IBPS परीक्षा माहिती IBPS Exam Information In Marathi

IBPS Exam Information In Marathi आईबीपीएस परीक्षा बँकिंग क्षेत्र हे तस पहायला गेलं तर कॉमर्स इंडस्ट्रीजशी जास्त निगडित आहे. पण सध्या कोणीही पदवी प्राप्त विद्यार्थी हा बँकिंग क्षेत्रात आपले करिअर अत्यंत सुरळीत बनवू शकतो. आय. बी. पी. एस. हि एक अशी संस्था आहे की जे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी परीक्षा भरवते व व त्याद्वारे विद्यार्थ्यांची निवड करून घेतली जाते. तर, बँक क्षेत्र हे अश्या स्वरूपाच क्षेत्र आहे जिथे आपण आपल्या जीवनाला एक सुंदर प्रकारे दिशा देवू शकतो. बँकिंग क्षेत्रात खासगी, सहकारी व सार्वजनिक (राष्ट्रीयीकृत) असे सध्या तीन प्रकार आहेत. 1990 नंतर च्या काळात आर्थिक उदारीकरणाच्या, खासगीकरणाच्या काळात खासगी बँकांविषयी आकर्षण वाढलं होतं.

banking exam information in marathi वेतनाचे मोठे आकडे हेच यामागचं मुख्य कारण होतं. चला तर जाणून घेवूया बँकेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना आपणास कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, तसेच ह्या मार्फत आपण कोणकोणत्या परीक्षा देऊ शकतो तसेच कोणकोणती पदे मिळवू शकतो ते आपण पाहू.

ibps exam information in marathi
ibps exam information in marathi
अनुक्रमणिका hide
1 IBPS परीक्षा माहिती – IBPS Exam Information In Marathi

IBPS परीक्षा माहिती – IBPS Exam Information In Marathi

आईबीपीएस म्हणजे काय – ibps full form in marathi

आय. बी. पी. एस. हि एक अशी संस्था आहे की जे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी परीक्षा भरवते व व त्याद्वारे विद्यार्थ्यांची निवड करून घेतली जाते. IBPS चा फुल फॉर्म: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute Of Banking Personnel Selection) 

स्वरूप

आज राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विविध पदांसाठी हजारो करिअरच्या संधी सर्वसामान्यांसाठी निर्माण झाल्या आहेत. येत्या काही वर्षांत हे चित्र असेच कायम असेल. देशात सध्या 26 राष्ट्रीयीकृत बँका आहेत. ज्यामध्ये विविध पदांसाठी भरती होत असते. मोठ्या प्रमाणावर भरती ही लिपीक पदे व प्रोबेशनरी ऑफिसर्ससाठी होते. याबरोबरीनेच लॉ ऑफिसर्स, आय.टी. ऑफिसर्स, क्रेडिट ऑफिसर्स, सुरक्षा अधिकारी, ग्राहक संपर्क अधिकारी, हिंदी भाषा अधिकारी इ. पदांसाठीदेखील भरती होते.

प्रत्येक बँक आपापली वेगळी परीक्षा भरवते त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षातून खूप वेळा परीक्षा देण्याची संधी मिळते. परंतु सध्या २६ पैकी २० बँकांनी (स्टेट बँक ऑफ इंडिया व त्यांच्या सहयोगी बँका आदी वगळून) एकत्र येऊन सामायिक लिपिक परीक्षा, सामायिक प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा व सामायिक स्पेशालिस्ट ऑफिसर परीक्षा २०११ पासून सुरू केली आहे.

याचाच अर्थ २० राष्ट्रीयीकृत बँकांसाठी एकाच लेखी परीक्षेला उमेदवारांना सामोरे जावे लागेल. या परीक्षा घेण्याचे काम इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) ही संस्था करीत आहे. सामायिक लेखी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज संस्थेच्या वेबसाइटवर ऑनलाइन भरावे लागतात. प्रवेश अर्ज भरण्याबाबत तसंच परीक्षा शुल्क भरण्याबाबतची सर्व माहिती संस्थेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे- (www.ibps.in)

परिक्षेत सहभागी असलेल्या 20 राष्ट्रीयकृत बँका

banking exam information in marathi: अलाहाबाद बँक, इंडियन ओवरसीज बँक, आंध्र बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब अॅण्ड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंडिकेट बँक, कॅनरा बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, देना बँक, विजया बँक, इंडियन बँक, आय.डी.बी.आय बँक.

