ग्वाल्हेर किल्ला माहिती मराठी Gwalior Fort Information in Marathi

gwalior fort information in marathi ग्वाल्हेर किल्ला माहिती मराठी, भारतामध्ये असे अनेक जुने किल्ले आहेत ज्यांच्या वास्तू रचनेने आणि पर्यटकांना आज देखील प्रेमात पाडले आहे आणि तसाच एक खूप जुना पण भव्य वास्तू कला असणारा किल्ला म्हणजे ग्वाल्हेर किल्ला आणि आज आपण या लेखामध्ये ग्वाल्हेर किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ग्वाल्हेर हा किल्ला भारतातील मध्य प्रदेश राज्यामधील एक जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे आणि या किल्ल्याची रचना हि अति अद्भुत आणि या डोंगरी प्रकार असणाऱ्या किल्ल्यावर अनेक राजवंशांनी राज्य केले.

ग्वाल्हेर हा किल्ला ३ चौरस किलो मीटरच्या परिसरामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याची उंची १० मीटर पेक्षा उंच आहे आणि हा किल्ला डोंगरमाथ्यावर बांधलेला आहे. या किल्ल्याची भव्य रचना हि प्रामुख्याने वाळूच्या दगडांच्यापासून बांधलेले आहे आणि त्यामध्ये बांधलेली असंख्य मंदिरे आणि राजवाडे इतर साहित्य प्रदर्शित करतात. खाली आपण ग्वाल्हेर या किल्ल्याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

gwalior fort information in marathi
gwalior fort information in marathi

ग्वाल्हेर किल्ला माहिती मराठी – Gwalior Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावग्वाल्हेर किल्ला
संस्थापकसम्राट राजा सुरज सेन पाल
परिसर३ चौरस किलो मीटर
उंची१० मीटर पेक्षा अधिक
प्रकारडोंगरी किल्ला

ग्वाल्हेर किल्ल्याचा इतिहास – gwalior fort history in marathi

ग्वाल्हेरचा किल्ला हा तात्कालिक सत्ताधारी सम्राट राजा सुरज सेन पाल यांनी स्थापन केला होता आणि त्या राजाचा कुष्टरोग बरा करणारा ग्वालीपा या ऋषीच्या सन्मानार्थ या किल्ल्याला नाव दिले होते. १०२२ या काळामध्ये या किल्ल्याची लोकप्रियता इतकी उंचीवर गेली होती कि गझनीच्या मोहम्मदने सलग चार दिवस त्यावर हल्ला केला होता.

तसेच या किल्ल्यावर मानसिंग तोमर आणि तोमर घराण्याने देखील काही काळ राज्य केले आणि मान सिंग तोमर याच्या कालावधीमध्ये त्याने किल्ल्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. १६ व्या शतकामध्ये या किल्ल्याचा ताबा हा तोमर घराण्याने गमावला आणि मग तो नंतर मुघलांच्या हातात गेला आणि नंतर मराठ्यांनी एका विशिष्ट कालावधीसाठी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

ग्वाल्हेर किल्ल्यामध्ये पाहण्यासारखी ठिकाणे

ग्वाल्हेर किल्ला हा सर्वात जुना किल्ला आहे आणि या किल्ल्यावर आपल्याला अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात जसे कि लेणी, राजवाडे, मंदिरे आणि इतर.

