटककार आणि अभिनेता म्हणून ओळख असणारे गुरु ठाकूर यांच्या विषयी आज आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. गुरु ठाकूर यांचा भारतातील महाराष्ट्र जिल्ह्यातील मुंबई या शहरामध्ये १८ जुलै १९६८ मध्ये झाला.

आणि त्यांनी जरी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात हि व्यंगचित्रकार म्हणून केली असली तरी त्यांनी नंतर गीतकार, पटकथा लेखक, नाटककार, कवी आणि अभिनेता म्हणून देखील आपली कामगिरी बजावली आणि त्यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची कामगिरी केल्यामुळे त्यांना त्या क्षेत्रातील काही सर्वोच्च पुरस्कार देखील मिळाले.

गुरु थकून यांनी त्यांचे वैचारिक किंवा मुलभूत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या सुरुवातीस लेखक म्हणून करियरला सुरुवात केली होती. गुरु ठाकूर यांनी मुख्यता मराठीमध्ये काम केले आणि तसेच त्यांनी मराठी भाषेसोबत हिंदी भाषेसाठी देखील काम केले. त्यांनी प्रमुखता गीतकार म्हणून आपली कामगिरी बजावली आणि त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्यापैकी मला वेड लागले, मल्हार वारी, माऊली माऊली हि गाणी आहेत आणि या गाण्यांच्यासोबत त्यांनी इतर गाणी देखील लिहिली.

गुरु ठाकूर यांची गीतकार म्हणून जरी ओळख असली तरी त्यांनी आपण वर सांगितल्या प्रमाणे पटकथा लेखन, नाटककार आणि अभिनेता म्हणून देखील काम केले आणि अभिनेता म्हणून काम करत असताना यांनी सुरुवातीला रंगमंचावर अभिनय करत असताना एक एकांकिका करताना गाणे हवे होते म्हणून त्यांनी गाणे देखील लिहिले आणि म्हणून त्यांना कवी आणि गीतकार म्हणून देखील ओळखले जाते.

guru thakur information in marathi
guru thakur information in marathi

गुरु ठाकूर यांची माहिती – Guru Thakur Information in Marathi

नावगुरु ठाकूर
जन्म१८ जुलै १९६८
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील मुंबई
ओळखनाटककार, पटकथा लेखन, गीतकार, कवी आणि अभिनेता

गुरु ठाकूर यांच्याविषयी माहिती – guru thakur biography in marathi

गुरु ठाकूर यांचा जन्म भारतातील महाराष्ट्र जिल्ह्यातील मुंबई या शहरामध्ये १८ जुलै १९६८ मध्ये झाला आणि त्यांनी त्यांचे सर्व शालेय शिक्षण हे मुंबई मधेच केले. त्यांनी त्यांचे वैचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात हि लेखक म्हणून केली आणि नंतर त्यांनी नाटककार, पटकथा लेखन, गीतकार, कवी आणि अभिनेता म्हणून देखील कामगिरी केली. त्यांनी मराठी भाषेमध्ये तर काम केलेच परंतु त्यांनी मराठी सोबत हिंदी भाषेमध्ये देखील काम केले आणि आपला वेगळाच ठसा उमटवला.

गुरु ठाकूर यांची कारकीर्द

गुरु ठाकूर यांनी मराठी साहित्यानाध्ये मोलाची कामगिरी बजावली आणि त्यांनी मराठी सोबत हिंदी भाषेसाठी देखील काम केले आणि आपण खाली त्यांच्या लिखाणाच्या क्षेत्रातील कामगिरी बद्दल पाहणार आहोत. त्यांना गीतकार, कवी, अभिनेत्रा, पटकथा लेखक म्हणून ओळखले जात होते.

  • मल्हार वारी, माऊली माऊली आणि मला वेढ लागले या सारखी अनेक प्रसिध्द गाणी लिहिली.
  • त्यांनी २०१० मध्ये झालेल्या असंभव मालिकेसाठी तसेच २०१० मध्ये झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या कुलवधू मालिकेसाठी त्यांनी गीत लिहिले होते.
  • श्रीयुक्त गंगाधर टिपरे या साठी लेखन देखील केले होते आणि गीत देखील दिले होते.
  • त्यांनी गोलमाल, आग बाई अरेच्चा, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, टाईमपास, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव, क्षणभर विश्रांती, मर्मबंध, लालबाग परळ अश्या प्रकारच्या अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी गीत दिले.
  • अभिनेता म्हणून काम करत असताना यांनी सुरुवातीला रंगमंचावर अभिनय करत असताना एक एकांकिका करताना गाणे हवे होते म्हणून त्यांनी गाणे देखील लिहिले
  • नटरंग, मर्मबंध आणि आग बाई अरेच्चा या चित्रपटासाठी संवाद लेखन देखील केले.

गुरु ठाकूर यांनी लिहिलेली काही प्रसिध्द गाणी – guru thakur poems in marathi

गुरु ठाकूर यांनी गीतकार म्हणून मराठी भाषेमध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आणि त्यांनी लिहिलेली काही गाणी म्हणजे मला वेड लागले, मल्हार वारी, माऊली माऊली, नवरी आली, कातरवेळी बसलो होतो, देवाक काळजी रे, तू बुद्धि दे तू तज दे, अप्सरा आली, खेळ मांडला, हे राजे जी रं जी रं, तोळा तोळा, नटरंग उभा, हि पोरी साजूक, मार्तंड मल्हारी, उसवले धांगे इत्यादी.

गुरु ठाकूर यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts

  • गुरु ठाकूर यांचा भारतातील महाराष्ट्र जिल्ह्यातील मुंबई या शहरामध्ये १८ जुलै १९६८ मध्ये झाला.
  • गुरु ठाकूर यांची मराठी साहित्य क्षेत्रामध्ये गीतकार, पटकथा लेखक, नाटककार, कवी आणि अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये मनाला हरपून टाकणारे गीत लिहिले आणि अनेक प्रकारचे लेखन केले.
  • त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्यापैकी मला वेड लागले, मल्हार वारी, माऊली माऊली, खेळ मांडला, देवाक काळजी इत्यादी गाणी आहेत.
  • त्यांनी नटरंग, टाईम पास, मर्मबंध, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव, शिक्षणाच्या आईचा घो, झेंडा, क्षणभर विश्रांती या सारख्या चित्रपटांच्यासाठी काम केले.
  • त्यांनी मराठी साहित्यांमध्ये तर कामगिरी केलीच परंतु त्यांनी मराठी सोबत हिंदीभाषेसाठी देखील काम केले आणि ह्या या महत्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले.

गुरु ठाकूर यांना मिळालेले पुरस्कार

  • गुरु ठाकूर यांना त्यांच्या नाटककार म्हणून कामगिरीला २००८ ते २००९ च्या दरम्यान मुंबई मराठी साहित्य संघ पुरस्कार मिळाला आणि त्यांना हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट नाटकर म्हणून मिळाला होता.
  • सण २०१० मध्ये त्याना नटरंग या चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी चित्रपती व्ही शांताराम हा पुरस्कार मिळाला होता.
  • त्यांना २००९ मध्ये नटरंग चित्रपटासाठी काल्गौराव पुरस्कार मिळाला होता जो सर्वोत्कृष्ट गीतकारासाठी होता.
  • नाटक भैया हातपायपसरी या नाटकासाठी त्यांना विनोदी नाट्यलेखन म्हणून नाटककार बबन प्रभू स्मृती पुरस्कार मिळाला होता.

आम्ही दिलेल्या guru thakur information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुरु ठाकूर यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या guru thakur poems in marathi या guru thakur kavita in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि guru thakur biography in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!