पदे

प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनेजमेंट ट्रेनी, लिपिक, स्पेशालिस्ट ऑफिसर्सची पदे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तांत्रिक (टेक्निकल) अधिकारी, विधी (लॉ) अधिकारी, राजभाषा (हिंदी) अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, मनुष्यबळ विकास (एच.आर.)/कार्मिक (पर्सोनेल) अधिकारी, माहिती तंत्रज्ञान अधिकारी (स्केल-२), विधी (लॉ) अधिकारी (स्केल – २), चार्टड अकाऊंटन्ट (स्केल -२), फायनान्स एक्झिक्युटिव्ह (स्केल -२), पणन (मार्केटिंग) अधिकारी.

पात्रता

प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनेजमेंट ट्रेनी

  • विद्यार्थी कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर असावा.
  • त्याची वयोमर्यादा ही किमान २० वर्षे व कमाल ३० वर्षे (ओ.बी.सी.साठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे तर अनुसूचित जाती/जमातीसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे) असावी.

लिपिक संवर्ग

  • विद्यार्थी हा मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर असावा. तसेच ज्या राज्यासाठी उमेदवार प्राधान्य देणार आहे त्या राज्याची भाषा त्याला येणे आवश्यक आहे. (उदा. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा येणे गरजेचे आहे.)
  • विद्यार्थ्यांची किमान वयोमर्यादा २० वर्षे असून खुल्या वर्गासाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे. (अनुसूचित जाती/जमातींसाठी ३३ वर्षे, ओबीसींसाठी ३१ वर्षे इतकी आहे.)

स्पेशालिस्ट ऑफिसर

माहिती तंत्रज्ञान अधिकारी

  • ह्यासाठी वयोमर्यादा ही किमान २० वर्षे, कमाल ३० वर्षे आहे.
  • शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान या विषयातील पदवी वा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

तांत्रिक (टेक्निकल) अधिकारी

  • वयोमर्यादा ही किमान २० वर्षे, कमाल ३० वर्षे आहे. २) शैक्षणिक पात्रता – इंजिनियरींगमधील खालील विषयातील पदवी आवश्यक आहे.

विधी (लॉ) अधिकारी

  • वयोमर्यादा – किमान २० वर्षे, कमाल ३० वर्षे आहे.
  • शैक्षणिक पात्रता – विधी विषयातील पदवी आवश्यक

राजभाषा (हिंदी) अधिकारी

  • वयोमर्यादा – किमान २० वर्षे, कमाल ३० वर्षे आहे.
  • शैक्षणिक पात्रता – एम.ए. (हिंदी) तसेच पदवीस्तरावर इंग्रजी विषय घेतलेला असणे आवश्यक किंवा एम.ए. (संस्कृत) तसेच पदवीस्तरावर हिंदी व इंग्रजी विषय घेतलेले असणे आवश्यक.

कृषी क्षेत्र अधिकारी

  • वयोमर्यादा – किमान २० वर्षे, कमाल ३० वर्षे. शैक्षणिक पात्रता – कृषी वा त्यासंबंधीत क्षेत्रातील पदवीधर (हॉर्टीकल्चर, पशुवैद्यकीय, डेअरी सायन्स, कृषी अभियांत्रिकी, फिशरीज सायन्स वगैरे)

मनुष्यबळ विकास (एच.आर.)/कार्मिक (पर्सोनेल) अधिकारी

  • वयोमर्यादा – किमान २० वर्षे, कमाल ३० वर्षे आहे.
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर व खालील विषयांपैकी किमान एका विषयात ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त संस्थेतून पदव्युत्तर पदवी वा पदविका प्राप्त असणे आवश्यक. (पर्सोनेल मॅनेजमेंट/इंडस्ट्रीयल रिलेशन्स/मनुष्यबळ विकास/ सोशल वर्क/ लेबर लॉ) किंवा बिझनेस मॅनेजमेंट/अॅडमिनीस्ट्रेशनमधील पदवी किंवा पदविका (मनुष्यबळ विकासातील स्पेशलायझेशनसह)

माहिती तंत्रज्ञान अधिकारी (स्केल-२)

  • वयोमर्यादा ही किमान २१ वर्षे, कमाल ३० वर्षे आहे. २) शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान या विषयातील पदवी वा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक. किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.