  • प्रवेश दरवाजा : प्रवेश दरवाजा हि कोणत्याही किल्ल्याची एक महत्वाची आणि भव्य वास्तु असते आणि तसेच या किल्ल्याला देखील दोन भव्य असे प्रवेश दरवाजे आहेत ते म्हणजे उर्वई गेट आणि हाती पोळ.
  • तेली मंदिर : तेली मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे जे मिहिरी भोज या राज्याच्या काळामध्ये बांधले होते. तेली मंदिर हे या किल्ल्यातील सर्वात प्रसिध्द वास्तूशिल्पीय रत्नापैकी एक आहे आणि हे पूर्णपणे प्राचीन द्रविडीयन शैलीमध्ये बांधले गेले आह.
  • मान मंदिर महल : मान मंदिर महल देखील या किल्ल्यावरील एक आकर्षक ठीकानापैकी एक आहे आणि हा महल बहुतेक राजा मान सिंगच्या काळामध्ये बांधला आहे. या महालामध्ये एक मोठे अॅम्फीथीएटर आहे. ज्या ठिकाणी दररोज संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो आयोजित केला जातो. मान मंदिर महल हे १५ व्या शतकामध्ये बांधलेले आहे.
  • गुजरी महल : गीजारी महल हा देखील मानसिंग तोमरच्या कारकीर्दीमध्ये १५ व्या शतकामध्ये मान सिंग तोमर यांच्या पत्नी मृगनयनी याच्यासाठी बांधला होता. गुजरी महल मध्ये धर्मग्रंथ, कलाकृती आणि मूर्ती पहायला मिळतात.
  • गोपाचक : गोपाचक हे त्या काळातील कारागीरांच्या अप्रतिम कलात्मक कौशल्याची साक्ष देणाऱ्या खडकांच्यावर उत्कृष्ट असे नक्षीकाम आहे आणि हे ठिकाण पाहताच पर्यटक नक्कीच त्याच्या प्रेमामध्ये पडतील.
  • विक्रम महल : विक्रम महल हा देखील या किल्ल्यातील एक राजवाडा आहे आणि हा राजवाडा पहिल्या तोमरचा विक्रमादित्य सिंग यांच्या राजवटीमध्ये बांधण्यात आला होता.
  • जैन मंदिर लेणी : या किल्ल्यावर अनेक जैन मंदिर लेणी आहेत ज्या आणि या सर्व मंदिर लेण्यांच्यापैकी सर्वात प्रसिध्द लेणी म्हणजे सिध्दाचल लेणी आणि ह्या लेण्या ५०० ते ७०० वर्षापेक्षा अधिक जुन्या आहेत आणि या ठिकाणी सर्वात जास्त भेट दिलेली मूर्ती हि आदिनाथाची आहे आणि ते एक प्रसिध्द तीर्थकार होते.

ग्वाल्हेर किल्ल्याविषयी मनोरंजक तथ्ये – facts

  • ग्वाल्हेर किल्ल्यामध्ये जो शिलालेख आहे तो शिलालेख हा १५०० वर्ष जुना आहे.
  • ग्वाल्हेर किल्ल्यातील मंदिराच्या कोरीव कामामध्ये गणितातील शून्याचा दुसरा सर्वात जुना संदर्भ दिसतो.
  • ग्वाल्हेर हा किल्ला ३ चौरस किलो मीटरच्या परिसरामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याची उंची १० मीटर पेक्षा उंच आहे.
  • १६ व्या शतकामध्ये हा किल्ला मुघलांनी आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर हा किल्ला मराठ्यांनी आपल्या ताब्यात काही काळासाठी घेतला.
  • गुजरी महल हे ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर १५ व्या शतकामध्ये मानसिंग तोमर याच्या कारकीर्दीमध्ये तत्याच्या पत्नीसाठी बांधला.
  • ग्वाल्हेर या किल्ल्याला भेट देण्यासाठीचा उत्तम काळ म्हणजे ऑगस्ट ते मार्च हा आहे.
  • ज्यावेळी हा किल्ला अकबराच्या ताब्यात होता त्यावेळी या किल्ल्याचा वापर तुरुंग आणि गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी केला जात होता.

टिप्स

  • ग्वाल्हेरचा किल्ला पाहण्यासाठी एक निश्चित वेळ ठरलेली आहे आणि ती म्हणजे सकाळी ७ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत हा किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी खुला असतो.
  • हा किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जातात आणि ते भारतीयांच्यासाठी ७५ रुपये प्रती व्यक्ती आहे आणि परदेशी पर्यटकांच्यासाठी २५० रुपये प्रती व्यक्ती आहे.
  • ग्वाल्हेरचा किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी ३ ते ४ तास लागू शकतात.
  • या ठिकाणी १५ वर्षाखालील मुलांना हा किल्ला पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो.

ग्वाल्हेर किल्ला पाहण्यासाठी कसे जायचे – how to reach

  • सध्या दिल्ली आणि इंदूर ते ग्वाल्हेर पर्यंत आठवड्यात सात दिवस दररोज उड्डाणे आहेत. त्यामुळे तुम्ही दिल्ली किंवा इंदूर मधून आपण विमानाने ग्वाल्हेर किल्ल्याला भेट देण्यासाठी येऊ शकतो.
  • दिल्ली मुंबई किंवा दिल्ली चेन्नई या मार्गावर ग्वाल्हेरला जाण्यासाठी ट्रेन आहेत त्यामुळे आपण ट्रेनने जाऊ देखील हा किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो.

आम्ही दिलेल्या gwalior fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ग्वाल्हेर किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gwalior fort history in marathi या gwalior fort information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gwalior fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gwalior fort information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!