विधी (लॉ) अधिकारी (स्केल – २)

  • वयोमर्यादा – किमान २० वर्षे, कमाल ३० वर्षे.
  • शैक्षणिक पात्रता – विधी विषयातील पदवी आवश्यक. किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक

चार्टड अकाऊंटन्ट (स्केल -२)

  • वयोमर्यादा हि किमान 21 वर्षे, कमाल 30 वर्षे.
  • शैक्षणिक पात्रता – सी.ए.

फायनान्स एक्झिक्युटिव्ह (स्केल -२)

  • वयोमर्यादा ही किमान २५ वर्षे, कमाल ३० वर्षे आहे.
  • शैक्षणिक पात्रता – एम.बी.ए. किंवा पी.जी.डी.बी.एम. (ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त) अनुभव – फायनान्शियल इन्स्टिटयूट किंवा बँकेत इंडस्ट्रीयल प्रोजेक्टसचे क्रेडिट. ॲपरायझल करण्याचा कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

पणन (मार्केटिंग) अधिकारी

  • वयोमर्यादा – किमान २० वर्षे, कमाल ३० वर्षे.
  • शैक्षणिक पात्रता – एम.बी.ए. (मार्केटिंग) किंवा २ वर्षांचा पी.जी.डी.बी.एम / पी.जी.डी.बी.ए. किंवा मार्केटिंग मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी वा पदविका अभ्यासक्रम आवश्यक.

परिक्षा पॅटर्न

आय. बी. पी. एस. हि संस्था सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने भरवते. परिक्षा ही तीन टप्प्यात भरवली जाते. पूर्व परिक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

पूर्व परिक्षा –

  • पूर्व परीक्षा ही १०० गुणांची घेतली जाते. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ पद्धतीचे असून परीक्षा संगणकावर ऑनलाइन घेतली जाते. खालील तीन विषयांवर प्रत्येकी एकूण १०० गुणांचे प्रश्न विचारले जातात. परिक्षेसाठी १ तासाचा कालावधी असतो. इंग्रजी भाषा (३० प्रश्न), क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्युड (३५ प्रश्न), टेस्ट ऑफ रिझनिंग (३५ प्रश्न) ह्या विषयांवर पेपर असतो.

पूर्व परीक्षेतून एकूण जागांच्या २० पट उमेदवारांची निवड मुख्य परिक्षेसाठी केली जाते.

मुख्य परीक्षा –

  • मुख्य परीक्षेमध्ये २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असते. ही प्रश्नपत्रिका ऑनलाईन (संगणकीकृत) असते. यासाठी कालावधी २ तासांचा असतो. पुढील पाच विषयांवर प्रश्न विचारले जातात. इंग्रजी भाषा – (४० प्रश्न – ४० गुण), सामान्य ज्ञान – (४० प्रश्न – ४० गुण), क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्युड – ( ५० प्रश्न – ५० गुण), टेस्ट ऑफ रिझनिंग (५० प्रश्न – ५० गुण), कॉम्प्युटर नॉलेज – (२० प्रश्न – २० गुण) पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग ही पध्दत वापरली जाते. एक चतुर्थांश म्हणजेच ०.२५ इतके गुण चुकीच्या उत्तरासाठी कमी केले जातात.

मुलाखत –

अंतिम निवड हि मुलाखतीवर ठरते. लेखी परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी एकूण १०० गुण असतात. खुल्या वर्गातील उमेदवाराला मुलाखतीमध्ये किमान ४० टक्के तर राखीव वर्गातील उमेदवाराला किमान ३५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे मुख्य परीक्षेतील गुणांना ८० टक्के वेटेज असेल तर मुलाखतीतील गुणांना २० टक्के वेटेज असेल. मुख्य परीक्षा व मुलाखतीतील एकत्रिक गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाते.

लिपिक पदासाठी मुलाखत घेतली जात नाही. त्यासाठी संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असतं. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील वर्ड एक्सेल, पॉवरपॉइंट आदी सॉफ्टवेअर वापरता येणेही गरजेचे असते. मार्केटिंगचे स्किल असणे हे आता आवश्यक झाले आहे.

अभ्यासक्रम – bank exam syllabus in marathi

आय. बी. पी. एस. परीक्षेसाठी विषय हे पूर्व परीक्षेसाठी वेगळे व मुख्य साठी वेगळे असतात. पूर्व परिक्षेसाठी इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी ( तर्क करणे) आणि गणित ( परिमाणात्मक दृष्टीकोन ) हे विषय असतात. पण त्यांची काठिण्य पातळी वाढत जाते. मुख्य परीक्षेला हे तीन विषय असतातच परंतु त्या व्यतिरिक्त आणखीन काही विषय ह्यात समाविष्ट होतात. तर्क क्षमता आणि संगणक योग्यता, परिमाणात्मक दृष्टीकोन, इंग्रजी भाषा आणि सामान्य / आर्थिक जागरूकता हे विषय मुख्य परीक्षेला विचारले जातात.

पुस्तके

  • इंग्रजी विषयासाठी पुस्तके
  • औब्जैकटिव इंग्लिश – एडगर थोरपे, पियर्सन (2013)
  • औब्जैकटिव जनरल इंग्लिश – आर.एस. अग्रवाल,
  • विकास अग्रवाल, एस चंद (2011)
  • वर्ड पावर मेड ईज़ी – नॉर्मन लुईस पेंगुइन
  • हाई स्कूल
  • अंग्रेजी व्याकरण और रचना – रेन और मार्टिन, एस चंद
  • आवश्यक व्याकरण उपयोग (तीसरा संस्करण रेमंड मर्फी कैंब्रिज विश्वविद्यालय
  • प्रेस – नई दिल्ली
  • वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी इंग्रजी प्रतियोगी परीक्षा
  • (5 वे संस्करण) – हरि मोहन प्रसाद,
  • उमा रानी सिन्हा, मैकग्रा हिल एजुकेशन.
  • गणित ( परिमाणात्मक दृष्टीकोन )
  • मात्रात्मक योग्यता परीक्षण – एन.के. सिंह, उपकार प्रकाशन (2010)
  • प्रतियोगी परीक्षांसाठी मात्रात्मक योग्यता
  • (17 वें संस्करण) – आर.एस. अग्रवाल, एस चंद (2012)
  • फास्ट ट्रैक ऑब्जेक्टिव अरिथमेटिक
  • ( पूर्णपणे संशोधित संस्करण) – राजेश वर्मा, अरिहंत.
  • बुद्धिमत्ता चाचणी ( तर्क क्षमता )
  • रीजनिंग टेस्ट – एडगर थोरपे, पियर्सन
  • वर्बल आणि गैर-मौखिक तर्क साठी एक आधुनिक दृष्टिकोण
  • (संशोधित संस्करण) – आर.एस. अग्रवाल, एस चंद
  • बैंक पीओ / एमटी परीक्षा अभ्यास कार्यपुस्तिका – विशेषज्ञ संकलन, अरिहंत.
  • याव्यतिरिक्त काही ऑनलाईन मटेरियल सुद्धा उपलब्ध असते जसे यूट्यूब किंवा स्टडी ॲप्लिकेशन वगैरे.

आय. बी. पी. एस. ही जशी परीक्षा घेते त्यामधे SBI बँक सोडली तर बाकी सगळ्या बँका समाविष्ट आहेत. Sbi हि बँक स्वतः वैयक्तिक त्यांच्या बँकेसाठी ह्या सर्व परीक्षा जशाचा तशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करते व त्याद्वारे त्यांची निवड करते.

आयबीपीएस लिपिक भरती 2021: परीक्षेचा सारांश

ऑर्गनायझेशनइंस्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस)
पोस्टलिपिक (Cleark)
रिक्तता3000+
सहभागी बँका11
परीक्षा मोडऑनलाइन
भरती प्रक्रियाप्रीलिम्स + मुख्य परीक्षा
वय मर्यादा20 वर्षे ते 28 वर्षे (01.07.2021 रोजी)
अर्ज फीअनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी- रु .१75.

सामान्य व इतर- रु. 850

ऑनलाईन परीक्षा Pre– 28 ऑगस्ट 29, 29 आणि सप्टेंबर 4, 5, 2021
ऑनलाईन परीक्षा – Mains31 ऑक्टोबर 2021

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेलच, IBPS परीक्षा ibps exam information in marathi language कशी असते? त्याचे स्वरूप व पात्रता काय आहे? त्याचा अभ्यासक्रम काय आहे ? पेपर कोणते व किती मार्क्स चे असतात महत्वाची पुस्तके कोणती आहेत या सर्वाचे थोडक्यात मार्गदर्शन केले गेले आहे. ibps exam information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच ibps full form in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही IBPS परीक्षेविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या ibps course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही mpsc information in marathi pdf त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!